राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, June 7, 2023

प्रा.विठ्ठलराव पाचारणे आणि डॉ. दिलीप शिरसाठ यांना विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्काराचे जाहीर १० जुन रोजी होणार पुरस्काराचे वितरण ?

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
येथील बोरावके नगरमधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे स्व.ॲड.रावसाहेब शिंदे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त (१० जून २०२३ रोजी) रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व बोरावके कॉलेजचे सेवानिवृत्त प्रा. विठ्ठलराव पाचारणे.
यांना स्व. ॲड,रावसाहेब शिंदे स्मृती
जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कार आणि सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दिलीप शिरसाठ यांना डॉ.वा.ग.तथा डॉ. बाबासाहेब कल्याणकर स्मृती धन्वनतरी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहे, सदरील पुरस्कार हे दि.१० जुन २०२३ रोजी वितरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी दिली. 
 शनिवार दि. १० जून २०२३ रोजी सकाळी १० वाजता महादेव मळा येथील विद्यानिकेतन शाळेत पुरस्कार वितरणसोहळा आयोजित करण्यात आला आहे. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य डॉ. राजीव रावसाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रा. डॉ. सदाशिव कदम उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी. ई. शेळके, मार्गदर्शक व समन्वयक डॉ. बाबुराव उपाध्ये, संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे आदिंनी केले.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

जबरी चोरीच् करुन पळल्याला या गुन्ह्यातील फरार संशयित पोलीसांच्या ताब्यात ?

नाशिक - प्रतिनिधि - समाचार -

नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाणे कार्य हद्दीत झालेल्या जबरी चोरीच्या घटनेतील फरार होऊन गेलेला संशयिताला खंडणी विरोधी पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून आणखी काही गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपासासाठी त्याला आडगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे...
रविंद्र दिलीप गांगुर्डे (३५, व्यवसाय- पेंन्टींग कॉन्ट्रॅक्टर, रा. बिल्डींग नंबर २, रूम नंबर ६३, निलगीरी बाग, यश लॉन्ससमोर, औरंगाबाद रोड, नाशिक ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहरात घडलेल्या गंभीर गुन्हयातील पाहीजे आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार चोरट्याला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर आडगांव पोलीस ठाण्यात भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गांगुर्डे हा गुन्हा घडल्या पासुन पसार होता. खंडणी विरोधी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार समांतर तपास करीत होते.
.संशयित गांगुर्डे हा दि. 5 मे रोजी नांदुर नाका, औरंगाबाद रोड, नाशिक येथे येणार असल्याची माहिती पोलीस अंमलदार विठ्ठल चव्हाण यांना मिळाली होती. त्या प्रमाणे खंडणी विरोधी पथकाने सापळा लावुन गांगुर्डेला शिताफीने ताब्यात घेतले. तर पुढील तपास व कारवाई साठी आडगांव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगिरी खंडणी विरोधी पथकातील सपोनि प्रविण सुर्यवंशी, श्रेपोउनि दिलीप भोई, सपोउनि दिलीप सगळे, पो. हवा. किशोर रोकडे, राजेश भदाने, पो.ना. योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर पो. अंमलदार विठ्ठल चव्हाण, स्वप्नील जुंद्रे, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, चारूदत्त निकम व मपोशि. सविता कदम यांच्या पथकाने केली.

---------------------------------------------------
===================================
 : - सह.संपादक,रंजित बतरा'"शब्द'"रचना संकलन...वार्ता...✍️✅️🇮🇳...
===================================
----------------------------------------------------

Tuesday, June 6, 2023

मालुंजा बुद्रुक ग्रामपंचायत घरकुलांच्या कामांचादर्जा जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतीं साठी आयडॉल ठरेल माजी आमदार मुरकुटे ?

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

तालुक्यातील मालुंजा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सध्या गावात सुरू असलेली विविध विकासकामे प्रगतीपथावर असून कामाचा दर्जा व गुणवत्ता उत्त्कृष्ठ आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या २८ घरकुलांच्या कामांचा दर्जा जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी आयडॉल ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले. 
श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ तसेच मसाला मेकींग कोर्सच्या महिला प्रशिक्षणार्थींना शसकीय प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मुरकुटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे संचालक सचिन गुजर होते. व्यासपीठावर अशोक कारखान्याचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, संचालक प्रफुल्ल दांगट, ज्ञानेश्वर कोकणे, सौ.मंजुश्री मुरकुटे, अशोक बँकेचे उपाध्यक्ष ऍड.सुभाष चौधरी, उद्योजक जितेंद्र तोरणे, नेताजी फौंडेशनचे अध्यक्ष रणजित बनकर मसाला मेकिंग कोर्सच्या ट्रेनर विद्या क्षिरसागर, सहाय्यक दिपाली बनकर, लाडगाव सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय भांड, राधाकिसन भांड आदी मान्यवर उपस्थित होते. 
श्री.मुरकुटे पुढे बोलताना म्हणाले, मालुंजा बुद्रुक गावात सध्या सुरू असलेली घरकुल योजना ही कामाचा दर्जा व गुणवत्तेच्या आधारावर जिल्ह्यात अव्वल ठरत असून सध्या गावात सुरू असलेली विविध विकासकामे कौतुकास्पद असून जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींचा विचार करता मालुंजा बुद्रुक ग्रामपंचायत जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी आयडॉल ठरेल, असा ठाम विश्वास मुरकुटे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी संचालक सचिन गुजर, संचालिका मंजुश्री मुरकुटे, उद्योजक जितेंद्र तोरणे, सरपंच अच्युतराव बडाख आदींची भाषणे झाली. सौ.मंजुश्री मुरकुटे यांच्या हस्ते मसाला मेकिंग कोर्समध्ये सहभागी झालेल्या सुमारे शंभर महिलांना शासकीय प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. 
प्रास्ताविकात सरपंच अच्युतराव बडाख म्हणाले, मालुंजा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील बेघर नागरिकांना जागा उपलब्ध करून देवून २८ घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरीत भूमिहीन घरकुल लाभधारकांना जागा उपलब्ध करून देवून संबंधितांनाही घरकुले देणार आहेत. गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ‘हर घर नळ’ ही योजना लवकरच कार्यान्वित करणार आहे. कार्यक्रमप्रसंगी सरपंच अच्युतराव बडाख, उपसरपंच सखाहरी शेंडगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबुराव बडाख, आण्णासाहेब बडाख, आशाताई बडाख, मिराताई बडाख, दत्तात्रय जाधव, किरण गायकवाड, उज्वला बडाख, अरुण बर्डे, किसन तात्या बडाख, नामदेवराव बडाख, भाऊसाहेब बडाख, अशोक बोरुडे, हरिभाऊ बडाख, चांगदेव बडाख, ऍड.कचेश्‍वर बडाख, रमेशराव बडाख, मधुकर थाोरात, बाळासाहेब बडाख, किशोर बडाख, संजय बडाख, रामभाऊ काळे, सुधीर बडाख, ज्ञानेश्वर बडाख, प्रभाकर बडाख, रामकृष्ण गुंजाळ, श्रीधर रिंगे, पोपट बोरुडे, सुंदर गायकवाड, सचिन बडाख, राधाकृष्ण बडाख, बाळासाहेब भळगट, किरण बडाख, गणेश बडाख, सोपान चव्हाण, दादासाहेब बडाख, नामदेव बोरुडे, सुधाकर बडाख, नामदेव तांबे,माणिक नवथर, सोपान विटकरे, डॉ.शेख, मुन्ना बोरुडे, गोपीनाथ गायकवाड, बाबासाहेब बडाख, सुनील थोरात, आबासाहेब बडाख, अजित बडाख, अशोक भांड, तुकाराम रिंगे, शंतनू डावरे, रावसाहेब क्षिरसागर, जनार्दन बडाख, इब्राहीम शेख, रेखाताई रिंगे, दुर्गाताई कलंके, सुरेखा बडाख, रेखा बडाख, शोभाताई बडाख, गायत्री बडाख, चंद्रकला बडाख, सीमा बडाख, पुष्पा परदेशी, वर्षा जोशी, उषाताई बडाख, शितल बडाख, भारती भणगे, अश्विनी गायकवाड, गायत्री झिंझुर्डे, कविता बडाख, राधिका बडाख, प्रियंका बडाख, वंदना बडाख, सविता बडाख, सोनम कलंके आदींसह महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक सरपंच अच्युतराव बडाख, सूत्रसंचालन आबा कुमावत यांनी तर आभार उपसरपंच रावसाहेब शेंडगे यांनी मानले.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

श्रीरामपूर शहर व तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद व्हावे याकरीता छावा स्वराज्य रक्षक सेना, आरपीआय (आंबेडकर) भिम गर्जना संघटनेचे उपोषण ?


(श्रीरामपूर) - प्रतिनिधि - समाचार श्रीरामपूर तालुक्यात सुरू असलेले सर्व अवैध व्यवसाय बंद व्हावे याकरीता छावा स्वराज्यरक्षक सेना,भीम गर्जना सामाजिक संघटना,रिपाई (आंबेडकर) यांचे लक्षवेधी उपोषणाची आज पासून सुरुवात करण्यात आली आहे.  
श्रीरामपूर) - प्रतिनिधि - समाचार
श्रीरामपूर तालुक्यासह शहरातील सुरु असलेले सर्वच अवैध व्यवसाय बंद व्हावेत यासाठी आज पासून येथील मेनरोडवरील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर छावा स्वराज्यरक्षक सेना,भीम गर्जना सामाजिक संघटना, रिपाई (आंबेडकर) यांच्यावतीने संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून लक्ष केंद्रित करण्यासाठी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे.
 या उपोषणास अनेक सामाजिक संघटना आणी कार्यकर्त्यांचा पाठिंबा व समर्थन मिळत आहे. या लाक्षणिक उपोषणास छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख,भीम गर्जना सामाजिक संघटनेचे फिरोजभाई पठाण,छावा स्वराज्यरक्षक सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश भोसले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर)चे युवा जिल्हाध्यक्ष रॉकी लोंढे आदि उपोषणास बसले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आधार दिव्यांग संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राम डमाले, तालुकाध्यक्ष भारत चौधरी, शहराध्यक्ष सुमित रहिले, रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष अशोक गडवे,राष्ट्रीय युवा क्रांती सेना अध्यक्ष विकास जगधने, भीम गर्जना शाखा हरेगाव,नेल्सन कदम, राहुरी तालुकाध्यक्ष छावा स्वराज्यरक्षक सेना तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व जागरुक नागरीकांनी पाठिंबा दिला दर्शविला आहे.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

Monday, June 5, 2023

ATM चोरून कॅबिन मधुल पळवलं अन् पुढे अस घडलं ?

नाशिक - प्रतिनिधि - वार्ता -
लासलगाव-विंचूर रोडवरील ॲक्सिस बँकेतील एटीएम  मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडून चक्क ते मशीन एर्टिका गाडीतून पळवून नेण्याचा अयशस्वी प्रयत्न फसल्याची घटना सोमवार (दि. ०५) रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. हा चोरीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी एटीएम मशीन ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लासलगाव-विंचूर रोडवर ॲक्सिस बँक असून त्या बँकेचे एटीएम मशीन बँके लगतच्या गाळ्यात आहे. सोमवार (दि. ०५) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी  सदर एटीएम मशीन फोडले व त्यातील अंदाजे १५ लाख रुपयांसह संपूर्ण मशीन सोबत आणलेल्या एर्टिका क्रमांक (एम. एच. १५ ए. झेड ०५७) या गाडीतून पळवून नेले. त्यानंतर ही घटना अॅक्सिस बँकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात कार्यान्वित असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाल्याने बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सदर घटनेची माहिती लासलगाव पोलिसांना फोनद्वारे दिली.
यानंतर लासलगाव पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तातडीने नाकाबंदी करून जलदगतीने तपासाची चक्र फिरवली. यावेळी पोलिस नाईक योगेश शिंदे, पोलिस कर्मचारी सुजित बारगळ यांनी एका खाजगी गाडीद्वारे सदर चोरट्यांचा पाठलाग केला असता चोरट्यांनी एटीएम मशीन नाशिक-औरंगाबाद रोडवरील बोकडदरे शिवारात पोलिसांच्या खाजगी गाडीच्या दिशेने फेकून देत सदर ठिकाणाहून पळ काढला.
त्यानंतर पोलिसांनी एटीएम मशीन व त्यातील अंदाजे
१४,८९,४०० लाख रुपये रोख रक्कम घटनास्थळावरून ताब्यात घेतली असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आहे. तर घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस कर्मचारी प्रदीप अजगे, कैलास महाजन, ए एस आय नंदकुमार देवडे,हवालदार देवा पानसरे, होमगार्ड पगारे घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान, याप्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे. तसेच या घटनेनंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, निफाड उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

-----------------------------------------------------
===================================--
: - टीप...प्रभावशैली...(वेब)...पाहण्यासाठी झूम 🔎🔍 चा वापर करा...
===================================
----------------------------------------------------






Sunday, June 4, 2023

.......युपी योद्धा कबड्डी संघात मराठमोळा बचाव पट्टू अजित पवार यांची निवड ?

श्रीरामपूर - प्रतिनिधि -वार्ता -
मराठमोळ्या मातीतील खेळ म्हणजे कबड्डी.भारतासह पाकिस्तान,बांगलादेश,श्रीलंका, इराण,जपान,थायलंड,दक्षिण कोरिया या आशियाई देशांमध्येही आता कबड्डी हा खेळ लोकप्रिय झाला आहे. कबड्डी खेळाला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून देण्याचं काम प्रो कबड्डीनं (PKL) केलं आहे. पीकेएलचा दहावा सिझन सुरू होणार आहे. दहाव्या सिझनसाठी युपी योद्धा संघाची बचाव फळीची भिस्त ही मराठमोळ्या कबड्डीपटू अजित पवारवर याच्यावर असणार आहे.
अजित पवार हा श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव गावचा आहे.
सुरुवातीला गावामध्ये यात्रेत कुस्ती हा खेळ खेळला जायचा. यात्रेमध्ये कुस्ती बघत बघत कुस्ती खेळणं सुरू केले.७ वीला असताना शाळेमध्ये कबड्डी खेळाचा सराव मुले करत असत. पवारने देखील कबड्डीचा सराव
करायला सुरुवात केली. सुरुवातीला खेळत असताना अनेक प्रकारच्या इजा देखील झाल्या.टी-शर्ट व शॉट घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे देखील नव्हते. मित्रांकडून पैसे घेऊन कबड्डी खेळण्यासाठी किट घेतले.त्याचे कबड्डी खेळणे त्याच्या आई- वडिलांना आवडत नसे,यासाठी त्याला लहानपणी कधी कधी मार खावा लागला.१० वी असताना त्याचा शाळेचे शिक्षकाने सांगितलं की टाकळीभान येथे आझाद क्रीडा मंडळ क्लब आहे,त्या क्लब मध्ये तू सरावासाठी जात जा.सन २०१४-१५ साली कबड्डी प्रशिक्षक श्री रवि गाढे यांचा आजाद क्रीडा मंडळ या क्लब कडून त्याने खेळायला सुरुवात केली व त्याच्या कबड्डी करिअरमध्ये यशाचा आलेख उंचावत गेला.
अजित पांडुरंग पवार यांची कारकीर्द
अजित पवारने २०१३-१४ पासून कबड्डी खेळायला सुरुवात केली. आझाद क्रीडा मंडळ या क्लब कडून खेळायला सुरुवात केल्यानंतर पवारने शालेय स्पर्धेत सहभाग घ्यायला सुरुवात केली.१६ वर्षे वयोगट व १९ वर्ष वयोगट या वयोगटात त्यांनी तालुका,जिल्हा,विभागीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.सन २०१९ मध्ये प्रथमच तो राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी पात्र ठरला.यानंतर त्याने मागे वळून बघितलंच नाही. व्यावसायिक,खाजगी स्पर्धेमध्ये सहभाग घेत अनेक स्पर्धेमध्ये त्याचा उत्कृष्ट बचाव पट्टू म्हणून सन्मान करण्यात आला.सन २०२२-२३ मध्ये ७० व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना दुसरा क्रमांक मिळाला.सन २०२२-२३ मध्ये पुन्हा त्याला महाराष्ट्र ऑलिंपिक कबड्डी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.सन २०२२-२३ जबलपूर येथे झालेल्या विद्यापीठ स्पर्धेमध्ये भारतीय विद्यापीठाचे त्यांने नेतृत्व केले.महाराष्ट्रात नव्हे तर देशातील विविध भागांमध्ये व्यवसायिक तसेच शासकीय स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला.या सुरेख कामगिरीवर महिंद्रा व महिंद्रा कंपनीने त्याला करारबद्ध केले आहे.शिर्डी,जळगांव,नाशिक,पुणे,मुंबई तसेच महाराष्ट्रातील विविध भागातील स्पर्धेमध्ये त्याला स्पर्धेचा उत्कृष्ट बचाव पट्टू म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली सन २०२२-२३ मध्ये आयोजित झालेल्या क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा सिरीज कबड्डी स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला. अहमदनगर जिल्ह्याचे कर्णधारपद त्यांनी भूषवले आहे.६४ टाकल पॉईंट घेऊन तो स्पर्धेतील उत्कृष्ट बचावटू म्हणून त्याचा गौरव करण्यात आला.
आझाद क्रीडा मंडळामुळे यश
ग्रामीण भागामध्ये टाकळीभान गावी आझाद क्रीडा मंडळ हा कबड्डीचा एक नामांकित क्लब आहे.तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील अनेक भागांमधून मुले या ठिकाणी कबड्डीच्या सरावासाठी येतात.पवारने देखील याच क्लब मध्ये सराव करण्यास १० वर्षांपूर्वी सुरुवात केली. अनेक राष्ट्रीय,राज्य खेळाडून सोबत सराव करत त्याने आपला खेळ उंचावला.क्लबचे प्रशिक्षक रवी गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रत्येक भागांमध्ये कबड्डी स्पर्धेत सहभागी झाला. जास्त स्पर्धा सहभागामुळे व्यावसायिक खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू,राष्ट्रीय खेळाडू यांच्याबरोबर खेळत असताना त्याचा खेळ उंचावला व सीजन १० साठी त्याची युपी योद्धा संघात प्रो कबड्डी लीग साठी निवड झाली.

(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))

कोरोन मंडळ रेल्वे भयंकर अपघात विषय : दोषींवर कठोर कारवाई करणार- पंतप्रधान मोदी ?

(नवी दिल्ली) - न्यूज - एजन्सी -

ओडिशामधील (Odisha) बालासोर (Balasore) येथील बहनागा बाजार स्टेशनजवळ तीन रेल्वेत झालेल्या विचित्र अपघातात (Train Accident) २८८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या रेल्वे अपघातानंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत बचावकार्याचा आढावा घेतला.....
यावेळी पंतप्रधान मोदींनी  रुग्णालयात जाऊन जखमींची  विचारपूस केली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "ही दुर्दैवी घटनाअसून मनाला विचलित करणारा अपघातआहे.जखमींच्या उपचारासाठी सरकार कोणतीही कसरसोडणार नाही. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यूझाला, त्यांना परत आणू शकत नाही. पण, सरकार कुटुंबीयांच्या दुखा:त सहभागी आहे." असेमोदींनी म्हटले.
मोदी पुढे म्हणाले की, सरकारसाठी ही घटना अत्यंत गंभीर असूनप्रत्येक कोनातून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असून त्यांना सोडणार नाही. या घटनेनंतर ओडिशा सरकार आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या संसाधनांच्या माध्यमातून लोकांची मदत केली. तसेच येथील नागरिकांनाही देखील संकटकाळात रक्तदान आणि बचावकार्याचे काम केल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
------------------------------------------------------------------------
=====================================
सह...संपादक...रंजित...बतरा...शब्द रचना संकलन...✍️✅️🇮🇳...
=====================================
------------------------------------------------------------------------