श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
तालुक्यातील मालुंजा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सध्या गावात सुरू असलेली विविध विकासकामे प्रगतीपथावर असून कामाचा दर्जा व गुणवत्ता उत्त्कृष्ठ आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या २८ घरकुलांच्या कामांचा दर्जा जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी आयडॉल ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ तसेच मसाला मेकींग कोर्सच्या महिला प्रशिक्षणार्थींना शसकीय प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मुरकुटे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे संचालक सचिन गुजर होते. व्यासपीठावर अशोक कारखान्याचे उपाध्यक्ष पुंजाहरी शिंदे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, संचालक प्रफुल्ल दांगट, ज्ञानेश्वर कोकणे, सौ.मंजुश्री मुरकुटे, अशोक बँकेचे उपाध्यक्ष ऍड.सुभाष चौधरी, उद्योजक जितेंद्र तोरणे, नेताजी फौंडेशनचे अध्यक्ष रणजित बनकर मसाला मेकिंग कोर्सच्या ट्रेनर विद्या क्षिरसागर, सहाय्यक दिपाली बनकर, लाडगाव सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय भांड, राधाकिसन भांड आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री.मुरकुटे पुढे बोलताना म्हणाले, मालुंजा बुद्रुक गावात सध्या सुरू असलेली घरकुल योजना ही कामाचा दर्जा व गुणवत्तेच्या आधारावर जिल्ह्यात अव्वल ठरत असून सध्या गावात सुरू असलेली विविध विकासकामे कौतुकास्पद असून जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींचा विचार करता मालुंजा बुद्रुक ग्रामपंचायत जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी आयडॉल ठरेल, असा ठाम विश्वास मुरकुटे यांनी व्यक्त केला. याप्रसंगी संचालक सचिन गुजर, संचालिका मंजुश्री मुरकुटे, उद्योजक जितेंद्र तोरणे, सरपंच अच्युतराव बडाख आदींची भाषणे झाली. सौ.मंजुश्री मुरकुटे यांच्या हस्ते मसाला मेकिंग कोर्समध्ये सहभागी झालेल्या सुमारे शंभर महिलांना शासकीय प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
प्रास्ताविकात सरपंच अच्युतराव बडाख म्हणाले, मालुंजा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील बेघर नागरिकांना जागा उपलब्ध करून देवून २८ घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरीत भूमिहीन घरकुल लाभधारकांना जागा उपलब्ध करून देवून संबंधितांनाही घरकुले देणार आहेत. गावातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून पाणी शुद्धीकरण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ‘हर घर नळ’ ही योजना लवकरच कार्यान्वित करणार आहे. कार्यक्रमप्रसंगी सरपंच अच्युतराव बडाख, उपसरपंच सखाहरी शेंडगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबुराव बडाख, आण्णासाहेब बडाख, आशाताई बडाख, मिराताई बडाख, दत्तात्रय जाधव, किरण गायकवाड, उज्वला बडाख, अरुण बर्डे, किसन तात्या बडाख, नामदेवराव बडाख, भाऊसाहेब बडाख, अशोक बोरुडे, हरिभाऊ बडाख, चांगदेव बडाख, ऍड.कचेश्वर बडाख, रमेशराव बडाख, मधुकर थाोरात, बाळासाहेब बडाख, किशोर बडाख, संजय बडाख, रामभाऊ काळे, सुधीर बडाख, ज्ञानेश्वर बडाख, प्रभाकर बडाख, रामकृष्ण गुंजाळ, श्रीधर रिंगे, पोपट बोरुडे, सुंदर गायकवाड, सचिन बडाख, राधाकृष्ण बडाख, बाळासाहेब भळगट, किरण बडाख, गणेश बडाख, सोपान चव्हाण, दादासाहेब बडाख, नामदेव बोरुडे, सुधाकर बडाख, नामदेव तांबे,माणिक नवथर, सोपान विटकरे, डॉ.शेख, मुन्ना बोरुडे, गोपीनाथ गायकवाड, बाबासाहेब बडाख, सुनील थोरात, आबासाहेब बडाख, अजित बडाख, अशोक भांड, तुकाराम रिंगे, शंतनू डावरे, रावसाहेब क्षिरसागर, जनार्दन बडाख, इब्राहीम शेख, रेखाताई रिंगे, दुर्गाताई कलंके, सुरेखा बडाख, रेखा बडाख, शोभाताई बडाख, गायत्री बडाख, चंद्रकला बडाख, सीमा बडाख, पुष्पा परदेशी, वर्षा जोशी, उषाताई बडाख, शितल बडाख, भारती भणगे, अश्विनी गायकवाड, गायत्री झिंझुर्डे, कविता बडाख, राधिका बडाख, प्रियंका बडाख, वंदना बडाख, सविता बडाख, सोनम कलंके आदींसह महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक सरपंच अच्युतराव बडाख, सूत्रसंचालन आबा कुमावत यांनी तर आभार उपसरपंच रावसाहेब शेंडगे यांनी मानले.
(((समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर)))