राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, September 13, 2023

*अशोक' च्या माध्यमातून दरवर्षी श्रीरामपूरच्या बाजापेठेत ६०० कोटी रुपयांची उलाढाल*

*श्रीरामपूर मर्चन्ट असोसिएशनच्या नूतन संचालकांचा माजी आ.मुरकुटे यांचे हस्ते सत्कार*

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

अशोक कारखाना माध्यमातून श्रीरामपूरच्या बाजारपेठेमध्ये ऊस पेमेंट, कामगारांचे पगार, बोनस, साखर विक्री, ऊस तोडणी मजूर व वाहतूकदार यांचे पेमेंट इत्यादीच्या माध्यमातून शहराच्या बाजारपेठेत दरवर्षी सुमारे ६०० कोटी रुपयांची उलाढाल होते. अशोक कारखाना ही तालुक्याची एकमेव कामधेनू असून त्यामुळे श्रीरामपूर तालुक्याच्या बाजारपेठेला संजीवनी मिळाली आहे. श्रीरामपूर मर्चंन्ट असोसिएशनचे नवीन संचालक मंडळ हे होतकरु, अभ्यासू व कार्यक्षम असल्याने असोसिएशनची भरभराट होईल. तसेच व्यापाऱ्यांचे प्रश्नही मार्गी लागतील, असा विश्वास अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी व्यक्त केला.
श्रीरामपूर मर्चंट असोसिएनच्या नूतन संचालकांचा सत्कार माजी आ.श्री.मुरकुटे यांचे हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष राहुल मुथा, नुतन संचालक संजय कासलीवाल, अनिल लुल्ला, गौतम उपाध्ये, धर्मेश शाह, नाना नागले, प्रेमचंद कुंकूलोळ, कल्याण कुंकूलोळ, बाळासाहेब खाबिया यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारत राष्ट्र समिती पक्षाचे तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे, अशोक कारखान्याच्या संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, शहर अध्यक्ष नाना पाटील, सचिव गणेश भाकरे, शेतकरी सेवा केंद्राचे अमोल कोलते, अशोक बँकेचे संचालक जितेंद्र तोरणे, प्रमोद करंडे, सौ.शालिनी कोलते, संजय मोरगे, पंकज देवकर, संजय वेताळ, अन्वर शेख आदी उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*भारत राष्ट्र समिती आणी समविचारी पक्ष**संघटनांची शनिवारी श्रीरामपूरात आढावा बैठक*


श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

पुढे होवू घातलेल्या लोकसभा, विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद,पंचायत समिती, ग्रामपंचायत आदि निवडणुकीकरीता सर्वांना सोबत घेवून रणनिती आखण्यासाठी 
शनिवार दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता भारत राष्ट्र समिती, शेतकरी संघटना आणी समचारी पक्ष व संघटनांची बैठक येथील संगमनेर रोडवरील व्हीआयपी गेस्ट हाऊस या ठिकाणी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती बी आर एस चे जिल्हा समन्वयक अशोकभाई बागुल यांनी दिली.
या बैठकीत भारत राष्ट्र समिती श्रीरामपूर व शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्याच्या पुढील वाटचालीसाठी व राजकीय परिवर्तनाच्या दृष्टीने आढावा बैठक आयोजित केली आहे या बैठकीत लोकसभा निवडणूक विधानसभा नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत होणाऱ्या निवडणुकीत कसा सहभाग घ्यावा कशा पद्धतीने निवडणूक लढवाव्यात करिता समविचारी पक्षांना संघटना बरोबर घेऊन काम करायचे आहे यासाठी शेतकरी संघटना विर लहुजी सेना, हिंदू एकता आंदोलन, छावा संघटना, एकलव्य सामाजिक संघटना, वाल्मिकी समाज एकता परिषद संघटना एकत्रित येऊन आपले विचार मांडणार आहे निवडणुकी बाबत पुढील वाटचाल ध्येय धोरणे ठरवणार आहे यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने ॲड.अजित काळे हायकोर्ट व राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना आणी बी आर एस चे जिल्हा समन्वयक अशोकभाई बागुल छावा संघटनेचे ॲड.सुभाष जंगले हिंदू एकता आंदोलन चे सुदर्शन शितोळे, वीर लहुजी सेनेचे हनीफ पठाण, बाळासाहेब बागुल, एकलव्य संघटनेचे शिवाजी गांगुर्डे, वाल्मिकी समाज एकता परिषदेचे अर्जुन आठवल इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत 
या बैठकीत भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न होणार असून पक्षाची भूमिका तेलंगणातील प्रगतीचा आढावा घेणार आहोत तसेच शेतकऱ्याचे प्रश्न पीक विमा कर्जमाफी सत्तेचे कर्ज वसुली पाट पाणी नियोजन शेतीची लाईट श्रीरामपूर तालुका दुष्काळ ग्रस्त करावा इत्यादी मागण्या सह निवडणुका हा विषय महत्त्वाचा आहे यासाठी जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना अनिल औताडे, युवराज जगताप, ॲड. सर्जेराव घोडे, अण्णासाहेब डावखर, गंगाधर पाटील चौधरी, बाळासाहेब थोरात, पंकज थोरात, साहेबराव चोरमल, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते उपस्थित राहणार आहेत तसेच श्रीरामपूर शहर व तालुक्यातील झोपडपट्टी धारकांचा प्रश्न, रस्ते, गटारी, अतिक्रमण नियमित करून त्यांना सात बाराचे उतारे देण्यात यावेत. आहे त्या जागेवर घरकुले मंजूर करण्यात यावी, श्रीरामपूर शहराची झालेली दुर्दशा नागरिकांचे विविध प्रश्न यावर काय उपाययोजना करता येतील त्यासाठी चर्चा करून, माहिती घेऊन पुढील रूपरेषा ठरवणे, राजनीती ठरवणे,उत्सुक उमेदवार ठरविणे यासाठी सर्व राजकीय नेते कार्यकर्ते संघटना यांनी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देविदास पंडित,विलास साळवे, संतोष गायकवाड, लहानू त्रिभुवन, भीमराज दिवे, मधुकर लांडे, सुभाष हळनोर, रावसाहेब पवार, प्रवीण साळवे, बाळासाहेब दुधाळ ,ल बा कोल्हे, शिवाजी गोसावी, दत्तात्रय पाटील बडाख, बाळासाहेब जगताप,अन्वर शेख अशोक गायकवाड, रवी गायकवाड, हनुमंत पाटील खरात, अर्जुन पाटील खरात, राजू भगत, चंदू पाटील फोपसे, रवी भोसले, अशोक लोंढे, रावसाहेब मगर, दिलीप त्रिभुवन, एकनाथ रणनवरे, नामदेव कांबळे, एफ एम वाघमारे, लक्ष्मण मोहन, अशोक दिवे, कचरू साबळे, अरुण बागुल, अशोक साळवे, बाबासाहेब जगताप,बशीर शेख ई मान्यवरांनी केले आहे.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



सोशल क्राईम आणि रॅगिंग समाजाला लागलेला कलंक आहे तो सायबर क्राईमनष्ट केला पाहिजे- स.पो.नि.जीवन बोरसे


श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

सायबर क्राईम, सोशल क्राईम आणि रॅगिंग समाजाला लागलेला कलंक आहे तो नष्ट केला पाहिजे असे प्रतिपादन श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी केले. तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग , विद्यार्थी विकास मंडळ, ग्रीव्हन्स सेल आणि जेटीएस शिक्षण संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ते पुढे असेही म्हणाले की, आजही शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात रॅगिंग होत आहे. रॅगिंगसाठीची मानसिकता असणे तशी सामूहिक व्यवस्था निर्माण केली जात आहे म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने सायबर क्राईम, सोशल क्राईम आणि रॅगिंग याविषयी चिंतन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल, इंटरनेट वरील क्राईमपासून दूर राहिले पाहिजे ,व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे .उत्तम करिअर केले पाहिजे .स्वतःवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाही झाले पाहिजेत याची दक्षता प्रत्येक विद्यार्थ्याने घेतली पाहिजे.विद्यार्थी विद्यार्थिनींनी पळून न जाता आई-वडीलांच्या आणि शिक्षकांच्या संस्काराचा विचार केला पाहिजे.
सायबर गुन्हे, ईमेलद्वारे होणारा छळ, फेसबुक ,व्हाट्सअप इंस्टाग्राम ,सायबर स्टॉकिंग, सायबर पोर्नोग्राफी, सायबर मार्किंग इत्यादी गुन्हेगारीचे प्रकार टाळले पाहिजेत असेही त्यांनी विचार मांडले तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी १९९९ मध्ये रॅंगिंग प्रतिबंधात्मक कायदा झाल्याचे सांगितले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्टॅट्युटनुसार प्रत्येक विद्यार्थ्याकडून तो फॉर्म भरुन घेतला जातो. महाविद्यालयाची शिस्त राखणे, मोबाईल न वापरणे,ड्रेसकोड अनिवार्य,ओळखपत्र गळ्यात घालणे,गाड्या पार्किंग सुरळीत लावणे, नियमित तास करणे , कुणाच्या रंगाव्यंगावर बोलू नये,कुणी कुणावर रॅगिंग करु नये, भावनेच्या भरात वाहत जाऊ नये.सत्य असत्य,खरे खोटे याची जाण व वैचारिक भान विद्यार्थ्यांना येणे गरजेचे आहे हे सांगितले.उपप्राचार्य प्रा. सुनिता ग्रोव्हर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.विचारपीठावर बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा.बापुसाहेब पुजारी, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड, विश्वस्त, शेखर डावरे, रविंद्र खटोड, मुख्याध्यापक डी.डी.पुजारी, शिक्षक प्रतिनिधी प्रा.नामदेव मोरगे आदि उपस्थित होते.
 चर्चासत्राचे प्रास्ताविक डॉ.बाबासाहेब पवार यांनी केले. प्रा.रुपाली उंडे यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा.प्रकाश देशपांडे यांनी आभार मानले.या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.चंद्रकांत कोतकर,प्रा.रुपाली उंडे,ग्रीव्हन्स सेलचे डॉ व्ही.एन.काळे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक वृंद यांनी परिश्रम घेतले.सदर चर्चासत्रासाठी ज्युनिअर व सिनियर कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

Monday, September 11, 2023

अनधिकृत हाॕटेल्सव्दारे तालुक्यात शेकडो बेकायदेशीर दारु विक्री सुनिल मुथा


बेलापूर प्रतिनिधि वार्ता

श्रीरामपूर तालुक्यात शेकडो हाॕटेल्सद्वारे संबंधित यंञणांशी हातमिळवणी करुन बेकायदेशीर दारु विक्री होत असून यामुळे शासनाचा मोठ्याप्रमाणात महसूल बुडत आहे.तसेच अधिकृत परवाना धारकांचा व्यवसाय अडचणीत आला असून संबंधित प्रकरणी परवानाधारक हाॕटेल चालकांचे शिष्टमंडळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून सदर प्रकार त्यांच्या निदर्शानास आणून देवून  याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे तालुका लिकर असोसिएशनचे सल्लागार सुनिल मुथा यांनी सांगीतले.                                                            श्री.मुथा म्हणाले की,तालुक्यात सुमारे दिडशे हाॕटेल्स खाणावळीच्या नावाखाली सुरु आहेत.या पैकी बहुतांश हॉटेल व खानावळी मधून संबंधित शासन यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन व आर्थिक तडजोड करुन राजरोसपणे अनधिकृत दारु विक्री  केली जात आहे.असे असताना संबंधित शासकीय यंञणा या प्रकाराकडे डोळेझाक करीत आहे.                                                        श्री.मुथा पुढे म्हणाले की,सदर दारु ही दमन येथून अथवा वाईन शॉप मधून आणून बेकायदेशीररित्या  विकली जाते. यातील बहुतांश दारु ही डुप्लिकेट म्हणजे बनावट असते.हा ग्राहकांच्या जीविताशी खेळ आहे. यामुळे पांगरमल प्रकरणाची पुनरावृत्ती होवू शकते.तसेच अशा दारु विक्रीमुळे शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडत आहे. यामुळे अधिकृत परवानाधारक परमीट हाॕटेल व्यवसायिकांचे व्यवसाय अडचणीत आले  आहेत. परवानाधारक कोट्यावधीचा महसूल शासनाला देतात.असे असताना आर्थिक हितसंबंधांमुळे  या महसुलावर पाणी फिरत आहे. हा प्रकार गंभीर असून शासनाचया संबंधित यंञणांनी व  अधिका-यांनी याची दखल घेवून तात्काळ कडक कारवाई करावी. यासंदर्भात  लिकर
 असोसिएशनचे प्रतिनिधी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून याबाबतची सविस्तर आकडेवारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नावानिशी देणार आहेत.या तक्रारीची दखल घेवून कारवाई करावी व या प्रकाराला आळा घालावा. अन्यथा  वरिष्ठांना नावानिशी माहिती देवून कारवाई करण्यास भाग पाडले जाईल असा इशारा श्री.मुथा यांनी दिला आहे.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

*श्रीरामपूर काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात मशाल जन आक्रोश मोर्चा*


*केंद्रातील मोदी सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील - सचिन गुजर*

*जी -२० जोमात सामान्य जनता मात्र कोमात - सौ.दिपालीताई ससाणे*

 *श्रीरामपूर काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात मशाल जन आक्रोश मोर्चा*

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -

केंद्रातील मोदी सरकार सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून सरकारला सर्वसामान्यांचे काहीही घेणे नसल्याचे साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर यांनी म्हटले आहे. जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने बेलापूर येथे केंद्र सरकार विरोधात मशाल जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सचिन गुजर बोलत होते . गुजर पुढे म्हणाले की,काँग्रेस पक्षाला त्याग व बलिदानाची मोठी परंपरा आहे. देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देण्यासाठी काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे. मोदी सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असून सरकार लोकशाहीची गळचेपी करत आहे. मराठा आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने लाठीमार करण्यात आला. मराठा व धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. मोदी सरकार दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार होते परंतु देशात मात्र बेरोजगारीच प्रमाण प्रचंड वाढलं आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस दिपालीताई ससाणे म्हणाल्या की, काँग्रेसने देशाला गरिबी हटावचा नारा दिला. परंतु भाजपा शासित केंद्र सरकारने जी २० परिषदेच्या निमित्ताने गरिबांची घरे पाडून त्यांचे संसार उध्वस्त केले.मोदी सरकार देशातील अनेक प्रलंबित प्रश्नांकडे सोईस्कर दुर्लक्ष करून जी -२० परिषदेत देशाचे खोटे चित्र उभे करत आहे. मराठा आरक्षणासाठी शांततेत चाललेल्या आंदोलनामध्ये सरकारने दडपशाही व बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. मणिपूर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत मोदी सरकार गप्प बसले. देशातील गरिबी, महागाई, बेरोजगारी, दुष्काळ या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करून जातीपातीचे भांडणे लावत आहे व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करत आहे. मोदी सरकार आपल्या देशाचे नावही बदलायला निघाले आहेत. सरकारला शेतकरी व सर्व सामान्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे ही लढाई केवळ तुमची आमची नसून आपल्या येणाऱ्या भावी पिढीच्या अस्तित्वाची आहे. त्यासाठी आपणास सर्वांनी एकत्र येऊन जन आंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे सौ ससाणे यांनी म्हटले आहे. यानंतर श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सुधीर नवले म्हणाले की,राज्य संकटांनी ग्रस्त आहे. दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्यांची जिने मुश्किल झाले आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. केंद्र व राज्य सरकारला मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. यानंतर श्रीरामपूर पंचायत समितीचे उपसभापती दत्ता कुऱ्हे म्हणाले की, इंडिया आघाडीने आव्हान उभे केल्याने मोदी सरकार नवनवीन पर्याय शोधत आहे. खा राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेस जनतेने उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य जनता काँग्रेसच्या पाठीशी राहील याबाबत शंका नाही. यानंतर बेलापूर खुर्द चे सोमनाथ वाकडे म्हणाले की,राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना जी २० परिषदेचे निमंत्रण दिले नाही. राज्यकर्त्यांचे मन मोठ असावं लागतं .परंतु या निमित्ताने भाजपमध्ये असलेली द्वेषाची भावना दिसून आली. यानंतर त्यांनी मोदी सरकारच्या अपयशाचा पाढाच वाचला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मशाली घेऊन भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. याप्रसंगी बेलापूर सोसायटी चेअरमन शेषराव पवार, संचालक अशोकराव कोरे शिवाजीराव वाबळे पाटील,अनिल पाटील नाईक, बाबूलालभाई शेख, कैलासशेठ चायल, आलम शेख, रामदास बडधे, बाळासाहेब जोशी, शेलार, जाकीर सय्यद, हरिभाऊ बडाख, विजय शेलार, बाळासाहेब लगे, संतोष कु-हे, यशवंत नाईक पा, सदस्य रमेश अमोलिक, जब्बार सय्यद, प्रमोद भोसले पा. पो.पा.अशोक प्रधान,हुसेन सय्यद, वाकडे पा,आबासाहेब माळी, नितीन खोसे, बाळासाहेब थोरात, बाबासाहेब कर्डिले, भाऊसाहेब थोरात, सचिन कुऱ्हे, रितेश गिरमे, गौरव कुऱ्हे, बंटी पवार, गौरव सिकची, चेतन कुऱ्हे, महेश बडधे, योगेश उंडे,संभाजी लिप्टे, गणेश कुऱ्हे, मधुकर म्हस्के, सोमनाथ शिंदे, सनी मंडलिक,अजय धाकतोडे, आयजुभाई सय्यद, रावसाहेब तांबे, बाबासाहेब मोरे, राजेंद्र जाधव, अशोक शिंदे, वैभव कुऱ्हे, कुणाल पाटील, गोपाल भोसले,अकील बागवान, प्रशांत आल्हाट, तुषार कुऱ्हे, झियान पठाण,तीर्थराज नवले,शिवतेज गोसावी,मा. नगरसेविका संगीताताई मंडलिक, सुजाताताई भळगट, राणीताई देसरडा, आशाताई परदेशी, त्रिवेणी गोसावी, मंगल खंडागळे, पद्मा भोसले, रमा म्हस्के, ज्योती शिंदे श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस, युवक काँग्रेसचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111*
---------------------------------------------------
===================================


Sunday, September 10, 2023

आधार कार्ड व मतदान कार्ड नोंदणी अभियान शिबिर*सोहेल भाई दारूवाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीरामपूर

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*आधार कार्ड व मतदान कार्ड शिबिर*

सोहेल भाई दारूवाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीरामपूर आयोजित आधार कार्ड व मतदान कार्ड शिबिर दिनांक १६ , १७ सप्टेंबर शनिवार व रविवार ला होणार आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. 
शिबीरात खालील प्रकारे काम होणार आहे 
*नवीन आधार कार्ड
*आधार अपडेट
*आधार कार्ड चा फोटो चेंज करणे
*मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक करणे
 *वोटर आयडी कार्ड नवीन बनवणे
*वोटर कार्ड अपडेट करणे
*वोटर कार्ड वर चा ऍड्रेस चेंज करणे
असे प्रकारचे सर्व अपडेट होणार आहे
तरी आपण याचा लाभ घ्यावा ही विनंती .
ऍड्रेस : काजी बाबा रोड वॉर्ड नंबर २
सोहेल भाई दारूवाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीरामपूर
संपर्क
ॲड.आरिफ भाई शेख
9890749069
समीर भाई (एस एस)
9511145111
दानिश पठाण
9271888245
रमजान पटेल
9922531339
मोहसीन बागवान (नट्या)
7249550668
आरसोहेल शेख
8830968903
हर्षल दांगट
9860997933
अनिरुद्ध भिंगारवाला
9130282829
गणेश ठाणगे
9860342255
अर्जुन अधिक
8408881818
शाहरुख बागवान
9822523346
नदीम बागवान
8888986186
नितीन बनकर
7972115636
अलीम बागवान
9922703131

===================================
---------------------------------------------------
ऍड्रेस : काजी बाबा रोड वॉर्ड नंबर 0२
सोहेल भाई दारूवाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीरामपूर
---------------------------------------------------
===================================


*पवित्र मारीयेवर सतत असाच विश्वास**श्रद्धा ठेवावी महागुरुस्वामी डानियल*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

*बी.आर.चेडे - शिरसगांव*

हरिगाव मतमाऊली यात्रा अमृत महोत्सव दिनी नाशिक धर्मप्रांत महागुरुस्वामी रा,रे.डॉ लूरडस डानियल यांनी हजारो भाविकांसमोर पवित्र मारिया विश्वाची राणी या विषयावर प्रवचन करताना प्रतिपादन केले की, आपण या मातेकडे, आईकडे,विनंती करतो हे माते आपल्यासाठी प्रार्थना करा. तुझ्यासाठी तुझ्या पुत्राकडे मध्यस्थी कर,कारण जीवन दिवसेंदिवस जीवन कठीण होत चालले आहे.जे काय माझ्या जीवनात घडते दुख,आजारपण, कष्ट,आहेत म्हणूनच आम्ही तुझ्याकडे येतो.तू संवेदनशील आहे,तू स्वत:च्या जीवनाकडे सर्व काही पाहिले आहे.सोसले आहे, माझ्या वेदना,शारीरिक वेदना हे काय आहे ते तुला ठाऊक आहे म्हणूनच आम्ही तुझ्याकडे येतो,तू आमची आई आहे, तुझ्या पुत्राने आपल्या शेवटच्या क्षणी मरण पत्करले,ती म्हणाली मी तुला जन्म दिला आहे मी तुझी आई आहे.म्हणूनच हे माते आम्ही मोठ्या मनाने फक्त जगात काही मागत नाही आम्ही पापात आहोत,पश्ताताप जीवनाने आम्ही तुझ्याकडे येतो आपल्या पुत्राकडे मागणी कर आमच्या सर्व पापांची क्षमा कर,देवाने आपल्या सर्वाना घडविले आहे.ज्या परमेश्वराने आपल्याला घडविले आहे त्याची एकच इच्छा होती ज्याला घडविले तो सुखी असावा,आनंदी असावा, देवासारखी योग्यता,क्षमता आहे,की स्वार्थी आहे या स्वार्थामुळे तो परमेश्वराला ओळखू शकला नाही.ज्या परमेश्वराने घडविले त्या परमेश्वरापासूनच मनुष्य दूर गेला आहे.प्रकाशापासून जसे आपण दूर जातो व अंधारात जातो तसे हे आहे.आपण कोठे आहोत कोणत्या दिशेने चाललो आहोत ते समजत नाही.परमेश्वर स्वस्थ बसत नाही मनुष्य माझ्यापासून दूर गेला आहे तो ऐकत नाही, परमेश्वराकडे फक्त प्रेम आहे एकत्र प्रेम करू शकतो त्या प्रेमामुळेच त्या मनुष्याला आपल्याकडे कसा येईल यासाठी त्याच्या योजनेप्रमाणे त्याचा एकुलता एक पुत्र या जगात येऊन स्वत:चे रक्ताने नवा करार केला. परमेश्वर आत्मा आहे त्याने पवित्र मातेला निवडले आहे.तिचे निष्कलंक,निष्पाप असे जीवन जगले.ती देवपुत्राची आई होणार आहे अशी भविष्यवाणी झाली. पवित्र मरीयेमुळेच परमेश्वर कोण आहे त्याची योजना काय आहे ते पाहू शकतो ज्या देवपुत्राला जन्म दिला तो देव आहे.व तो देव आपल्याबरोबर राहील.त्यावेळी सर्व काही शक्य होते.देवाला अशक्य काहीच नाही..येशूने सर्वांसाठी रक्त सांडले आहे.ती आई सतत आपल्यासाठी आहे. म्हणे आपल्या आईकडे प्रमाणे जाऊ या श्रद्धेने विश्वासाने जाऊ या.माझ्यासाठी प्रार्थना कर तुम्ही येथे आला आहात खूप आशा अपेक्षा आहेत हेतू आहे ते नक्कीच पूर्ण होणार.मरीयेचे आभार मानण्यासाठी,गौरव करण्यासाठी परमेश्वर तुमचा साथ देवो माता नेहमीच तुमच्यासाठी मध्यस्थी करो.
या भव्य कार्यक्रमात प्रमुख धर्मगुरू फा डॉमनिक रोझारिओ, सचिन मुन्तोडे,रिचर्ड अंतोनी, सायमन शिणगारे.जेम्स थोरात,आनंद बोधक,तुस्कानो, मायकल वाघमारे,संजय पठारे,संजय पंडित संदीप जगताप,ज्यो गायकवाड,आदी सर्व धर्मगुरू उपस्थित होते. यावेळी यात्रेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्मरणिकेचे प्रकाशन महागुरूस्वामी लूरडस डांनियल यांच्या हस्ते करण्यात आले.

===================================
---------------------------------------------------
 *संकलन:*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================