राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, November 21, 2023

*साईभक्त भाविकांच्या अडचणी सोडवण्यासाठी श्री साईबाबा संस्थानने त्वरित कारवाई करावी - कमलाकर कोते*

*श्री साईबाबा संस्थान अधिकार*
*आणि ग्रामस्थांची बैठक संपन्न*

*राजेंद्र बनकर / शिर्डी*
दर्शनरांग सुरू झाल्यानंतर येणाऱ्या साईभक्त भाविकांच्या विविध अडचणी व समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान मुंख्यकार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर, उपकार्यकारी अधिकारी हुलवळे यांची ग्रामस्त व व्यापारी यांचे शिष्टमंडळासोबत भेट घेऊन चारही गेट ईन आऊट सुरु करावे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. शिवसेना नेते कमलाकर कोते यांनी यावेळी बोलताना सांगितले की ,साई उद्यान,नाट्यगृह,सेवाधाम ईमारती लाडू,मोबाईल,चप्पल स्टॅन्ड व जनसंपर्क कार्यालय सुरु करावे संरक्षण विभागात वर्षानुवर्षं एकाच जागेवर ठाण मांडून बसलेल्या अधिकारी,कर्मचारी यांच्या बदल्या तात्काळ केल्या पाहिजेत, अनुभवाचा फायदा न होता साईभक्त भाविकांना तोटाच होत आहे तसेच समाधीवर लावलेली काच आता काढण्याची गरज आहे, साईभक्तांसोबत गैरवर्तन करणारे कर्मचारी यांच्या वर कारवाई केली पाहिजे, पिंपळवाडी रोड देखील आता तात्काळ पूर्णपणे खुला करावा आदी मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी रमेश गोंदकर,विजय जगताप , नितिन कोते,रविंद्र गोंदकर,दत्तात्रय कोते, निलेश कोते , ताराचंद कोते , प्रमोद गोदकर ,विकास गोदकर संपत जाधव ,बडु गोरक्ष , विरेश गोंदकर ,सचिन शिंदे ,फुटरमल जैन ,राम आहेर आदींसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्त व व्यापारी उपस्थित होते

===================================
---------------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



*क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त अ.भा.लहुजी सेनेच्या वतीने श्रीरामपूरात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन*


श्रीरामपूर - प्रतिनिधि - /वार्ता -
येथील अखिल भारतीय लहुजी सेनेच्या वतीने क्रांतीगुरू लहुजी साळवे यांच्या २२९ व्या जयंतीच्या निमित्ताने श्रीरामपूर येथे गुरुवारी दि.३० नोव्हेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील असलेल्या प्रांगणात सायंकाळी ५ वाजता राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळयासह सुमधुर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यक्रम संयोजक भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व सचिव हनिफभाई पठाण यांनी दिली.
यावेळी होणाऱ्या कार्यक्रमप्रसंगी भारतीय लहुजी सेनेचे प्रमुख संस्थापक व्ही .जी. रेड्डी,माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक,लोकसेवा विकास आघाडीचे गणेशसिंग राजपूत, माजी शिक्षण महासंचालक रामचंद्र जाधव,उद्योगपती के.के. आव्हाड, भाजपचे दीपक पटारे, दीपक तूरकणे,तलाठी युनियनचे अध्यक्ष राजेश घोरपडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
    या कार्यक्रमाला सर्वधर्मीय बहुजन समाजातील नागरिकांनी व सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह हितचिंतकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही कार्यक्रमाचे संयोजक भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल,राष्ट्रीय सचिव हनिफभाई पठाण,कायदेशीर सल्लागार अँड. रमेश कोळेकर, राज्य प्रमुख सुरेश आढागळे,जिल्हाध्यक्ष रज्याकभाई शेख,दक्षिण जिल्हा प्रमुख शांतवन खंडागळे आदि पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

*फोटो ओळी*
क्रांतीगुरू वीर लहुजी वस्ताद यांच्या होणाऱ्या जयंती कार्यक्रमाची पत्रिका ब्रम्हलिन १००८ बाल ब्रम्हचारी महाराज यांच्या समाधीवर अर्पण करतांना भारतीय लहुजी सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब बागुल,हनिफभाई पठाण,शांतवन खंडागळे दिसत आहे (छाया-सुधीर चव्हाण)

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

Monday, November 20, 2023

*बाजार समितीने फराळाऐवजी शेतकऱ्यांसाठी शेती मार्गदर्शन शिबिरे घ्यावीत - मुरकुटे*


श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आसल्याने नफा कमावणे हा उद्देश न ठेवता शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन शिबिरे व अभ्यास दौरे घेतले पाहीजेत. केवळ मर्जितील कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी दिवाळी फराळाचे फॕड सुरु झाले असल्याची प्रतिक्रिया जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रगतिशील शेतकरी ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी प्रसिध्दी पञकाद्वारे व्यक्त केली आहे.
        या पञकात मुरकुटे यांनी नमुद केले आहे की, बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. केवळ नफा कमावणे हा बाजार समितीचा उद्देश नाही. शेतकऱ्यांना सोयी सुविधा देणे व शेतीचे उत्पन्न वाढीसाठी शेतीविषयक मार्गदर्शन शिबिर घेणे शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजित करणे ही शेतकऱ्यांची मुलभुत गरज आहे. माञ बाजार समितीच्या वतीने असे कार्यक्रम होताना दिसत नाहीत. बाजार समितीच्या व्यवस्थापनाला याचा विसर पडलेला दिसत आहे. शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी आनलेल्या शेतमालातुन बाजार समितीला उत्पन्न मिळते. माञ बाजार समितीला याच शेतकऱ्यांचा विसर पडल्याचे पहावयास मिळते. 
          बाजार समितीच्या वतीने दिवाळी फराळाचे आयोजन केले जाते. माञ बाजार समितीत शेतमाल विक्री करणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांना या पासुन नेहमीच वंचित ठेवले जाते. संचालक मंडळाच्या मर्जीतील कार्यकर्त्यांनाच फराळासाठी निमंञीत करुन फराळ दिला जातो ही वस्तुस्थिती आहे. बाजार समितीने शेतमालाचे उत्पन्न वाढवीण्यासाठी व आधिकाधिक शेतकऱ्यांना बाजार समितीकडे आकर्षित करण्यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग असलेले मार्गदर्शक शिबीरे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास दौरे आयोजित केल्यास शेतकऱ्यां सोबतच बाजार समितीलाही फायद्याचे ठरणार आहे .शेतकरी व बाजार समितीच्याही उत्पन्नात वाढ होणार आहे असेही या पञकात श्री.मुरकुटे यांनी नमुद केले आहे.

 *बाजार समिती ही शेतकऱ्यांचे हीत जोपासनारी संस्था आहे. केवळ नफा कमावणारी ही संस्था नाही. समितीला मिळालेल्या उत्पन्नातुन व्यवस्थापन खर्च वजा जाता उर्वरीत रकमेचा वापर शेतकऱ्यांच्या हितासाठीच केला गेला पाहीजे. ठेव पावत्या करुन व्याजाचे उत्पन्न वाढवण्यापेक्षा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न व्हायला हवेत. अन्यथा ठेव पावत्यांवरील व्याजातुन बाजार समितीचे उत्पन्न वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना लाभांश रुपाने दिलासा द्यावा असे मत श्री.मुरकुटे यांनी नमुद केले आहे.*

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन, श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


*जव्हार मध्ये रंगला आदिवासी* *कला, संस्कृती व पर्यटन महोत्सव*


*सौरभ कामडी- पालघर*
जव्हार - आदिवासी कला व संस्कृती, हस्तकला यांची ओळख पर्यटकांना होऊन या कलेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील आदिवासी व्यक्तिमत्व "धरती आबा" भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत शहरातील राजीव गांधी स्टेडियम या ठिकाणी पर्यटन संचालनालय , कोकण विभाग नवी मुंबई " यांच्या विद्यमाने आदिवासी कला व संस्कृती व पर्यटन महोत्सव २०२३" दिनांक १८ व १९ नोव्हेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते.
     या महोत्सवात येथील आदिवासी संस्कृती, प्रस्तुत करताना आदिवासी नृत्य कला, स्थानिक हस्तकला, विविध वस्तूचे प्रदर्शन, स्थानीक खाद्यपदार्थांचे स्टॉल ,रानभाज्या, औषधी वनस्पती, फोटोग्राफी गॅलरी, वारली कला, बांबू कला विषयी कार्यशाळा, वारली पेंटिंग, पेपर मेसी वस्तू चे प्रदर्शन, बांबू उत्पादन, पारंपरिक वेशभूषा, जंगल भ्रमंती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या पालघर व ठाणे आणि मुंबई सारख्या महानगरातून इच्छुकांनी हजेरी लावली. 
    या वेळी अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, पोलीस उप विभागीय अधिकारी शैलेश काळे, मुख्याधिकारी मानिनी कांबळे, तहसीलदार गावित, घांगळी वादक सोनू म्हसे , तारपा वादक भिक्या धिंडा आणि सातवी इयत्तेतला छोटा तारपा वादक धिंडे आदी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे नियोजन करण्यात गणेश कनगरे, मनोज कामडी, वैभव घोलप, महिला बचत गट, ढोल नाच, नृत्य पथक आदींनी मेहनत घेतली.

   *जव्हार सारख्या आदिवासी संस्कृती लाभलेल्या भागात पर्यटन स्थळे , येथील स्थानिक कलाकारांच्या विविध कलेचे रुप जग भरात प्रसिद्ध होऊन या भागात रोजगार उपलब्ध व्हावा, जेणे करून या भागातील स्थलांतर रोखणे शक्य होईल व पर्यटन वृध्दी होऊन विकास नांदेल.*
    *- हनुमंत हेडे , उपसंचालक, पर्यटन कोकण विभाग* 

*मी स्वतः आदिवासी समाजाचा असून आमच्या कला व वस्तूंना अश्या प्रकारच्या महोत्सवातून अर्थार्जन मिळणार असल्याने अतिशय चांगल्या प्रकारे हा उपक्रम योजिला आहे, यातून कलेला चालना मिळून रोजगार निर्माण होऊ शकेल.-*
   *सचिन दामोदर शिंगडा, आदिवासी नेते*

===================================
---------------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


उसगांवचा संतमहिमा'लिहिणारे सुखदेव सुकळे संतवृत्तीचेच प्राचार्य डॉ. राजधर टेमकर💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
संत हे काळाच्या पुढे असतात, त्यामुळेच संतसाहित्य हे मनामनात आणि जगात अजरामर आहे. या वाटेवर साहित्यिक सुखदेव सुकळे यांनी संपादित केलेला 'उसगावचा संतमहिमा 'आणि त्यांनी लिहिलेले 'साक्षात्कारी संत काशिनाथ महाराज' चरित्र म्हणजे भक्ती आणि नीतीची साक्ष असून साहित्यिक सुखदेव सुकळे हे संतवृत्तीचेच असल्यानेच त्यांच्या हातून अनेक प्रबोधक साहित्यनिर्मिती झाली असल्याचे गौरव उदगार आदिनाथनगरचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी काढले. 
   श्रीरामपूर येथील बोरावकेनगरमधील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान कार्यालयात प्राचार्य डॉ. टेमकर आणि मित्रपरिवाराने स्व.सौ.पुष्पा सुकळे पुस्तकालय आणि प्रतिष्ठानकार्य यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.सुखदेव सुकळे यांनी प्राचार्य डॉ. टेमकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा शाल, बुके, पुस्तके देऊन सत्कार केले. संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले, सौ. सुरेखा बुरकुले आदिंनी कार्यक्रमाचे नियोजन केले.सुखदेव सुकळे म्हणाले, महात्मा गांधी यांच्या ३०
जानेवारी २०१८ रोजी विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. शासन रजिस्टर्ड असलेल्या या प्रतिष्ठानने अध्यक्ष डॉ. राजीव रावसाहेब शिंदे, कार्याध्यक्ष प्राचार्य टी. ई. शेळके, उपाध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, सुदामराव औताडे पाटील आणि प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी अनेक सेवाभावी उपक्रम राबविले, वाचनालय आणि विविध पुरस्कार सुरु केले, विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या वाटप,निराधार आणि गरजूंना सहकार्य केले जात असल्याची माहिती दिली. प्राचार्य डॉ. टेमकर यांनी सुकळे यांच्या सेवाकार्याचे कौतुक करून म्हणाले स्व. अड, रावसाहेब शिंदे हे ज्ञानसूर्य होते,त्यांच्यामुळेच राजळे परिवाराने मला सेवेची संधी दिली,अड, रावसाहेब शिंदे यांचे विचार, कार्य पुढे नेणारे सुकळेसर कृतज्ञतेचे आदर्श आहेत.हा सेवाशील आदर्श प्रतिष्ठान जपत आहे, हे विशेष प्रेरणादायी आहे. तसेच संतसाहित्य, आदर्श डॉक्टर,सेवाशील व्यक्तिमत्व पुरस्कार दिले जातात ही मोठी समाजसेवा आहे,असे सांगून प्रतिष्ठानला सहकार्य करू असे आश्वासन दिले.यावेळी कृष्णा टेमकर यांनीही प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. सुयोग बुरकुले यांनी आभार मानले.

===================================
---------------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================


गुन्हेगारांची टोळी गजाआड, सव्वा सहा लाखांच्या दुचाकी हस्तगततोफखाना पोलिसांची कामगिरी

अहमदनगर -प्रतिनिधि -/ वार्ता-
नगर शहर, उपनगरातून दुचाकी चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी तोफखाना पोलिसांनी गजाआड केली आहे. त्यात तिघांचा समावेश असून त्यांच्याकडून सहा लाख 15 हजार रूपये किमतीच्या सात चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
करण मनोज पवार (वय 22 रा. कॉटेज कॉर्नर, सावेडी, नगर), उमेश दिलीप गायकवाड (वय 19 रा. नाना चौक, ढवणवस्ती, तपोवन रस्ता, सावेडी) व मनोज गोरख मांजरे (वय 22 रा. कल्याण रस्ता, शिवाजीनगर, नगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी देखील अटक केली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी पुन्हा दुचाकी चोरीचा उद्योग सुरू केला होता.


नगर शहर, उपनगरात दररोज दुचाकी चोरीला जात आहेत. तोफखाना हद्दीतील चोरीच्या दुचाकीचा तपास करण्याचे काम गुन्हे शोध पथकाकडून सुरू असताना त्यांना माहिती मिळाली की करण पवार, उमेश गायकवाड व मनोज मांजरे हे दुचाकी चोरून त्याची विक्री करत आहे. पथकाने त्या तिघांचा शोध घेतला असता ते मिळून आले. त्यांनी नगर शहर, उपनगरातून सात दुचाकी चोरी गेल्याची कबूली दिली. त्यातील दोन दुचाकीची विक्री केली होती. त्या पोलिसांनी हस्तगत केल्या तर पाच दुचाकी चोरट्यांच्या ताब्यात मिळून आल्या आहेत. एकुण सात दुचाकी हस्तगत केल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, दिनेश मोरे, संदीप धामणे, अविनाश वाकचौरे, वसीम पठाण, अहमद इनामदार, सुरज वाबळे, भानुदास खेडकर, सचिन जगताप, सतिष त्रिभुवन, सतीष भवर, संदिप गिर्‍हे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, सुमीत गवळी, गौतम सातपुते, राहुल गुंड्डू यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास अंमलदार धामणे करत आहेत.
संशयित आरोपींना तोफखाना पोलिसांनी यापूर्वीही दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात पकडले होते. त्यावेळी त्यांच्याकडून अनेक दुचाकी हस्तगत करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली होती. काही दिवस कारागृहात काढल्यानंतर ते पुन्हा जामिनावर बाहेर आले. त्यानंतर त्यांनी पुन्हा दुचाकींची चोरी करण्यास सुरूवात केली. चोरलेली दुचाकी ओळखींच्या लोकांना कमी किंमतीत द्यायची व काही दिवसांत कागदपत्रे देतो असे सांगून ते पळत होत होते.

=================================
------------------------------------------------
: - सह,संपादक - रंजित बतरा - शंकलन...✍️☑️🇮🇳
------------------------------------------------
=================================














Sunday, November 19, 2023

*निळवंडे धरणाचे पाणी कालव्याद्वारे**गावात आले हीच खरी मोठी दिवाळी*


संगमनेर - प्रतिनिधि -/ वार्ता -
निळवंडे धरणाचे पाणी कालव्‍यांच्‍या माध्‍यमातून गावात आले, हीच खरी आपल्‍यासाठी दिवाळी ठरली आहे. वर्षानुवर्षांची पाण्‍याची प्रतिक्षा आता संपली आहे. निळवंड्याचे पाणी मिळण्‍यासाठी राज्‍यात आपले सरकार सत्‍तेवर यावे लागले. शेवटच्‍या गावाला पाणी मिळेल असे नियोजन करण्‍यात आले असून, एकही शेतकरी पाण्‍यापासून वंचित राहणार नाही अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

       तालुक्‍यातील लोहारे येथे मंत्री विखे पाटील यांच्‍या हस्‍ते निळवंडे पाण्‍याचे जलपुजन करण्‍यात आले. याप्रसंगी त्‍यांनी लोहारे ग्रामस्‍थांशी संवाद साधला. ग्रामस्‍थांच्‍या वतीने मंत्री विखे पाटील यांचे स्‍वागतही जल्‍लोषात करण्‍यात आले. लोहारे ग्रामस्‍थांसह भाजपाचे तालुका अध्‍यक्ष वैभव लांडगे, शरद गोर्डे, हरिष चकोर यांच्‍यासह विविध गावांचे सरपंच आणि सदस्‍य मोठ्या सख्‍येने उपस्थित होते. प्रारंभी मंत्री विखे पाटील यांनी लोहारे गावचे ग्रामदैवत अवजीनाथ बाबा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या पुतळ्यास अभिवादन केले.

       मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, निळवंडे धरणाच्‍या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले हेच आपल्‍या दृष्‍टीने मोठे भाग्य ठरले आहे. प्रधानमंत्री आल्‍याने धरणाच्‍या भविष्‍यातील कामासाठी कोणत्‍याही निधीची कमतरता पडणार नाही. डाव्‍या कालव्‍याप्रमाणेच उजव्‍या कालव्‍यातही लवकरच पाणी सोडण्‍याचे नियोजन आहे. अकोले तालुक्‍यातील उच्‍चस्‍तरीय कालव्‍यांचे कामही पुर्ण झाले असून, या कालव्‍यातूनही पाणी देण्‍याचे नियोजनही विभागाने केले आहे.
अनेक वर्षे सर्वच गावांना पाण्‍याची प्रतिक्षा होती. राज्‍यात युती सरकार आल्‍यानंतर या कामाला गती मिळाली. त्‍यामुळेच कालव्‍यांव्‍दारे पाणी येवू शकले, ही ख-याअर्थाने आपल्‍यासाठी दिवाळी ठरली आहे. आवर्तनाचा कालावधी वाढविल्‍यामुळे शेवटच्‍या गावाला पाणी देण्‍याचे नियोजन असून, जलसंपदा विभागाच्‍या आधिका-यांनीही रात्रंदिवस घेतलेल्‍या मेहनतीमुळे पाणी पोहोतच असल्‍याचे समाधान ना.विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

===================================
---------------------------------------------------
*शरद गोर्डे - संगमनेर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================