राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, January 21, 2024

झाप मध्ये सह्याद्री आदिवासी म. ठाकूर ठाकर समाजाचा महाराष्ट्र राज्याचा १९ वा वर्धापन दिन व आदिवासी जनजागृती मेळावा संपन्न


- सौरभ कामडी - पालघर -/वार्ता
दिनांक.२० जानेवारी २०२४ रोजी पालघर जिल्हातील जव्हार तालुक्यामधील झाप या गावातील शिवाजीनगरमध्ये सह्याद्री आदिवासी म.ठाकूर ठाकर समाजाचा महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन व आदिवासी जन जागृती मेळावा राज्याचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या ठिकाणी आदिवासी ठाकूर समाजाच्या चालीरीती यावर चर्चा झाली, पेसा नोकर भरती प्रक्रिया वर चर्चा झाली,सामजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी फंडीग जमा करणे यावर चर्चा झाली,धनगरांना आदिवासी समाजात आरक्षण देऊ नये असा एकमुखाने ठराव करण्यात आला. याच मीटिंग वाडा तालुका ठाकूर समाजाची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये, प्रकाश शेलार यांची वाडा तालुका अध्यक्षपदी निवड तर चंद्रकांत दुधवडे यांची उप अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यामधे आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात आले, यामध्ये ढोल नाच.मोरघा नाच, दगटी नाच, कांबड नाच चे दर्शन घडवून आणले गेले..मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले ते ४० फूट ठाकूर समाजाचा लोगो दगडापासून हेमंत दरोडा यांनी साकारलेली रांगोळी व आदिवासी वाद्य २४ फुटाचा तारपा या कार्यक्रमाचे नियोजन जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा, संजय भला, काशिनाथ दरोडा,पांडू भस्मे,शंकर वारा,विजय वारा,मोखाडा तालुका अध्यक्ष भगवान फसाले, अंनता झुग्रे, वाडा तालुका अध्यक्ष डॉ.वसंत हिरवे,भालचंद्र खडके, सदू धापटे,प्रकाश शेलार व समस्थ झाप गावकरी यांनी परिश्रम घेतले..या कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली त्यामधे विक्रमगड विधानसभेचे आ. सुनील भुसारा, बोईसर विधानसभेचे आ.राजेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, माजी आ. पांडुरंग गांगड, राज्याचे उप अध्यक्ष सोमनाथ मेंगाळ, जव्हार पंचायत समितीच्या सभापती विजयाताई लहारे, मोखाडा सभापती प्रदीप वाघ,जिल्हा परिषद सदस्य कावजी ठाकरे,संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जानू हिरवे,मंगा खडके, खा.गावीत यांचे ओ.एस. डी. श्री. चौधरी तथा सर्व महाराष्ट्रतील पदाधिकारी,जिल्हा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, सरपंच,उपसरपंच,सदस्य समवेत ७ ते ८ हजार अशा मोठ्या संख्येने ठाकूर बांधव महाराष्ट्राच्या काण्या - कोपऱ्यातून सहभागी झाले होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार सौरभ कामडी - पालघर*
==============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

अनुश्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये खेळाच्या भव्य स्पर्धा उत्साहात संपन्न


- वाघोली,पुणे - प्रतिनिधि - / वार्ता
एज्युकेशन सोसायटीचे अनुश्री इंग्लिश मीडियम स्कूल लोणीकंद पुणे येथे खेळाच्या भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी बक्षिस वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते विजयी गटा ला बक्षिसे वितरण करण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढगे, सचिव स्वप्निल ढग,
हर्षल टाके आणि प्राचार्य पूजा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा अंतर्गत भव्य खेळाची स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी गटा प्रमाणे घेण्यात आल्या. सदर स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या गटाला मान्यवरांच्या शुभहस्ते बक्षीसे देण्यात आली. या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून स्वप्निल ढमढेरे तसेच भूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कैलास पवार, संस्था सचिव हर्षल ढगे, प्राचार्य पूजा मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकांची देखील मोठी उपस्थिती लाभली.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

शिरसगांव येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त भव्य कलश मिरवणूक


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव येथे अयोध्यात होणाऱ्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतभर प्रभू श्रीराममय वातावरण दि २१ व २२ जानेवारी रोजी होत असल्याने शिरसगांव येथेही रविवारी सायंकाळी ५ ते ७ वाजता भव्य कलश मिरवणूक फटाक्यांची आतषबाजी करीत सवाद्य भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली, त्यात शिरसगांवचे सर्व पुरुष महिला, बालके मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महिलांनी डोक्यावर कलश घेतले होते.श्री विठ्ठल मंदिरात दिपोत्सव साजरा झाला. त्याचप्रमाणे सोमवार दि.२२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता श्रीराम प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता महाआरती व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या आनंदमय सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार योजना, गणेशराव मुदगुले,सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव,सर्व ग्रा .प. सदस्य, अशोकराव पवार,बापूसाहेब काळे,आदी मान्यवर व शिरसगाव ग्रामस्थ, भजनी मंडळ, यांनी केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



कला क्रीडा संस्कृतीमध्ये विद्यार्थी निपुण व्हावा - डॉ.श्याम शिंदे


- अहमदनगर - प्रतिनिधि - / वार्ता -
आजच्या जागतिक स्पर्धेच्या युगात विद्यार्थी पुस्तकी किडा न बनता अभ्यासाबरोबरच तो कला, क्रीडा, संस्कृती यातही निपुण व्हावा,म्हणजे त्याचा शैक्षणिक व मानसिक विकास होतो आणि तो पुढील आयुष्यातील कोणत्याही स्पर्धेत टिकून राहू शकतो असे प्रतिपादन सप्तरंगचे अध्यक्ष डॉ.श्याम शिंदे यांनी केले.
  महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळ संस्थेचे महाराष्ट्र पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज,सावेडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष ऍड.युवराज पोटे हे होते.यावेळी विचारपिठावर अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र बारस्कर, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक,सचिव सुनील गोसावी, राजेंद्र चोभे,प्राचार्य अंकुश दराडे, संस्थेच्या अध्यक्ष स्वाती दराडे - आव्हाड,मुख्याध्यापक सुशांत श्यामलेट्टी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शब्दगंध चे सुनील गोसावी म्हणाले की, शालेय विद्यार्थ्यांना सामाजिक, व्यवहारिक ज्ञान हे अनुभवातून मिळत असते, या शाळेत विविध उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी उत्तम प्रयत्न होत आहेत. त्यामुळे सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक रवींद्र बारस्कर यांनी खेळाच्या स्पर्धेमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राज्यस्तरावर खेळाला उत्तम यश मिळवणाऱ्या मुलांचे सन्मान चिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. राजेंद्र चोभे यांनी शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण व परिपूर्ण बनविणारे असावे, असे शिक्षण या शाळेत देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, हे आशादायी चित्र असून सर्व शिक्षकांच त्यांनी अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.युवराज पोटे यांनी ६० पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शून्यातून शाळा उभारणी होत असताना पालक व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मागील बारा वर्षात शाळेने प्रगती करून ५०० पेक्षा जास्त स्कॉलर विद्यार्थी, खेळाडू, डॉक्टर,इंजिनिअर समाजासाठी घडविले. त्याबद्दल अभिनंदन केले.
 सामाजिक जाणीव असल्यानं तळागाळातील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले शिक्षण व व्यक्तिमत्त्वावर चांगला संस्कार घडवण्यासाठी प्रयत्न केले यासाठी चांगले शिक्षकाची गरज असते आणि असा शिक्षक ग्रुप आम्हास लाभला, प्रत्येक उपक्रमात विद्यार्थी,पालकांचा उत्तुंग सहभाग असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आम्हास करता येत आहे. असे उददगार प्रास्ताविकातून प्राचार्य अंकुश दराडे यांनी व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंयोजन प्रा. शुभांगी काटे यांनी केले. बक्षीस वितरण प्रसंगी संस्थेचे अध्यक्षा सौ.स्वाती दराडे - आव्हाड, प्रशासक प्रणव दराडे, मुख्याध्यापक सुशांत सामलेटी यांचे सह सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

 जिल्हा व राज्य स्कॉलरशिप फेसिंग मध्ये रोप्य व कांस्यपदक मिळवणारे विद्यार्थी कु.सृष्टी धाकतोडे, कु. झिर्क्रा खान, गौरव जरे,सम्यक लोढा, संचिन बागवानी, माहीर कपूर, पार्थ झवर या सर्वांना पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने रामायणातील घडलेल्या घटनांवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम व नृत्य सादर केले.छोट्या मुलांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनावरील नाट्य सादर केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना नृत्य अभिनय व नाटक शिकविणारे शिक्षक वृंद, पालक उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अजिजभाई शेख - राहाता*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


अक्षदा कलश शोभायात्रेचे परिसरात उत्साहात स्वागत- केतन खोरे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
समस्त श्रीराम भक्त, प्रभाग क्र.१६ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या येथून आलेल्या अक्षदा कलश शोभायात्रेचे पुर्णवादनगर, लबडे वस्ती, दक्षिणमुखी हनुमान मंदिर रोड, मुळा-प्रवरा परिसरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आल्याची माहीती मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे पाटील यांनी दिली. यावेळी माजी नगरसेविका स्नेहल खोरे, राजाभाऊ चांडवले, ॲड.अरुण लबडे, किशोर लबडे, सोमनाथ लाड, श्री वायंदेशकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना केतन खोरे म्हणाले की, अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर असावे हे सुमारे ५०० वर्षांपासून भारतीयांचे स्वप्न २२ जानेवारीला श्री क्षेत्र अयोध्या येथे होणा-या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठानाने पुर्ण होणार आहे. प्रभागातील नागरीक पुन्हा एकदा दिवाळीची तयारी करत असल्याचे खोरे म्हणाले. प्रभाग १६ मधील साई मंदिर, पुर्णवादनगर ते श्री पावन गणेश मंदिर, लबडे वस्ती या परिसरातून निघालेला शोभायात्रेत महिला भगिनींनी आपल्या घरासमोर, रस्त्यावर सडा-रांगोळी काढून शोभायात्रेचे पारंपारीक पद्धतीने स्वागत केले.
   यावेळी शेकडो महिलांनी कलश पूजन करत मोठ्या उत्साहात शोभायात्रेत सहभाग घेतला. यावेळी ढोल ताशा पथक व जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. या शोभायात्रेचे श्रीराम भक्त तुषार चांडवले, नितीन हारदे, चेतन लोंढे, किशोर झिंजाड, दिक्षित सर, विजय शर्मा, अरुण कुलकर्णी, सिद्धांत शर्मा, मनोज होंड, ऋषिकेश पाटील, रामेश्वर होंड, बंडू मंडवे, शुभम चोथवे आदींनी उत्तम नियोजन केले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी विराट मोर्चा; हजारो श्रीरामपूरकर सहभागी


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या वतीने शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह (शिवपुतळा) सरकारने "श्रीरामपूर जिल्हा " घोषित करावा या मागणीकरिता विराट मोर्चा काढण्यात आला.
शनिवार दि.२० जानेवारी रोजी श्रीरामपूर शहरातील आझाद मैदान येथून मोर्चास सुरूवात झाली. सदरचा मोर्चा हा आझाद मैदान येथुन निघुन मेनरोडमार्गे -भगसिंगचौक- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, गिरमे चौक, तुळजाभवानी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गे श्रीराम मंदिर चौकात आला. श्रीराम मंदिर चौकामध्ये मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी सरकारचे व प्रशासनाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह (शिवपुतळा) "श्रीरामपूर जिल्हा व्हावा या
 मागणीकडे लक्ष वेधण्यात आले. मोर्चामधील प्रभु श्रीराम, महाबली हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांनी लक्ष वेधले होते.
  यावेळी नगर जिल्ह्याचे विभाजन झाले तर श्रीरामपूर हाच नविन जिल्हा होणार नाहीतर जिल्हा
 विभाजन होणार नाही व इतर कोणत्याही ठिकाणी
 जिल्हा मुख्यालय होवू देणार नाही असे श्रीरामपूर
जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप (नाना) भोसले
 यांनी सांगितले. तर शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख
माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी
 सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या नावाने म्हणजेच “श्रीरामपूर” या नावाने भारतात जिल्हा अस्तित्वात
 नाही. तरी हिंदुस्थानातला श्रीरामांच्या नावाचा
 पहिला जिल्हा होण्याचा मान श्रीरामपूरला मिळावा. या विराट मोर्चात श्रीरामभक्त- शिवभक्त, व्यापारी, वकील, इंजिनियर, कामगार, राजकीय नेतेमंडळी, पदाधिकारी यांच्यासह शिवप्रहारचे मावळे प्रचंड
मोठया संख्येने सहभागी झाले होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम, श्रीरामपूर*
===============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना🛕🛕🛕


🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^
राज तिलक की करो तयारी आरहे हैं भगवा धारी
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
.अयोध्येत 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे . संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे . या आनंदात मुस्लिम समाजही सामील आहे . दिनांक 22 जानेवारी रोजी आम्ही शहरातील मटणाची छोटी दूकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .अशी माहिती बकर कसाब जमातीचे प्रमुख अबूभाई कुरेशी यांनी श्रीराम मंदिर चौकात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात दिली याप्रसंगी श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष अशोक उपाध्ये , भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते ,माजी नगरसेवक मुक्तारभाई शेख ,मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे , , राष्ट्रवादीचे लकी सेठी , माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे , नगरसेवक दिलीप नागरे , नगरसेवक दीपक चव्हाण ,राजेंद्र उडें ,भाजपचे माजी शहराध्यक्ष संजय पांडे , दै. राज प्रसारित गूगल ब्लॉग चे संपादक राजु मिर्जा.गौतम उपाध्ये , राजेंद्र पाटणी , अयाज ताबोळी ,खालील भाई कुरेशी , जब्बारभाई कुरेशी , अरमानभाई , इसाकभाई ,अजहर शेख , अकिलभाई कुरेशी , अय्युब भाई कुरेशी ,निसार भाईकुरेशी ,हसनभाई कुरेशी ,बब्बूभाई शेख ,सलीमभाई कुरेशी आदींसह मुस्लिम समाजातील मान्यवर व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

<{-^-}><{-^-}><{-^-}><{-^-}><{-^-}><{-^-}><{-
^-
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
शब्द रचना संकलन वार्ता... ✍️✅🪷भाजपा
 ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
÷
<{-^-}><{-^-}><{-^-}><{-^-}><{-^-}><{-^-}><{-^-}