राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, August 5, 2024

बालिकेतील ज्यु रेड क्रॉस च्या विद्यार्थिनींचा राखी पौर्णिमेनिमित्त एक अनोखा स्तुत्य उपक्रम - दत्तात्रय साबळे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भाऊ बहिणीच्या ऋणानुबंधांना आणखीन घट्ट करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा. 
शाळा महाविद्यालयामध्ये राखी पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम होतच असतात , बालिका विद्यालय मध्ये इंडियन रेड क्रॉस चे अध्यक्ष प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व सचिव सुनील साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच जुनियर रेड क्रॉस युनिटची स्थापना झालेली असून या अंतर्गत सामाजिक जाणिवेचे भान ठेवत समाजातील अनाथ घटकांना मदतीचा हात देण्यासाठी तसेच समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी , त्याचप्रमाणे सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांपर्यंत या राख्या जाणार आहेत . आजच्या गतिमान तंत्रज्ञानाच्या युगातून थोडेसे बाहेर पडून या सर्वांप्रती कृतज्ञता  व्यक्त करण्याच्या भावनेतून एक नवीन नाते निर्माण करण्याचा हा एक छोटासा उपक्रम या कार्यशाळे मार्फत झाला. 
यामध्ये विद्यालयातील पाचवी ते नववीच्या जुनियर रेड क्रॉस च्या विद्यार्थिनींनी राखी बनवण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबवला या उपक्रमाचे  कौतुक विद्यालयाचे विद्यमान चेअरमन दत्तात्रय साबळे यांनी विद्यार्थिनीची हितगुज करताना केले. 
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या विद्या कुलकर्णी , उपमुख्याध्यापक किशोर खुरंगे ,पर्यवेक्षिका अनिता शिंदे, मंगला डोळस, पतपेढीचे संचालक सतीश म्हसे ,शिक्षक प्रतिनिधी अस्लम शेख, संगीता कुलकर्णी, उत्सव समिती प्रमुख चंद्रकांत शिंदे सर युनिट चे समन्वयक श्री अवधूत कुलकर्णी व श्रीमती निर्मला लांडगे मॅडम आदी शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


ओव्हरफ्लोचे पाणी कालव्यांना सोडून लाभक्षेत्रातील बंधारे, तलाव भरून द्या - ससाणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने भंडारदरा ओव्हरफ्लोचे पाणी कॅनॉल द्वारे सोडून मुठेवाडगाव, टाकळीमानचा टेल टॅंक. तसेच इतर गावोगावीचेही पाझर तलाव, साठवण तलाव व बंधारे भरून द्यावेत अशी मागणी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेसच्या वतीने जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले. 
ससाणे पुढे म्हणाले की, एकीकडे मोठा पाऊस पडतो आहे तर दुसरीकडे लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भंडारदरा लाभक्षेत्रातील गावांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही तसेच विहिरीतील पाण्याची पातळी अपेक्षित रित्या वाढलेली नाही, भूजल पातळी अद्याप खालावलेलीच आहे . गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाट पाण्याची मोठी गरज आहे. सध्या सोयाबीनची पिके, ऊस, कपाशी, पशुधनासाठी लागणारा चारा पावसाअभावी सुकत असून चालू हंगामातील पिके वाचवण्यासाठी शेतकरी चिंतातुर आहे. त्यामुळे कालव्याद्वारे भंडारदरा ओव्हर फ्लोचे पाणी कालव्यात तात्काळ सोडून गावोगावीचे तलाव,बंधारे भरून द्यावेत अशी अशी मागणी ससाणे यांनी केली आहे. सध्या भंडारदरा ओव्हर फ्लोच्या पाण्याचा प्रवरा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे हे पाणी कालव्याद्वारे सोडून श्रीरामपूर तालुक्यातील पाझर तलाव, बंधारे भरून दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे ससाणे यांनी म्हटले आहे. यावेळी वडाळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जि. प. चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले, बाजार समितीचे संचालक विलास दाभाडे, माजी नगरसेवक मुजफ्फर शेख, मुन्नाभाई पठाण, भारत पवार, मोहन रणवरे, बाबासाहेब बनकर, सनी मंडलिक, प्रदीप वाघुले, बाबासाहेब लोखंडे, सरबजीत सिंग चूग, विशाल साळवे, राजेश जोंधळे,अक्षय जोंधळे, तीर्थराज नवले, सागर दुपाटी, कल्पेश पाटणी आदी मान्यवर उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================





EPS-95 चे यशस्वी आंदोलन, केंद्रीय कामगार मंत्री आणि EPFO ​​ने बोलावली बैठक


  राजानी न्याय द्यावा, नाहीतर प्रजा न्याय देईल"  कमांडर अशोक राऊत

  पंतप्रधान तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध : - केंद्रीय कामगार मंत्री

बी.आर.चेडे - नवी दिल्ली
कर्मचारी पेन्शन योजना, 1995 (EPS-95) अंतर्गत देशातील हजारो पेन्शनधारकांनी 31 जुलै 2024 रोजी किमान मासिक पेन्शन 7,500 रुपयांपर्यंत वाढवणे आणि महागाई भत्त्याशी जोडणे यासह इतर मागण्यांच्या समर्थनार्थ यशस्वी आंदोलन जंतर नवी दिल्ली येथे केले. NAC चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या विनंतीवरून आणि श्री धैर्यशील माने, खासदार कोल्हापूर (हातकलंगले) यांच्या आवाहनावरून महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या खासदारांची बैठक व चर्चा झाली. 
 ईपीएस पेन्शनर्सचा गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष सोडवण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी NAC च्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत कमांडर अशोक राऊत यांनी ईपीएस 95 पेन्शनधारकांची बाजू वस्तुस्थिती आणि पुराव्याच्या आधारे मांडली. पेन्शनधारकांच्या म्हणण्यानुसार, सेवानिवृत्त पेन्शनधारकांना कर्मचारी पेन्शन योजना, 1995 अंतर्गत इतके कमी पेन्शन मिळत आहे की त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.

कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी चर्चेसाठी इपीएस 95 च्या शिष्टमंडळास बोलावले. ते लवकर सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी ते म्हणाले की फक्त हे आश्वासन नाही तर पंतप्रधानही त्यासाठी कटिबद्ध आहेत. आंदोलन संपवण्याचा आग्रह कामगार मंत्री ना. मांडवीया यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना कमांडर अशोक राऊत म्हणाले की, आम्ही एका तारखेच्या पुढे आंदोलन स्थगित करू. सध्या 22 राज्यांमधून लोक प्रतिनिधी म्हणून या आंदोलनात सामील झाले आहेत. कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय सरचिटणीस वीरेंद्रसिंग राजावत, राष्ट्रीय मुख्य समन्वयक रमाकांत नरगुंड हे मंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उपस्थित होते.

 या आंदोलनात महाराष्ट्रातील अकरा खासदारांनी सहभाग घेऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, डॉ शोभा बच्छाव, खासदार, धुळे (काँग्रेस), नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, कल्याण काळे, श्री भास्करराव भगरे, खासदार, दिंडोरी (राष्ट्रवादी, शरद पवार), राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक (उ बा ठा), भाऊसाहेब वाकचौरे, खासदार, शिर्डी (उ बा ठा), ओमराजे निंबाळकर, बंडू जाधव यांनी आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिला.
        तातडीच्या बैठकीत EPS-95 च्या टीमला संबंधित विभागाच्या कार्यालयात पाचारण करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता विभागीय कार्यालय बंद असतानाही बैठक अत्यंत सकारात्मक झाली. तसेच विभागाच्या वतीने आश्वासन दिले.
तर ख. धैर्यशील माने, खासदार कोल्हापूर (हातकणंगले,शिवसेना) यांनी 1 ऑगस्ट रोजी बैठक बोलावली होती.  
या बैठकीला 12 खासदार उपस्थित होते. यामध्ये सरकारचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सहकार राज्यमंत्री (भाजप), सौ. स्मिता वाघ, खासदार, जळगांव (भाजप), विशाल पाटील, खासदार सांगली (अपक्ष), संदिपान भुमरे, खासदार, छत्रपती संभाजीनगर (शिवसेना), सुरेश उर्फ ​​बाल्या मामा म्हात्रे, खासदार भिवंडी (राष्ट्रवादी, शरद पवार), डॉ. मेधा कुलकर्णी, राज्यसभा खासदार, पुणे (भाजप) आणि इतर मान्यवर उपस्थित होते. सर्व खासदारांनी आमचा मुद्दा पूर्णपणे समजून घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.असे अशोकराव राऊत यांनी सांगितले 

 केंद्रीय भविष्य निर्वाह निधी मुख्य आयुक्त यांच्या बैठकीत कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय सरचिटणीस वीरेंद्रसिंह राजावत, पीएन पाटील, शोभा आरस, सरिता नारखेडे, बी एस नारखेडे आणि राजीव भटनागर उपस्थित होते. 
दुसऱ्या दिवशी खासदारांची भेट घेतल्यानंतर कमांडर अशोक राऊत, राष्ट्रीय महासचिव वीरेंद्रसिंग राजावत, पी.एन.पाटील, शोभा आरस, सरिता नारखेडे, बी एस नारखेडे यांनी चर्चासत्रात भाग घेतला.

EPS-95 च्या राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत म्हणाले, “दीर्घ काळापासून नियमित पेन्शन फंडात योगदान देऊनही पेन्शनधारकांना एवढी कमी पेन्शन मिळत असल्याने त्यांच्या समस्या वाढत आहेत. ते म्हणाले, गेल्या आठ वर्षांपासून देशभरातील 78 लाख पेन्शनधारक किमान पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत, मात्र आजतागायत सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. ते म्हणाले की, सध्या पेन्शनधारकांना सरासरी केवळ 1,450 रुपये मासिक पेन्शन मिळत आहे. निवृत्तीवेतनधारक मूलभूत पेन्शनसह महागाई भत्त्यामध्ये दरमहा 7,500 रुपये वाढ करून पेन्शनधारकांच्या जोडीदारांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासह अन्य मागण्या करत आहेत. जर राजा तसे करणार नाही तर आता लोक हिशेब करतील.असा इशारा दिला.

 EPS-95 अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पेन्शनच्या 12 टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीमध्ये जाते. तर नियोक्त्याच्या 12 टक्क्यांपैकी 8.33 टक्के हिस्सा EPS-95 मध्ये जातो. आणि याशिवाय, सरकार पेन्शन फंडात 1.16 टक्के योगदान देते. सध्या सप्टेंबर 2014 मध्ये लागू असलेल्या नियमानुसार पेन्शन दिली जात आहे. ईपीएफओच्या आकडेवारीनुसार, देशभरात सुमारे ७८ लाख पेन्शनधारक आहेत

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे : -  ✍️✅🇮🇳... शिरसगाव 
*सहयोगी*
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------





निष्क्रीय लोकप्रतिनिधींमुळे मतदार संघातील रस्त्याचे वाटोळे - हेमंत ओगले


शेतकरी युवक संवाद यात्रेत
नागरीकांनी मांडल्या व्यथा

- श्रीरामपूर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथील शेतकरी, युवक आणि जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस हेमंत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी युवक संवाद यात्रा काढण्यात आली. यात्रेच्या पहिल्या 
दिवसापासुन कालच्या पाचव्या दिवशीही ग्रामीण भागात शेतकरी - युवक संवाद यात्रा पोहचताच नागरीकांनी रस्त्याच्या व्यथा मांडल्या.
  निष्क्रीय लोकप्रतिनिधीमुळे रस्त्याची निकृष्ट कामे झाली. संततधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून खड्यांना जलाशयाचे स्वरूप आले आहे. एकुणच या सर्व गोष्टींना वाढती कमीशनखोरी कारणीभुत असल्याचे मत नागरीकांमधुन व्यक्त झाले आहे.
दरम्यान कष्टकरी, शेतकरी माता भगिनी युवकांच्या सन्मानासाठी शेतकरी युवक संवाद यात्रेनिमित्त आवाज तुमचा संपर्क आमचा हे ब्रिद वाक्य घेऊन, मतदारसंघातील अंतिम घटकापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी शेतकरी युवक संवाद यात्रा सुरू केलेली आहे. समस्या जाणून घेऊन आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तसेच करण ससाणे आणि हेमंत ओगले यांच्या माध्यमातून त्या सोडविण्यासाठी पर्यंत करणार असल्याचे शेतकरी व युवकांशी संवाद साधताना करण ससाणे आणि हेमंत ओगले यांनी आश्वासन दिले.
आतापर्यंत या गावांमध्ये मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी स्व. जयंतराव ससाणे यांनी भरघोस निधी दिला त्यांच्यानंतरच्या काळात मात्र गावागावात विकास पहायला मिळाला नाही. अनेक गावात मंजुर कामे होत नाही. कामांना दर्जा नाही. भविष्यात विकासकामांना वेग देण्यासाठी हेमंत ओगले हेच योग्य असल्याची ग्वाही करण ससाणे यांनी दिली. भविष्यात आमच्या पाठीशी उभे राहून श्रीरामपूर विधानसभा स्व. जयंतराव ससाणे यांचा बालेकिल्ला असल्याची ओळख कायम ठेवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================









श्री संतुकनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांची व्यसनमुक्ती जनजागृती


- अहमदनगर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
अहमदनगर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या जेऊर येथील श्री संतुकनाथ विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व्यसनमुक्ती जनजागृती पथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या व्यसनमुक्ती जनजागृतीचे पथयात्रेचे आयोजन प्राचार्य सिद्दिकी ए. एन. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी जेऊर गावातील बाजारपेठेत व्यसनमुक्ती निमित्त आयोजित केलेल्या सभेत प्राचार्य सिद्दिकी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, समाजातील काही व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांनी गंभीरपणे विळखा घातला असून या व्यसनांपासून नागरिकांनी दूर व्हावे आणि आपल्या आरोग्य व कुटुंबाकडे लक्ष द्यावे, असा संदेश दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी आठवडे बाजारात जाऊन व्यसनांमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची आपल्या संदेशातून जाणीव करून दिली. जेऊर गावातील आठवडेे बाजारातील ग्रामस्थांनी या उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. नंतर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी ग्रामस्थांसह आठवडे बाजारात व्यसन न करण्याची शपथ दिली. ग्रामस्थांना मी दारू पिणार नाही, मी दारू पिऊन गाडी चालवणार नाही, मी दारू पिऊन घरात मुलांना व बायकोला मारणार नाही, पान टपरीवर मावा, तंबाखू, गुटखा खाणार नाही, आपल्या स्वतःच्या संसाराकडे, व्यवसायाकडे, मुलांकडे, कुटुंबाकडे पूर्णपणे लक्ष देईल, मी माझे आरोग्य उत्तम सांभाळील, अशी शपथ दिली. यावेळी श्री.बोरुडे सर, सौ. गाडेकर, सौ शेलार यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================




Sunday, August 4, 2024

शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही - आमदार लहु कानडे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाबरोबरच श्रीरामपूर शहरातील विकास कामांना प्राधान्य देऊन आपण कोट्यावधी रुपयांची कामे केली. यापुढेही शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली.
शहरातील प्रभाग चारमध्ये केलेल्या विकास कामांबद्दल या प्रभागातील नागरिकांच्यावतीने आ. कानडे यांना विकास सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुका अध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, राजू साळवे, पत्रकार दीपक कदम आदि मान्यवर व्यासपीठावर होते.
यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, गेल्या चार वर्षात मतदार संघात आपण मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. कामे करताना दुजाभाव केला नाही. ग्रामीण भागाबरोबरच शहरातील विकास कामांना प्राधान्य दिले. श्रीरामपूर एमआयडीसीत 220 केव्हीचे हाय पॉवर सबस्टेशन मंजूर केल्याने एमआयडीसीतील उद्योगांमध्ये वाढ होऊन तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. स्मशानभूमीमध्ये विद्युत गॅस दाहिनी बसविली. कोरोना काळात ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली. तसेच शहरातील विविध भागातील रस्त्यांसह तरुणांसाठी ओपन जीम्सची उभारणी केली. समाज मंदिरासाठी निधी देऊन विविध भागात पेविंग ब्लॉक बसविले. यापुढेही शहरातील विकास कामांना भरीव निधी देऊन विकास कामे केली जातील असेही ते म्हणाले.

यावेळी सचिन गुजर म्हणाले की, विकास कामे करताना आ. कानडे यांनी कोण आपला, कोण विरोधक हे न पाहता कामे केली आहेत. आता आगामी निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु शहरातील जनता सुज्ञ असून ती विकास कामांबरोबर राहील तथा कोणाच्याही बनवेगीरीला बळी पडणार नाही असेही ते म्हणाले.
याप्रसंगी अरुण पाटील नाईक, अशोक (नाना) कानडे यांनी मनोगत व्यक्त केले. 
आपल्या भागातील कामे केल्याबद्दल बोरावकेनगर, अतिथी कॉलनी,आशीर्वाद नगर, पठाण वस्ती, रेव्हन्यु कॉलनी या भागातील नागरीकांच्यावतीने आ. कानडे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
            यावेळी अतिथि कॉलनी विकास मंडळाचे अध्यक्ष ऍड. बाबासाहेब मुठे, व्ही. एम. कुलकर्णी, सुभाष लिंगायत, धुमाळ सर, नाईक सर,गंधे सर,ऍड कारखानीस, फापाळे सर, वाणी सर, प्रदीप आखेगावकर, पोटघन सर, हिंगणीकर साहेब, श्री. लोखंडे, रायपल्ली साहेब, जोशी सर, कर्डीले, वाघ नाना, विकास लिंगायत, डॉ. गोकुळ मुठे, पाटील सर, अमोलिक सर, बाबासाहेब मुठे, प्रकाश देशमुख, सुरंजन साळवे, विलास कुलकर्णी, मुकुंद नरवडे, पाटील सर, सचिन मुळे, अधिक जोशी, चंद्रकांत वायकर, राकेश दुशिंग, लेविन भोसले, अश्फाक शेख, संजय जोर्वेकर, निशिकांत पंडित, शरद पंडित, सौ. धुमाळ, सौ. आखेगावकर, सौ. रायपल्ली, संगीता मुठै, ललिता टाकसाळ, सुमित्रा लिंगायत, प्रतिमा पंडित, अंजली कारखानीस, संगीता लटमाळे, मनीषा मुठे, वैशाली जोशी आदींसह नागरिक उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग
पत्रकार दिपक कदम, ✍️✅🇮🇳...श्रीरामपूर 
*सहयोगी* 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


रस्त्यावरील वाढदिवस : - संस्कृती की विकृती


 श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
करायची. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या सोयी गैरसोईचा विचार न करता उलट रस्ता अडवून इतरांची अडचण करायची. ग्रुपमध्ये एकाची गाडी आडवी लावायची सीटवर केक ठेवायचा मोठ्या आवेशात वाढदिवसाची गर्जना करायची. किर्कश आरडाओरडा करायचा मग केक कापायचा. एखादा तुकडा भरवला की बाकी केक वाढदिवस असणाऱ्याच्या तोंडाला चोळायचा. यात कुठला आलाय मोठेपणा. उलट हा एक सामाजिक ऱ्हास आहे. प्रतिष्ठा सांभाळायची असेल तर वाढदिवस घरात आणि कुटुंबीयांसमवेत अथवा समारंभात सन्मानपूर्वक साजरी करायला हवीत. ही खरी प्रतिष्ठा हा खरा संस्कार. केक तोंडाला चोळून झाला की मग फटाक्यांची आतिशबाजी. अधिक वेळ फटाक्यांची आतिषबाजी करायची. फटाके फोडायचे, भोवताली नागरी वस्ती, वृद्ध, लहान मुले, हॉस्पिटल यांचा कोणताही विचार करायचा नाही. कोणी काही बोलायची सोय नाही. जनसामान्यांच्या मनात एक भीती नव्हे तर ती एक दहशतच. शिर्डीच्या जवळील पिंपळस गावातील घटना तशी ताजीच आहे. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास नित्याचाच. रस्त्यावरील गर्दी आणि गाड्यांची रेलचेल पाहून एका सुजाण व्यक्तीने विचारलेला जाब, त्याला उत्तर मिळते ते लाथाबुक्क्यांनी. या वादाचे प्रकरण पोहोचते थेट दवाखान्यात आणि पर्यायी पोलीस स्टेशनमध्ये. म्हणावे बोलावे कसे. संबंध राजकीय वर्तुळातले. अखेर असे घडत असेल तर सर्वसामान्य माणूसही या तरुणपिढीच्या मानसिकता बदलण्याच्या वादात कधी पडणार नाही. रस्त्यांवरील फटाक्याच्या आतिषबाजीने रस्ता अर्धा बंद करायचा. येणाऱ्या जाणाऱ्यांची अडचण. वाढदिवस केक कापून फटाक्याच्या आतिषबाजीपर्यंत थांबत नाही. तो पुढचे रूप धारण करतो. एका मोठ्या वसाहतीत रस्त्यांवर एका गाडीवर ठेवलेले अंड्याचे अनेक ट्रे दिसले. समवेत मोठा तरुणांचा घोळका. मला वाढदिवसाचा अंदाज आला; पण असे काही घडेल असे वाटले नव्हते. नेहमीच्या संभाषणात मैत्रीच्या नात्यातील मधुर शब्दसुमने एकमेकांना वाहिली जात होती. इतर ऐकणाऱ्यांना आश्चर्य वाटेल अशी ती भाषा प्रेमाची आणि जिव्हाळ्याची वाटली. या वयातून प्रत्येक जण जातो. समाज आणि कौटुंबिक संस्कार विसरून ही तरुणपिढी कशी लयाला जात आहे. याचे वाईट वाटले. नेहमीच्या रस्त्यावरील वाढदिवसाच्या साचेबद्ध पद्धतीने वाढदिवस उरकला. काही वेळातच गाडीवरील ट्रेमधून हातात अंडी घेऊन एकमेकांकडे फेकायला सुरुवात केली. एकमेकांच्या अंगावर, कपड्यांवर अंडी फुटली जात होती. माझ्यासाठी हा एक आश्चर्याचाच धक्का होता. रस्त्यावरील इतर व्यक्ती दुरून हा खेळ पाहत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विस्मयचकितपणा जाणवत होता. अंड्याने डोक्याचे केस कपडे पूर्ण लडबडून गेले होते. हेच का ते भारतीय आदर्श संस्कृतीचे दर्शन? जगभरात भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व आणि पावलोपावली तिचे महत्त्व आपण इतरांना सांगतो. मग ही संस्कृती की विकृती? संस्कृती असेल तर ती कुठली ? भारतात लोकशाही पद्धती आहे. मग या लोकशाही तत्त्वाचा विपर्यास का होतोय. देशात कायद्याची रेलचेल आहे. आणखी यासाठी नवा कायदा करून यादीत भर घालावी लागणार का ? टी.व्ही., आकाशवाणी, वर्तमानपत्रातून जनजागृती करून याला थांबवे लागणार का? रस्त्यावरील वाढदिवस नवे नवे रूप धारण करीत आहे. कदाचित याला समाज आणि प्रशासनाने थांबवले नाही तर आणखी वाढदिवस साजरा करण्याच्या नवीन प्रथा जन्माला येतील. मग भूषणाने इतर देशवासीयांना सांगावे लागेल. रस्तेवरील वाढदिवस हा आमच्या जगण्याचा आणि संस्कृतीचा आता अविभाज्य घटक झालाय. परदेशात रस्त्यावर कागदाचा तुकडा, कचरा टाकला तर मोठी शिक्षा आणि दंड होतो. वाढदिवस साजरा केल्याचे केकचे पुठ्ठे, कागद, फटाक्याची कागद आणि अंड्यांचा भाग तसाच पडून असतो. मग आपण अपेक्षा करतो की स्वच्छतादूत केंव्हा स्वच्छ करतील. रोज कोणाचा ना कुणाचा वाढदिवस असतो. पहिले पाढे तेच. तरुणपिढीने यातून स्वतःला आवरायला हवे. या असंस्कृतशील पद्धतीला फाटा देऊन पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, जलसंधारण, गरजू विद्यार्थी, रुग्ण, विकलांग यांना या वाढदिवसाच्या खर्च पोटी होणाऱ्या खर्चातून मदत करायला हवी. या लेखाचे लेखन करत असताना खाली रस्त्यावर वाढदिवसाची फटाक्यांची अतिशबाजी सुरू झाली, याला काय योगायोग म्हणायचा का? मी जरा स्पष्टच मांडले; परंतु या पाठीमागे हे थांबण्याची आणि वरील बाबींना मदत करण्याची माझी तळमळ आहे, हे एक कटू सत्य
 आहे. 


डॉ. शरद दुधाट,✍️✅🇮🇳...श्रीरामपूर, +९१९८३४१३२१३८

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================