- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भाऊ बहिणीच्या ऋणानुबंधांना आणखीन घट्ट करणारा सण म्हणजे राखी पौर्णिमा.
शाळा महाविद्यालयामध्ये राखी पौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम होतच असतात , बालिका विद्यालय मध्ये इंडियन रेड क्रॉस चे अध्यक्ष प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व सचिव सुनील साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच जुनियर रेड क्रॉस युनिटची स्थापना झालेली असून या अंतर्गत सामाजिक जाणिवेचे भान ठेवत समाजातील अनाथ घटकांना मदतीचा हात देण्यासाठी तसेच समाजाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी , त्याचप्रमाणे सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिकांपर्यंत या राख्या जाणार आहेत . आजच्या गतिमान तंत्रज्ञानाच्या युगातून थोडेसे बाहेर पडून या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून एक नवीन नाते निर्माण करण्याचा हा एक छोटासा उपक्रम या कार्यशाळे मार्फत झाला.
यामध्ये विद्यालयातील पाचवी ते नववीच्या जुनियर रेड क्रॉस च्या विद्यार्थिनींनी राखी बनवण्याचा एक स्तुत्य उपक्रम राबवला या उपक्रमाचे कौतुक विद्यालयाचे विद्यमान चेअरमन दत्तात्रय साबळे यांनी विद्यार्थिनीची हितगुज करताना केले.
यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या विद्या कुलकर्णी , उपमुख्याध्यापक किशोर खुरंगे ,पर्यवेक्षिका अनिता शिंदे, मंगला डोळस, पतपेढीचे संचालक सतीश म्हसे ,शिक्षक प्रतिनिधी अस्लम शेख, संगीता कुलकर्णी, उत्सव समिती प्रमुख चंद्रकांत शिंदे सर युनिट चे समन्वयक श्री अवधूत कुलकर्णी व श्रीमती निर्मला लांडगे मॅडम आदी शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment