अन् यशात शिक्षक आणी
गुरुजणांचाही मोठा हात !!
शिर्डीची कन्या कु.सोनाली काटकर बनली महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक
प्रयत्न करत रहा, एकदिवस नक्कीच तुम्ही देखील यशस्वी व्हाल - कु. सोनाली काटकर
- राजेंद्र बनकर - शिर्डी -/ वार्ता
शिर्डीची भूमीकन्या सोनाली किसन काटकर हिची नुकतीच महाराष्ट्र पोलिस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने तीचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.
शिर्डीची भूमीकन्या व श्री साईबाबा संस्थानचे सेवानिवृत्त कर्मचारी किसन पाराजी काटकर यांची सुकन्या आणी संदीप काटकर यांची धाकटी भगीनी कु. सोनाली काटकर हिने अगदी प्रतीकुल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. अनेकदा तीला अपयशाला सामोरे जावे लागले माञ कष्टाने व जिद्दीने तीने अखेर महाराष्ट्र लोकसेवा परिक्षेत उत्तीर्ण होत आपल्या यशाची वाट मोकळी केली आहे. सोनाली काटकरचे
शिर्डीच्या पावननगरीत आगमन होताच मोठ्या जल्लोषात तीचे स्वागत करण्यात आले.यावेळी शिर्डी शहरात धनगर समुदायातील पहिल्याच मुलीने आपल्या कष्टाने व जिद्दीने हे यश संपादन केल्याने तीचे आगमन होताच फटाक्याची आतषबाजी व पुष्पवृष्टी करत केक कापून तीचे औक्षण करण्यात आले. शिर्डीची कन्या पोलीस अधिकारी झाली याचा सार्थ अभिमान शिर्डीकरांना असुन मुला - मुलीमध्ये कुठलाही भेदभाव न करता त्यांना त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण घेऊ द्या, त्या नक्कीच आपल्या माता - पितांचे नाव उज्वल करतील असे मत यावेळी शिर्डी ग्रामस्थांनी व्यक्त केले.
तर या यशापर्यंत जाण्यासाठी मला मोठा संघर्ष करावा लागला माञ मी कधी जिद्द सोडली नाही, अनेकदा अपयश माझ्या नशीबी आले माञ हार न मानता,खचून न जाता प्रयत्न हे सातत्याने सुरुच ठेवले आणि शेवटी यश मिळाले असुन आयुष्यात संघर्ष अटळ आहे, यश तुम्हाला हुलकावणी देत असते, माञ अशावेळी हताश निराश न होता पुन्हा नव्याने आपले प्रयत्न सुरु ठेवावे, मग तुम्ही यशस्वी होणारच.
माझ्या या यशात माझे माता - पिता आणि बंधू संदीप काटकर यांची मोठी खंबीर साथ लाभली असुन,त्यांनी मला कधीच निराश न करता शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहन दिले असुन
यासोबतच माझे शिक्षक आणी गुरुजण यांचाही यशात मोठा हात असल्याचे कृतज्ञ होत सोनाली काटकर हिने आपले अनुभव सांगताना स्पष्ट केले.
आपल्या मायभूमीत येताच केलेल्या सन्मानाबद्दल सोनाली काटकर हिने यावेळी सर्वांचे आभार व्यक्त केले.
सोनाली काटकर च्या निवडी बद्दल राजकीय, सामाजिक,शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तर शिर्डी शाहरात धनगर समुदायातील पहिलीच कन्या ही पोलीस अधिकारी झाली असुन आमच्या कष्टाचे सार्थक झाले,यापुढे बहिण सोनालीने महाराष्ट्र शासनाच्या पोलिस खात्यात आपली प्रामाणिक सेवा करुन देशसेवा करावी असे मत संदीप काटकर यांनी व्यक्त केले.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================