- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
तालुक्यातील शिरसगांव येथील श्रीसंत गोरा कुंभार प्रतिष्ठानतर्फे श्रीसंत गोरा कुंभार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार पुणे येथील साहित्यिक श्रीमती सविता संजय कुंभार ह्यांच्या तू चाल पुढे' या आत्मचरित्र उत्कृष्ट निर्मितीबद्दल वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी उपाध्ये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रारंभी प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी श्रीमती सविता कुंभार ह्यांच्या लेखनाचे आणि जीवन कार्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विवाहानंतर थोडा काळ संसार सावरला परंतु वैधव्य आल्यानंतरही छोट्या मुलीचे धैर्याने पालनपोषण करीत. पुण्यात सुरवातीच्या काळात शाळकरी मुलांची रिक्षा व नंतर मारुती व्हॅन गाडी धाडसाने चालवून आपला जीवनप्रवास आकाराला आणला, त्यांचे' तू चाल पुढे' हे आत्मचरित्र अनेकांना प्रेरणादायी आहे.असे सांगून पुस्तकाचा परिचय करून दिला. श्रीमती सविता कुंभार म्हणाल्या, माझ्या दुर्लक्षित जीवनाचा आणि आत्मचरित्राचा श्रीरामपुरात साहित्यिक सन्मान झाला, हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा आनंद आहे. पुण्यात विविध महिला मंडळात सामाजिक, साहित्यिक कार्य करण्यासाठी हा पुरस्कार दिशादर्शक ठरणारा आहे. कडा येथील माझे मेव्हणे सुभाषराव देशमुख, त्यांचा परिवार, सोलापूर येथील हनुमंत कुंभार परिवार आणि सर्व स्नेहीजन ह्यांचा आधार आणि आशीर्वाद मला नेहमी प्रेरणा देणारा आहे. त्यावेळी प्रतिष्ठानच्या सौ. मंदाकिनी उपाध्ये, सौ. आरती उपाध्ये यांनी मनोगत व्यक्त करून सविता कुंभार आणि उपस्थितांना पुस्तके देऊन सन्मान केला. यावेळी सुभाषराव देशमुख, हानुमंतराव कुंभार, सुमित [प्रसाद] देशमुख, गणेशानंद उपाध्ये, सौ.अनिता देशमुख, सौ. प्रतिक्षा देशमुख, सौ. आशाताई कुंभार, राजेंद्र राजपुरे, सूरज भालेराव, सौ. प्रीती भालेराव, सौ. प्रियंका राजपुरे,राणी राजपुरे,स्वराज राजपुरे,ग्रंथा उपाध्ये.यांनी सविता कुंभार यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या. गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.
=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - ✍️✅🇮🇳... शिरसगाव
-----------------------------------------------
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️l💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================