राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, September 5, 2024

संत मदर तेरेसा निस्पृह समाजसेवेच्या प्रतीक - आ. कानडे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 ख्रिश्चन समाजातील संत मदर तेरेसा यांची पुण्यतिथी भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी आमदार लहू कानडे यांनी शहरातील प्रशासकीय इमारती जवळील संत मदर तेरेसा यांच्या स्मारकाच्या ठिकाणी जाऊन मदर तेरेसा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले की, संत मदर तेरेसा या निस्पृह समाजसेवेच्या प्रतीक होत्या. ज्या येशू ख्रिस्ताने जगभरातील लोकांसाठी प्रेमाचा संदेश दिला. त्याच प्रेम भावनेने संत मदर तेरेसा यांनी समाजातील गोरगरीब माणसांची पीडितांची आरोग्य सेवा केली. आयुष्यभर त्यांनी हे सेवा कार्य केले. त्यानिमित्ताने आपले संपूर्ण आयुष्य एक मिशन केले. या माध्यमातून मिशनरीज तयार केले. आजही त्यांचे कार्य जगभर चालू आहे. व्हॅकेटन सिटीने त्यांना संत हे थोर पद दिले. समाजाने त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी.

यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, पत्रकार दीपक कदम, संतलूक हॉस्पिटलच्या व्यवस्थापक सिस्टर धांसी, सिस्टर प्रभा, सिस्टर सरोज, सिस्टर रिटा, सिस्टर अँनी, सिस्टर जॅकलीन तसेच पी. एस. निकम, अशोक जाधव, राजू साळवे, रवींद्र लोंढे, निशिकांत पंडित, रज्जाक पठाण, अविनाश काळे, सुरेश ठुबे, लेविन भोसले, राकेश दुशिंग, संतोष गायकवाड, इग्नाती रूपटक्के, रवींद्र गायकवाड, किरण बोरावके, भाऊसाहेब तोरणे यांच्यासह ख्रिस्ती बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर ±९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


अ.भा.मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या प्रयत्नातून अनुदान अपात्र मराठी चित्रपटांना अनुदान मिळणार


- मुंबई - प्रतिनिधी - / वार्ता -
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे देवेंद्र मोरे, बाळासाहेब गोरे यांनी सांस्कृतिक मंत्री ना.सुधीर मुनगंटीवार तसेच सांस्कृतिक विभाग यांचेकडे गेल्या आठ महिन्यांपासून करोना महामारीमुळे नुकसान झालेल्या मराठी चित्रपट निर्माता यांचे अनुदान, अपात्र चित्रपटांना प्रोत्साहन म्हणून सरसकट अनुदान देण्याची मागणी केली होती, त्याला बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष) यांनी सहकार्य केले आणि दि. ४ सप्टेंबर २०२४ रोजी ना. सुधीर मुनगंटीवार आणि संपूर्ण सांस्कृतिक विभाग अधिकारी यांची बैठक मंत्रालय येथे झाली.
त्यामध्ये मा.मंत्री महोदय यांनी अनुदान अपात्र मराठी चित्रपटांना अनुदान देण्याची विनंती स्विकारली आहे. 
तरी अनुदान अपात्र मराठी चित्रपट निर्माता यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांचेकडे संपर्क साधून आपल्या चित्रपट बाबत माहिती द्यावी.
याप्रसंगी मराठी चित्रपट अनुदान योजनेत बदलही करण्यासाठी मा. मंत्री महोदय यांनी सुचना दिल्या असून जास्तीत जास्त मराठी चित्रपटांना अनुदान मिळेल असा नवीन शासन निर्णय घेण्याचे संबंधित अधिकारी यांना सुचविले आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या प्रयत्नांना यश मिळत आहे म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील निर्माते यांचेकडून अभिनंदन होत आहे.
या निर्णयानंतर निर्माता महामंडळ मराठी चित्रपट वितरणातील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असून कोणत्याही मराठी चित्रपटांना थिएटरचा प्रॉब्लेम राहणारच नाही असे देवेंद्र मोरे/ बाळासाहेब गोरे यांनी सांस्कृतिक मंत्री यांना प्रस्ताव दिला आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
बाळासाहेब गोरे - मुंबई 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

विद्यानिकेतन स्टेट बोर्डमध्येशिक्षक दिन उत्साहात संपन्न


- श्रीरामपूर -  प्रतिनिधी - / वार्ता -
येथील स्व.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, स्टेट बोर्डमध्ये शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके, माजी प्राचार्य शिवाजीराव बारगळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
         यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई.शेळके होते. त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व सांगितले. प्रसंगी इ. दहावीतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प व सन्मानपत्र देऊन सत्कार केला. दरम्यान कु.अक्षदा दळे हिने कविता सादर केली, तर संगीत शिक्षक दिपक वाघ यांनी गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे गीत सादर केले. तसेच इ. दहावीतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करत, शिक्षकांचे मनोरंजनपर खेळ घेतले. व उपस्थित विद्यार्थी- शिक्षकांची मने जिंकली. प्रसंगी शिक्षक दिनाच्या द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांनी वर्ग अध्यापनाचे काम हाती घेतले व सुरळीत पार पाडले. कार्यक्रमाचे आयोजन- नियोजन इ. दहावीतील विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इ.दहावीतील सर्वच विद्यार्थी व वर्गशिक्षिका राजश्री तासकर व मंगेश साळुंके यांनी कठोर परिश्रम घेतले. .
          यावेळी कार्यक्रमास चेअरमन टी.ई.शेळके, व्हा. चेअरमन डॉ.प्रेरणाताई शिंदे, खजिनदार डॉ.राजीव शिंदे, माजी प्राचार्य शिवाजीराव बारगळ, प्राचार्य विनोद रोहमारे, उपप्राचार्या भारती कुदळे, समन्वयक मंगेश साळुंके, मनिषा उंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कु.वेदिका दायमा, कु.संजीवनी गाडेकर यांनी केले, तर आभार कु.गायत्री महांकाळे हिने मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकरराव बाहुले (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

जि.प.शाळेतील कु.श्रेया जाधव वक्तृत्व स्पर्धेत तालुक्यात प्रथम


- लियाकतखान पठाण -  संगमनेर -/ वार्ता -
संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील जिल्हा परिषद शाळेतील कु. श्रेया संदीप जाधव इयत्ता चौथी हिने कासारा दुमाला येथे दिनांक ३ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्य सेनानी व आदिवासी श्रमिकांचे नेते साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृती प्रित्यर्थ मानव विकास संस्था संचलित श्री काशेश्वर माध्यमिक विद्यालय कासारा दुमाला या ठिकाणी झालेल्या वकृत्व स्पर्धेत बाल गटात संगमनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. कु.श्रेया हिने मिळवलेल्या या यशाबद्दल गटविकास अधिकारीअनिल नागणे, गटशिक्षणाधिकारी श्री.गुंड विस्तार अधिकारी श्री.भांगरे केंद्रप्रमुख श्रीमती वलवे मॅडम,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व समिती गावचे सरपंच, उपसरपंच,सर्व सदस्य, ग्रामस्थ, पालक, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थिनीला मुख्याध्यापक श्रीमती आरोटे मॅडम, वर्ग शिक्षक श्री. गडाख सर व श्रीमती घोटेकर मॅडम तसेच आई- वडील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐...


माझ्या प्रिय सन्माननीय शिक्षक बंधू - भगीनी आणी गुरुजनांनो आपणास शिक्षक दिनाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा! 
आपण जे ज्ञान, कौशल्ये आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देत आहात, ते खरोखरच अमूल्य आहे. आपल्या मोलाच्या योगदानामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहेत. विद्यार्थ्यांच्या भविष्याची घडण आणि त्यांच्या यशामध्ये आपला सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

आपल्या कठोर परिश्रम आणि अथक प्रयत्नांमुळे आपल्याकडून शिकणारे विद्यार्थी नक्कीच उज्वल यशस्वी होतील. आपण प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहात.

आपल्या मार्गदर्शनासाठी आणि शिकवणीसाठी मनःपूर्वक आभार. आपण असेच सदैव विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत राहावे, त्यांना नवीन उंचीवर पोहोचवण्यासाठी आपली मेहनत अशीच अविरतपणे चालू ठेवावी ही अपेक्षा.
आपणा सर्वांना पुनश्च शिक्षक दिनाच्या खुप खुप आदरपूर्वक हार्दिक शुभेच्छा !


=================================
-----------------------------------------------
पत्रकार शौकतभाई शेख✍️✅🇮🇳...
संस्थापक अध्यक्ष
समता फाऊंडेशन,श्रीरामपूर 
भ्रमणध्वनी +९१ ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

श्रीरामपूरची रश्मी शिंदे झालीमिस इंटरनॅशनल इंडिया 💐💐💐...


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या डिवाइन गृपने आयोजित केलेल्या मिस डीवाईन ब्यूटी २०२४ सौंदर्य स्पर्धेच्या प्रतिष्ठित मिस इंटरनॅशनल इंडिया स्पर्धेत श्रीरामपूरच्या मिस रश्मी प्रेरणा राजीव शिंदे हीने विजयाची पताका रोवली आहे. श्रीरामपूर सारख्या तालुका पातळीवरील ठिकाणाहून येऊन आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद मिळवणारी रश्मी शिंदे ही संपूर्ण भारतातील तालुकास्तरावरील पहिलीच तरुणी होय. या अभूतपूर्व कामगिरीमुळे रश्मी शिंदे हिला जपानची राजधानी टोकियो या ठिकाणी होणाऱ्या 'मिस इंटरनॅशनल' या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाला आहे. 'मिस इंटरनॅशनल' ही जगातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित अशी सौंदर्य स्पर्धा असून तिचे मुख्यालय टोकियो या ठिकाणी आहे. सौंदर्य व विलक्षण बुद्धिमत्तेच्या धनी असलेल्या कु.रश्मी शिंदे हिच्या प्रतिनिधित्वामुळे प्रथमच या स्पर्धेच्या इतिहासात विजेतेपदाला गवसणी घालण्याची सुवर्णसंधी भारताला प्राप्त झाली आहे.
रश्मी शिंदे हीचा मिस इंटरनॅशनल इंडियाच्या विजेतेपदापर्यंतचा हा प्रवास अथांग कर्तुत्वाचा ,अथक मेहनतीचा आणि स्वतःवरील दृढ विश्वासाचा राहिला आहे .श्रीरामपूर सारख्या नीमशहरी भागातून येऊन जागतिक सौंदर्य स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घालण्याचा पराक्रम हा केवळ अविश्वसनीय आणि थक्क करून सोडणारा आहे. यापूर्वीही रश्मी हीने देशांतर्गत विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये आपल्या कर्तुत्वाची अविट अशी छाप सोडली आहे. मग ते 'इंडियाज मिस टिजीपीसी' सारख्या सौंदर्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करणे असो किंवा व्हीजेटीआय मुंबईच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयातील 'प्रतिबिंब' आणि ' वस्त्र ' सारख्या लोकप्रिय फॅशन शोमध्ये सर्वांची वाहवा मिळवणे असो. रश्मी हे नाव मॉडलिंगच्या दुनियेत गेल्या चार ते पाच वर्षापासून सतत चर्चेत राहिले आहे.
रश्मी हीचा शैक्षणिक प्रवास देखील अतिशय उल्लेखनीय राहिला असून तिने आपले प्राथमिक शिक्षण श्रीरामपूर येथील सेंट झेवियर्स या शाळेतून तर माध्यमिक शिक्षण पुण्यातील नामांकित अशा बिशप स्कूलमधून पूर्ण केले आहे. शिक्षण चालू असतानाच साहित्य ,संगीत, कला ,खेळ या विविध क्षेत्रातही तिचा मुक्त वावर राहिला आहे. थोर स्वातंत्र्य सेनानी स्व.ऍड रावसाहेब शिंदे यांच्या रूपात एक ज्ञान तपस्वीच आजोबांच्या रूपात प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या संस्कारांचे ,ज्ञान लालसेचे ,समाजसेवेचे ,साहित्य तसेच वक्तृत्वाचे बाळकडू रश्मी हीस बालवयातच संस्कार रूपाने मिळाले. त्यातूनच तिच्या व्यक्तिमत्त्वाचा बहुआयामी विकास होत राहिला. परिणामी रश्मी आज आघाडीची राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू तसेच राष्ट्रीय स्केटर खेळाडू म्हणूनही ओळखली जाते. एक परिपूर्ण अथलेटीक म्हणूनही तिच्याकडे आज पाहिले जात असून विविध मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेऊन चमकदार कामगिरी करत तिने आपल्या शारीरिक क्षमतेची आणि कणखरपणाची चुणूक वारंवार दाखवून दिली आहे. एवढेच नव्हे तर कथ्थक सारख्या शास्त्रीय नृत्याचे विधिवत प्रशिक्षण घेऊन तिने त्यात ही नैपुण्य प्राप्त केले आहे. रश्मी हीचे मराठी ,हिंदी ,इंग्रजी या तीनही भाषा वरती कमालीचे प्रभुत्व असून त्यातून अमोघ वक्तृत्वाचे कौशल्य तिने प्राप्त केले आहे . अशा विविध अंगाने रश्मी हीचे व्यक्तिमत्व विकसित होत असतानाच शैक्षणिक क्षेत्रातही तिने धवल यश मिळवले आहे. व्हीजेटीआय मुंबई सारख्या नामांकित महाविद्यालयातून तिने बी टेकची पदवी अतिशय उत्तम गुण मिळवून प्राप्त केली आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रात उत्तम करिअरची संधी समोर उभी असताना कॉर्पोरेट की मॉडेलिंग तसेच सौंदर्य स्पर्धचे क्षेत्र असा यक्ष प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला असता अंत:प्रेरणेने व ठाम आत्मविश्वासाने रश्मी हीने मॉडेलिंग क्षेत्राची निवड केली . अतिशय आव्हानात्मक क्षेत्र असताना देखील तिने घेतलेला हा निर्णय हा तिचा स्वतःवरील प्रचंड विश्वासाचा आणि धाडसीपणाचे द्योतक आहे. हा करियर संदर्भातील अतिशय कठीण निर्णय घेत असताना रश्मी हीस आई-वडिलांचा भरभक्कम पाठिंबा मिळाला. डॉ. प्रेरणा आणि डॉ.राजीव शिंदे यांनी पालक म्हणून कधीही आपल्या इच्छा, अपेक्षा आपल्या मुलांवर लादल्या नाहीत. मुलांना त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडण्याची मोकळीक त्यांनी नेहमीच दिली. त्यातूनच रश्मी आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेवू शकली.
डॉ. प्रेरणा शिंदे या श्रीरामपूर मधील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आहेत. पूर्णवेळ कार्यमग्न असूनही आई म्हणून त्या रश्मी हिच्या पाठीशी नेहमीच उभ्या राहिल्या आहेत. प्रत्येक प्रसंगी रश्मी शिंदे हीस मानसिक, भावनिक पाठिंबा देण्याचे, तिचे मनोधैर्य उंचावण्याचे काम डॉ.प्रेरणा यांनी नेहमीच केले आहे. त्यामुळे रश्मीच्या यशात डॉ.प्रेरणा यांचा शब्दश: सिंहाचा वाटा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
रश्मीने मॉडलिंग सारख्या अतिशय आव्हानात्मक क्षेत्रात कार्य करीत असूनही त्याच वेळेस विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल या श्रीरामपुरातील अग्रगण्य शैक्षणिक संकुलाच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी ही आपल्या खांद्यावर घेतली आहे. तिच्या प्रशासकीय कौशल्यामुळेच विद्यानिकेतन शैक्षणिक संकुल आज संपूर्ण नगर जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक संकुल म्हणून नावारूपाला आले आहे . आज या संकुलात दोन हजारपेक्षा (२०००) जास्त विद्यार्थी शिक्षण घेत असून मोठ्या वेगाने संस्थेचा विकास होत आहे. सामाजिक बांधिलकीच्या उदार जाणिवेतून महिला सक्षमीकरणासाठी कार्य करीत असलेल्या प्रेरणा फाउंडेशन या समाजसेवी संस्थेच्या सचिव म्हणूनही रश्मी काम पाहत आहे. तिच्याच मार्गदर्शनाखाली प्रेरणा फाउंडेशन विविध समाज उपयोगी उपक्रम सातत्याने श्रीरामपूर या ठिकाणी राबवत आहे. त्यात गरीब मुलींच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षणाची जबाबदारी , पौगंडावस्थेतील मुलींच्या समस्ये संदर्भातील सेमिनार, ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना मोफत कपडे वाटप, कोरोना काळात गरिबांना शिधा वाटप तसेच मुख्यमंत्री तसेच पंतप्रधान सहाय्यता निधीत भरीव आर्थिक मदत करण्यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
रश्मी हीने अतिशय कमी वयात जीवनाच्या विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे . 'मिस इंटरनॅशनल इंडिया ' या विजेते पदाला तिने घातलेली गवसणी ही तिच्या सौंदर्य, कुशाग्र बुद्धिमत्ता तसेच बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचाच पुरावा आहे. जगात ज्या आघाडीच्या सौंदर्य स्पर्धा गणल्या जातात त्यात मिस युनिवर्स, मिस वर्ल्ड, मिस अर्थ आणि मिस इंटरनॅशनल या चार स्पर्धांचा समावेश होतो. या चार पैकी मिस इंटरनॅशनल सौंदर्य स्पर्धा वगळता तीनही स्पर्धांवर भारतीय तरुणींनी विजयाची मोहर उमटवलेली आहे. तेव्हा जपानची राजधानी टोकियो येथे होणाऱ्या ' मिस इंटरनॅशनल' या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत विजेतेपदाचा लखलखणारा हिरेजडीत मुकुट रश्मी शिंदे जेव्हा आपल्या मस्तकावर धारण करेल तेव्हा वर्षानुवर्षीचे कोट्यवधी भारत वासियांचे अधूरे राहीलेले स्वप्न साकार होईल. याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. रश्मी हीस या स्पर्धेसाठी आणि विजेतेपदासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा.
ह्या विजेते पदाच्या पार्श्वभूमीवर रश्मी हीचा भव्य स्वागत आणि नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन श्रीरामपूरकर वासीयांच्या वतीने शुक्रवार दि. ०६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजता महादेव मळा याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. तरी ह्या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ह्या सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
शंकरराव भुसळे (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳....
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



Wednesday, September 4, 2024

श्रीरामपूर विधान मतदारसंघात विविध विकास कामांसाठी २ कोटी १५ लाख रुपये निधी मंजूर - आ. कानडे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता 
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात जन सुविधा विशेष अनुदान योजना, नागरी सुविधा विशेष अनुदान योजना व क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २ कोटी १५ लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात करावयाच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले होते. या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचे जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी कळविले आहे. मतदार संघातील जनसुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत १० कामांना प्रत्येकी १० लाख रुपये असा एकूण १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच नागरी सुविधा विशेष अनुदान योजना अंतर्गत ८ कामांना ७५ लाख रुपये तर क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत २ कामांना ४० लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

जनसुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे घनवट वस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, गुजरवाडी येथे स्मशानभूमीचा विकास करणे १० लाख रुपये, खोकर येथे भरमोल वस्ती (फकीर वस्ती) रस्ता करणे १० लाख रुपये, मुठेवडगाव येथे स्मशानभूमी विकसित करणे १० लाख रुपये, खिर्डी येथे स्मशानभूमी विकसित करणे १० लाख रुपये, मालुन्जा येथे म्हसोबा वस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, महांकाळवडगाव येथे हनुमान मंदिर, बरड वस्ती ते नारायण बडाख वस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, खिर्डी येथे लक्ष्मण जाधव वस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, केसापूर (ता. राहुरी) येथे वार्ड क्र. १ रस्ता करणे १० लाख रुपये, व दवणगाव (ता. राहुरी) येथे बटवाल वस्ती रस्ता करणे १० लाख रुपये असा एकूण १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

नागरी सुविधा विशेष अनुदान योजनेअंतर्गत श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु. येथे ऐनतपूर वस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, टाकळीभान येथे सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्तीची सोय करणे १० लाख रुपये, निपाणीवडगाव येथे सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्तीची सोय करणे ८ लाख रुपये, बेलापूर बु. येथे गावअंतर्गत रामगड वस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, बेलापूर बु. येथे बोंबलेवस्ती रस्ता करणे १० लाख रुपये, पढेगाव येथे सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्तीची सोय करणे ७ लाख रुपये, तर टाकळीमिया (ता. राहुरी) येथे सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्तीची सोय करणे १० लाख रुपये व टाकळीमिया (ता. राहुरी) येथे कांबळे वस्ती व तनपुरे वस्ती रस्ता करणे १० लाख रुपये अशा एकूण ७५ लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

याशिवाय क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत मुठेवडगाव येथील श्री संत तुळशीराम महाराज देवस्थान येथे भक्तनिवास बांधणे २५ लाख रुपये व वांगी बु. येथील श्री गणेश देवस्थान गणेशखिंड येथे भक्तनिवास बांधणे १५ लाख रुपये अशा ४० लाख रुपये निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून या कामांचा लवकरच शुभारंभ होणार असल्याची माहिती आ. कानडे यांनी दिली.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================


=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================