राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, October 21, 2024

टिळकनगर धर्मग्रामात मिशन रविवार साजरा


"मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी आलो आहे - प्रभू येशू ख्रिस्त
 
- श्रीरामपूर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
काल रविवार दि.२० ऑक्टोबर संपूर्ण जगात देऊळमाता मिशन रविवार (मिशन संडे) साजरा करण्यात आला.
"मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी आलो आहे असे प्रभू येशू ख्रिस्तांने सांगितले प्रमाणे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या समर्पित व त्यागमय जीवनातून दुसऱ्यांची सेवा करण्याची शिकवण दिली आहे. ख्रिस्ताचे हे मिशन कार्य गेली आडीच हजार वर्षापासून अविरत सुरू आहे,अनेक संकटे आली तरी हे कार्य सुरुच आहे, हे मिशन कार्य करीत असतांना अनेक धर्मगुरू,धर्मभगिनी,प्रापचिंक यांनी आपले जीवन ख्रिस्ताठायी समर्पित केले आहे. त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता बाळगणे आवश्यक आहे. हे मिशन कार्य यापुढेही अविरत चालू राहावे यासाठी आपण प्रयत्न करूयात असे फादर म्हणाले.
आजच्या मिशन संडेचे औचित्य साधून टिळकनगर धर्मग्रामातील आगाशेनगर मधील संत झेवियर विभाग (झोन) मधील राजेंद्र भोसले सर,पी.एस. निकम सर व सतिश पाटोळे साहेब यांच्या संकल्पना व योगदानातून आगाशेनगर मधील डि पॉल 
संस्था संचलित ' इप्रेसिया सेवा संदन ' वृद्धाश्रम मधील माता भगिनींना फळे (सफरचंद,केळी) व बिस्किटांचे वाटप करण्यात आले.
 याप्रसंगी टिळकनगर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरु फा.पीटर डिसोझा,सहाय्यक धर्मगुरू फा.संजय पठारे यांनी विशेष प्रार्थना करून आशिर्वाद दिला. तसेच सर्व वृद्ध महिलांची आस्थाने विचारपूस केली . त्यामुळे या वृद्ध महिलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. याप्रसंगी मायकल जगताप हेही प्रामुख्याने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित "साईगंगा न्यूज पोर्टल" चे लोकार्पण

- अजीजभाई शेख -  राहाता -/ वार्ता -
स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या माध्यमातून, संगमनेर तालुक्यातील मिरपूर लोहारे येथील पत्रकार रमेश भागवत कापकर संपादित "साई गंगा न्यूज पोर्टल" चे स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख यांच्या शुभहस्ते काल रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी श्रीरामपूर येथील समता कार्यालयात अनावरण तथा लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी ॲड.मोहसिन शेख, पत्रकार अफजल मेमन, हेमंत शेजवळ,कलिम शेख, इब्राहिम बागवान आदि मान्यवर उपस्थित होते.

           पत्रकार रमेश भागवत कापकर हे साईगंगा या साप्ताहिकाचे संपादक असून स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संगमनेर तालुका समन्वयक आहेत, आपल्या साप्ताहिक साई गंगा या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्या संगमनेर तालुक्यासह त्यांनी राहाता, कोपरगांव,राहूरी,सिन्नर, येवला आदी तालुक्यात आपल्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा सातत्याने प्रयत्न केलेला आहे तथा विविध विषयांकित विशेषांकाद्वारे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, राजकीय , शासकीय, प्रशासकीय यासोबतच धार्मिक आणी पर्यटन, तथा वृक्ष आणी जल संवर्धन, अशा जनहिताच्या विषयांना सातत्याने आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे.

          या वर्तमानपत्राने एक पाऊल पुढे टाकत इलेक्ट्रॉनिक मिडियाकडे देखील आगेकूच करत स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित "साई गंगा न्यूज पोर्टल" या नावाने न्यूज पोर्टल सुरु केले आहे. यात देखील विविध विषयांकीत दैनंदिन ताज्या घडामोडींच्या बातम्या असणार आहे.
या साई गंगा या न्यूज पोर्टलसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ पत्रकार शौकतभाई शेख, कायदेविषयक सल्लागार ॲड.मोहसिन एस.शेख, कार्यकारी संपादक अमोल म्हस्कुले, सहसंपादक संपतराव मैड,उप संपादक हेमंत शेजवळ, मानद संपादक पंढरीनाथ खालकर, व्यवस्थापक - सतिश चिंतामणी तथा संगमनेर तालुक्यासह परिसरातील इतरही तालुक्यातील प्रतिनिधी/ वार्ताहर आदि कामे संभाळत आहेत.

*साई गंगा न्यूज पोर्टल सुरु केल्याबद्दल संपादक रमेश कापकर यांचा स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्यावतीने शौकतभाई शेख यांच्या हस्ते समता कार्यालयात सत्कार करण्यात येवून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या*

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

Sunday, October 20, 2024

मौलाना आझाद हायस्कुल व सावित्रीबाई फुले शाळेत स्वातंत्रता सेनानी सरसय्यद अहमद खान यांची जयंती साजरी


सरसय्यद अहमदखान यांच्यामुळे केवळ मुस्लिम समाजाचं नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजच इंग्रजी भाषेतून शिक्षण घेऊ लागला - डॉ.प्रा.अब्दुस सलाम

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
पारंपारिक मदरसा प्रणित शिक्षण व्यवस्था आणि ब्रिटीशांच्या आगमनानंतर भारतात आलेली चर्चप्रणित शिक्षण व्यवस्था यातील संघर्षात पारंपारिक मदरसाप्रणित शिक्षण व्यवस्थेला आधुनिक शिक्षणाची जोड देण्याचे महत्वपूर्ण कार्य सर सय्यद अहमदखान यांनी पार पाडले. म्हणूनच डॉ. राजेंद्रप्रसाद आणि डॉ. जाकीर हुसेन सारखे राष्ट्रपती याच मदरसा शिक्षण व्यवस्थेतून निर्माण होऊ शकले. त्यांच्यामुळे केवळ मुस्लिम समाजाचं नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजच इंग्रजी भाषेतून शिक्षण घेऊ लागला. त्यांनी मध्ययुगीन भारतातील चाळीसपेक्षा जास्त अरबी, फारशी ग्रंथांची इंग्रजीत भाषांतरे केली हे त्यांचे सर्वात मोठे कार्य आहे, असे प्रतिपादन मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह डॉ.प्रा. अब्दुस सलाम सर यांनी केले. 
मुकुंदनगर येथील मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कुल व सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेत स्वातंत्र्य सेनानी सर सय्यद अहेमद खान यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर सय्यद अहमद खान यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मख़दुम एज्युकेशन ऍंड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, प्राचार्या फरहाना सय्यद, मुख्याध्यापक नौशाद सैय्यद, असलम पटेल, फरीदा जहागिरदार, सोलापूरे नाहीद, नाजेमा शेख, खतीजा खान, नफीस अंजुम, सदफ शेख, शेख शाहीन, शेख फरजाना, शेख सुलताना, शेख मुमताज, शेख यास्मिन, शेख हिना आदि उपस्थित होते.
प्रास्तविक करतांना प्राचार्या फरहाना सय्यद यांनी सांगितले की, आज आपण स्वत:चे वाढदिवस थाटामाटात साजरे करत असतो, पण ज्यामुळे स्वातंत्र्य उपभोगत आहोत, त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात फार उदासिनता जाणवते, ही समाजाचे दुर्भाग्य आहे, असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मलायका व सिदरा यांनी केले, तर आभार फरिदा जहागिरदार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मौलाना आझाद हायस्कुल व सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेच्या सर्व शिक्षकांनी भरपूर परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*💐✅🇮🇳...
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================


धामोरी - कोपरगाव रस्त्याची दयनीय अवस्था बांधकाम खात्याने लक्ष देण्याची नागरीकांची मागणी


धामोरी - कोपरगाव रस्त्याची दयनीय अवस्था  बांधकाम खात्याने लक्ष देण्याची नागरीकांची मागणी

- कोपरगांव - प्रतिनिधी -/ वार्ता -
कोपरगाव तालुक्यातील धामोरी, मोर्वीस, चासनळी, मायगाव देवी, सांगवी भुसार या गावांतील नागरिकांचे दररोज तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच कोपरगांव ला दैनंदिन कामासाठी जावे - यावे लागले. परंतु सांगावी भुसार, काळ धोंडो ते रवंदा गाढे वस्ती दरम्यान रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे छोटेमोठे अपघात ही होतात. अन् त्यातच रस्त्याच्या कडेला वेडीभाभळींची साम्राज्य 
असल्याने अपघातास निमंत्रण दिले जात आहेत, तरी लवकरात लवकर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेवुन या मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था बघून ह्या मार्गावरील रस्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी धामोरी, मोर्वीस,चास नळी,मायगाव देवी,सांगवी भुसार येथील प्रवाशी तथा नागरिकांकडून केली जात आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------



Saturday, October 19, 2024

आली दीपावली...प्रेम, सुख सावली


दिवाळी सण म्हणजे सर्वांचा आवडता व आनंदाचा सण. दिव्यांचा लखलखाट, फटाक्यांची आतषबाजी, भरगच्च रांगोळ्या, तिखट - गोड फराळ आणि नव-नविन कपडे. वा sss दिवाळीची रंगतच न्यारी. सर्व कुटुंबीय एकत्र येण्याचा सर्वात महत्त्वाचा सण म्हणजे दिवाळी.
          दिवाळी सणाची तयारी २५-२० दिवस अगोदरच सुरू होते. नवीन वस्तू खरेदीबाबतच्या ऑफर्स, सेल अशा अनेक जाहिराती वर्तमान पत्रात वाचायला मिळतात. तसेच हेही वाचतो किंवा मोबाईल वर पाहतो की, ज्यांना खरी गरज आहे - अन्न, वस्त्र, निवारा व मदतीची, अशा लोकांकडूनच पणत्या, आकाशकंदील, रांगोळी खरेदी करावी. पण, प्रत्यक्षात असे किती होते? किंवा कोणी घेते का? खूप कमी ठिकाणी असे दृश्य पाहावयास मिळते. काहीवेळा असेही पाहावयास मिळते की, गावाकडील काही लोक हे शहरामध्ये जाऊन दिवाळीची खरेदी करतात. आणि आवर्जून सांगतात की, ५० रु. जास्त गेले पण, काय भारी आहे. असलं इथं गावात नाही मिळत म्हणून यावेळी शहरातून आणलंय खास दिवाळीला.
           तसेच, गावाकडील काही मंडळी पणत्या, आकाशकंदील, रांगोळी विकण्यास शहरामध्ये जातात. परंतु; पाहिजे तितका नफा त्यांना मिळत नाही. कारण; शहरातील काही दुकानदार महागड्या शोभेच्या वस्तुंनी गिर्हाईक आकर्षित करतात. फॅन्सी व लेटेस्ट या नावाखाली बरयाचदा गिर्हाईकास भूरळ पाडली जाते. आणि बरेचजण पैशाचा विचार न करता खरेदी करत असतात. उंची - महागडी कपडे खरेदी करतात. प्रदूषण पसरविणारे फटाके मोठ्या प्रमाणात वाजवतात. लहान बालके. वृध्द, आजारी यांचा विचार केला जात नाही. त्यामुळे प्रदुषण वाढ होऊन अनेकजण आजारीही पडतात.
            फराळाच्या बाबतीतही तसेच. काही घरांमध्ये तर असे पाहावयास मिळते की, भरमसाठ फराळाचे पदार्थ बनविले जातात, अगदी तेलकट - तुपट कसलाही विचार न करता. का तर म्हणे, मामाला, आत्याला डबा द्यायचाय. मित्राला द्यायचंय, मैत्रिणीला द्यायचंय. आणि घरी आलेले इतरांचे डबे काहीवेळा तसेच राहतात. फक्त आवडीचाच पदार्थ खाल्ला जातो. ८-८, १०-१० दिवस काही डबे उघडले जात नाहीत. शेवटी तो फराळ वाया जातो. काहीवेळा असेही आढळते की, त्यांचे पदार्थ चांगल्या तेलातले नसतात, त्याला काही टेस्टच नसते. नको खायला. फक्त आपलेच खा. भरमसाठ पदार्थ करण्याच्या प्रकाराने काहींना विशेषतः लहान बालके व महिलांमध्ये - पित्त, डोके दुखणे, पोट दुखणं यांसारख्या समस्या आढळतात.
        आपणाला जर खरंच समाधानाने व आनंदाने दिवाळी सण साजरा करावयाचा असेल तर साधे दिवे खरेदी करा, साध्या साजेलशा पणत्या, आकाशकंदील गरजू लोकांकडूनच खरेदी करा. काही गरजू, अपंग लोक यांसारख्या वस्तू विक्रीस ठेवतात, तेंव्हा त्यांच्याकडून जरूर घ्या. त्यामुळे त्यांनाही फायदा होईल, शिवाय त्यांना त्यांच्या मुलभूत गरजा भागविता येतील. आणि त्यातून मिळणारा आनंद हा लाखमोलाचा असणार आहे. आपणाला त्यांच्या गरजा प्रत्यक्षपणे भागविता येत नसतील तर निदान आपण हे तरी करू शकतो.
         कपडे खरेदी करतानाही पैशांचा योग्य विचार करूनच खरेदी करावेत. त्याच्याकडे खूप भारी आहेत म्हणून मलापण तसेच हवे आहे. अशी बरोबरी न करता विचार करूनच कोणतीही खरेदी करावी. दिवाळीला चांगले नवीन कपडे घेतले म्हणून पहिले कपडे ठेवणीत ठेवू नका. येत नसतील पण, जर घालण्याजोगे असतील तर एखाद्या गरजूस ते कपडे भेट द्यावेत. सोबत थोडा फराळही द्यावा.
                  फटाक्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, खूप मोठ्या आवाजाचे, खूप धूर करणारे फटाके वाजवू नका. काळजीपूर्वक हाताळता येतील असेच मोजके फटाके वाजवा. फटाके वेळी लहान मुलांना एकटे सोडू नका.आणि हो...दिवाळी बरोबर ज्ञान दीपावली साजरी करूयात .मुलांना छोटी छोटी ..पण चांगली संस्कार करणारी जगातली पुस्तके भेट देऊयात..फटाके पेक्षा आपण ग्रंथ संस्कृती घरात निर्माण करूया..फटाक्यांचा प्रकाश तात्पुरता असेल..आणि त्यातून कदाचित फक्त धूर मिळेल पण आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मुलांना सुट्टीत चांगले खेळ खेळायला देणे हेच आवश्यक वाटते.. दर वर्षी दिवाळीत नवीन कपडे घेतो. तशी ज्ञान देणारी पुस्तके खरेदी केली तर मुलांचे व्यक्तिमत्व आणि प्रभावी होईल.. हलकी फुलकी गोष्टीची पुस्तके ,सुट्टीत निसर्ग सान्निध्य,आपल्या माणसांचे प्रेम मुलांना मिळायला हवे..सर्जनशील होण्याचा आनंद वेगळाच असेल. नोकरी,संसाराच्या व्यापातून मिळणारे दिवाळीचे काही दिवस मन मुक्त होण्याचा आणि सर्वांना आनंद देण्याचे असायला हवेत. 
                दिवाळी सणाच्या निमित्ताने माहेरवाशीण, सासुरवाशीण, पै- पाहूणे एकत्र जमलेले असतात, तेंव्हा कोणतीही तेढ मनात न आणता, रुसवे - फुगवे सोडून, आनंदाने सर्वांनी मिळून सण साजरा करा. त्यामुळे आपला आनंद द्विगुणित तर होईलच पण; खर्या अर्थाने दिवाळी साजरी केल्याचा आनंद मिळेल. आणि म्हणूनच तर म्हणतात ना - 
" सण दसरा,दीपावली मोठा
नाही आनंदा तोटा .".

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*लेखन*✍️✅🇮🇳...
सौ.मीनल अमोल उनउने
सातारा - ९१३०४७०३९७
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

जिल्ह्यात समाजवादी पार्टी विधानसभा निवडणूक लढवणार - जोएफ जमादार


जिल्ह्यात समाजवादी पार्टी विधानसभा निवडणूक लढवणार - जोएफ जमादार

- शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील समाजवादी पार्टी च्या जिल्हा कार्यालयात नुकतीच जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या अध्यक्षतेखाली समाजवादी कार्यकर्ता - पदाधिकारी यांची मिटिंग संपन्न झाली, यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभेत समाजवादी पार्टी चे उमेदवार रिंगणात उतरविण्याविषयी तथा अनेक विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी समाजवादी पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
सध्या देश आणि राज्यातील राजकीय वातावरण पाहता कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल याचे सांगता येणे मोठे दुरापास्त झाले आहे. सकाळी एका पक्षात असणारा नेता सायंकाळी दुस-या पक्षात प्रवेश करत आहे, सकाळी जो विरोधकांच्या विषयी विरोधात बोलत होता, सायंकाळी तोच विरोधकांच्या समुहात सामील होत मांडीला मांडी लावून त्यांचे गुणगाण गात आहे, हे सर्व पाहून मतदार राजामध्ये प्रचंड प्रमाणात संताप आणि चीड यासोबतच संभ्रमणाचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून सर्व जाती धर्माला बरोबर घेवून चालणारा आणी सर्वांना समान न्याय देणारा असा उमेदवार, असा पक्ष समस्त जागरुक मतदारांना हवा आहे, आणी तो पक्ष केवळ समाजवादी पार्टी हा पक्ष
असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अखिलेशजी यादव, प्रदेशाध्यक्ष आ. अबु असिम आझमी यांच्या आदेशान्वये अहमदनगर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टी आपले उमेदवार उभे करणार असल्याचे पक्षाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

समाजवादी पार्टी हा पक्ष सर्व जाती धर्मांना बरोबर घेवून चालतो, सर्वांना समान न्याय देण्याची भुमिका ठेवतो, उपेक्षित आणि दुर्लक्षितांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवित राहतो, करीता समाजवादी पक्षाने निवडणूक लढवावी अशी समाजवादी पार्टी कार्यकर्ता आणी जिल्ह्यातील समस्त मतदारराजांकडून वारंवार सातत्याने मागणी होत असल्याने जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच शहरातील समाजवादी पार्टी कार्यालयात मिटिंग घेण्यात आली, त्यात निवडणूक विषयांसह अनेक ज्वलंत विषयांवर चर्चा करण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने संगमनेर,राहुरी,राहाता (शिर्डी), या विधानसभा मतदारसंघापैकी कोणत्याही एका मतदार संघातून जोएफ जमादार यांनी उमेदवारी करावी असा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अग्रह धरल्याने सदरील ठिकाणी जोएफ जमादार हे स्वतः उमेदवार असणार असल्याचे सांगितले गेले.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक नेते योग्यतेचे असल्याने यातील योग्य उमेदवारास समाजवादी पार्टी निवडणूक रिंगणात उतरविणार असल्याचे सांगण्यात आले. समस्त नागरीकांच्या मुलभूत गरजा व त्यांचे हक्क, अधिकार याविषयी समाजवादी पार्टी नेहमीच सातत्याने आवाज उठवित असल्याने सोबतच अहमदनगर जिल्ह्यातील समाजवादी पार्टी चे कामे देखील पुर्वीपासून मोठ्या प्रमाणात असल्याने विधानसभा निवडणूकीत हमखास यश मिळणार असल्याचे देखील यावेळी जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी सांगितले.

या वेळी आसिफ तांबोळी, अय्यूब पठाण, अब्दुल सैय्यद, सुल्ताना शाह, राजू शेख, मतीन शेख, अल्तमश शेख, गुफ्फरन जमादार, जैद शेख,संजय वाघ,अनवर तांबोळी, इमरान मंसूरी, अमजद शेख, सलीम शेख, शहेजाद शेख , कलीम शेख, रियाज सैय्यद, उसामा शेख, अली शेख, शोएब शेख, साहिल शेख, फरहान शेख, तौसीन मंसूरी, रफीक शेख, मुबाशहीर पठाण, अरबाज़ क़ुरैशी,अमन इनामदार, आदि मान्यवर उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================



<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
*यामध्ये प्रामुख्याने संगमनेर,राहुरी,राहाता (शिर्डी), या विधानसभा मतदारसंघापैकी कोणत्याही एका मतदार संघातून जोएफ जमादार यांनी उमेदवारी करावी असा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अग्रह धरल्याने सदरील ठिकाणी जोएफ जमादार हे स्वतः उमेदवार असणार असल्याचे सांगितले गेले.*
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

Friday, October 18, 2024

कोणाला निम्मेच तिकीट, तर कोणाला मोफत प्रवास आहे




एस टी बस ची अत्यंत दयनीय
अवस्था,त्याकडे कोण पाहे

एस टी बस चे तुटके बाकमुळे कोपरगांव तालुक्याच्या टाळकी,रवंदा, सांगवी भुसार,धामोरी चासनळी या मार्गावरील प्रवाशांचे होत आहे प्रचंड प्रमाणात हाल

- कोपरगांव - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत कोपरगांव आगारातील टाळकी, रवंदा, सांगवी भुसार,धामोरी चास नळी या मार्गावरील एस टी बस मधील आसन व्यवस्थेची अतिशय दयनीय अवस्था झालेली असल्याचे बघावयास मिळते आहे.
सदरील मार्गावर एस टी बस प्रवाशांनी फुल्ल भरलेली असता बस मधील काही आसन व्यवस्थेचे बाक अक्षरशः तुटलेल्या अवस्थेत दिसुन येत आहे. या तुटलेल्या आसन व्यवस्थेची दयनीय अवस्थेमुळे काही प्रवाशांना उभे राहुन प्रवास करणे भाग पडत आहे.
बसमध्ये उभे राहुन प्रवास करताना तोल जावू नये म्हणून तुटलेल्या बाक चे सहारे घ्यायचे ? की, तुटलेले बाक बसमध्ये इतरत्र मागे पुढे जावू नये म्हणून त्यांना धरुन ठेवायचे ? असा संभ्रम निर्माण होवून प्रवाशांची मोठी पंचायत निर्माण होत आहे.
शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनेद्वारे एस टी बस मध्ये कोणाला निम्मेच तिकीट तर कोणास मोफत प्रवास आहे,मात्र एस टी बस ची झालेली दुरवस्था याकडे कोण पाहे असे म्हण्याची वेळ प्रवाशांवर येवून ठेपली आहे.
आणि आतातर दीपावली सण येत असल्याने एस टी बस मध्ये प्रचंड गर्दी ही होणारच आहे, तेव्हा या दयनीय आसन व्यवस्थेची सुधारणा होईल तरी केव्हा ? याकडे देखील प्रवाशांचे लक्ष लागले आहे. तरी संबधित महाराष्ट्र राज्य परिवहन ( एस. टी.) महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणी कोपरगांव आगारातील प्रमुख अधिकारी यांनी सदरील बाबी त्वरित दखल घेवुन या दयनीय आसन व्यवस्थेची सुधारणा करावी अशी मागणी रवंदा,सांगवी भुसार,धामोरी चास नळी येथील प्रवाशांकडुन केली जात आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दत्तात्रय घुले - धामोरी 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================