राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, November 14, 2024

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खरवली फाटा बायपास मार्गाचे अपूर्ण काम अत्यंत धोकादायक आणि गैरसोयीचे*


खरवली कडे जाणाऱ्या बायपास रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे - नागरिकांची मागणी

- बोरघर - माणगाव - / विश्वास गायकवाड -
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली सतरा वर्षे रखडले आहे. संबंधित राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण कामाच्या ठेकेदाराने आपल्या सोई प्रमाणे या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू ठेवले आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाची ठिक ठिकाणी अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणी असलेल्या मोठ मोठ्या खड्ड्यांमुळे आणि डायव्हरसन मुळे या राष्ट्रीय महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी आणि उपरोल्लेखित खरवली फाटा ओपन अंब्रेला हॉटेल समोरील खरवली गावाकडे जाणाऱ्या बायपास मार्गाच्या आसपास भीषण अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांना, कुटुंबांना आपले अनमोल प्राण गमवावे लागले आहे. 
      मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गा पैकी एक असून हा महामार्ग मोठ्या रहदारीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. देशाच्या उत्तर आणि दक्षिण टोकाला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग शासन, प्रशासन आणि ठेकेदारांच्या अक्षम्य नाकाम वृत्तीमुळे तब्बल सतरा वर्षे प्रलंबित राहिला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामा विरोधात आणि प्रलंबित रटाळ चौपदरीकरणाच्या कामा विरोधात मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली रायगड प्रेस क्लब च्या माध्यमातून अनेक प्रकारची आंदोलने केली, निवेदने दिले मात्र निष्ठूर प्रशासकीय यंत्रणेने आणि संबंधित कामाच्या ठेकेदाराने या कडे वारंवार अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी अनेकदा मोठ मोठे अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. 
       मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव कडून मुंबई च्या दिशेने जाताना खरवली फाटा ओपन अंब्रेला हॉटेल समोर साले, उमरोळी, खरवली, चेरवली, पेण, आमडोशी, बोरघर, उसर, चरई, तळेगाव, बोरीचा माळ, म्हसळा, तळा, मुरूड इत्यादी पर्यटनस्थळाकडे जाणारा रस्ता आहे. या जोड रस्त्याकडे जाणाऱ्या वाहन चालकांना जीव धोक्यात घालून महामार्गाच्या पश्चिमेस खरवली कडे जावे लागते. खरवली फाटा या ठिकाणी खरवली कडून माणगाव, इंदापूर कडे येणाऱ्या वाहनांना सदर राष्ट्रीय महामार्ग क्रॉस करण्यासाठी महामार्गाच्या खाली मोठी मोरी तथा सबवे ची व्यवस्था केली आहे. मात्र माणगाव कडून खरवली कडे जाणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी सोयीस्कर असलेल्या पश्चिमेकडील बायपासचे काम अद्याप अपूर्ण ठेवले असल्याने या ठिकाणी वाहन चालकांची मोठी गैरसोय होते. कारण या ठिकाणी ठेकेदाराने खरवली कडे जाणाऱ्या बायपास मार्गाचे काम अद्याप केलेले नाही. त्यामुळे महामार्गावरून भरदाव येणारे वाहन चालक अचानक खरवली फाट्यावर आल्यावर खरवली कडे जाण्यासाठी वाहनाची गती कमी करतो त्यामुळे मागून भरधाव येणाऱ्या वाहन चालकांना आपल्या वाहनाचा वेग कमी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या मुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने या समस्येवर मात करण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणच्या बायपास चे काम शीघ्र गतीने करावे अशी नागरिकांकडून मागणी केली जात आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Wednesday, November 13, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुस्लिमांना नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्याबाबत सकारात्मक - इद्रिस नायकवाडी


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू, फुले,आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. म्हणूननच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधिमंडळात मुस्लिम समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुस्लिमांना नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्याबाबत सकारात्मक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे हे सुध्दा घर्मनिरपेक्ष व पुरोगामी विचारांवर काम करणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे अशा धर्मनिरपेक्ष विचाराच्या नेतृत्वाखालील श्रीरामपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. कानडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून विधानसभेत पाठवावे, असे आवाहन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आमदार इद्रिस नायकवाडी यांनी केले.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महायुतीचे उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ शहरातील वार्ड नंबर २ मधील मौलाना आझाद चौक येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. माजी नगरसेवक मुख्तार शहा अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सचिव हसीन शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, कुरेशी समाजाचे अध्यक्ष मेहबूब कुरेशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन शितोळे आदीसह मान्यवर उपस्थित होते.

नायकवाडी म्हणाले, उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या समाजाच्या विकासासाठी आपल्या विचाराची माणसे सत्तेत जाणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुस्लिम समाजाला सत्तेत प्रतिनिधीत्व दिले. अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टी) ची स्थापना करून मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळास बाराशे कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाने काम करणारे नेतृत्व ओळखावे असे आवाहन त्यांनी केले.

आ. कानडे म्हणाले, पाच वर्षांपूर्वी मायबाप मतदारांनी लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करण्याची संधी दिली. ती जबाबदारी समजून आपण भेदभाव न करता प्रामाणिकपणे काम केले. जे जे प्रश्न लोकांनी आणले ते सोडवण्याचा प्रयत्न केला वार्ड नंबर २ मध्ये सात कोटीहून अधिक रुपयांची विकास कामे केली. मतदारसंघात १२०० कोटी रुपयांचा विकास निधी आणला पाच वर्षांपूर्वी काँग्रेसचा आमदार पळून गेला. काँग्रेसकडे उमेदवार नव्हता. त्या संकट काळात आपल्याला उमेदवारी दिली. आपण एकनिष्ठ व प्रामाणिकपणे पक्षासाठी काम केले. परंतु मला धोका मिळाला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागलो नाही म्हणून षडयंत्र रचले गेले. पक्षाच्या नेतृत्व या कट कारस्थानला बळी पडले. ठराविक घराण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले उमेदवारी नाकारली. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या पाठीशी उभे राहत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली. कटकारस्थान रचनाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्याला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अविनाश आदिक यांनी, आ. कानडे यांनी या भागात सात कोटी पेक्षा अधिक रुपयांची विकास कामे केली आहेत. कोट्यावधी रुपयांची विकास कामे करूनही काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली. परंतु आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महायुतीचे उमेदवार असून त्यांना मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन केले. या भागात केलेल्या विकास कामांमुळे सर्व मुस्लिम समाज तुमच्याबरोबर असून या भागातून मोठे मताधिक्य देऊ, अशी ग्वाही माजी नगरसेवक मुक्तार शहा यांनी यावेळी दिली. यावेळी याकूब शहा, आदिल मखदूबी यांची भाषणे झाली. भटक्या विमुक्त समाजाचे नेते मल्लू शिंदे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले.

यावेळी माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, सलीम शेख, मोहम्मद शेख, भाऊसाहेब मुळे, राजेंद्र पवार, अल्तमश पटेल, अशोक कानडे, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, जयश्री शेळके, सायरा शहा, कविता कानडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव फारूक पटेल, राज्य प्रतिनिधी विश्वनाथ आवटी, सुनील थोरात, विधानसभा अध्यक्ष किशोर पाटील बकाल, शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, शहर उपाध्यक्ष सैफ शेख, युवक जिल्हा कार्याध्यक्ष माजी नगरसेवक अल्तमश पटेल, माजी नगरसेवक नजीर मुलानी, तालुका युवक उपाध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, युवक शहर उपाध्यक्ष तौफिक शेख, गुरुचरण सिंग भाटियानी महिला तालुकाध्यक्ष मंदाताई गवारे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियंका जनवेजा, रुबीना पठाण, तसेच प्रा. कार्लस साठे, राजेंद्र कोकणे, बंडोपंत बोडखे, जयकर मगर. अक्षय नाईक, फिरोज शहा, एजाज दारूवाला, अहमद शहा, मुदस्सर शेख, जावेद तांबोळी, अब्दुल मणियार, बागवान, नदीम तांबोळी, अब्दुल मणियार, दिशान शेख, फिरोज पठाण, इफ्तेकार शेख आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व मुस्लिम समाज बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

मौलाना आझाद व्याख्यानमाला पहिले पुष्प


मौलाना आझाद यांनी शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून अंमलात आणले - प्रा.डॉ.महेबुब सय्यद* 

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांनी देशाची शैक्षणिक प्रगती व तरुणांना प्रशिक्षणाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी शैक्षणिक धोरण आखले. शिक्षणाला राष्ट्रीय प्रवाहाचे साधन म्हणून त्यांनी अंमलात आणले. व त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होऊन शिक्षणाचे दारे सर्वांसाठी खुली झाली. त्यामुळे शिक्षण विस्ताराचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, शिक्षणाचे महत्व विशद करतांना संसदेत मौलाना आझाद म्हणाले होते की, देशाचे अंदाजपत्रकात शिक्षणाला महत्वाचे स्थान देणे गरजेचे आहे. अन्न, वस्त्रानंतर शिक्षणाचा क्रम लावला पाहिजे. त्यांचे असे मत होते की, देशाच्या पंचवार्षिक योजनेचा हेतू केवळ शेती, उद्योग, वीज, दळणवळणाची साधने यांची प्रगती एवढाच असू नये तर देशाच्या नवीन पिढीची जडण घडण योग्य प्रकारे होण्यासाठी शिक्षणाकडेही तेवढेच लक्ष दिले पाहिजे. म्हणूनच सुरुवातीच्या काळात देशाचे शैक्षणिक बजेट २ कोटीचे होते. ते १९५८ साली ३० कोटींचे झाले. शैक्षणिक विकासासाठी त्यांनी ठोस पाऊले उचचली. अनेक नविन शैक्षणिक संस्था निर्माण करुन विकसित केल्या.
१९२३ साली अवघ्या ३५ व्या वर्षी ते काँग्रेस पक्षाचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले. धारासना सत्याग्रहाचे ते प्रमुख क्रांतीकारक होते. पुढे १९४० - ४५ या काळात सलग सहा वर्षे ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहिले. त्यांच्याच काळात १९४२ चे अंग्रेजो भारत छोडो ही चळवळ उभी राहिली. स्वातंत्र्यासाठी एकूण साडे सात वर्षे त्यांनी कारावास भोगला. स्वातंत्र्य लढ्यात सर्वाधिक काळ कारावास भोगण्याचा उच्चांक त्यांच्या नावावर आहे. त्यांच्या आयुष्यातील सरासरी आठवड्यातील एक दिवस कारावासात गेला आहे. असे नमूद केले. 
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 137 व्या जयंतीनिमित्त मखदुम सोसायटीच्यावतीने आयोजित कौमी एकता सप्ताह मध्ये मुकुंदनगर येथील मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल मध्ये डॉ.महेबुब सय्यद यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह प्रा डॉ अब्दुस सलाम सर, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, सचिव डॉ कमर सुरुर, संचालक राजुभाई शेख, डॉ शमा फारुकी, प्राचार्या फरहाना सय्यद, हसीब शेख, फरीदा जहागिरदार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ कमर सुरुर यांनी तर सूत्रसंचालन अंजुम खान यांनी केले. आभार यास्मिन शेख यांनी मानले. 

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Tuesday, November 12, 2024

आ.कानडे यांना तीन हजार कोटी रुपयांचा निधी देणार - उपमख्यमंत्री अजित पवार


आ.लहु कानडे यांची उमेदवारी मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस व मी स्वत :- निश्चित केली

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. श्रीरामपूर राहुरी मतदारसंघात लहू कानडे विजयी होतील. त्यांनी गत पाच वर्षांत १२०० कोटींची कामे केली होती. पुढील काळात त्यांना ३ हजार कोटी रुपये देऊ अशी ग्वाही, राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत श्रीरामपूरला गत वैभव प्राप्त करून देण्याचा वादा पवार यांनी दिला. महायुतीचे उमेदवार आ. लहू कानडे यांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः निश्चित केली होती. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचीही सहमती घेतली, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

आ. लहू कानडे यांच्या प्रचारार्थ शहरातील थत्ते मैदान येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत श्री. पवार बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक. माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक. देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम., श्रीरामपूर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रानाथ पाटील थोरात. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार. प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक. तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे. भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे. अमृत काका धुमाळ. राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव फारुख पटेल. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिस्टर शेलार. सदस्य शरद नवले. बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार. उपसभापती अभिषेक खंडागळे,, माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, सलीम शेख, मोहम्मद शेख, मुख्तार शहा, मेहबूब कुरेशी, भाऊसाहेब मुळे, जितेंद्र छाजेड, विजय शेळके, रवी पाटील, अल्तमश पटेल, मल्लू शिंदे, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, स्नेहल खोरे, संगीता शेळके, आदिवासी संघटनेचे शिवाजी गांगुर्डे, रिपब्लिकन पक्षाचे सुरेंद्र थोरात, भीमा बागुल, सुभाष त्रिभुवन, उद्योजक अंकुश कानडे, आदींसह मान्यवर उपस्थित होते माजी नगरसेविका जयश्री शेळके विजय शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.

अजित पवार म्हणाले, आपण शिव,शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा मानतो. किमान कार्यक्रमावर महायुतीतील तीनही पक्ष सोबत आहोत. लाडक्या बहिणींना मदतीचा निर्णय घेतला. त्यावर विरोधकांनी तिजोरी खाली झाल्याची टीका केली. बहिणींना दिलेली दिवाळीची भेट पुढची पाच वर्षे सुरू राहणार आहे. आ. कानडे हे उच्च शिक्षित आहेत. त्यांची पत्नी, मुलगा, मुली हे यशस्वी कारकीर्द गाजवत आहेत. प्रशासकीय सेवेचा त्यांना दांडगा अनुभव आहे. हागणदारी मुक्त गाव योजनेचे ते जनक आहेत. अतिशय बिकट आर्थिक स्थितीतून पुढे आलेला हा संवेदनशील लेखक आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने कानडे यांची उमेदवारी कापली. मात्र या उमद्या कार्यकर्त्याच्या मागे मी भक्कमपणे उभा राहिलो.

श्रीरामपूर मतदारसंघात देवळाली प्रवरा हे माझे आजोळ आहे. श्रीरामपूरला लहानपणी चित्रपट पहायला यायचो. येथील आर्थिक सुबत्ता जवळून अनुभवली आहे. महायुतीच्या सरकारमध्ये लहू कानडे यांच्या माध्यमातून श्रीरामपूरला गतवैभव प्राप्त करून देण्याचे वचन पवार यांनी दिले.

*लाडकी बहिण योजना सुरू राहणार*

लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहे. महायुती सरकारला लाडक्या बहिणींची काळजी आहे. योजनेत भरीव वाढ करणार आहे, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली-

*मुख्यमंत्र्यांची सभा मी रद्द केली*

महायुतीचे भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी आयोजित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा मी रद्द केली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः कानडे यांची उमेदवारी निश्चित केली. कांबळे हे आजारी वगैरे नसून ते ढोंग करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्याच सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात आज सभा होते, महायुतीकडून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश आहेत. यावरून सर्व काही स्पष्ट होते. कानडे हेच अधिकृत उमेदवार असून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. असे अजित पवार म्हणाले.

आ. कानडे म्हणाले, पाच वर्षापूर्वी काँग्रेसला उमेदवार नसल्याने त्यांनी उमेदवाराची गळ घातली. मायबाप जनतेने विश्वास दाखवून मला आमदार केले. ती जबाबदारी समजून आपण राजकीय गट गट. पक्ष असा भेदभाव न करता विकास कामांसाठी निधी दिला. तालुक्यात बाराशे कोटी रुपयांची विकास कामे केली. परंतु कपट कारस्थान करून आपली उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी संपर्क करून मुंबईला बोलावले. दुसरा फोन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा आला. श्री. पवार यांनी मुख्यमंत्री अमित शहा, श्री. विखे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आपल्याला उमेदवारी दिली. माजी आमदार चंद्रशेखर कदम व नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मेळावा घेऊन पाठिंबा दिला. रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे मी मानतो, असे ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, अमृत काका धुमाळ, देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, फारूक पटेल यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारणी सदस्य सुनील थोरात, शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, संदीप चोरगे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, सैफ शेख, भाजपाचे विधानसभा समन्वयक नितीन दिनकर, केतन खोरे, गणेश राठी, मारुती बिंगले, गिरीधर आसने, गणेश मुद्गुले, बाबासाहेब चिडे, नानासाहेब शिंदे, राधाकृष्ण आहेर, भाऊसाहेब बांद्रे, अजित चव्हाण, सुधीर टिक्कल, शहाजी कदम, रमेश घुले, पी. एस. निकम, रवी गायकवाड, सचिन ब्राह्मणे, सागर कुऱ्हाडे, संपत चितळकर, चांगदेव देवराय, योगेश जाधव, अशोक गागरे, शामराव निमसे, कोंडीराम विटनोर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष मंदाताई गवारे, सरपंच मंजुश्री ढोकचौळे, पुष्पलता हरदास, रमा धिवर, मनीषा थोरात, सीमा पटारे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, सरपंच अशोक भोसले, सागर मुठे, हरिभाऊ बनसोडे, आबा पवार, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, रमेश आव्हाड, दीपक कदम, राधाकृष्ण तांबे, अक्षय नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संकलन*
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111

<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

सभेला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे मंडपाच्या बाहेर लोकांना उभे राहावे लागले. हे लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पोलिसांना सांगितले की, स्टेजसमोर सुरक्षिततेसाठी सोडलेली मोकळी जागा आहे, तिथे लोकांना बसायला सांगा, माझ्या जीवाला काही होत नाही. माझे काय बरे वाईट व्हायचे ते होऊ देत. त्याला मी जबाबदार राहील. आम्ही लोकात राहणारे असून लोकांसाठी काम करतो. त्यांना बसायला जागा द्या, अशी सूचना त्यांनी केली.
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

अजित पवार यांच्याप्रमाणे आमदार कानडे देखील शब्दाला पक्के - सयाजी शिंदे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 उपमुख्यमंत्री अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत. दिलेला शब्द ते पाळतात. त्याचप्रमाणे आमदार लहू कानडे हे देखील आपल्या शब्दाला पक्के आहेत. आ. कानडे हे कवी आहेत. साहित्यिक आहेत.. प्रशासकीय कामाचा त्यांना अनुभव आहे. तसेच तालुक्यातील प्रश्नांचा अभ्यास आहे. त्यामुळे येत्या २० तारखेला आपण त्यांना निवडून देऊन त्यांच्या विजयाचा गुलाल उधळावा, असे आवाहन प्रसिद्ध अभिनेते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे स्टार प्रचारक सयाजी शिंदे यांनी केले.
         राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ बेलापूर येथे झालेल्या जाहीर सभेत श्री. शिंदे बोलत होते. ज्येष्ठ नागरिक कनजीशेठ टाक अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक, आ. कानडे, प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, श्रीरामपूर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रभान पाटील थोरात, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मिस्टर शेलार, माजी सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच स्वाती अमोलिक यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते,

श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील उत्कृष्ट राजकारणी कोण असेल तर ते अजित पवार आहेत. जे करतात ते बोलतात. आम्हीही बोलल्याप्रमाणे आ. कानडे यांना निवडून देणार आहोत. देवळालीसह या ठिकाणी मला तरुणांचा उत्साह दिसला. तरुणांनी पार्टीत रहावे, परंतु रात्रीच्या मित्रांच्या पार्टीत राहू नये, जन्मदाती आई, धरणी माता आणि वृक्ष यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. आपल्या आईचा नेहमी आदर करावा, असे सांगून पुढील पाच वर्षात आपल्याला वृक्ष संवर्धनाचे काम करावयाचे आहे. त्यासाठी शाळा शाळातील मुलांचे ग्रुप तयार करावे, आपण त्यांना बिया देऊ, त्यातून वृक्षांचे संरक्षण करू, असे ते म्हणाले.

आ. कानडे म्हणाले, माझ्या कुटुंबाला राजकीय वारसा नाही. पाच वर्षांपूर्वी मायबाप मतदारांनी विश्वास टाकून आमदार केले. आपण भेदभाव, गट तट, पक्ष न बघता येईल ते काम प्रामाणिकपणे केले, तेव्हाचे काँग्रेसचे आमदार टाटा करून निघून गेले. त्यावेळी काँग्रेसने उमेदवारी दिली. जनतेच्या आशीर्वादाने आपण आमदार झालो. पाच वर्षात बाराशे कोटी रुपयांची विकास कामे केली. महाविकास आघाडीत असताना तसेच महायुतीच्या सरकारात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी देऊन सहकार्य केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही भरभरून निधी दिला. त्यामुळे दळणवळण, वीज, शेती, युवक, महिला यांचे प्रश्न सोडवू शकलो. शेवटच्या दिवशी काँग्रेसने उमेदवारी नाकारली. चांडाळ चौकडीने कटकारस्थान करून प्रामाणिक माणसावर अन्याय केला.. हलक्या काळजाच्या नेत्यांनी त्यांचे ऐकले. त्यांना धडा शिकवण्यासाठी या निवडणुकीत आपल्याला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

श्री. आदिक म्हणाले, आ. कानडे हे पारदर्शक काम करणारे आमदार आहेत. मतदारसंघात त्यांनी कोट्यावधी रुपयांची कामे केली. परंतु त्या कामातील वाटा मिळाला नाही, त्यांचे लाड पुरविले नाहीत, म्हणून जवळ असणार्यांनी कटकारस्थान करून त्यांचे तिकीट कापले. परंतु त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसला एक कर्तबगार आमदार लाभला असून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लहू कानडे हेच महायुतीचे उमेदवार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांना मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अरुण पाटील नाईक, शरद नवले, अभिषेक खंडागळे, भाजपाचे प्रफुल्ल डावरे, आकाश क्षीरसागर, इस्माईल शेख, अशोक कारखान्याचे माजी संचालक जालिंदर कुऱ्हे यांची भाषणे झाली. यावेळी वळदगावचे सरपंच अशोक भोसले, राधाकृष्ण तांबे, कोंडीराम विटनोर, अनिल बिडे, विधानसभा अध्यक्ष किशोर बकाल, सुनील थोरात, ॲड. जयंत चौधरी, माजी सरपंच रामराव शेटे, प्रा. मच्छिंद्र पारखे, भाऊसाहेब कुताळ, जाफर आतार, दादासाहेब मेहत्रे, दीपक पवार, अक्षय नाईक, मोहसीन शेख, जमीर पिंजारी, चंद्रकांत नवले, बाळासाहेब दानी, किशोर कांबळे, मुस्ताक शेख, दीपक निंबाळकर, प्रशांत खंडागळे, चंद्रकांत नाईक, सचिन ब्राह्मणे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

Monday, November 11, 2024

राज्यस्तरीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य -२०२४ स्पर्धेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सुयश


राज्यस्तरीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य -२०२४ स्पर्धेत महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सुयश

- जावेद शेख - राहूरी -/ वार्ता -
डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे दि ७ -११ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत पार पडलेल्या राजभवन मुंबई संकल्पित राज्यस्तरीय युवक महोत्सव इंद्रधनुष्य २०२४ या सांस्कृतिक स्पर्धेत राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या संघाला तीन पारितोषिक जाहीर झाले असल्याची माहिती विद्यापीठाचे संचालक राष्ट्रीय सेवा योजना तथा विद्यार्थी कल्याण डॉ. महावीरसिंग चौहान यांनी दिली आहे. यात श्री. क्षितीज जाधव यास ऑन दि स्पॉट फोटोग्राफीसाठी द्वितीय रजतपदक, श्री. तेजस कांबळे यास पाश्चिमात्य गायनासाठी प्रथम सुवर्णपदक तर गोद्रा ह्या एकांकिकेस प्रथम सुवर्णपदक पारितोषिक सिने अभिनेत्री गिरीजा प्रभु यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख होते.
 इंद्रधनुष्य २०२४ या सांस्कृतिक स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील कृषि व अकृषी मिळून एकुण २४ विद्यापीठातील १५०० विद्यार्थी कलाकार सहभागी झाले होते. यात नृत्य, अभिनय, संगीत, ललित कला व साहित्य या विविध कलाप्रकाराचे सादरीकरण करण्यात आले. या विविध कलाप्रकारांमध्ये सहभागी होण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील व अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. महावीरसिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली ४५ विद्यार्थी कलाकारांसह ८ सहकलाकार दिग्दर्शक, नृत्य निर्देशक, संघ व्यवस्थापक व इतर कर्मचार्‍यांचा समावेश होता. यात सर्वश्री सागर गावंड, ऋतीराज रास्ते, प्रा दिपाली वाघ, आकाश साळवे, चांगदेव दातीर व बापूसाहेब गवते, श्रीमती अर्चना टकले, ॠषी कदम व सागर नन्नावरे यांनी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. या यशस्वी विद्यार्थी कलाकारांसह डॉ. महावीरसिंग चौहान यांचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्षनाथ ससाणे व कुलसचिव डॉ. मुकूंद शिंदे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*👍✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर -९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================

साने गुरुजी यांनी राष्ट्रभक्ती आणि मानवप्रेमाची मूल्ये रुजविली- सुखदेव सुकळे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
साने गुरुजी यांनी भारतीय स्वातंत्र्य आणि भारतीय संस्कृतीची मूल्यनिष्ठा शिकविली. त्यांनी लिहिलेली ७६ पुस्तके म्हणजे अमृतमूल्ये आहेत. २४ डिसेंबर १८९९ ते ११ जून १९५० या जीवनकाळात त्यांनी केलेली समाजसेवा दिशादर्शक आहे. त्यांची राष्ट्रभक्ती व मानवप्रेमाची मूल्ये जोपासली पाहिजेत असे विचार विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी व्यक्त केले.
  येथील आंतरभारती श्रीरामपूर शाखेतर्फे सुखदेव सुकळे यांचे साने गुरुजींची मूल्यनिष्ठा जाणीव विषयावर व्याख्यान अतिथी कॉलनीतील समाज मंदिरात आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. स्वागत, प्रास्ताविक शाखेचे संस्थापक, अध्यक्ष सुभाष लिंगायत यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शाखेचे उपाध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी करून दिला. यावेळी नायब तहसिलदार दत्तात्रय रायपल्ली यांनी कथा सादर केली.ॲड. बाबासाहेब मुठे यांनी श्रीशिव मंदिर उभारणीची माहिती दिली. ह.भ.प. प्रा. सखाराम कर्डिले महाराज, प्रा. शिवाजीराव बारगळ, माजी प्राचार्य श्री ए.डी. पोटघन,माजी मुख्याध्यापक दत्तात्रय चव्हाण, दगडू शिंदे, लेविन भोसले, कारभारी वाघ इत्यादींनी चर्चेत भाग घेतला.
          सुखदेव सुकळे यांनी साने गुरुजी यांचा खडतर जीवनप्रवास सांगून भारतीय संस्कृतीचा आदर्श म्हणजे शिक्षक साने गुरुजी होते. मंदिर प्रवेश, शेतकरी आंदोलन, तुरुंगवास, समाजवादी विचारधारा, विविध उपक्रमांची माहिती सुकळे यांनी सांगून आंतरभारती शाखेने आपले कार्य वाढवावे म्हणून ११११ रुपये देणगी दिली. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी साने गुरुजी यांची साहित्यसंपदा आणि आंतरभारती संकल्पना विद्यार्थी आणि उगवत्या पिढीसमोर ठेवली पाहिजे. त्यांची देशभक्ती आणि समाजमूल्ये यांची शिकवण समजून घेतल्यास साने गुरुजींचा मोठेपणा कळेल. असे सांगून आपण सर्वजण त्यांच्या विचारांचा आदर्श प्रत्यक्ष कृतीत आणणे गरजेचे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले.त्यांनी उपस्थितीतांना ग्रंथसंवाद पुस्तके भेट स्वरूपात देऊन वाचन संस्कृतीला घरोघरी प्रतिष्ठा लाभावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शाखेचे सचिव लेविन भोसले यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस, श्रीरामपूर - ९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================