रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर
- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
गळीत हंगाम सुरक्षित आणि अपघात मुक्त पार पाडण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्यावतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सह. साखर कारखाना लि. अमृतनगर संगमनेर येथे विशेष रस्ता सुरक्षा सत्राचे आयोजन करण्यात आले होते,
या सत्रात ऊस वाहतुकीशी संबंधित सुरक्षा विषयी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली आणि आवश्यक निर्देश वाहन चालकांना देण्यात आले. कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांना ऊस वाहतुकीसाठी आवश्यक सुरक्षा उपाय राबवण्याची निर्देश दिले गेले. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यात आले. वाहनांवर मागील बाजूस लाल रंगाची आणि समोरील बाजूस पांढऱ्या रंगाची रिफ्लेक्टर पट्टी बसविण्याचे निर्देश देण्यात आले. या पट्ट्या ऊस किंवा पाचटामुळे झाकल्या जाणार नाहीत त्याची दक्षता घेण्याची सूचना करण्यात आली. काही वाहनांवर प्रत्यक्ष कार्यालयाकडून रिप्लेक्टर पट्ट्या लावून या प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. नादृष्ट वाहने रस्त्यावर असल्यास ती तात्काळ बाजूला हटवावी किंवा रात्री ती स्पष्ट दिसतील अशी व्यवस्था करावी अशी सूचना करण्यात आली या मार्गदर्शन १७ मध्ये कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सुरक्षारक्षक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते. हा उपक्रम उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथील सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक राणी सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात आला.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार राजेश जेधे - संगमनेर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================