राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, December 26, 2024

विधार्थींनींनी दिले देशभक्ती, संविधान जागर,शैक्षणिक, साहित्यिक व समाज प्रबोधनाचे अनेक संदेश


सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची आवड निवडचा अंदाज येतो - डॉ. प्रा.सलाम सर 

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
विद्यालयातील विद्यार्थी वर्षभर मोठ्या आतुरतेने शाळेचे स्नेह संमेलनाची वाट पाहत असते. त्यांना याद्वारे आपल्या आवडीच्या गोष्टी स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करता येते. यामुळे पालकांना व शिक्षकांनाही विद्यार्थ्यांच्या आवड निवडचा अंदाज येतो. व मुलांवर संस्कार करुन त्यांचे भविष्य घडवण्याचे कार्य शिक्षक करतात. लहान वयात मुलांच्या पाया रचला जातो. आजची मुले उद्याचे भविष्य आहे. त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्यास सक्षम समाज घडणार आहे.असे प्रतिपादन मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्रमुख कार्यवाह डॉ.प्रा. अब्दुस सलाम सर यांनी केले.
मोहम्मदिया एज्युकेशन सोसायटी संचलित मुकुंदनगर येथील मौलाना आझाद उर्दु गर्लस हायस्कूल चा वार्षिक स्नेहसंमेलन माऊली संकुल येथे संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व प्रमुख कार्यवाहक डॉ. प्रा. अब्दुस सलाम सर, शेख लाला, उपसचिव अजीज जनाब, विश्वस्त नसीर शेख, शरफुद्दीन शेख, सलीम शेख ,रशिद शेख,हसीब शेख, मतीन शेख,फरीदा भाभी,शबाना आपा, मुख्याध्यापिका फरहाना सय्यद, मुख्याध्यापक नौशाद सैय्यद,महेनाज बाजी, असलम पटेल, फरीदा जहागिरदार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना विद्यार्थ्यांनी संविधानामध्ये समाजाच्या हक्कासाठी असणाऱ्या बाबींचा उल्लेख संविधान जागर नाटकातून सांगितले. मंगल पांडे यांच्या फाशीची संपूर्ण माहिती ही नाटक द्वारे देण्यात आली. तसेच भारताच्या प्राचीन इतिहास ही नाटकातून सांगण्यात आला. या व्यतिरिक्त मुशायरा, कव्वाली, कोळी डान्स, पाण्याचे महत्व, झाडांचे महत्त्व व अशा अनेक शैक्षणिक साहित्यिक व सामाजिक विषयांची नाटके सादर करून पालक व विद्यार्थांया मध्ये जनजागृती करण्यात आली. आपल्या मुलांमधील कलागुणांना पाहून पालकांनीही त्यांना भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहार अंजूम यांनी केले. तर आभार अंजुम खान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नाजेमा जुल्फेकार, नाहीद, रफत,नाजेमा इकबाल, अफशा, मिनाज शेख, खुतेजा बाजी, सदफ, मलेका बाजी, सिदरा, यास्मिन शेख आदी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भरपूर परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, December 24, 2024

डॉ.शिवाजीराव कदम यांना इस्माईल साहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार जाहीर


दि.२७ डिसेंबर २०२४ रोजी उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण

- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
रयत शिक्षण संस्थेचे माजी मानद सचिव पै. इस्माईलसाहेब मोहम्मदसाहेब मुल्ला यांची ५१ वी पुण्यतिथी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४.३० वा. संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा या महाविद्यालयात आयोजित केली आहे. 
या समारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा पै. इस्माईलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार यावर्षी भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
या कार्यक्रमास संस्थेचे व्हा. चेअरमन मा. ॲड.भगीरथ शिंदे, संस्थेचे संघटक मा. डॉ. अनिल पाटील, संस्थेचे कायदा सल्लागार मा. ॲड. दिलावरसाहेब मुल्ला, मुल्ला कुटुंबीय,संस्थेचे इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सातारा शहरातील शिक्षण प्रेमींनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख यांनी केले आहे. 
भारती अभिमत विद्यापीठाचे कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम यांनी गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये अतुलनीय असे योगदान दिले आहे. त्यांचा शैक्षणिक प्रवास ग्रामीण समाज जीवनातून झाला. 
आपल्या बुद्धिमत्तेच्या सामर्थ्यावर त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक स्वरूपाचे कार्य केले असून कृतिशील शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासूसंशोधक, वंचितांच्या शिक्षणाबद्दलची नितांत आस्था प्रत्येक ठिकाणी अधोरेखित होत आली आहे. ध्येयनिष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कुशल शैक्षणिक प्रशासक, उत्साही संशोधक आणि नि:स्वार्थी समाजसेवक म्हणून ते परिचित आहेत. रसायनशास्त्रासारख्या विषयामध्ये डॉक्टरेट मिळविल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे, अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, श्रीलंका, जपान, थायलंड आणि फ्रान्स यासारख्या विविध देशांमध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात १७५ हुन अधिक शोधनिबंध सादर केले. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये २५ वर्षाहून अधिक काळ प्राचार्यपद त्यांनी भूषवले असून प्रकुलगुरू, कुलगुरू आणि आता सध्या भारती विद्यापीठाचे कुलपतीपदी त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा नोंदविला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, आधिसभा सदस्य असे त्यांचे भरीव योगदान आहे. त्यांच्याच पुढाकाराने विद्यापीठामध्ये ‘औषध निर्माण शास्त्र’ या विद्याशाखेची निर्मिती झाली आणि या विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी १५ वर्ष काम केले. विद्यापीठ अनुदान आयोग व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया या भारत सरकारच्या दोन सर्वोच्च संस्थांवर दोन वेळा त्यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते. त्यांच्या दृष्टेपणामुळे वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण घेता आले आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि आधी संस्कृती समितीचे सदस्य म्हणून देखील त्यांनी आपले योगदान दिले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून त्यांनी संस्थेसाठी सर्वोत्कृष्ट योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी असणाऱ्या अनेक संस्थांमध्ये त्यांचे सदस्यत्व आहे. उच्च शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल भारताचे राष्ट्रपती सरन्यायाधीश यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय कायदा दिन पुरस्कार’ व इतर अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन आणि मानवी उदात्त मूल्यांचा प्रसार त्यांनी आपल्या कृतीतून केला आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वास रयत शिक्षण संस्थेच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा ‘इस्माईलसाहेब मुला जीवन गौरव पुरस्कार’ यावर्षी महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तरी या समारंभास शिक्षण क्षेत्रातील मान्यवराने मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सचिव मा. विकास देशमुख यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी विभाग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद वाघ कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्काराने सन्मानित


रेड क्रॉसने केला सन्मान

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शिर्डी लोकसभा मतदारसंघ व श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात नुकत्याच झालेल्या निवडणुका अतिशय शांततेत, निर्भयपणे, व नियोजनबध्द ,कुशलतेने पार पाडल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी किरण सावंत - पाटील व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचा इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे वतीने कर्तव्यदक्ष अधिकारी पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
       प्रास्तविक व स्वागत पाटणी विद्यालयाचे चेअरमन भरत कुंकुलोल यांनी केले.
            यावेळी प्रांताधिकारी किरण सावंत व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.
        सचिव सुनील साळवे यांनी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील व तहसीलदार मिलिंदकुमार वाघ हे रेड क्रॉस सोसायटीला मिळालेले अष्टपैलू पदाधिकारी असून किरण सावंत - पाटील यांचे नेतृत्वाखाली सर्व टीम जिल्ह्यात कार्य करत आहेत. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा मोठा फायदा प्रशासनात होतो.कर्तृत्ववान पदाधिकारीमुळे रेड क्रॉसचे काम प्रगतीपथावर चालू आहे. रेड क्रॉस सोसायटी अध्यक्ष तथा प्रांताधिकारी किरण सावंत - पाटील उपाध्यक्ष तथा तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांचे कामाची प्रशंसा वरिष्ठांकडून झाली याचा रेड क्रॉस सोसायटीला अभिमान असल्याचे सुनील साळवे यांनी सांगितले
          सत्काराला उत्तर देताना तहसीलदार मिलिंदकुमार वाघ म्हणाले की, प्रांताधिकारी किरण सावंत - पाटील यांचे नेतृत्वाखाली काम करण्यास मिळाल्याने खूप शिकण्यास मिळाले. रेड क्रॉसचे सेवाकार्य करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर आहोत. या पुरस्काराने काम करण्याची दुप्पट प्रेरणा मिळेल असे सांगत मिलिंदकुमार वाघ यांनी निवडणूक प्रक्रियेत योगदान देणाऱ्या सर्व घटकांना धन्यवाद दिले.
             अध्यक्षीय मनोगत व सत्काराला उत्तर देताना किरण सावंत - पाटील म्हणाले रेड क्रॉस चे अविरत सेवाकार्य प्रेरक आदर्श आहे. एकटा व्यक्ती काही करू शकत नाही निवडणुका शांततेत नियोजनपूर्वक पार पाडणेसाठी महसूल स्टाफ, निवडणूक प्रक्रियेतील सर्व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा असतो.
रेड क्रॉसचे कामाविषयी किरण सावंत - पाटील यांनी समाधान व्यक्त करत विविध कार्यक्रमचे वार्षिक नियोजन बनवण्याचे सूचित केले. भविष्यात गरजू नागरिकांपर्यंत विविध सुविधा रेड क्रॉस उपक्रमांद्वारे पोहोचविण्याचे कार्य सदस्यांनी करावे असे आवाहनही सावंत यांनी केले. आमचा केलेला सन्मान हा नवसंजीवनी देणाराच असेल त्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल असे किरण सावंत - पाटील यांनी सांगितले
         प्रवीणकुमार साळवे यांनी आभार मानले.
         कार्यक्रमासाठी भरत कुंकुळोल ,श्रावण भोसले, सुरेश वाघुले, पोपटराव शेळके, सचिन चंदन,संदीप छाजेड, गणेश थोरात,अरुण कटारे,केशव धायगुडे,बन्सी फेरवानी,विनोद हिंग्निकर, प्रवीण साळवे,श्रीकांत दहिमिवाल,डॉ.स्वप्नील पूर्णाले, बदर शेख,ज्ञानदेव माळी, शिवाजी गोरे, अवधूत कुलकर्णी,साहेबराव रक्टे, मायाताई चाबुकस्वार, पुष्पाताई शिंदे,सुभाष बोधक, मधुकर वेडे,सोमनाथ जगताप आदी आजीव सभासद उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, December 23, 2024

बाळ येशू जन्म देखाव्यातून ख्रिस्ती समाजाने दिला शांती व प्रितीचा संदेश


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
दरवर्षी प्रमाणे नाताळ निमित्त शहरातून सर्वपंथीय ख्रिस्ती समाजाच्या वतीने बाळ येशूच्या जन्म देखाव्याची मिरवणूक काढण्यात आली.
 मंगल दुशिंग यांनी केलेल्या प्रार्थनेनंतर या मिरवणुकीस संत लोयोला चर्चपासून सुरूवात कऱण्यात आली. सदर कॅण्डल सर्विस मिरवणूक पुढे सिद्धार्थनगर, भुयारीपूल मार्गे बस स्टॅन्ड, मेन रोड , छत्रपती शिवाजी महाराज रोड , दशमेश नगर, कर्मवीर पुतळा मार्गे पुन्हा चर्चकडे आली. दरम्यान लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.प्रकाश भालेराव, फा.जेकब गायकवाड, ईम्यानुएल चर्चचे पा.अण्णासाहेब अमोलिक, पा.अलिशा आमोलिक, बेथेल चर्चचे पा. सतीश आल्हाट, सिस्टर नलिनी आल्हाट, न्यू होप चर्चचे पा. रावसाहेब त्रिभुवन, पा. सातदिवे , पा.दिपक शेळके, तसेच झेवियर्सचे शिक्षक रविन्द्र त्रिभुवन यांनी ख्रिस्त जन्माबाबत शहरवासियांना सुवार्ता संदेश देऊन नाताळ व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
 मिरवणूक शहरात पोहचताच अनेक सामाजिक व राजकीय मान्यवरांनी उपस्थित धर्मगुरूंचा सत्कार केला.
याप्रसंगी तालुक्याचे आमदार हेमंत ओगले, माजी आमदार बी.के.मुरकुटे, साई संस्थानचे मा.विश्वस्त सचिन गुजर, अ.नगर जिल्हा बॅकेचे संचालक करण ससाणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लकी सेठी, नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे, अशोक थोरे, संजय आगाशे,
माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, माजी नगरसेवक राजेंद्र सोनवणे, सनी सानप, भाजपा सरचिटणीस रुपेश हरकल, माजी नगरसेवक राजेश अलग आदींनी ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. 
तसेच रितेश एडके, महेंद्र जावळे, किशोर कंत्रोड, संतोष आढागळे, निलेश ओझा, मनोज भोसले व अनेकांनी शाल ,बुके व गुलाबपुष्प देवुन धर्मगुंरूचे स्वागत केले. यावेळी कमलाकर पंडित व मंगल दुशिंग यांनी सुत्रसंचलन केले. मिरवणूक यशस्वी होणेकामी लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.प्रकाश भालेराव, फा.विक्रम शिणगारे ,फा. अनिल चक्रनारायण, पा. अण्णासाहेब अमोलिक, पा.सतीश आल्हाट, पा. दिपक शेळके, पा.सातदिवे, कमलाकर पंडित,विजय त्रिभुवन, लाजरस गायकवाड, जॉन धीवर, डॅनियल साळवे, लुकस दिवे, ललित गायकवाड, संदीप साळवे, प्रवीण सात्राळकर, रविन्द्र त्रिभुवन तसेच महिला प्रतिनिधी लता बनसोडे, बेनिग्ना पवार, सुवर्णा बोधक, मंगल दुशिंग, विजया दळवी, संगीता पंडित, युथ ग्रुप, नाताळ उत्सव समिती, महिला मंडळ, कनोसा सिस्टर्स व सेंट लुक हॉस्पिटलच्या सिस्टर्स आदींनी परीश्रम घेतले या सर्वांचे कमलाकर पंडित यांनी आभार मानले व फा. प्रकाश भालेराव यांनी केलेल्या शेवटच्या प्रार्थनेने सदर मिरवणुकीची सांगता केली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
रवि त्रिभुवन (सर) श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, December 22, 2024

श्रीरामपूर - मोफत नाडी परीक्षण शिबीरात अनेकांनी घेतला नाडी परीक्षणाचा लाभ

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिक व त्रिमूर्ती आयुर्वेदिक संशोधन व विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत नाडी परीक्षण व अष्टविद परीक्षेसह या शिबिरात मध्ये आज शंभरहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला, यामध्ये आयुर्वेदाचार्य डॉक्टर सोनाली खर्डे व डॉक्टर प्रीतम गोरडे यांनी पेशंटची नाडी परीक्षण करून मार्गदर्शन व आहार विषयक सल्ला मार्गदर्शन व उपचार दिले,
सदर शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री आयुर्वेद हर्बल कॉस्मेटिक च्या संचालिका सौ.सोनल संदीप त्र्यंबके व श्री. संदीप त्र्यंबके त्याचबरोबर त्यांचे सहकारी महादेव ओहोळ, सुभाष कुरे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी बोलताना श्री आयुर्वेद अँड हर्बल कॉस्मेटिकच्या संचालिका सौ. सोनल संदीप त्र्यंबके यांनी सांगितले की, वेळोवेळी आमच्या संस्थेच्या माध्यमातून लोकहित उपयोगी असेच अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात येईल त्या माध्यमातून अनेक गरजू नागरिकांना नक्कीच फायदा होईल आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करणे व येणाऱ्या काळामध्ये संस्कार शम्यं व निरोगी सुदृढ पिढी घडवणे हेच आमचे ध्येय असेल त्यासाठी श्री आयुर्वेद व हरबल कॉस्मेटिक असे अनेक उपक्रम आयुर्वेद तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी राबवत राहील असेही त्या म्हणाल्या.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
=================================
-----------------------------------------------

नाताळ या सणानिमित्त श्रीरामपूर शहरात स्कॅटल मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
नाताळ सणानिमित्त शहरात मोठ्या उत्साहात स्कॅटल मिरवणूक काढण्यात आली होती,या मिरवणुकीत श्रीरामपूर धर्मग्रामाचे लोयोला सदन येथील प्रमुख धर्मगुरू रे.फा.प्रकाश भालेराव, रे.फा.विक्रांत शिनगारे, रे.फा.जेकब 
गायकवाड, लोयोला दिव्यवाणीचे प्रमुख रे.फा.अनिल चक्रनारायण तसेच संत लुक हॉस्पिटलच्या सर्व सिस्टर्स, कनोसा होस्टेलच्या सर्व सिस्टर्स, पास्टर आण्णा अमोलिक,पा.सतिश आल्हाट, पा.रावसाहेब ञिभुवन, पा.सचिन चक्रनारायण , पा.दिपक शेळके,पा.बन्टी सातदिवे, पा.अलिशा अमोलिक, पा.निलीमा आल्हाट कलाकार पंडीत त्याचबरोबर सर्व ख्रिस्ती भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
नाताळ सणाची मिरवणूक चालू असताना श्रीरामपूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार हेंमत ओगले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा बैंकेचे संचालक करणदादा ससाणे,सचिन गुजर, संजय छल्लारे, सिध्दार्थ मुरकूटे, प्रकाश ढोकणे, लकी शेट्टी, अशोक थोरे, राजेंद्र सोनवणे, अशोक उपाध्ये,रूपेश हरकल, राजेश अलघ तसेच नाताळ उत्सव समिती, क्रॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट),उबाठा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर सर्व पक्षांच्या नेत्यांनी समस्त ख्रिस्ती बंधू- भगीनींना नाताळ सणाच्या शुभेच्छा दिल्या.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम, श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, December 21, 2024

शब्दगंध ची नगरमध्ये बुधवारी**वार्षिक सर्वसाधारण सभा


अ,नगर - प्रतिनिधी - वार्ता -
शब्दगंध साहित्यिक परिषद, संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि.२५/१२/२०२४ रोजी स.११.०० वा.कोहिनूर मंगल कार्यालय,पाईपलाईन रोड,सावेडी,अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती माहिती संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी दिली.                                                                                          
    सभेत जमा खर्चास मंजुरी, शाखा विस्तार,नवीन सभासदांना मान्यता,सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन, साहित्य पुरस्कार, राज्य कार्यकारी मंडळ सदस्य निवड या विषयावर चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार आहेत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित राहणार आहेत.
यावेळी राज्यस्तरीय प्रेम काव्य लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
     तरी सर्व साहित्यिक व साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक, सचिव सुनील गोसावी, प्रा. डॉ. अशोक कानडे, सुभाष सोनवणे,भगवान राऊत, भारत गाडेकर, राजेंद्र पवार, डॉ.तुकाराम गोंदकर, सुनील धस, राजेंद्र फंड,स्वाती ठुबे, अजयकुमार पवार, राजेंद्र चोभे यांनी केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================