राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, January 2, 2025

चर्मकार समाजच्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे दि.५ रोजी आयोजन



चर्मकार समाजच्या राज्यस्तरीय वधू-वर 
परिचय मेळाव्याचे दि.५ रोजी आयोजन

समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन;
राज्यातील चर्मकार समाज एकवटणार


नगर / प्रतिनिधी:
चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने नगर शहरात राज्यस्तरीय चर्मकार समाजाचे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार ५ जानेवारी रोजी येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत हा मेळावा होणार असून, या मेळाव्यात सर्व समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन समितीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव साळवे, वधू-वर मंडळाध्यक्ष अश्रूजी लोकरे, केंद्रप्रमुख बापूसाहेब देवरे यांनी केले आहे.
या मेळाव्यासाठी आमदार संग्राम जगताप, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार हेमंत ओगले, माजी आ.भाऊसाहेब कांबळे, माजी आ. लहूजी कानडे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, कॉ. स्मिताताई पानसरे, संपतराव बारस्कर, माजी नगरसेवक आशोक कानडे, नगरसेवक सागर बोरुडे, उद्योजक अंकुशराव कानडे, नितीन उदमले, नगरसेवक सुनील त्र्यंबके, तुकाराम शेंडे, डॉ. रावसाहेब बोरुडे, अजित रोकडे, आर्किटेक्चर कल्याण सोनवणे, विश्‍वनाथ निर्वाण, भास्करराव जाधव, उद्योजक रामदास उदमले आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
चर्मकार संघर्ष समितीच्या माध्यमातून सातत्याने समाजकार्य सुरु आहे. दरवर्षी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करुन समाजातील मुला-मुलींचे विवाह जमविण्याचे काम केले जात आहे. तर या कार्यक्रमानिमित्त राज्यातील चर्मकार समाज बांधव एकत्र येत आहे. चर्मकार समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात सातत्याने संघटनेच्या माध्यमातून आवाज उठविण्यात आला आहे. तर समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या विचाराने व महापुरुषांच्या समतेच्या मुल्यांवर संघटना कार्यरत आहे. समाजातील गुणवंताचा सन्मान, चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळातील विविध प्रश्‍न सोडविणे व महिलांच्या विविध प्रश्‍न सोडविण्याचे कार्य सुरु असल्याचे शिवाजीराव साळवे यांनी म्हंटले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

शब्दगंध च्या अध्यक्षपदी राजेंद्र उदागे तर कार्याध्यक्षपदी ज्ञानदेव पांडुळे


- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य संस्थेची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली अहिल्यानगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडली. यावेळी विचारपीठावर संमेलनाचे माजी स्वागताध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, संस्थापक, सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, प्रा.डॉ.अशोक कानडे, बाळासाहेब शेंदुरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम भारताचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग व जिल्हा ग्रामीण साहित्य परिषदेचे संस्थापक,ज्येष्ठ लेखक आ. य.पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सोळाव्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलना बाबत चर्चा करण्यात आली. विविध परीक्षा समित्या गठित करण्यात आल्या. या संमेलनाच्या निमित्ताने कथालेखन, काव्य लेखन, निबंध लेखन स्पर्धा, साहित्यिक व्यक्तीचित्र स्पर्धा, पोस्टर पोएट्री स्पर्धा घेण्याचे निश्चित करण्यात आले. 
यावेळी २०२५ ते २०२७ या कालावधी करिता नूतन कार्यकारी मंडळ बिनविरोध निवडण्यात आले. अध्यक्षपदी राजेंद्र उदागे तर कार्याध्यक्षपदी ज्ञानदेव पांडुळे यांची निवड करण्यात आली. इतर सविस्तर कार्यकारिणी पुढील प्रमाणे 


अध्यक्ष - राजेंद्र उदागे 
सचिव - सुनील गोसावी 
कार्याध्यक्ष - ज्ञानदेव पांडूळे 
कार्यवाह - भारत गाडेकर 
राज्य संघटक - प्रा.डॉ.अशोक कानडे 
उपाध्यक्ष - डॉ.जी.पी.ढाकणे 
उपाध्यक्षा - जयश्री झरेकर 
खजिनदार - भगवान राऊत 
सह कार्यवाह - प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर 
सह सचिव - स्वाती ठुबे 
सह सचिव - प्रा.डॉ.अनिल गर्जे 
प्रसिध्दी प्रमुख - राजेंद्र फंड 
नियोजन समिती प्रमुख - बबनराव गिरी
*कार्यकारी मंडळ सदस्य*- 
सुभाष सोनवणे 
अरूण आहेर 
रविंद्र दाणापुरे 
शर्मिला गोसावी 
प्रशांत सूर्यवंशी 
राजेंद्र पवार 
शिरीष जाधव
यावेळी राजेंद्र चोभे, मारुती खडके, त्रिंबकराव देशमुख, शिवाजी जाधव,सुरेखा घोलप, वर्षा भोईटे, जयश्री राऊत, श्यामा मंडलिक, संतोष जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरव भूकन, दिशा गोसावी, वृषाली राऊत, हर्षली गिरी, ऋषिकेश राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी बोलताना ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, शब्दगंध ने साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगळा कसा उमटवलेला असून संस्थेच्या नाव लौकिकात भर घालणारी कामगिरी नव्या कार्यकारी मंडळा कडून होईल.जास्तीत जास्त नवोदितांनी सभासद व्हावे.
बाळासाहेब शेंदुरकर यांनी शब्दगंध च्या साहित्य संमेलना बाबतची भूमिका स्पष्ट करून संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन केले. भगवान राऊत,शिरीष जाधव, सुभाष सोनवणे, राजेंद्र चोभे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
बैठकीचे प्रास्ताविक संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले तर शेवटी प्रा.डॉ.अशोक कानडे यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

शब्दगंध दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न


*शब्दगंध दिनदर्शिकेचे*
 *प्रकाशन उत्साहात संपन्न* 

नगर / प्रतिनिधी:
शब्दगंध चे उपक्रम नवोदितांना प्रेरणा देणारे असून संस्थेची सर्व माहिती दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्व सभासदांपर्यंत पोहोच करण्याची कृती दिशादर्शक आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक कवी शिरीष जाधव यांनी व्यक्त केले. 
अहिल्यानगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात शब्दगंध च्या वतीने आयोजित दिनदर्शिका प्रकाशन समारंभात ते बोलत होते. शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनील गोसावी, राजेंद्र चोभे,डॉ.अनिल गर्जे, प्रा. डॉ.तुकाराम गोंदकर, स्वाती ठुबे,शर्मिला गोसावी व ज्ञानदेव पांडूळे आदी मान्यवर उपस्थित होते.
            शब्दगंधच्या दिनदर्शिका मध्ये सर्व सभासद, शाखांची व साहित्यिक उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे, साहित्यिकांना उपयुक्त अशी दिनदर्शिका तयार झाल्याने आनंद होतो आहे, असे मत कवयित्री स्वाती ठुबे यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ.अनिल गर्जे, सुभाष सोनवणे,भगवान राऊत, डॉ. अशोक कानडे, बबनराव गिरी, डॉ.तुकाराम गोंदकर, रवींद्र दानापुरे व सुनील गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

-=()=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-
-=()=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-
-=()=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-

माळावर दवाखाना सुरू केला. रोग्यांची त्यांनी सेवा केली, त्यातच त्यांनाही प्लेगची लागण झाली, त्यातच त्यांचे १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.

" झाल्या सावित्रीबाई फुले म्हणून शिकल्या मुली क्रांतिज्योतीचा हा दीपस्तंभ जपला पाहिजे गल्लोगल्ली"

स्त्रीचा महिमा, स्त्रीची प्रतिष्ठा, तिची सुरक्षा आणि प्रागतिक अपेक्षा जपण्यातच क्रांतिज्योती सावित्रीबाईना खरी मानवंदना आहे !

-=()=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-
-=()=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-
-=()=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-=-()-


=================================
-----------------------------------------------
*शब्दगंध दिनदर्शिकेचे*✍️✅🇮🇳...
 *प्रकाशन उत्साहात संपन्न*
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला सबलीकरणाचा आदर्श


क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
महिला सबलीकरणाचा आदर्श

" क्रांतिज्योत पेटविली
सावित्रीबाई फुले यांनी
स्त्रीशिक्षणाचा दीपस्तंभ
फडकत आहे तो गगनी"
  भारतीय संस्कृतीचा आदर्श जपत कांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी पती महात्मा जोतीराव फुले यांच्या शैक्षणिक, सामाजिक, वाङमयीन कार्याची ज्ञानज्योत लावून ठेवली आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ०३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगांव या खेड्यात झाला तर त्यांचे निधन पुणे येथे १० मार्च १८९७ रोजी झाले. सावित्रीबाई फुले यांना ६६ वर्षाचे आयुष्य लाभले. महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला तर त्यांचे निधन २८ नोव्हेंबर १८९० रोजी झाले. त्यांना ६३ वर्षाचे आयुष्य लाभले. समाजसेवा आणि शैक्षणिक क्रांतीचे हे पतीपत्नी म्हणजे भारतीय इतिहासातील एक आदर्श जोडपे आहे. आपले सर्व जीवन समाजाच्या उद्धारासाठी समर्पित करणारे हे दांपत्य पूजनीय, वंदनीय आणि सर्वांना दिशादर्शक ठरले आहे 
  नायगाव खेड्यातील खंडूजी नेवसे पाटील गावाचे पाटील होते. आई लक्ष्मीबाई नेवसे आदर्श गृहिणी होत्या. सावित्रीबाई ०९ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय जोतीराव फुले यांच्याशी झाला. जोतीराव यांची आई चिमणाबाई आणि वडील गोविंदराव शेरीबा फुले यांनी मुलांवर उत्तम संस्कार केले. जोतीराव ९ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. आत्या सगुणाबाई यांनी जोतीरावांवर उत्तम संस्कार केले. हडपसर येथील इंग्रज अधिकाऱ्या च्या घरी त्या मुलांना सांभाळत असत, तेच संस्कार जोतीबावर झाले.हा परिवार मुळचा सातारा जिल्हयातील खटाव तालुक्यातील कटगुण येथील होता.जोतीबांचे आजोबा शेरीबा माधवराव गोऱ्हे हे पुणे येथे पेशवे दरबारी होते. पेशव्यांनी त्यांना फुलशेतीसाठी ३५ एकर जमीन दिली. गो-हे परिवार फुलांची शेती करीत, त्यामुळे पुढे गोऱ्हे आडनाव बाजूला पडून फुले आडनाव झाले. अशा या फुले परिवारात आल्यावर निरक्षर असलेल्या सावित्रीबाई यांना महात्मा फुले यांनी साक्षर केले. शिक्षण नसल्याने समाजात अन्याय, अत्याचार, लुबाडणूक, अंधश्रद्धा, जाचक रुढी, परंपरा यामुळे सर्वसामान्य समाज गलितगात्र झाला होता. महात्मा फुले यांनी समाजप्रबोधन आणि शिक्षणाचे कार्य सुरु केले.
" विद्येविना मति गेली
मतिविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतिविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले."
   अज्ञानाचे खालचे मडके फोडले की बाकी समस्यांची उतरंड आपोआप ढासाळेल असे म्हणून जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. ०१ जानेवारी १८४८ रोजी त्यांनी पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरु केली आणि स्त्री शिक्षणाचा प्रारंभ झाला. सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका झाल्या. भारतीय माणसांनी सुरु केलेली ही पहिली मुलींची शाळा प्रगतीला पूरक ठरली. तत्कालिन कर्मठ समाजकंटकांनी शिक्षिका सावित्रीबाईंचे कार्य थांबविण्यासाठी प्रखर विरोध केला, त्यांच्यावर दगड, शेणमातीचा मारा केला, घरातील स्त्री शिकली तर तिने वाचलेला अक्षरांच्या अळया होऊन त्या पुरुषांच्या जेवणाच्या ताटात पडतील असा भ्रम निर्माण करण्यात आला, धर्म बुडाला-- जग बुडणार--कली आला" अशी समाजात भिती निर्माण केली गेली पण सावित्रीबाईचे स्त्रीशिक्षणाचे कार्य थांबले नाही, केवळ ६ विद्यार्थिनीने सुरु झालेल्या या शाळांची संख्या वर्षभरात १८ झाली. 
 शिक्षणाबरोबर सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीजागृती आणि स्त्रीरक्षण यांना महत्त्व दिले. बाला- जरठ विवाहाला विरोध केला. छोट्या मुली विधवा झाल्या की त्यांना कुरूप करण्यासाठी त्यांचे केशवपण केले जाई. छोटया बालविधवावर अन्याय, अत्याचार होत असत, त्या गरोदर राहत असत, काही बालविधवा आत्महत्या करीत , काही मुकपणाने अश्रू गिळत असत. अशा बालविधावांसाठी महात्मा फुले, सावित्रीबाईंनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु केले. बालविधवांचे कोणी केशवपण करू नये म्हणून त्यांनी नाभिक समाजाचे प्रबोधन केले. त्यांचा संप घडवून आणला, गृहआश्रमात विधवांना आश्रय मिळाला. अत्याचाराला बळी पडलेल्या काशीबाई या बालविधवा असलेल्या स्त्रीचे मूल सावित्रीबाई यांनी दत्तक घेतले, तोच यशवंत पुढे डॉक्टर झाला आणि या कार्याला त्याने वाहून घेतले.
  महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर१८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सविजनिक सत्यधर्म पुस्तक लिहिले. सत्यशोधकी विवाह सुरु केले, या सर्व कार्यात सावित्रीबाई फुले यांनी वाहून घेतले. महात्मा फुले यांनी सामाजिक प्रबोधनासाठी १८५५ मध्ये तृतीय रत्न नाटक लिहिले,१८६९ मध्ये शिवरायांचा पोवाडा लिहिला,१८७३ ला गुलामगिरी ग्रंथ लिहिला,१८८३ ला शेतकऱ्यांचा आसूड लिहिला. सत्सार अंक १,२ काढले, त्यातच ताराबाई शिंदे यांनी स्त्रीपुरुष तुलना दीर्घ निबंधलेख लिहून स्त्रीदास्य आणि स्त्रीशोषणावर प्रखर प्रकाश टाकला. सतीबंदी यासाठी संघर्ष सुरू ठेवला. महात्मा फुले यांच्यावर अनेक संकटे आली. घर सोडावे लागले पण दोघांचे कार्य थांबले नाही.२८ नोव्हेंबर१८९० रोजी महात्मा फुले यांचे निधन झाले, त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी कोणी पुढे आले नाही त्यावेळी सर्व विधी सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई फुले यांनी १८५४ मध्ये 'काव्यफुले' १८९१ ला' सावित्रीबाईची गाणी', १८९२ साली' बावनकशी सुबोध रत्नाकर' कवितासंग्रह, जोतिबांची भाषणे संपादितपुस्तक प्रकाशित केले.१८९६-९७ मध्ये पुण्यात प्लेग रोगाची साथ सुरु झाली. इंग्रज सरकारने दडपशाही केली स्थलांतरित लोकांचे प्रश्न वाढले. सावित्रीबाईंनी पुण्याजवळ असलेल्या ससाणे माळावर दवाखाना सुरू केला. रोग्यांची त्यांनी सेवा केली, त्यातच त्यांनाही प्लेगची लागण झाली, त्यातच त्यांचे १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.
  " झाल्या सावित्रीबाई फुले
म्हणून शिकल्या मुली
क्रांतिज्योतीचा हा दीपस्तंभ
जपला पाहिजे गल्लोगल्ली"
  स्त्रीचा महिमा, स्त्रीची प्रतिष्ठा, तिची सुरक्षा आणि प्रागतिक अपेक्षा जपण्यातच क्रांतिज्योती सावित्रीबाईना खरी मानवंदना आहे !


=================================
-----------------------------------------------

*डॉ.बाबुराव भामा दत्तात्रय उपाध्ये*💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - भ्रमणसंवाद: ९२७००८७६४०
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*लेख विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*लेख प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी मुदतवाढ आ.हेमंत ओगले*


सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी
मुदतवाढ : - आ.हेमंत ओगले

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतले असल्याची माहिती श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी दिली आहे.
     नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार ओगले यांनी शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांना स्पर्श करत त्यामध्ये दूध दरवाढ कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा तसेच सोयाबीन व इतर पिकांच्या हमीभावात बाबत देखील सरकारचे लक्ष वेधले होते तसेच अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती. त्याला यश आले असून शासनाने सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ डिसेंबर पर्यंतच होती.
    जे शेतकरी ६ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची नोंद करतील अशा शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत १२ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे, किमान आधारभूत किंमत योजना अंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी ४८९२ रुपये प्रतिक्विंटल या हमीभावाने सुरू आहे तरी वाढलेल्या मुदतीची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तसेच ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदीच्या ऑनलाईन नोंदी बाकी असतील अशा शेतकऱ्यांनी त्वरित ६ जानेवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन आमदार हेमंत ओगले यांनी केले आहे. 
 तरी याबाबत शेतकऱ्यांना काही अडचण असल्यास त्यांनी मला अथवा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे कळविले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

संपादक राजु मिर्जा यांनी घेतली खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट


संपादक राजु मिर्जा यांनी घेतली खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची भेट

विविध विषयांवर सविस्तर चर्चा

- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -
शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय खासदार मा.श्री. भाऊसाहेब वाकचौरे हे आपल्या कामानिमित्त येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी आले असता राज प्रसारित चे संपादक राजु मिर्जा यांनी आपल्या शिष्टमंडळासह त्यांची भेट घेवून कार्येक्षेत्रात होत असलेल्या विक्रमी विविध विकासकामांबरोबरच काही ठिकाणी कामातील अनियमितता आणी संबंधित विभागाकडून होत असलेला ठिसाळपणा याविषयी सविस्तर चर्चा केली.

याप्रसंगी बोलताना खा. वाकचौरे म्हणाले की,
ज्या ज्या ठिकाणी असे काही गैर कामकाज आढळून येईल त्यास अजीबात खपवून घेतले जाणार नाही,जनतेचे मुलभूत प्रश्नांचे निवारण आणी विकासकामे हे योग्य पद्धतीनेच झाली पाहिजे,
विकासकामांबाबत म्हणायचे ठरले तर मी केवळ एक नाममात्र जनसेवक आहे,सर्व काही श्री साईबाबांजीच्या आशिर्वादानेच होत आहे, तथा सध्याही आणी भविष्य काळातही समस्त जनतेचे मुलभूत प्रश्न आणी समस्यां यावर कटाक्षाने लक्ष दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================




प्रा.अशोकराव तुसे यांनी शैक्षणिक, कौटुंबिक आदर्श निर्माण केला- डॉ. बाबुराव उपाध्ये


प्रा.अशोकराव तुसे यांनी शैक्षणिक, कौटुंबिक आदर्श निर्माण केला- डॉ. बाबुराव उपाध्ये

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले इतिहास विभाग प्रमुख प्रा. अशोकराव भागवतराव तुसे यांनी शैक्षणिक योगदानाचा आणि कौटुंबिक संस्कृतीचा आदर्श निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी काढले.
    श्रीरामपूर येथील बेलापूर रोडवरील अनमोल लॉन्स येथे प्रा.अशोकराव तुसे यांचा विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान , वाचन संस्कृती प्रतिष्ठान आणि तुसे मित्रमंडळातर्फे सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते.
    प्रा.अशोकराव भागवतराव तुसे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या श्रीरामपूर, सातारा येथील शाखेत इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ सेवा केली. त्यांच्या शैक्षणिक, कार्यकुशल जीवन वाटचालीबद्दल विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान आणि वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे सन्मानचिन्ह, शाल, बुके, विविधग्रंथ,भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला, तसेच विविध मित्रमंडळीतर्फे प्रा. तुसे यांचा सत्कार करण्यात आला. 
प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये आपल्या भाषणात पुढे म्हणाले, प्रा. तुसे हे विद्यार्थी वर्गात प्रिय प्राध्यापक होते, त्यांनी चरित्र आणि चारित्र्याचा आदर्श निर्माण केला. आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले. सामाजिक स्नेहबंध जपले. पुस्तके वाचणे, विविध उपक्रमांत सहभागी होणे, प्रतिसाद देऊन अनेकांना प्रेरणा देणे आणि वाचत संस्कृतीला बळ देण्याचे केलेले उपक्रम कौतुकास्पद आहे. 
यावेळी प्रा.अशोकराव तुसे यांनी स्वतःची ग्रंथतुला करून सर्व ग्रंथ ज्या शाळेत ते शिकले त्या पढेगांव येथील यशवंत विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी ग्रंथ भेट दिले हे विशेष कौतुकस्पद आहे. 
सुखदेव सुकळे म्हणाले,प्रा. तुसे आणि परिवार एक आदर्श परिवार आहे. प्रा. अशोकराव आणि सौ. सुलोचना तुसे यांनी समाजात आणि कौटुंबिक नातेबंधाचा आपलेपणा निर्माण केला. डॉ.सागर तुसे, प्राचार्या सौ. तृप्ती परदेशी, शिक्षिका सौ. वैशाली कुमावत, सौ. सारिका पवार, सौ.सपना कुमावत या मुलांनी वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला, हा आदर्श अनेकांना प्रेरणादायी ठरणारा असल्याचे सांगून सुखदेव सुकळे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी केशवराव भवरे, सपना कुमावत, संजय कुमावत, रावसाहेब परदेशी, रामप्रसाद परदेशी, भारती तुसे, स्वप्नील परदेशी , सारिका पवार, हरिश्चंद्र परदेशी, सीताबाई परदेशी, चांगदेव परदेशी, प्रा. एकनाथ औटी, प्रा.चंद्रभान चौधरी, संजय बुरकुले, सौ. सुरेखा बुरकुले, संकेत बुरकुले, सौ. शीतल बुरकुले आदिंनी प्रा. तुसे यांचा सन्मान करून मनोगतातून आपल्या आठवणी सांगितल्या. 
सुनबाई सौ.उर्मिला तुसे यांनी सगळ्या कार्यक्रमाची रुपरेषा तयार केली होती.
अनमोल लॉन्स गोरे रसवंती गृहाचे हेमंत गोरे, अनमोल गोरे यांनी नियोजन केले. प्रा. अशोकराव तुसे यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================