राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, February 14, 2025

सौ.कोमल पांडव या विदर्भाची हिरकणी पुरस्काराने सन्मानित



*सौ.कोमल पांडव या विदर्भाची* 
*हिरकणी पुरस्काराने सन्मानित*

- वरूड - जि.अमरावती -/ प्रतिनिधी -
श्री शिवाजी शिक्षण संस्था संचालित न्यू इंग्लिश प्रायमरी स्कुल वरुड जि. अमरावती याठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. कोमल पांडव यांना नुकताच कलाजिवन संस्थेतर्फे विदर्भाची हिरकणी पुरस्कार - २०२५ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सौ.पांडव यांचे शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही मोठे कार्य आहे.त्या सातत्याने आपल्या शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही विविध सामाजाभिमुख उपक्रम राबवून अविरत कार्य करत आहेत.त्यांनी या आधी अलेक्सा हे मॉडेल विद्यार्थाकरीता तयार केले आणि त्याची विद्यार्थ्यांनी माहिती तथा आनंद सुद्धा घेतला तसेच कोरोना काळात त्यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर राहून महिलांना कोरोना लस घेण्याकरीता मोलाचे मार्गदर्शन व मदत केली. महागाईबाबत गॅस सिलिंडर, तेल इत्यादी घरेलु जीवनावश्यक वस्तूंचे दर गगणाला भिडले असता त्यांनी महागाईविरोधात आवाज उठविला. यासोबतच शिक्षक भरती करण्याकरिता अनेकवेळा निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुढाकार घेतला यासोबतच महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सन्मान, तसेच महिलांचे हेल्थ चेकप तपासणी शिबीरे घेऊन महिलांना सक्षम कसे करता येईल या करिता त्या सातत्याने कार्यरत असतात, त्यांच्या अशा या विविध सामाजाभिमूख उपक्रम आणी कार्यची दखल सामाजिक क्षेत्रातील नावाजलेली संस्था असलेल्या कलाजिवन संस्थेने घेत त्यांची हिरकणी - २०२५ या पुरस्कारा साठी निवड करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.त्यांना मिळालेल्या या पुरस्कारबद्दल सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
सौ.पांडव यांना मिळालेल्या पुरस्कारबद्दल त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, काम करत रहा, एक दिवस आपल्या कामाची दखल ही घेतली जातेच, आपण कामे करत असताना सामाज आपल्याकडे कटाक्षाने बघत असतो,तथा आपल्या चांगल्या - वाईट कामांचे मुल्यमापनही करत असतो,
त्याद्वारे काय चांगले आणी काय वाईट याचे फलस्वरुप पुढे निदर्शनास येवू लागते.
चांगले कामे असली तर त्याचे फळ देखील चांगलेच मिळतात हे यावरून स्पष्ट होते. करीता हा पुरस्कार माझा नसुन मला मिळालेल्या समाज कार्याच्या संधीचा आहे, त्या समाजसेवेचा आहे, एकारुपाने हा पुरस्कार म्हणजे माझ्या सामाजिक कामांची पावतीच होय असेही त्यांनी यावेळी सांगितले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार प्रविण सावरकर - 
वरुड
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस 
श्रीरामपूर - 9561174111
=================================
-----------------------------------------------

Sunday, February 9, 2025

अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेतर्फे उर्दू सप्ताहाचे आयोजन


अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य 
परिषदेतर्फे उर्दू सप्ताहाचे आयोजन 

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अहमदनगर जिल्ह्यात उर्दू प्रेमींच्या सहकार्याने उर्दू सप्ताह साजरा केला जाणार आहे. या सप्ताहात सर्व शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक सक्रियपणे सहभागी होतात.या वर्षीचा तपशील खालील प्रमाणे आहे.
सोमवार १० फेब्रुवारी २०२५ रोजी उर्दू सप्ताहाचे उद्घाटन, उर्दू भाषेच्या इतिहासाचे वर्णन.उर्दू भाषेचे महत्त्व आणि इतिहास याबद्दल माहिती प्रदान करणे. मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी मुलांना पाठ्यपुस्तकातील कविता म्हणणे. बुधवार १२ फेब्रुवारी रोजी उर्दू कॅलिग्राफी स्पर्धा,उर्दू वाचन स्पर्धा. गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी बैत बाजी आणि कविता वाचन स्पर्धा होईल.
शनिवार १५ फेब्रुवारी रोजी पवित्र ग्रंथ स्तुती आणि पठण स्पर्धा. सोमवार १७ फेब्रुवारी रोजी उर्दू लेखक आणि कवींबद्दल माहिती. त्यांच्या नावांची यादी बनवुन आणि त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहणे. मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी उर्दू गीते, गझल आणि विनोदांचे पठण करने आणि ते लक्षात ठेवणे. गुरुवार २० फेब्रुवारी रोजी समारोप आणि पुरस्कार वितरण समारंभ घेतला जाईल असे अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे अध्यक्ष सलीम खान पठाण यांनी सांगितले. 
 या मेळाव्यात उर्दू आठवड्यात सहभागी होणाऱ्या मुलांचे तसेच या वर्षी ज्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत दाखल केले आहे त्यांचे विशेष स्वागत केले जाईल. 
उर्दू सप्ताहात दररोज किंवा कोणत्याही एका दिवशी आपापल्या शाळांमधून पदवीधर झालेले आणि उर्दू माध्यमाच्या पलीकडे उच्च शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी आणि आज समाजात चांगले पद भूषवणाऱ्या किंवा यशस्वी उद्योजकांना मुलांसमोर आमंत्रित केले जाईल आणि त्यांचे स्वागत केले जाईल.असे सचिव आबीद दुलेखान यांनी सांगितले. 
या व्यतिरिक्त उर्दूच्या प्रचारासाठी योग्य वाटणारी कोणतीही कृती शाळेत करता येईल.या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शाळा प्रशासन समिती, शिक्षक आणि समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने बक्षिसे दिली जाईल.असे सहसचिव डॉ कमर सुरुर यांनी सांगितले. सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी या उर्दू सप्ताहात सक्रिय असलेल्या सर्व शिक्षकांना जिल्हास्तरावर २० ते २५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या समारंभात ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल.असे सलीम खान पठाण यांनी सांगितले.
हा उर्दू सप्ताह यशस्वी करण्यासाठी उर्दू साहित्य परिषदेचे पदाधिकारी सर्वश्री के के खान,शरफुद्दीन शेख, अन्सार शेख, नवीद मिर्झा, शाकीर अहमद शेख, इमाम सय्यद, फैयाज शेख, शबनम खान, नर्गिस इनामदार, हनीफ शेख, नौशाद सैय्यद , अनिस शेख , बदर शेख , जमीर शेख, साजिद कुरेशी, वसीम शेख, हारुण कुरेशी, जावेद शेख, सुभान सय्यद, नाजमा शेख,तनवीर रजा शेख, मोहम्मद उमर बागवान,फिरोज खान पठाण, अरबाज पठाण, शाहनवाज गुलाम, इकबाल काकर, मुबशीर खान, शबिस्ता शेख ,जहीर शेख,आरिफ दस्तगीर, महमूद शेख, मुनव्वर शेख, मतीन मनियार, हुसेन मोमीन, इलियास शहा, साजिद शेख, जहीर काकर, फिरोज शेख, उसमान तांबोळी, सिद्दीक बागवान, वहिदा सय्यद,शाहीन शेख, अल्ताफ शाह, आसिफ शेख, जाकीर शाह,मिनाज शेख,अस्मा पटेल, आमरीन पठाण, यास्मिन शेख, नसरीन इनामदार, नाजिया शेख व जिल्ह्यातील उर्दू साहित्य परिषदेचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Thursday, February 6, 2025

कोट्यावधींचा निधी असूनही लाभार्थ्यांना लाभ मिळेनात


हजारो प्रस्ताव धूळखात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
कोट्यावधी रूपयांचा निधी राज्य सरकारने आयुक्तालयास देऊनही महाराष्ट्रातील लाखभर लेकरांना महिला व बालविकास विभागाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा एक ते दोन वर्षांपासून नियमित,सहज, सुलभ लाभ मिळत नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवरच नाही तर आगाऊ देणाऱ्या महिला व बालविकास आयुक्तालयाकडून महाराष्ट्रातील लाखभर लेकरांना मात्र सावत्रपणाची वागणूक मिळत आहे.
या क्षेत्रात राज्य पातळीवर काम करणारे मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व महाराष्ट्र साऊ एकल महिला समितीचे समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. विविध आजार व इतर कारणांमुळे आई किंवा वडिलांचा मृत्यू झाला असेल किंवा काळजी व संरक्षणाची गरज असेल अशा शून्य ते अठरा वर्षापर्यंतच्या बालकांसाठी ही योजना राबविली जात आहे. त्यासाठी अशा बालकांच्या पालकांकडून राज्यभरात असलेल्या जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केले जातात. या प्रस्तावांची छाननी करून ते मंजुरीसाठी जिल्हा बालकल्याण समितीकडे पाठविले जातात. समितीचे अध्यक्ष, सदस्य यांच्या समोर लाभार्थी व पालकांसह प्रस्तावांची फेरपडताळणी, तपासणी होऊन पात्र, अपात्र प्रस्तावांबाबत आदेश केले जातात. मंजुरीच्या पुढील महिन्यापासून लाभार्थ्यांना लाभ मिळणे अपेक्षित आहे. त्यानुसार दरमहा २ हजार २५० रू. शिक्षण व बालसंगोपनासाठी मिळतात. तर कोविड कोरोनोच्या महासंकटात आई किंवा वडील अथवा दोन्ही गमावलेल्या एकल किंवा अनाथ बालकांना केंद्र सरकारच्या प्रायोजित योजनेतून (स्पॉन्सरशीप ) योजनेंतर्गत दरमहा ४ हजार रू. लाभ शिक्षण व संगोपनासाठी मिळतो.
सध्या राज्यात एक लाखांच्या आसपास बालके क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचे लाभार्थी आहेत. हे प्रस्ताव मंजूर असलेल्या कोविड लाभार्थ्यांना थेट केंद्र सरकारच्या प्रायोजित योजनेतून दरमहा चार हजार रूपयांचा लाभ दिला जातो. त्यासाठी स्वतंत्र, वेगळे अर्ज, प्रस्ताव दाखल करावे लागत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करताना योजनेचे अनुदान दरमहा अकराशे रूपयांहून बावीसशे रू. करून डी.बी.टी. प्रणालीद्वारे दरमहा देण्याचे जाहीर केले.
केंद्राच्या प्रायोजित योजनेचे पैसे लाभार्थ्यांना बऱ्यापैकी मिळत आहेत. राज्याच्या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करून मंत्रालयातून पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तांच्या बँक खात्यात कोट्यावधी रूपयांचे अनुदान जमा केले आहे. मात्र चालू आर्थिक वर्षातील दहा महिने उलटून गेल्यानंतरही योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पोहचत नाहीत. 
याशिवाय राज्यभरातील जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा बालकल्याण समित्यांकडे बालसंगोपन योजनेची हजारो प्रकरणे धूळ खात पडली आहेत.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=
*लाडक्या बहिणीचे लाड;*
 *बालकांशी मात्र सावत्रपणा*
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविणाऱ्या पुणे येथील महिला व बालविकास आयुक्तालया मार्फतच बालसंगोपन योजना राबविली जाते. बहिणींच्या खात्यात दरमहाच नाही तर आगाऊ पैसे देणारे आयुक्तालय बालकांना मात्र सावत्रपणाची वागणूक देत आहे. पैसे जमा करण्यात व प्रस्ताव मंजुरीत दिरंगाई करणाऱ्यांविरूद्ध कारवाई झाली पाहिजे. 
-मिलिंदकुमार साळवे, सदस्य मिशन वात्सल्य शासकीय समिती,श्रीरामपूर
=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Wednesday, February 5, 2025

प्रत्येक श्वास बनतो आहे जात आणि धर्म...निधर्मी राहण्याचे स्वातंत्र्य उरले नाही


अ.नगर -  प्रतिनिधी - प्रतिनिधी -/ वार्ता -
रस्त्यावरती आणली त्यांनी आरती आणि नमाज..
देवाला देव्हाऱ्याचे स्वातंत्र्य उरले नाही...
प्रत्येक श्वास बनतो आहे जात आणि धर्म..
निधर्मी राहण्याचे स्वातंत्र्य उरले नाही... छत्रपती संभाजीनगर येथील विद्रोही कवयित्री डॉ.प्रा.प्रतिभा अहिरे यांच्या अंतर्मुख करणाऱ्या कवितांनी मराठी,हिंदी,उर्दू त्रैभाषिक कविसंमेलनात देशाच्या वर्तमान व्यवस्थेवर हल्ला बोल केला. लोकशाही उत्सव समितीच्या वतीने रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीच्या सभागृहात निमंत्रित कविंचे कविसंमेलन महात्मा गांधींच्या हौतात्म्य दिनी आयोजित करण्यात आले होते.
लोकशाही उत्सव समितीच्या वतीने संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २५ ते ३० जानेवारी दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या अभियानाचा समारोप त्रैभाषिक कविसंमेलनाने करण्यात आला. या कविसंमेलनात देशाच्या सद्य स्थितीसह मानवी भावभावनांचे प्रतिबिंब उमटले.डॉ. कमर सुरूर यांच्या अध्यक्षतेखाली हे कविसंमेलन संपन्न झाले. सुरूर यांनी 
आओ हिंदुस्तान बनाये ऐसा हिंदुस्तान
 प्यार का हो कानून जहॉं और सबका हो सन्मान... इन्सानो में फैल रहा है नफरत का आजार.. 
दिन धर्म में बॉंट रहे हो उलफत का संसार..
दिल का शीशा टूट गया तो रोयेगा भगवान
ही कविता सादर केली.
छत्रपती संभाजीनगर येथील सुनील उबाळे यांनी आर्थिक विषमता आणि गरिबीचे रखरखीत दाहक वास्तव उभं केलं...
"लोक भलेही लपवून ठेवू द्या सोनं ताळेबंद तिजोरीत.. 
म्या खेळत्या वयात भाकरीचे तुकडे लपवून ठेवले होते उद्याची उपासमार टाळण्यासाठी...
 ती भाकर पाऱ्यासारखी निसटत राहिली,
 मी मोठा होत गेलो तिला पकडता पकडता...."
या कवितेला उपस्थितांनी मोठी दाद दिली.
आझमगड येथील शायर मुसेब आझमी यांनी या कविसंमेलनात प्रेम भावनेचे रंग भरले..
"आखिरत इंसाफ आशिक का करेगी जब 
पहेले मजनू से बुलाया जाएगा मुझको...
हमसे जिंदा है जहाँ में उलफत..
तुझको दुनिया बताए कैसे..?
हैरगी,ऑंख जो दिल के केंद्र...
उसको पानी से बुझाए कैसे...?"
 या तरलतम भावनेच्या कवितेलाही रसिकांनी आवर्जून दाद दिली. गोरखपूर येथील शायर नोमान सिद्दिकी यांनी याच आशयाला विस्तारत आपली गझल सादर केली..
 "कुछ दिनों से है सुरज कही लापता
 चांद भी अपने घर से निकलता नही...
 सिर्फ बातो से अब दिल बहलता नही
 एक चिंगारी तो लाजमीं है हुजूर 
कोई दीपक यहॉं खुद जलता नहीं....."
या प्रेम कवितेलाही मोठी दाद मिळाली..
ज्येष्ठ शायर बिलाल अहेमदनगरी यांनी युवकांच्या विसंगतीवर मार्मिक शब्दांत भाष्य केले व काही प्रेमावरील शेर पेश केले. 
"मतला मेरी गझल का सुनया गया मुझे 
एक शायरे मिजाज बनाया गया मुझे..
मायूस तो नही हुं नमकीने जिंदगी से
 हर गम को सह रहा हूं अपनी हंसी खुशी से...."
 यासारख्या कविता,गझलांनी रसिकमनात विचारांची बिजं पेरली.
या कविसंमेलनाचे प्रास्तविक अशोक सब्बन यांनी तर सुत्रसंचालन डॉ महेबुब सय्यद यांनी केले.
कविसंमेलनाच्या प्रारंभी संविधानावर पथनाट्य सादर करण्यात आले.
  यावेळी कॉम्रेड स्मिता पानसरे, ऍड. बन्सी सातपुते, चित्रकार राजानंद सुरडकर, ऍड. रवींद्र शितोळे, प्राचार्य जयदीप पवार,संजय झिंजे, आर्किटेक्ट अर्शद शेख, आनंद पुरंदरे, आबीदखान दुलेखान, पारूनाथ ढोकळे, रवी सातपुते, डॉ. लक्ष्मीकांत येळवंडे, कॉम्रेड अनंता लोखंडे, आनंद शितोळे, डॉ. सुरेश जैन, संध्या मेंढे, अॕड.विद्या जाधव -शिंदे, आदिंसह मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. या प्रसंगी सोनाली देवढे-शिंदे यांनी आभार मानले.

सोबत छायाचित्र 
लोकशाही उत्सव समितीच्या त्रैभाषिक कविसंमेलनात कविता सादर करताना विद्रोही कवयित्री प्रा प्रतिभा अहिरे मंचावर कमर सुरूर, मुसेब आझमी, नोमान सिद्दीकी,बिलाल अहेमदनगरी, सुनील उबाळे, डॉ. महेबुब सय्यद, आदी...


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान, अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

वॉर्ड नंबर १ पंजाबी कॉलोनी दशमेश नगर श्रीरामपूर येथे मोबाईल हिचकू चोरणारे व मुलींची छेड करून लुटानेर यांचा सुळसुळाट


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - चंद्रकांत मराठे 
सदरील विषय : सविस्त्तर उत्त असे अचानक संध्याळाली दरम्यान दिवस रात्री उल्लंखनीय प्रकार घडत असून सतत होत आहे दुचाकी वहान दोन ते तीन अज्ञान इसम घातकी शस्त्र बाळगत असून त्या शस्त्र चा धाक दाखून बळजबरी ने नागरिकांचा लुटण्याचा निरनिराळ्या प्रकार बिनधास्त पणे करीत असल्याचे समज ते तसेज सदरील पंजाबी कॉलोनीतील जय मातादी मंदिर व गुरद्वारा येथे
 असून आशीर्वाद घेण्याकरिता श्रद्धालू भाविक मध्ये उद्ध व्यक्त तसेज महिला व मुलींचा समावेश असून प्रचंड प्रमाणात ये जा असून अनेकानेक वेलांस या चोरट्यानी रात्री दिवसा लुटणायाच थैमान छेड छाड करण्याचा प्रमाण घातला असून महिला तरुणीला उद्ध इसम यांना दहशत व्यक्त करून मोबाईल पैशाचा पर्स हीचक ण्याचा डाव सादला आहे सदर या कॉलोनी परिसरातील राहणारे महिला धस्तावले व स्वतःचा मान मर्यादाला स्वाभिमान पडू नये या अनुषंगाने पोलीस ठाणे येथे जाण्यास विलंब करीत आहे हे सर्व प्रकार महिन्या भरात अनेक वेळेस घडून सुद्धा वरील नागरिक सहन करीत असून कुठलीच तक्रार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नोंदणीनी केली नसून हे राबडी करणारे गुंडाचे दहशत्ती मुळे सदर विषय, बाबत जस्वंत सिंग सेठी गुरुदेव जी भट्यानी हरजीत गुलाटी विरेंद्र सहानी विरपाल सिंग सूड काके तेजपाल सिंग वालिया महेंद्र देशपांडे सौरभ नाईक श्री निवास कुलकर्णी प्रतीक पांडे साहेली कौर उपेल रश्मी कौर बरार अनेकांची अशी मागणी होते की शहर पोलीस  स्टेशन ने पंजाबी दशमेश नगर कॉलोनीतील गस्त वाडून घडत असल्याले गैर प्रकार तात्काळ थांबव्हावे अंन्यथा  पोलीस अधीक्षक कार्यालयात अ:-नगर येथे रितसर धरणे प्रदर्शने करण्यात येईल असे पंजाबी दशमेश नगर कॉलोनीतील राहणारे नागरिकांने आपले तक्रार विषय : - सुचविले आहे ?...

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

संगमनेर दोघांविरुद्ध गुन्हा, दोघा अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या एका शिक्षिकेचे ५० हजार रुपयांचे दागिने लांबविले.


- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता -दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या एका शिक्षिकेचे ५० हजार रुपयांचे दागिने लांबविले आहे. शहरालगतच्या गुंजाळवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वृत्तपत्र विक्रेते दिनेश टकले यांच्या भावजयी शिक्षिका योगिता निखिल टकले (वय ३९) या संगमनेर शहरालगतच्या गुंजाळ मळा परिसरातील श्रद्धा कॉलनी मध्ये राहतात. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्या वॉकिंग करून घरी पाई जात होत्या. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी टकले यांचे पन्नास हजार रुपये किंमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण लांबविले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने टकले यांचे गंठण ओढले. यानंतर चोरटे फरार झाले.

याबाबत योगिता टकले यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीवरील दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================



Tuesday, February 4, 2025

निळवंडे ते कौठे कमळेश्वर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या या उद्देशाने थांबलेल्या दरोडेखोरांना संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (दि.28) पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाठलाग करुन पकडले.


- संगमनेर - प्रतिनिधी -/ वार्ता - निळवंडे ते कौठे कमळेश्वर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने थांबलेल्या दरोडेखोरांना संगमनेर तालुका पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (दि.28) पहाटे पाच वाजेच्या सुमारास पाठलाग करुन पकडले. या कारवाईत पोलिसांनी गावठी कट्टा व 4 लाख 61 हजार 650 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेल्या तीन दरोडेखोरांना न्यायालयात हजर केले असता 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दोघे पसार होण्यात यशस्वी झाले आहे.

 याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांना गुप्त माहिती मिळाली की निळवंडे ते कौठे कमळेश्वर रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने कार (क्र.एमएच.23, ई.6847) थांबलेली आहे.

त्यानुसार त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते, पोहेकॉ. शिवाजी डमाळे, संपत जायभाये, आशिष आरवडे, सचिन उगले, पोकॉ.बाबासाहेब शिरसाठ, प्रमोद चव्हाण यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने मंगळवारी पहाटे सदर ठिकाणी पाठलाग करुन कारमध्ये असलेले दरोडेखोर ललित अनिल थोरात (वय 24, रा. थोरात वस्ती, वडगाव पान, ता. संगमनेर), किरण संजय काळे (वय 19, रा. माळेगाव हवेली, ता. संगमनेर) व गणेश चंद्रभान गायकवाड (वय 26, रा. खांडगाव, ता. संगमनेर) या तिघांना पकडले. तर अजित अरुण ठोसर उर्फ करमाळ्या (रा. मातकोळी, ता. आष्टी, जि. बीड) व भैय्या राऊत (पूर्ण नाव माहीत नाही) हे दोघे पसार होण्यात यशस्वी झाले.

पोलिसांनी त्यांच्याकडून 15 हजार रुपयांचा गावठी कट्टा व आठशे रुपये किमतीचे चार जिवंत काडतुसे, लाल रंगाची मिरची पावडर, 15 व 20 हजार रुपये किमतीचा मोबाइल, 50 हजार रुपये किमतीचे प्रत्येकी दोन आयफोन, 3 लाख 10 हजार रुपये किमतीची कार, दोनशे रुपये किमतीचा कोयता, सुताची दोरी, सहाशे रुपये किमतीचे तीन प्लास्टिकचे ड्रम असा एकूण 4 लाख 61 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे


=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================