राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, March 1, 2025

मराठी संपादक पत्रकार न्याय हक्क संरक्षण कृती समितीची स्थापना समितीच्या अध्यक्षपदी संपादक प्रविण सावरकर यांची निवड


- उद्धव - फंगाळ -/ मेहकर -
वरुड (जि.अमरावती) शहरात पत्रकारांच्या विविध समस्या करिता व त्यांच्या संविधानिक अधिकारांसाठी नुकतीच विभागीय मराठी संपादक व पत्रकार न्याय हक्क संरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीद्वारे पत्रकारांच्या विविध समस्या, आरोग्य समस्या निवास समस्या, पत्रकारांना शासनाच्या विविध योजना मिळण्याकरीता विभागीय मराठी संपादक व पत्रकार न्याय हक्क संरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यासमीतीच्या अध्यक्षपदी संपादक प्रवीण सावरकर, उपाध्यक्ष तुषार अकर्ते, सचिव विलास पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या समितीच्या माध्यमातून शासन स्तरावर पत्रकारांना शासकीय योजनेचा फायदा मिळावा तसेच पत्रकारां करिता नुकतेच स्थापन झालेले आर्थिक विकास मंडळाच्या माध्यमातुन पत्रकारांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा व पत्रकारांना आरोग्य विमा पत्रकारांचा अभ्यास दौरा सह विविध योजनेची माहिती होण्या करिता व समाजोपयोगी उपक्रम राबविणेकरिता पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी विभागीय मराठी संपादक व पत्रकार न्याय हक्क संरक्षण कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे.
या समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणून दैनिक लोकम चे वरुड तालुका प्रतिनिधी संजय खासबागे,दैनिक हितवाद चे प्रतिनिधी त्रिलोचन कानुंगो व दैनिक देशोन्नती चे तालुका प्रतिनिधी योगेश ठाकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
 यावेळी प्रामुख्याने ज्येष्ठ पत्रकार त्रिलोचन कानुगो, संजय खासबागे, योगेश ठाकरे, प्रकाश गळवे, प्रविण सावरकर विनोद मेंढे, निलेश लोणकर, तुषार अकर्ते, रवींद्र इंगोले, निखिल बावणे, तुषार खासबागे, दिपक बोदरकर, विष्णू राऊत, गजानन नानोटकर, श्री. खंडाईतकर, शेषराव कडू, त्रिनयन मालपे,जितेंद्र फुटाणे, राहुल जाधव, अतुल काळे, किशोर चौधरी यांच्यासह असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.
याप्रसंगी शहरी आणी ग्रामीण भागतील सर्व वार्ताहर व प्रतिनिधींना या समितीमध्ये सभासद करून घेण्यात येणार असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रविण सावरकर यांनी सांगितले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


रमजानुल मुबारक 2025 रोजा नंबर 01रविवार दिनांक 02-03-2025


'" इस्लाम समजून घेताना "'
लेखक :- डॉ. सलीम साईदा सिकंदर शेख 
बैतुशशिफा दवाखाना,
9271640014.
विषय :- अल्लाह (परमेश्वर )च्या अदुतीय भक्तिमय  पर्वाला प्रारंभ..
सन 2025, इस्लामी 1446 हिजरी,महिना शव्वाल परुंतु यालाच सर्व जगात"  रमजान  "रोजा (उपवास )",ठेवण्याचा पवित्र रमजानुल मुबारक महिना. कालच अमावस्या होऊन बंधूनी चंद्र कोर पाहण्याची मनात हुरहूर इच्छा असते,  बघितलं तर प्रत्येक महिन्यात चंद्र कोर चंद्र दर्शन हें होतच असते परुंतु मागील आठवा( 8)महिना शबाना संपल्यावर येणारा नववा (9) महिना शव्वाल अर्थात रमजान महिन्यातील चंद्र कोरला काही वेगळं च महत्व अप्रूप असतं. चंद्रकोर पाहण्याची याच देही याच डोळ्यात बघून अल्लाह कडे लगेच दुवा प्रार्थना करून,अल्लाह च्या कृपा दृष्टी लाभावी.
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, " शाबान हा माझा आवडता महिना आहेत व रमजान महिना हा अल्लाह( परमेश्वर- ईश्वरा" चा आवडता महिना आहेत " म्हणून,
प्रेषित मुहम्मद स्व. सांगितलं की, " तुम्ही पहिल्या प्रथम चंद्र कोर पाहून लागलीच अल्लाह जवळ दुवा प्रार्थना करून जे शुभ शुभ असेल त्यामध्ये तुमच्या इच्छा आकांशा दया करुणा, कर्ज असेल तर कर्ज मुक्ती साठी, तुम्ही रोजच्या व्यवसाय वाढीव साठी, आरोग्य सुखरूप राहावं व तुमच्या अपत साठी प्रार्थना करा,:, अल्लाह तुमच्या साठी जे जे योग्य राहील ते तेंच तुम्हाला खात्रीने भेटेल ".
तसं हिजरी प्रेषित(पैगंबर )मुहम्मद स्व.सल्लम. 16 जुलै 622 रोजी आपल्या स्वकी्यांनी दिलेल्या अतोनात- हाल- कष्ट -वेदना ना कंटाळून इस्लाम च्या प्रसारासाठी मक्का हुन मदिनेच्या स्थलांतर - प्रवासाला - हिजरत " म्हटलं जातं. त्याचं घटनेला आज 1446 वर्षे झालीत. यालाच अरबीत आत - तकबीम - हिजरी व येथूनच हिजरी वर्ष गणलं गेलं व चंद्र ( लुनार कॅलेंडर ) काल संबोधित करतात.
इस्लामी काल गणना चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील परस्पर संबंधावर आधारित, त्याला चांद्र ( लुनार कॅलेंडर )काल  म्हणतात. चंद्रमासाचा कालावधी 29.53 दिवसाचा असल्यामुळे 12 महिन्यात गुणल्यानं वर्षाचे 354 दिवसच होतात.
   भारतीय हिंदू कालगनणा सौर अर्थात सूर्य व पृथ्वी यांच्या परस्पर संबंधावर असल्यामुळे त्याचे 365 दिवस होतात.सूर्यावर आधारित अर्थात सोलर कॅलेंडर.
   इसवी सन किंवा लॅटिन अंनो डॉमिनी ही ग्रोगेरियन दिनदर्शिका मधील काल गणना सर्व जगात( ग्रोगेरिअन कॅलेंडर )हें येसू ख्रिस्त यांच्या जन्मा पासून चालू आहेत. हिब्रू भाषेत "येशु ख्रिस्त व अरबी भाषेत "इसा "यांना पैगंबर म्हणून पवित्र कुरआन  मध्ये  उल्लेख 0आलेला आहेत, त्यांना " इसा"  'इसाअलैसलाम" म्हणून उल्लेख आहेत, इसा चा अपभ्रमश "इसवी ", हा शब्द तय्यार झाला   व" सन" म्हणजे वर्ष किंवा "साल " म्हणून" इसवी सन " ही कालगना सर्व जगात मान्य करण्यात आली म्हणून एक (1)जानेवारी ही तारीख सर्व जगाला समान म्हणून मान्य  आहे,त्यांचं 365-366 ( लीप वर्षे ) होतात. बघितलं तर 1 जानेवारी हा सार्वत्रिक रित्या वर्ष आरंभ असला तरी जगातील विविध देश व धर्माच्या हिशोबात 365 दिवसात 80 अंशी पेक्षा ही जास्त वर्षे आरंभ येतात परुंतु यापैकी कित्येक तारखा समान असल्या तरी 12 बारा महिन्यात 58 आठ्ठावन्न दिवस असे आहेत की कुठलाणा कुठला वर्षे आरंभ हा येतोच असतो.. असो.
 तर सौर आणि चंद्र वर्ष यांच्या मध्ये जवळ जवळ 10-11 दिवसांचा फरक होत असतो. हिंदू मधील सौर कालगनणे तील जो 10-11 दिवसाचा फरक होत असतो ती तफावत भरून काढण्यासाठी भारतीय पंचांग तज्ञान्नी त्यामध्ये संशोधन करून प्रत्येक तीन (3) वर्षात "अधिक " मासाची योजना केली आहेत : ,त्याला आपल्या खेडुत भाषेत" पित्तरपाठ "महिना म्हणून संबोधित करतात.  हिंदू कालगनणा नुसार नवीन वर्ष हें गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्त वर म्हणजेच चैत्र शुद्ध 1, शालिवहन शके 1947, येत्या 2025 वर्षी गुढीपाडवा रमजान ईद अर्थात ईद उल फितर च्या एक दिवस अगोदर  30 मार्च 2025 रविवारी आहेत अर्थातच योगायोग म्हणावं.
             🌷चंद्र ( लुनार )कालगनणा प्रेषित मुहम्मद स्व.यांनी स्पष्ट केल्याने प्रत्येक वर्षात 10-11:दिवस कमी कमी होत होत गेल्याने जगामध्ये रमजान चे रोझे विविध ऋतूत येतात, वेगवेगळ्या देशात फक्त्त एकाच ऋतूत येत नाहीत व ठराविक एकाच तारखेला किंवा ठराविक एकाच महिन्यात दर वर्षी येतच नाहीत. सध्या काही ठिकाणी पावसाळ्यात तर काही ठिकाणी उन्हाळ्यात तर काही ठिकाणी थंडी मध्ये येतात.काही देशात 12 तास तर काही ठिकाणी 13,14,15,16,17,18,20,22 तासांचे रोझे आहेत.. म्हणून या लुनार कॅलेंडर मुळे,  10-11:दिवस पुढे पुढे जात जगात विविध ऋतुत  विविध महिन्यात पुढे फिरत पुन्हा 32-33 वर्षांनी पुन्हा आज आपण या  2-03-25  मार्च महिन्यात जे रोज़े उपवास किंवा कोणताही उत्सव, सन, दिवस आलेला आहेत  तर 32-33 वर्षांनी 02-03-2057 ला तोच दिवस, तीच तारीख, महिना व उत्सव येतील. कालचक्र हें फिरून पुन्हा पुन्हा त्यांच ठिकाणी येत असतं. म्हणून जगातील प्रत्येक रोजदार व्यक्तींना विविध ऋतुत रोझा अनुभवण्याची संधी भेटत असते.असो.
    म्हणून रामजानुल मुबारक च्या पहिल्या चंद्र कोरीच महत्व  औरंच, पैगंबर मुहम्मद स्व. म्हणतात की, तुम्ही अल्लाह जवळ जितकी प्रार्थना दुवा करतांन तेवढी थोडीच असणार आहेत म्हणून तुम्ही जरूर दुवा करा. "
जगतील मानव कल्याण व एकता व अखंडते साठी, निरोगी आरोग्यासाठी, बहीण बंधू, मित्र, शेजारी, देशासाठी, जगासाठी, शांतता, करुणा, दया, उन्नती साठी, कर्ज फेडण्यासाठी टाकत शक्ती मिळावी म्हणून, सुखी समृद्ध जीवनासाठी, जगामध्ये जे आजारी आहेत व ज्यांना दुर्धर आजार, कॅन्सर इत्यादी आजाराने ग्रस्त आहेत त्यांच्या निरोगी आरोग्याची दुवा करावे, इत्यादी दुवा कराव्यात..
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात की, "अल्लाह परमेश्वराच्या खजिन्यात किंचित ही कमी होणार नाहीं.. कारण तो फक्त्त देणाराच आहेत "..
लहान मुलं, आपल्या आवडत्या आप्त ना शुभेच्छा देतात, मामा मामी, आजोबा आजी, मावशी, बहीण भाऊ, आत्या, भाची भाचा, नात नाती मित्र, आप्त स्वकीय आवडती व्यक्तींना शुभेच्छा, शुभ चिंतन शुभेच्छातात, खरं सर्व घरातील व्यक्ती चा आनंद गगनात मावेनासा होत असतो..एक्दमच आनंदाचाच संपूर्ण महिना भर असतो.
थोडयाच वेळाने नमाज ईशा व तारविह ची वेळ जवळ येते, बंधू नमाज च्या तय्यारी करून आपल्या जवळच्या किंवा आपल्या काम धंध्याच्या सोयीनुसार जात असतात.
महिला भोर पहाटे च्या रोझा ठेवण्या साठी अन्न ग्रहण करतात त्यास " सेहरी " म्हटलं जाते, त्या तय्यारी करतात...
अब्दुल्ला बिन उमर रजि. म्हणतात की, आम्हाला प्रेषित मुहम्मद स्व. नीं सांगितले की," तुम्ही चंद्र दर्शन बघून रमजान चे रोझा ( उपवास ) ठेवा व शेवटी चंद्र दर्शन करूनच रोझा ( उपवासाचे सांगता करा ' ( सहीह बुखारी शरीफ 1906).
ही अशीच दिनचर्या संपूर्ण रामजानुल मुबारक महिना भर चालू असते.. महिना भर अल्लाह ( परमेश्वर ) च दया व कृपा अखंड अद्वियपने अलौकिक अदृश्य पने सतत चालूच असते म्हणून या संधीचा प्रत्येक बंधू भगिनींनी फायदा घेऊन आपलं जीवन करणी लावणं आपल्याच हातात आहे...म्हणून उद्या पहिल्या रोझा व इतर सर्व संस्कारांचा जरूर फायदा उचलवा..
सर्वाना रामजानुल मुबारक च्या हार्दिक शुभेच्छा...
(कृपया :- मित्रांनो लेख आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवाव्यात.. आपल्या मित्रांना, नातेवाईकांना पाठवावे.)

=================================
-----------------------------------------------
लेखक :- डॉक्टर सलीम  सईदा सिकंदर शेख ✍️✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना 
श्रीरामपूर,
जिल्हा :- अहमदनगर 
9371640014.
-----------------------------------------------
=================================

( क्रमशः )

23-02-25 रविवार " विस्थापित झालेल्या असंख्य पीडित लोकांच्या उपजिवेकेसाठी पुनर्वसन होणे अंत्यन्त गरजेचे आहेत " विद्रोही अध्यक्ष डॉक्टर सलीम शेख...


श्रीरामपूर शहरात झालेल्या प्रशासनाच्या वतीने झालेल्या अतिक्रमण कारवाई मुळे श्रीरामपूर शहरांत अनेक कुटुंब विस्थापित झाले.. त्यातील दोन व्यापारी यांचे मानसिक धक्याने हृदय विकाराने निधन झाले..
विस्थापित झालेल्या अनेक कुटुंबाचे दोन वेळा अन्न चे ही पंचायत झालेली आहेत.. अशा अनेक विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे यासाठी उपोषणास बसलेल्या अनेक कुटुंबानापाठिंबा म्हणून " श्रीरामपूर विद्रोही सांस्कृतिक चळवळ श्रीरामपूर शाखे" च्या वतीने रविवार 23-02-2025 रोजी उपोषण स्तळी भेट दिली.. काही प्रकृती अस्तव्यस्त झालेल्या महिलांना व बंधूना श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात उचलून ऍम्ब्युलन्स मध्ये पाठवण्यात मदत करण्यात आली..
सहभागी शिस्तमंडळात विद्रोही श्रीरामपूर चे अध्यक्ष डॉक्टर सलीम सिकंदर शेख, सचिव अशोकराव दिवे सर, संघटक अमोल सोनवणे, कार्य अध्यक्ष अकबर भाई शेख, व कार्यकर्ते उपस्थित होते, सर्व सहभागी सदस्यांनी शासनाने विस्थापित कुटुंबाना पूर्णवसन करावे यासाठी करण्यासाठी जाहीर पाठिंबा व्यक्त केला 
==================================
-----------------------------------------------

डॉ, सलीम सिकंदर शेख ✍️✅🇮🇳...
बैतुशशिफा दवाखाना मिल्लतनगर श्रीरामपूर 
+९१९२७१६४००१४
-----------------------------------------------
=================================



Wednesday, February 26, 2025

दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ.वंदनाताई मुरकुटेंचा सहभाग


दिल्लीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ.वंदनाताई मुरकुटेंचा सहभाग 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 देशाची राजधानी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती व साहित्यिका डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी सहभागी होऊन श्रीरामपूरचा ठसा साहित्य संमेलनातही उमटविला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांना भेटून त्यांनी ‘योगीराज गंगागिरी ते सद्गुगुरु नारायणगिरी’ महाराज हे स्वलिखित पुस्तक त्यांना भेट दिले.
   डॉ. वंदनाताई यांना साहित्य संमेलनात ‘विशेष निमंत्रित’ म्हणून निमंत्रित केले होते. डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापासून ते समारोपापर्यंतचे चर्चासत्र, कवी संमेलन, परिसंवाद आदी उपक्रमात सहभाग घेऊन स्वतःच्या कर्तुत्वाची झलक दाखवून श्रीरामपूरचे नाव शतगुणित केले.
   देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीअजित पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा उषा तांबे, सूत्रसंचालक समीरा गुजर, बीव्हीजे ग्रुपचे हणमंतराव गायकवाड, जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, पश्चिम बंगालच्या खासदार सागरीका घोष, संस्कृती प्रकाशनच्या सुनिताराजे पवार, काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम, निर्भीड पत्रकार संजय आवटे, रविंद्र शोभणे, गायिका मधुरा वेलणकर, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री उदय सामंत , संजय नहार व अनेक मान्यवरांच्या भेटी घेऊन साहित्य संवाद केला.
   संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.ताराबाई भवाळकर यांनी डॉ. वंदनाताई मुरकुटे यांच्या साहित्यकृतीचे कौतुक करून तरुणांनी लेखन व संशोधनात सहभागी झाले पाहिजे असे आवाहन केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग* ✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Sunday, February 23, 2025

सुफी साधू - संतांमुळे समता बंधू भावाचा विचार सर्व धर्मियांच्या मनात जागवला - ह.भ.प. धर्मकिर्ती महाराज सावित्री फातेमा सद्भावना मंचचे नगरमध्ये सर्वधर्मीय संमेलन संपन्न

सुफी साधू - संतांमुळे समता बंधू भावाचा विचार सर्व धर्मियांच्या मनात जागवला - ह.भ.प. धर्मकिर्ती महाराज 

सावित्री फातेमा सद्भावना मंचचे 
नगरमध्ये सर्वधर्मीय संमेलन संपन्न
   
- अह,नगर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
भारताची अडीच तीन हजार वर्षाची समतेची, एकोपाची, बंधू - भावाची इतकी चांगली परंपरा आहे की या देशाचा आदर जवळपास सर्व देशांनी घेतला आहे. महाराष्ट्राच्या एकोप्याचे वातावरण कधी बिघडू शकणार नाही या देशातील संतांनी प्रथम कोणाचा आदर्श घेतला असेल तर बाहेरून आलेल्या सुफी संतांचा आदर्श घेतला. त्यामुळे समता, बंधुभावाचा विचार सर्व धर्मीयांच्या मनात जागविला असे विचार परभणी येथील हभप धर्मकीर्ती महाराज यांनी व्यक्त केले.                                                                        अहिल्यानगर येथील सावित्री फातिमा सदभावना मंच आयोजित सर्वधर्मीय संमेलनात हभप धर्मकीर्ती महाराजांनी राजकारणी लोकांनी जे धर्मयुद्ध सुरू करून जाती-जातीत भांडणे लावण्याचे काम केले त्या विषयावर परखड प्रभावीपणे आपल्या खास शैलीत समाचार घेतला. 
सावित्री फातेमा सद्भावना मंचाच्या वतीने सर्व धर्मीय सदभावना संमेलनाचे सैनिक लोन नगर येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके, ज्येष्ठ कीर्तनकार पारनेर येथील ह.भ.प. सोपानकाका औटी महाराज, सत्यपाल महाराज शिरसोलीकर, परभणी येथील ह.भ. प. धर्मकीर्ती महाराज सावंत, पारनेर येथील भंते बाळासाहेब पातारे, जळगांव येथील मौलाना समी, प्रा. सौ.स्मिताताई पानसरे, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, बाळासाहेब मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाचे अध्यक्ष एडवोकेट संभाजी बोरुडे होते. 
सदर प्रसंगी सत्यपाल महाराज यांना राज्यपातळीच्या सद्भावना पुरस्काराने शाल सन्मानचिन्ह व ११ हजार रुपये रोख देऊन सन्मानित करण्यात आले.
हभप धर्मकीर्ती महाराज पुढे म्हणाले सुफींने अस्पृश्यांना जवळ केले, वर्ण व्यवस्था जातीव्यवस्था यावर प्रकाश टाकीत सर्व धर्मीयांना सामाजिक एकतेचा संदेश दिला.भागवत भक्ती धर्मा अगोदर सुफींचे आगमन होते. प्रचंड जातिवाद अस्पृश्यता परिस्थिती होती. अशावेळी सुफी साधुसतांनी  समता बंधू भावनेचा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत केला. जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज हे विठ्ठलाला मानतात तुकोबाराया हे सुफींना मानतात त्यांचे अभंगातून त्यांनी एक ओळ सांगितली त्याची लोककथा सांगून तुकाराम महाराजांची दिंडी एका मस्जिद मधे थांबली असता तेथील मुस्लिमांनी तुकाराम महाराजांना मस्जिदी मधे कीर्तन करण्यास सांगितले. त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले. अल्ला देवे, अल्ला दिलाये , अल्ला खिलाये अशी ओवी सांगितली हे एकेश्वर सांगणारे महत्त्व त्यांनी विशद केले.  
यावेळी खासदार निलेश लंके म्हणाले की समाजामध्ये  द्वेशाचे प्रमाण दिवसा दिवस वाढत चालले आहे.आजच्या परिस्थितीत सदभावनेच्या कार्यक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे. छत्रपतींच्या हिंदुत्वाची आज खरी गरज आहे. आज सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या संमेलनाची वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. आजच्या संमेलनाचे हेतू सर्वदूर घराघरात पोहोचायला हवे. त्यासाठी त्यांनीही असे संमेलन भविष्यात आयोजित करण्याचे माणस केले.
प्रास्ताविक करताना डॉ. रफिक सय्यद म्हणाले की भारतीय समाज अठरापगड जाती धर्मांचा समाज आहे. अर्थातच या समाजामध्ये परस्पर सदभावना सलोखा बंधुभाव अनिवार्य व परम महत्त्वाचा आहे. त्याशिवाय देशात शांती सुख-समृद्धी नांदणार नाही. सुदैवाने भारतासह महाराष्ट्राला व अहिल्यानगर (अहमदनगर)
 जिल्ह्याला सदभावनेचा महान वारसा लाभला आहे. येथील सुफी हजरत शाह शरीफ बाबां विषयी मालोजीराजे भोसले यांना परम आदर होता. म्हणूनच त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे अनुक्रमे शहाजी व शरीफ जी अशी ठेवली होती. आजही  शाहशरीफ बाब हे भोसले घराण्याचे श्रद्धास्थान आहे. श्रीगोंदाचे सुफी शेख मोहम्मद (रह.) संत शेख महंमद महाराज व संत तुकाराम महाराजांचे घनिष्ठ संबंध सर्वज्ञात आहेत. संत शेख मोहम्मद महाराज श्रीगोंदा आणि पंचकोशीतील लोकांचे श्रद्धास्थान आहे. सावित्रीबाई फुले आणि फातेमा शेख या शहरातील क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या विद्यार्थीनी आहेत. हाच परस्पर सदभावनेचा बंधुत्वाचा व प्रेमाचा वारसा जोपासण्यासाठी व आणखी वृद्धींगत करण्यासाठी सर्व धर्मीय सद्भावना संमेलन आयोजित केले आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी सत्यपाल महाराज म्हणाले की आज प्रत्येकाला जागरूक व्हावे लागेल. समाजातील सदभावनेसाठी काम करणारे लोकांनवर हल्ले होतात. कारण सदभावनेसाठी काम करणाऱ्यांच्या विचारांना त्यांना मारायचे आहे. पण विचार मरत नाही, ते अशा सद्भावना कार्यक्रमाद्वारे इतरांमध्ये पसरत असतात. माणसाला माणूस बनवण्याचा कारखाना सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाद्वारे तयार होत आहे असे सांगितले.
जळगांवहून आलेले मौलाना समी म्हणाले की युवा पिढीला दिशाभूल करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्या युवा पिढीला आपल्याला सत्यमार्ग दाखवावा लागेल. धर्म व इतिहासाचे विकृतीकरण पण थांबविण्याची आज अत्यंत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कॉम्रेड स्मिता पानसरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले सदभावना मंच हे सर्वांना एकत्र आणण्याचे काम करीत आहे. अस्वस्थ वर्तमान काळात राजरोसपणे धर्माचा आणि सत्तेचा वापर करून दहशत निर्माण करून जाती जाती तेढ निर्माण केली जात आहे. अशा वातावरणात न घाबरता हे संमेलन ठेवल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देत त्या म्हणाल्या प्रश्न संकटे आव्हानांची माहिती आहे, ती परतून लावण्यासाठी संघर्ष करून प्रश्न काय आहे त्याची वेळीच उत्तरे दिली तर ते सुटतात,त्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.सावित्री फातेमा सदभावना मंच यामधील एका शब्दाला अनेक जण विरोध करताना दिसतात सावित्रीच्या पुढे जर बहिणाबाई जनाबाई असे असते तर गजारावर झाला नसता, फातेमाला कथोकल्पित पात्र आहे हे कोणीतरी आणल आहे असा कांगावा केला जातो. बहुजनांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. धर्मसत्ता राजसत्ता हे काम करताना दिसत आहे. खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या माणसाच्या वतीने सर्वांचे आहे. फातिमा ही होतीच त्याचा इतिहास आहे, पुरावा आहे. सावित्रीमाईंनी महात्मा फुले यांना लिहिलेले पत्र आहे ते आजही पुरावा म्हणुन आहे. सावित्रीबाई या आजारी असताना शाळेची जबाबदारी फातेमा यांच्यावर सोपवण्यासाठी महात्मा फुलेंना पत्र लिहिले होते. ती जबाबदारी फातेमा यांनी पार पाडली असे असताना त्यांचें नाव कथाकल्पित आहे असे म्हणणे चुकीचे आहे. असे सांगितले. 
भंते बाळासाहेब पातोरे म्हणाले की राज्यघटना उध्वस्त करण्याचा काम सध्या होत आहे. त्याला वाचविण्याची गरज असून संविधानाने दिलेल्या अधिकाराची लोकांना जाणीव करून दिली पाहिजे. जेणेकरून लोक सरकारला जवाब विचारू शकते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ऍड. संभाजी बोरुडे म्हणाले की संविधानाला अपेक्षित असणाऱ्या भारताच्या निर्माण साठी सदभावना मंच प्रयत्नशील आहे. सदभावना असणारा हा जिल्हा असून येथे  शाहशरीफ दर्गा आहे. सावित्री फातिमाची शाळा आहे.अशा जिल्ह्यात सदभावनेसाठी काम करण्याची वेळ का आली, यावर विचार मंथन करावे लागेल. मानवता धर्म आज खतरयात आहे. जातीला महत्त्व दिले जात आहे. मूठभर लोक हे कार्य करत आहे व अडाणी व इतिहास भुगोल माहिती नसणारी माणसं त्यांच्या मागे जात आहे. ही फार दुर्दैवी बाब आहे. आजच्या या शिक्षित समाजात अशा भेदभाव करणारी प्रवृत्ती फोपावत आहे हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. व भविष्यात आम्ही सतत या मंचाद्वारे सद्भावनेचे कार्य चालू ठेवु अशी त्यांनी ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सावित्री फातिमा सद्भावना विचार मंचाचे एडवोकेट संभाजी बोरुडे, अशोक सब्बन, बाळासाहेब मिसाळ, संजय झिंजे, युनूसभाई तांबटकर, मुबीन खान, मेजर संजय वाघ,प्रतिक बारसे, फिरोज शेख, राजूभाई शेख, प्रा. डॉ. मेहबूब सय्यद, मुस्ताक सर तांबटकर, अब्दुल रहीम साहब, बापू चंदनशिवे, कादीर सर, जहीर सय्यद पत्रकार, मेजर रफीक, अश्फाक शेख, मुनाफ भाई, एड.आरिफ भाई, नदीम भाई, मुश्ताक भाई आदिंनी भरपूर परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक सब्बन यांनी केले. तर आभार प्रतिक बारसे यांनी मानले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*💐✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

बेलापूरात ५६८ घरकुलांना मंजुरीआणी पहिल्या हप्त्याचे वितरण घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

बेलापूरात ५६८ घरकुलांना मंजुरी
आणी पहिल्या हप्त्याचे वितरण  
                                                                       घरकुल लाभार्थ्यांचा मेळावा
 मोठ्या उत्साहात संपन्न

ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून घरकुलासाठी शेती महामंडळाची ३४ एकर जागा विनामूल्य मिळाल्याने प्रति घरकूल आर्धा गुंठा जागा मिळणार 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता...
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत तालुक्यातील बेलापूर बु - ऐनतपूर येथील ५६८ घरकुल लाभधारकांचा मेळावा बेलापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
या मेळाव्यास देशाचे गृहमंञी नाम.अमित शहा, राज्याचे मुख्यमंञी नाम. देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी व्हिडीओ संबोधित केले. याप्रसंगी बोलताना श्री.शरद नवले म्हणाले की,जिल्ह्याचे पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा. यांचेमुळे बेघरांचे स्वतःचे घराचे स्वप्न साकार होत आहे.नामदार श्री.विखे यांनी घरकुलासाठी शेती महामंडळाची एकर ३४ जमिन विनामूल्य दिली. तेथेच आता सदर लाभार्थींचे पुनर्वसन होवून त्यांचे स्वतःचे घराचे स्वप्न साकारणार आहे. रामगड येथील घरकुल वसाहतीचे राधाकृष्णनगर व गायकवाड वस्ती येथील घरकुल वसाहतीचे सुजयनगर असे नामकरण करणार असल्याचे श्री.नवले म्हणाले. कृषी उत्पन्न समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की, गावकरी मंडळाने कारभार हाती घेताना जी आश्वासने दिली ती यानिमित्ताने पूर्ण होत असल्याचा आनंद होत आहे.नाम.राधाकृष्ण विखे पा. यांचेमुळे बेलापूरला १२६ कोटींची पाणी पुरवठा योजना, ४३ एकर शेती महामंडळाची जागा मोफत मिळाली. त्यामुळेच ज्यांना स्वतःचे घर नाही त्यांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.
या घरकुल लाभार्थींना अर्धा गुंठा जागा दिली जाणार असून तेथे प्लॕन करुन रस्ते, पाणी,वीज अशा अद्ययावत सुविधा पुरविण्यात येवून सदरची घरकुल योजना राज्यात आदर्श ठरेल अशी असेल असे श्री.खंडागळे म्हणाले याप्रसंगी सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच प्रियंका कु-हे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे,भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी इस्माईल शेख,भास्करराव खंडागळे, विष्णुपंत डावरे, ज्ञानेश गवले,शफिक बागवान, बाळासाहेब दाणी, प्रभात कुऱ्हे,बाबुराव पवार,तस्वर बागवान, दादासाहेब कुताळ, महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर, शफिक शेख,गोपी दाणी, श्रीराम मोरे यांच्या सह घरकुल लाभार्थीं उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================


Saturday, February 22, 2025

मराठी भाषा गौरवदिनी सातारा जिल्ह्यातील साहित्यिकांचा सन्मान छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये

- सातारा - प्रतिनिधी -/ वार्ता -
येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळ व घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेजचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी कॉलेजच्या बॅरिस्टर पी.जी पाटील सभागृहात ‘मराठी भाषा गौरव दिन’ समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या समारंभात मान्यवर लेखकाचे व्याख्यान आयोजित केले असून मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या अग्रणी व घटक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला व भाषिक कौशल्याचा आविष्कार करण्यास संधी मिळण्यासाठी मराठी वक्तृत्व,रांगोळी,कविता रसग्रहण,पुस्तक परीक्षण, निबंध इत्यादी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय व छत्रपती शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी सहभागी होतील. या स्पर्धेत प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे,विद्यापीठाचे पदाधिकारी, प्रमुख अतिथी वक्ते यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

 मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून भाषा मंडळ व मराठी विभागाने सातारा जिल्ह्यातील साहित्यिक यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्याचे ठरविलेले आहे. तरी जे या समारंभास उपस्थित राहणार आहेत, अशा लेखक ,कवी यांनी भाषा मंडळाचे प्रभारी संचालक,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे मोबाईल नंबर ९८ ९० ७२ ६४ ४० यांचेकडे आपली नावे नोंदवावीत. तसेच आपल्या प्रकाशित ग्रंथ , कलाकृती यांची माहिती लेखी स्वरुपात द्यावी तसेच प्रकाशित ग्रंथ छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागात देण्यात यावे. मराठी भाषेतून ज्यांनी साहित्य ग्रंथ प्रकाशित केले त्याची नोंद मराठी विभागात ठेवली जाणार आहे. हे ग्रंथ विद्यार्थी व अभ्यासक यांना हे ग्रंथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे नोंदणी केलेल्या साहित्यिक यांनाच मराठी भाषा गौरव दिन समारंभात प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. भाषा मंडळ व मराठी विभाग यांनी मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी कोणकोणते उपक्रम व कार्यक्रम घ्यावेत यासाठी या साहित्यिकानी आपल्या सूचना लेखी स्वरुपात मराठी विभागात द्याव्यात असे आवाहन करण्यात आलेले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*✍️✅🇮🇳...
समता मीडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================