!!! "जो सर्वभौम शक्तीशाली असूनही बदल्याची भावना जोपासत नाहीं तोच खरा समर्थशाली " प्रेषित मुहम्मद स्व.....!!!
आज 20 रमजान, इस्लामी इतिहासातील सर्वात अतुलनीय अभूतपूर्व व आठवणीच्या हिंदोळ्यावरील...
म्हणजेच मदिना विजय... सार्वजनिक माफी चा दिवस.
.
हजरत मुहम्मद स्व. यांचा जन्म इसवी 570 मध्ये कुरेश काबील्यात झाला, सरासरी 1250 मैल लांब व 750 मैल रुंद असा सुमारे 10 लाख चौ. मैल अर्थातच 30 लाख चौ. किलोमीटर क्षेत्रफळाचा भुभाग त्यामध्ये 90% भाग हा वाळवंटाचा, भरातसारखीच तिन्ही बाजूने समुद्री किनारा, याच भागात एका पट्ट्यात सुपीक पट्टा अन याच पट्ट्यात पवित्र मक्का व मदिना ही शहरे, वाळवंटी भागामुळे येथील जीवन मान भटकंती चे होते, मेंढपाळ, व्यापार, लूटमार, हें येथील प्रमुख व्यवसाय, त्यातच येथे थोडयाशा गोष्टीं मधून रक्त रणजित संघर्ष, संपूर्ण पने अराजक्त परिस्थिती, चोरी डकैती, लूटमार, खून खराबी येथील रोजचाच, दारू, झुगार चुकीच्या रितिरिवाज , परंपरा चालीरिती वेगवेगळ्या, मुली स्त्री या फक्त्त भोगवीलासासाठी नाच गाणं, वेश्या व्यवसाय, जन्म झालेल्या मुलींना त्या जन्म दात्या मुलीचा बाप स्वतः त्या जिवंत मुलींना पुरीत होते एवढ्या अराजक्त परिस्थिती.. अशा परिस्थिती मध्ये अल्लाह नें 570 मध्ये हजरत मुहम्मद स्व. यांचा जन्म झाला, ते जसे जसे वाढत होते तसे तसेच अल्लाह ( परमेश्वर ) त्यांना विकसित करीत होते.. त्यांना वयाच्या चाळीसव्या (40) वर्षी.. पैगंबर -प्रेषित अर्थात अल्लाह चा संदेश जगात सर्व विश्वासाठी सर्व जाती धर्मासाठी सांगणारा (रहेंमतलील आलमीन )
म्हणून एका गार नावाच्या गुहेत जाहीर केलं.. तसें प्रेषित मुहम्मद स्व.लहानपणापासूनच पुरोगामी परिवर्तन वादी मताचेच होते, पैगंबर =(संदेशवाहक ) झाल्या नंतर त्यांच्या कामाने जास्त स्वरूपात परिवर्तन ला वेग आला, त्यांनी एकेश्वर वादाची अर्थात जगात एकच अल्लाह, ( परमेश्वर ) आहेत व अंतिम संदेश वाहक हें मुहम्मद स्व. आहेत म्हणून सर्व अरबी लोकांना संदेश देण्यासाठी सतत दिवस रात्री मेहनत घेत होते.. ही पुरोगामी परिवर्तन ची नांदी चाहूल होती यामुळे जुन्या सर्व प्रथा,रितरिवाज, परंपरा, पुरोहित वादी प्रथा बंद होऊन नवीन पुरोगामी पद्धत येऊन मानवी कल्याण होण्याची सुरुवात प्रेषित मुहम्मद स्व यांनी सुरुवात केली होती त्यामध्ये बरेच समविचारी मित्रांनी नवीन इस्लाम धर्म ही स्वीकारले होते व काही नवीन धर्म स्वीकारित होते.. ही परिवर्तनाची सुरुवात फार चांगल्या रीतीने पुढे पुढे जातं होती, कोणतेही परिवर्तन हें लवकर कधीच होत नसते ती हळू हळू निरंतर होणारी असतं व त्या मध्ये अगदीच टोकाचा विरोध होणं सहजकीच असते, सहजासहजी कोणतं परिवर्तन होत नसते म्हणून तेथील तथाकठीत सरमजामशाही वादी मंडळी नें अतोनात विरोधाला सुरुवात केली, जागोजागी छळ, त्रास देत होते, मध्ये तीन वर्षे सर्व अरबी सरंमजाम शाही वादयानी तीन वर्षे आर्थिक सामाजिक बहिष्कार टाकून त्यांच्या व त्यांना त्यांना मानणाऱ्या मित्र च्या परिवाराला तीन वर्षे आर्थिक सामाजिक बहिष्काराणे खूप त्रास दिला गेला, त्या सर्वांनी अल्लाह च्या पुरोगामी परिवर्तन वादी धर्मा साठी अतोनात छळ 11 वर्षे सहन केलेत परुंतु त्रासाची सीमा ही जीवावर यण्याची वेळ आली प्रेषिताना जीवे मारण्याचा कट कारस्थान करण्यात आले शेवटी अल्लाह चा आदेशानुसार दिनांक 16 जुलै 622 रोजी मक्का सोडून मदिना येथे स्थलांनस्तर करण्यात आले.
मदिना व आसपासच्या हजारो किलोमीटर च्या परिसरात व जवळच असलेल्या आफ्रिकन देशा पर्यंत इस्लाम चा मानवता वादी प्रसार प्रचार जोरात होत होता व चालूच होता हें पुरोगामी परिवर्तन वादी पैगंबर व त्यांच्या सहकार्य यांच्या आचार विचार व जीवन शैली बघून हजारोच्या संख्येनें रोज च लोंढेचे लोंढे येऊन इस्लाम धर्म स्वीकारात होते. व इस्लाम स्वीकारलेल्या बंधूनची प्रगती व उन्नती उत्साह बघून तेथील त्या बंधूना ही मक्का वासिय त्रास देत होते, मधल्या काळात किरकोळ कारणावरून लढाया, रक्त रंजित खुनी संघर्ष हा सतत चालूच होता व काही प्रसिद्ध लढाया हीप्रसिद्ध झाल्या आहेत, हें फार अति प्रमाणात चाललं व झालं होतं. म्हणून याला कुठेतरी शांतता आली पाहिजे व आळा घातला पाहिजे, म्हणून यावर तोडगा म्हणजे परस्पर समझोता - तह - करण्याचा प्रयत्न झाला आणि तो " हुदैबिया " या गावात करण्यात आला, तो समझोता -तह "- सुलाह हुदैबिया " म्हणून जगतात प्रसिद्ध आहेत.
सुलाह -हुदैबिया तह समझोता ची मर्यादा 10 दहा वर्षाची ठेवण्यात आली होती, दोन्हीही बाजूच्या बऱ्याच अटी शर्ती ना मान्यता देण्यात आली होती, विरोधी मक्कावासिय गटांनें जास्त प्रमाणात जाचक अटी घातल्या होत्या, येवढ्या जाचक अटी असूनही प्रेषित मुहम्मद स्व यांनी शांततेसाठी - खून खराबा - अजून जास्त रक्त सांडू नाहीं म्हणून आपल्या सहकार्य यांच्या विरोधात ही मान्य केला. ( अटी शर्ती मोठया आहेत असो ).
थोडयाच दिवसात म्हणजे दोन अडीच वर्षांमध्येच मक्कावासियांनी शांतता करार समझोता उल्लंघन तोडण्याची सुरुवात केली. वारंवार या कराराचे उललंघन होत होते, न राहवून कुठ पर्यंत त्रास सहन करायचे म्हणून शेवटी पैगंबर प्रेषित मुहम्मद स्व. नी आपल्या दहा हजार योद्धा सहाबाना घेऊन मक्का कूच करण्याचा आदेश 23-डिसेंबर 629 व 10 रमजान o8 हिजरी.ला देवून दहा दिवसात कोणतीही खबर बात गुप्त ठेवता आपल्या ताफया सह 2 जानेवारी 630 रोजी हिजरी तारीख " 20 रमजान 08,"सकाळी सकाळी मक्का शहरात पोहचले हें बघून मक्कातील प्रत्येक नागरिक हें अचानक झालेलं चित्र बघून अक्षरशा भांबवला सैरा -वैरा पळत सुटला, कोणाला काही कळत होत नव्हतं, कारण हें मक्कावासियांना माहित होते, कीं,आपल्या पूर्वज आपल्या घरातील लोकांनी प्रेषित मुहम्मद स्व च्या अनुयायीना, मित्रांना किती अतोनात त्रास दिला छळ केला खुनी व रक्त रंजित संघर्ष केला याच जणींवेतून व आपण केलेल्या पापाची जाणीव असल्यामुळे जीव मुठीत घेऊन जीव वाचवीत होते लहान मोठे अगदीच धस्तावलेलं होते कारण इलाज काहीच नव्हता कारण आपण केलेल्या कृत्याना या जगात तरी माफी नाही व मिळणारच नव्हती व माफिच्या लायक ही नव्हतं..
कारण आज बदल्याचा दिवस होता, अतोनात यातना त्रास छळ ज्यांनी केला त्या सर्वाना शिक्षा करण्याचा दिवस होता.. बदला..
परुंतु झाले उलटे च, हो सहाबा (सहकारी)च्या विचार करण्यापाली कडे झाले.. होते..
एका युद्धात प्रेषित पैगंबर यांच्या आवडते चुलते हजरत हमजा रजि. जें प्रेषित यांना प्रत्येक गोष्टीमध्ये तन मन धन नें सहकार्य मदत करायचे त्या आवडत्या चुलते हजरत हमजा यांना युद्धात वीर गती नंतर मक्का सरदार अबू सुफियान ची पत्नी हिंदा नें हमजा रजि. चे काळीज काढून खाल्लं होतं व कानं कापून आपल्या गळ्यात माळ घातली होती. अशा कौर्य करणाऱ्याना माफी मिळणे तर अश्यक्यच होतं..
परुंतु झाले अगदीच उलटं पैगंबर यांनी सर्व मक्का वासियांना एका झटक्यात माफी देवून टाकलं -माफी -माफी -माफी..
ज्या चुलती हिंदा हिने आपल्या चुलते अबू हमजा रजि. यांचे काळीज खाल्लं व कानाचा गळ्यात हार घातला होता अशा क्रूर कामाजारणाऱ्या ला ही सरसकट माफी दिली.. मक्का विजय च्या दिवशी हिंदा आपली ओळख पटू नयेत म्हणून आपलं तोंड झाकून क्षमा दानात आली होती परंतु पैगंबर मुहम्मद यांनी तिला ओळखत आपल्या चुलत्याची आठवण काढून रडत रडत म्हणाले आज " हिंदा " आज तुलाही माफी माफी.
मक्के च्या काबागृहा जवळच घोषणा केली कीं " आज कोणावरही सूड उगवला जाणार नाहीं... कोणाची ही हत्या करण्यात येणार नाहीं..
कोणाचाही बदला घेण्यात येणार नाहीं.. जें आप आपल्या घरात लपून बसलेले आहेत त्यांना ही माफी देण्यात आली आहेत..
यावर अगोदर कुणाला ही विश्वास बसला नाहीं व बसत ही नव्हता कारण त्यांनी केलेल्या क्रूर कृत्याची शिक्षा ही फाशी कच होतं होती,...परुंतु झाले उलटंच...अपक्षे वेगळं...
आजच्या घडीला प्रेषित पैगंबर मुहम्मद स्व. यांच्या कडे लष्करी ताकत, सर्वभौम सत्ता - अफाट साम्राज्य - संपत्ती - सगळ्या गोष्टीनी युक्त होते त्यांना कोणीही रोखू शकत नव्हतं..
येवढ असूनही बदला घेण्याच्या बदल्यात आपल्या दुश्मनाना एवढे मोठ- मोठ्ठाले पपी कृत्याच्या बदल्यात माफ केलं... ती पण सार्वजनिक माफी...
तो दिवस होता 20 वां रमजान रोजा.. आणि 08 हिजरी.
इसवी सन होतं 2 जानेवारी 630...
आज ही 20 वां रोजा हिजरी 1446 वार शुक्रवार.. ईद चा दिवस.
पैगंबर मुहम्मद स्व. म्हणतात कीं, " जो: सर्व शक्ती शाली असूनही : बदल्याची भावना ठेवत नाहीं.. तोच खरा.. शक्तिशाली श्रद्धांवान ( बंधू ).. त्यालाच अल्लाह पसंद करतात.. अल्लाह ला माफ करणारे पसंद ( प्रिय ) आहेत..
(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या मित्र व नातेवाईकांना जरूर पाठवा.. प्रतिक्रिया अवश्य नोदवां..)
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(((*))) (((*)) (((*))) (((*))) (((*))) (((*))) (((*)))
लेखक डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल.. मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर
मोबाईल 9271640014...
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
(((*))) (((*)) (((*))) (((*))) (((*))) (((*))) (((*)))