! "लैलतुल कद्र - एहतेकाफ मानवी मुल्यं वृद्धिंगत करण्यासाठी "!
पवित्र कुरआन मध्ये अल्लाह सांगतात कीं, " (1),आम्ही या ( पवित्र कुरआन ) ला कद्र च्या पवित्र रात्रीतच अवतारीत केलं आहेत, (1),
(2) तुम्हाला काय माहित, कीं, त्या कद्र च्या रात्रीचे महत्व काय आहेत??(2),
(3) ती( एक )कद्र ची रात्र हजार महिन्यांन पेक्षा काही अधिक उत्तम आहेत.,(3),
(4), त्या रात्री असंख्य स्वर्ग इशदूत व ( प्रमुख स्वर्ग दूतां पैकी एक असलेले जिब्राईल अलै.) हे स्वर्ग दूत आपल्या पालनकर्त्याच्या आदेशानुसार प्रत्येक गोष्टीबाबतीतले आदेश घेऊन पृथ्वी तलावर उतरतात,(4),
(5) ते पहाट होयीपर्यंत ती संपूर्ण रात्रं शांतता व सुरक्षिततेची रात्रं आहेत... ( पवित्र कुरआन, पारा 30 वां, सुरह नं. 97, अल - कद्र आ. नं. 01 ते 05.संपूर्ण ).(5).
आज 21वां रोजा वीस रोजे पूर्ण होऊन शेवटच्या विभागाला( अशराह )अर्थातच "जहान्नम ( नरका)तील अग्नी पासून स्वरक्षण " म्हणून, त्यासाठीच कळत- नकळ केलेल्या चुकीच्या कामाची- कार्याची- चुकांची माफी मागून निष्कलंक होण्यासाठी रात्रंदिवस अल्लाह च्या दरबारात सतत माफी मागने.
सध्याच्या 21 रोजा ते 30 या दहा दिवसातील " विषम " ताक" "संख्या असलेल्या रात्री ना लैलतुल कद्र च्या" ताक "रात्री म्हणून संबोधित कारतात. लैल म्हणजेच पवित्र -शुभ -शुभ रात्री. या एका रात्री मध्ये आपण जेवढ्या प्रार्थना दुवा, नमाज कुरआन किंवा जें काही काही शुभ कामे करू त्या प्रत्येक शुभ कामाचे " किम्मत ही एक हजार महिन्यांच्या रात्री पेक्षा ही जास्त किमतीचे पुण्य, साबब.. मिळणार आहेत किंवा तुम्हीं तेवढी प्रार्थना नमाज इत्यादी अदा केल्या सारखं होईल.. म्हणून जगात श्रद्धांवान बंधू याच रात्रीचे वर्षे भर आतुरतेने वाट बघत असतात.
रमजान महिन्यात शेवटच्या विभागात अशराह मध्ये विसाव्या रोज्याच्या रात्री पासून लैलतल कद्र ची 21 वी विषम "ताक "रात्रं चालू होत असते त्यामध्ये संपूर्ण दहा दिवस 24 तास जगातील प्रत्येक मस्जिद मध्ये आप आपल्या मोहल्ला, गाव, गल्ली, शहरातील जबाबदार प्रमुख लोकं काही श्रद्धांवान बंधूना आग्रहाचे निमंत्रण देवून कोणाला दहा दिवसासाठी तर कुणाला आपल्या फुरसत च्या वेळे नुसार मस्जिदच्या एका कोपऱ्यात बसवून अल्लाहशी नतमस्तक होऊन 24 तास नामस्मरण करण्यासाठी विनंती करतात त्याला "एहतेकाफ " म्हणतात. जेवढ्या जास्त संख्येणे भाविक बसतील तेवढे चांगले असते.. संपूर्ण गाव मोहल्ला, गल्ली न बसू शकत नाहीं,तर ज्यांना नामस्मरण करण्यासाठी वेळ असेल अशा श्रद्धांवान बंधू ना बसून सर्वान तर्फे त्यांना सर्व जगाच्या शांततेसाठी- सुखरूप आरोग्य लाभावे, -सुख -समृद्धी लाभावी, या साठी प्रार्थना करण्यासाठी विनंती केली जाते.
वीस दिवसात आपण काहीच केले नाहीं आपण अपल्या रोजच्या संसरातच्याच फेऱ्यात अडकून पडलो होतो, म्हणून येणाऱ्या दहा दिवस बाकी आहेत संधी अजूनही आहेत म्हणून बाहेरील जगाचा राहाडा विसरून अल्लाह शी एकरूप होऊन, देहभान विसरून,अल्लाह च्या नामस्मरनात तल्लीन होऊन विलीन होणं. अगदी धायमोकलून रडून डोळ्यात पाणी आणून आपण कोणाला अजानतेपणी काही बोललो असेल, एखाद्याला वेडे वाकडे बोललो असेल, कुणाचे मन दुखावले असेल, अप शब्द बोलले असेल कळत- नकळत कोणाच्या भावना दुखावल्या असेल, किंवा स्वतः मध्ये अहंकार शिरला असेल, काही कधी कधी लयी गर्व झालेला असेल तर त्वरित अल्लाह जवळ लवकरच माफी मागा.. माफ करणारा फक्त्त व फक्त्त अल्लाह च आहेत..
अहंकारा मुळे आयुष्यात खूप काही गडबडी होतात.. सगळे काही संपून जातोय.. नांव गाव इज्जत पैसा प्रॉपर्टी संपत्ती. काहीच शिल्लक राहत नाहीं म्हणून..
प्रेषित मुहम्मद स्व. सांगतात कीं, " ज्या व्यक्तीच्या मानत तिळमात्र देखील अहंकार, मी, गर्व आहेत, असेल, तर, अशा व्यक्ती स्वर्गात कधी जाणार नाहीं ".
पुन्हा, प्रेषित मुहम्मद स्व. म्हणतात कीं, " अल्लाह हें सुंदर आहेत अल्लाह ला सौंदर्य आवडते. अहंकार हा सत्याला नाकारतो आणि दुसऱ्याला तुच्छ समजतो, " ( हदीस इब्न मसउद, मुस्लिम शरीफ ).
म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार बाळगू नये, आपल्या मध्ये आलेला " मी "अहंकार आपल्या उन्नती साठी बाधा ठरतो, आयुष्याच्या प्रगतीला अडचणीत आनीत असतो, आपल्या आयुष्यात जागोजागी गडबड करीत असतो म्हाणून अहंकाराला संपूर्ण पने घालवण्यासाठी आपल्या व्यस्त जीवनाचा काही वेळ काढून एका जागी शांत बसून अल्लाह शी समर्पण समरप्रीत निर्वीकार होऊन एकरूप होऊन दुवा प्रार्थना जरूर करावी आपल्या अंतर्गत अंतर्मणातील दडलेल्या प्रत्येक पापाची, दुषकृत्या व केलेल्या चुकांची लिन होऊनमनमोकळे जस खास मित्रां बरोबर जशा सगळ्या मनातील गोष्टी बिनंधास्त बोलतोय बिनधास्त सांगतोय अगदीच त्याच प्रमाणे आरे -कारे च्या स्वरूपात अल्लाह जवळ व्यक्त होऊन माफी मागणं -रित्या करणे -व्यक्त होणं, रडून अगदीच धाय मोकळून रडू रडून वारंवार मागणं.. अल्लाह ला राजी करणे हेच महत्वाचं असतं...
शास्र -सायंटिस्ट सांगतात कीं जेव्हा आपण आपल्या अंतर मनातील सर्व विसरून हात वर करूनतन मनाने जोर जोराने बोलत असतो त्याला सेल्फ सममोहंन - स्वतःच स्वतः ला सममोहित करीत असतो, अर्थात आपल्या मनातील चुकीचं विचार गोष्टी= नेगेटिव्ह एनर्जी,),(- ve)गोष्टी घालवून (पॉसिटीव्ह) सकारात्मक एनर्जी विचारामध्ये परवार्तीत ( ट्रांसफर ) होत असतात. मन मोकळे होऊन मनुष्य ताजातावन होत असतो. एका प्रकारे नवीनच ऊर्जा प्राप्त झाल्या सारखं होऊन मनुष्य मोकळा होतो.. मोकळं झालं सारखं होतं मनातील अपराधी पानाची भावना एकदा ची कमी होते.अशा मुळे नकारत्मक विचाराचे सकारात्मक विचारात परिवर्तन होतं आणि हेच साध्य करायचं असतं आणि हेच साध्य होतं.
यातूनच आपल्यातील लोकं कल्यानासाठी मानवी मूल्य वृद्धगत जरूर होतील,
म्हणून या दहा दिवसाच्या लैलतल कद्र च्या रात्रीचा जरूर फायदा उचला..
(मित्रांनो लेख आवडला तर मित्रांना नातेवाईकांना जरूर पाठवा.. प्रतिक्रिया अवश्य नोंदवा )
(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
लेखक डॉक्टर सलीम साईदा सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल, मिल्लतनगर,✍️✅🇮🇳...
श्रीरामपूर, जिल्हा :- अहमदनगर.
, मोबाईल नं. 9271640014👍
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))(((*)))
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷