राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, April 2, 2025

श्रीरामपूर - नगरपरिषद समोरील होत असलेलं बे मुद्दत आंदोलन स्थागित...

श्रीरामपूर नगरपालिका समोर सुरू असलेले धरणे आंदोलन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर व मुख्याधिकारी गणेश घोलप यांच्या मध्यस्थीने स्थगित...

सफाई कामगारांच्या वारसांना लाड - पागे समितीच्या शिफारशीनुसार सेवेत कायम करावे या मागणीसाठी श्रीरामपूर नगरपालिका समोर धरणे आंदोलन सुरू


सफाई कामगारांच्या वारसांना लाड - पागे समितीच्या शिफारशीनुसार सेवेत कायम करावे या मागणीसाठी श्रीरामपूर नगरपालिका समोर धरणे आंदोलन सुरू 

नगरपालिका सफाई कर्मचारी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील - भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 श्रीरामपूर नगरपालिका आरोग्य विभागातील आस्थापनेवरील कायम रिक्त पदावरील सफाई कामगारांच्या वारसांना लाड - पागे समितीच्या शिफारशीनुसार सेवेत कायम करावे या मागणीसाठी अहिल्यानगर जिल्हा नगरपालिका कामगार कर्मचारी यांच्या वतीने कॉ. जीवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर नगरपालिके समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 
  लाड - पागे समितीच्या शिफारशीनुसार कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्याची पद्धत गेली अनेक वर्ष सुरू असून शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने लाड -पागे समितीच्या शिफारसीच्या अनुषंगाने सफाई कामगारांचे वारसा हक्काच्या अंमलबजावणी बाबत २४ फेब्रुवारी २०२३ शासन निर्णय निर्गमित केला आहे तरी शासन निर्णयाच्या अनुषंगाने उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी नगर यांनीही ८ जानेवारी २०२५ रोजी या शासन निर्णयाची तातडीने काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश दिलेले आहे तरीही श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाकडून सदर कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असल्याने तसेच कोर्ट आदेशाचे पालन होत नसल्याने धरणे आंदोलन सुरू असून या बेमुदत आंदोलनासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांनी आंदोलन कर्ते यांची भेट घेऊन आपल्या कामगारांच्या प्रश्नाबाबत प्रयत्नशील असून पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा विनिमय करून येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. तसेच कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी भाजपाचे मारुती बिंगले आपल्यासाठी सदैव प्रयत्नशील होते व आहेत. त्यांच्याच पाठपुराव्यामुळे आपल्याला यश मिळालेले आहे तसेच तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे सार्थक झाले असल्याचे चित्र आज न्यायालयाच्या माध्यमातुन दिसत आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ दिनकर यांनी दिली. प्रसंगी शहराध्यक्ष मारुती बिंगले,बंडू कुमार शिंदे, हंसराज बत्रा, सतीश सौदागर, अक्षय गाडेकर, किराण कर्नावट, आनंद बुधेकर, महेश रुपेश हरकल, भैय्या भिसे, राहुल पांढरे, पूजाताई चव्हाण, पुष्पाताई हरदास, मिलिंद कुमार साळवे, गणेश करडे,विजय आखाडे आणि भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शेवटी बंडू कुमार शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई ✍️✅🇮🇳...
वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================