राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, May 3, 2025

सैनिक स्मारकासाठी भुखंड मंजूरनवनागापूरात उभारणार भव्य सैनिक स्मारक,वीर सैनिकांच्या शौर्याला सलाम


- अहिल्यानगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
वीर सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या अथक प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नवनागापूर ग्रामपंचायतीने संस्थेला सैनिक स्मारक उभारणीसाठी भूखंड मंजूर केला आहे. आज या भूखंडाची मोजणी नव नागापूरचे सरपंच डॉ. बबनराव दशरथ डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य सागर वसंतराव सप्रे, ग्रामसेवक ज्ञानदेव शिवाजी अडसुळे, इंजिनीयर किशोर पंढरीनाथ सप्रे, ग्रामपंचायत क्लर्क सचिन भगवान श्रीराम, पाणीपुरवठा क्लर्क प्रकाश बाप्पू गव्हाणे, पाणीपुरवठा कर्मचारी मुबारक सय्यद आणि वीर सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष माजी सैनिक बाबासाहेब बापूराव तेलोरे, उपाध्यक्ष लहू बन्सी सुलाखे, सचिव रावसाहेब किसन गोरे, संस्थेचे सल्लागार किसन सदाशिव कांबळे, संस्थेचे सर्व माजी सैनिक अनिल गुजर, संदीप हरिचंद्र शंकर भापकर, सुनील खाकाळ, बाबासाहेब रुपनर, पांडुरंग रोकडे, बाजीराव भालेराव यांच्या उत्साही उपस्थितीत पार पडली.
अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरणार असल्याने संस्थेच्या सदस्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे, याप्रसंगी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधानाची एक वेगळीच अनोखी चमक दिसत होती. हे सैनिक स्मारक केवळ माजी सैनिकांसाठी प्रेरणास्रोतच नव्हे तर स्थानिक लोकवस्तीलाही आपल्या शूर जवानांच्या बलिदानाची आठवण करून देईल आणि देशभक्तीची भावना जागृत ठेवेल, असा विश्वास संस्थेच्या सदस्यांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायतीने दाखवलेल्या या सहकार्यामुळे आता लवकरच स्मारकाच्या उभारणीचे काम सुरू होणार आहे. वीर सैनिक बहुउद्देशीय संस्थेचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे आणि नवनागापूरच्या इतिहासात एक सोनेरी पान म्हणून नोंदले जाईल.
या भूखंड मोजणीच्या वेळी वीर सैनिक बहुउद्देशी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सल्लागार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सरपंचांनी देखील या स्मारकाच्या उभारणीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

=========*मान्यवरांची मनोगते*=========
अनेक वर्षांच्या प्रयत्नांना यश आले याचा आनंद आहे. हे स्मारक केवळ एक इमारत नसेल, तर ते आपल्या शूरवीरांच्या त्याग आणि शौर्याचे प्रतीक असेल.
*अध्यक्ष तथा माजी सैनिक बाबासाहेब बापूराव तेलोरे*

=================================

ग्रामपंचायतीने दाखवलेल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत. या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल आणि देशसेवा करण्याची भावना त्यांच्या मनात रुजेल. *उपाध्यक्ष - लहू बन्सी सुलाखे*

=================================

संस्थेच्या सर्व सदस्यांच्या एकजुटीमुळे हे स्वप्न साकार होत आहे. लवकरच स्मारकाचे काम सुरू करून ते पूर्णत्वास नेऊ.*सचिव - रावसाहेब किसन गोरे*
=================================

हे स्मारक नवनागापूरच्या इतिहासात एक महत्त्वाचा landmark ठरेल. यामुळे गावाची ओळख आणखी वाढेल.- *सल्लागार , किसन सदाशिव कांबळे*

=================================

ग्रामपंचायत नेहमीच माजी सैनिकांच्या पाठीशी उभी आहे आणि राहील. या स्मारकाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य आम्ही देऊ. हे स्मारक आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असेल.
*डॉ. बबनराव दशरथ डोंगरे- सरपंच - नवनागापूर ग्रामपंचायत*
=================================
----------------------------------------------

*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111

----------------------------------------------
=================================

पी.ए.इनामदार स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज मध्ये महाराष्ट्र दिन साजरा


अ,नगर प्रतिनिधी - प्रतिनिधी -/ वार्ता -
इकरा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचालित पी.ए.इनामदार स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज गोविंदपुरा अहिल्यानगर येथे महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी झेंडावदनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळेस शाळेचे प्राचार्य, उपप्राचार्य व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
यावेळी प्राचार्य फिरोसअली यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आजच्या समाजात शिक्षणाच्या नवकल्पनां विषयी सखोल माहिती दिली. त्यांनी समाजासाठी उपयुक्त नवीन अभ्यासक्रम बाबत चर्चा केली, ज्यामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक विषयावर काम करण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत यांनी झाली. यावेळी ध्वजारोहण करण्यात आले आणि उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. उपप्राचार्या फरहाना शेख यांनी मुख्य पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अहमदनगर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

कु.फिजा सय्यद हिला पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान !


- अकोले - प्रतिनिधी -/ वार्ता -
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील आंतरराष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू कु. फिजा सय्यद हिला जिल्हा क्रीडा पुरस्कार महाराष्ट्र दिनी अहिल्यानगर येथे प्रदान करण्यात आला आहे.
        १ मे महाराष्ट्र दिनी अहिल्यानगर येथे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरगे आदी उपस्थित होते. सॉफ्टबॉल क्रीडा प्रकारात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन २०१९ - २० या वर्षीचा जिल्हा क्रीडा पुरस्कार कु.फिजा फत्तू सय्यद हिला घोषित केला आहे. त्याचे वितरण जिल्हा पोलीस ग्राउंड वरती करण्यात आले.
       
   कु.फिजा सय्यद ही सॉफ्टबॉल खेळाडू असून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा मध्ये उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. तिच्या कार्याचा गौरव म्हणून तीला हा पुरस्कार प्राप्त झाला असून तिचे या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार भाऊसाहेब वाकचौरे ✍️✅🇮🇳...
अकोले जि.अहिल्यानगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

आधार देऊनही लाभार्थी निराधारसंजय गांधी योजना,अनुदान देण्याचीसाऊ एकल महिला समितीची मागणी


आधार देऊनही लाभार्थी निराधार

संजय गांधी योजना,अनुदान देण्याची
साऊ एकल महिला समितीची मागणी 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
हयातीचे दाखले, आधार क्रमांक, बँक पासबुकच्या झेरॉक्स देऊन आधार सिडिंग केले तरी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत नाही. हे रखडलेले अनुदान तातडीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, अशी मागणी महाराष्ट्र साऊ एकल महिला समितीने केली आहे.
समितीचे राज्य समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे यांनी प्रलंबित अनुदानाबाबत श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. महाराष्ट्र सरकारने थेट लाभ हस्तांतरण (डी.बी.टी.) योजनेद्वारे संजय गांधी निराधार योजनेसह विविध सामाजिक अर्थ सहाय्य योजनांचा लाभ फेब्रुवारी २०२५ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना हयातीचे दाखले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसल्याबाबत महिला व बालविकास प्रकल्पाधिकाऱ्यांचे पत्र, लाभार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र, आधार क्रमांक, बँक पासबुकच्या झेरॉक्स सादर करण्यास तहसीलमधील संजय गांधी निराधार अनुदान योजना विभागातून सांगितले होते. अगोदरच आधार लिंक असलेले बँक खाते आधार सिडिंग करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर केली. आता कागदपत्रे सादर करून पाच ते सहा महिने होऊन गेली आहेत. काही लाभार्थ्यांनी एकदा नाही, तर अनेकदा कागदपत्रे जमा केली. पण गेल्या काही महिन्यांपासून अनुदान बँक खात्यात जमा होत नसल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत, याकडे मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे व बाळासाहेब जपे यांनी तहसीलदार वाघ यांचे लक्ष वेधले. त्यांनी याबाबत तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना संजय गांधी निराधार योजना अनुदान विभागाचे नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर यांना दिल्या आहेत.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

संजय गांधी निराधार योजना व इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे अनुदान जमा होत नाही, अशा लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करून बॅंक खाते आधार सिडिंग करून घेणे आवश्यक आहे. हयातीचा दाखला, अपडेट आधार व पासबुकची झेरॉक्स तहसील कार्यालयात जमा केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा करणे सोपे होईल. 
मिलिंदकुमार साळवे.
सदस्य मिशन वात्सल्य शासकीय समिती.

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

बँक खाते आधार सिडिंग करून हयातीचा दाखला, बँक पासबुक व आधारची झेरॉक्स, लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसल्याचे बालविकास प्रकल्पाधिकाऱ्यांचे पत्र व स्वयंघोषणापत्र अशी कागदपत्रे १ जानेवारीस जमा केली आहेत. त्याला चार महिने झाले. आठ महिन्यांपासून माझे अनुदान रखडले आहे.
मयुरी सूर्यकांत परदेशी,लाभार्थी, श्रीरामपूर.

±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±±

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

भूमी फौऊंडेशनचे पाचवे मराठी साहित्य व कविसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भूमी फौंडेशन,महाराष्ट्र राज्य सेवाभावी संस्थेचे पाचवे साहित्य व कविसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. भूमी फौऊंडेशन ही सामाजिक सेवाभावी संस्था गेल्या पाच वर्षापासून ०१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य संमेलन घेत असून यावर्षी दूरदर्शी पद्धतीने आयोजित केलेल्या या साहित्य व कविसंमेलनाचे उद्घाटन सा.आयुक्त महिला व बालकल्याण आयुक्तालय पुणे येथील अश्विनी कांबळे यांनी उद्घाटनपर भाषणात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. कैलास पवार व अध्यापिका सौ.अनिता पवार यांच्या अपूर्व योगदानाचे आणि शेतकरी मुलींच्या शिक्षणाची घेतलेली जबाबदारी, निवासी वसतिगृह, उपक्रम तसेच साहित्य संमेलनाचे आयोजन याबद्दल कौतुक केले. अध्यक्षस्थानी पुणे येथील भारतीय जैन संघटना वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड होते प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य टी. ई. शेळके, साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये होते. संयोजक डॉ.कैलास पवार यांनी स्वागत,प्रास्ताविक करून मान्यवरांची ओळख करून दिली.वाघोली पुणे येथील सावित्रीबाई मुलींचे निवासी वसतिगृहातील मुलींनी स्वागतगीत सादर केले. कु.शीतल बाळासाहेब म्हस्के या विद्यार्थिनीने महाराष्ट्र गीत सुंदर आवाजात सादर केले. साहित्यिका सौ.मीना गागरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन संपन्न संपन्न झाले. त्यामध्ये राज्य,देश आणि परदेशातून अनेक कविंनी भाग घेतला.प्राचार्य शेळके यांनी भूमी फौऊंडेशनच्या प्रारंभा पासूनच्या जलसंधारण, शेतशिवार उपक्रम, शैक्षणिक, सामाजिक कार्य सांगून साहित्य संमेलनाचे औचित्य याविषयी डॉ कैलास पवार यांचे कौतुक केले. डॉ.बाबुराव उपाध्ये म्हणाले, साहित्य म्हणजे समाजहित साधते ते लेखन असून कविसंमेलन ही मुक्त संवादाची कार्यशाळा आहे. भूमी फौऊंडेशन ही माणुसकी घडविणारी कार्यशाळा आहे,माणसांच्या उद्धाराचा सेवारथ चालविणारे डॉ. कैलास पवार आणि अध्यापिका अनिता पवार यांच्या समर्पित जीवनाचा हा सेवारथ पुढे जाण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले पाहिजे अशी भावना व्यक्त करून महाराष्ट्र माझा ही कविता सादर केली. साहित्यिका मीना गागरे यांनी मनोगत व्यक्त करून कविसंमेलनात ज्यांनी भाग घेतला त्यांचे क्रमांक घोषित केले. राज्यातून प्रथम क्रमांक नाशिक येथील डॉक्टर शिल्पा बोरकर व द्वितीय क्रमांक महांकाळ वाडगांव येथील चक्रनारायण किशोर आणि तृतीय क्रमांक हा वाघोली पुणे येथील किशोर पांचाळ यांनी पटकावला आहे.
सर्व क्रमांक प्राप्त कवींचे राज्यभरातून अभिनंदन होत आहे. 
क्रमांक प्राप्त कवींचा यथोचित असा सन्मान संस्थेच्या येणाऱ्या आगामी कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.यावेळी विवेक शिवणकर,प्रा.डॉ. यादव,धनराज वाळके, भीमराज बागुल व असंख्य सहभागी कवी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे✍️✅🇮🇳...
राज्य प्रसिद्धी प्रमुख-भूमि फौंडेशन (महाराष्ट्र राज्य)
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विकासाची गंगा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी जातनिहाय जनगणना- वाकचौरे


💐💐💐पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन💐💐💐
                                    
- अकोले - प्रतिनिधी -/ वार्ता -
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना चा निर्णय घेतला आहे, विकासाची गंगा शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय असून य आता जातीय जनगणना सुद्धा होणार आहे या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिनंदनास पात्र आहे असे मत भाजपा सोशल मीडिया सेल चे जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे पाटील व्यक्त केली आहे. 
              वाकचौर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, काँग्रेसने आजवर जातनिहाय जनगणनेला विरोधच केला आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आजवर योग्य पद्धतीने जातनिहाय जनगणना कधीच झाली नाही. २०१० मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी जातनिहाय जनगणने बाबत केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत विचार करू असे आश्वासन लोकसभेत दिले होते. त्या नंतर जातनिहाय जनगणनेसाठी मंत्रिमंडळ गटाची स्थापनाही करण्यात आली होती. मात्र या गटातील तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी २०११ मध्ये होणाऱ्या जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्यास विरोध केला होता. मनमोहन सिंग यांच्या काँग्रेस सरकारने जातनिहाय जनगणना प्रत्यक्षात कधीच केली नाही. काँग्रेस सरकारने सामाजिक -आर्थिक आणि जात गणना (एसईसीसी) केली. त्यासाठी ४८९३. ६० कोटी इतका खर्च केला. मात्र कोणत्या जातीचे लोकसंख्येतील प्रमाण किती आहे याची आकडेवारी जाहीरच केली नाही. या पाहणीच्या अहवालात विविध प्रकारच्या ८. १९ कोटी एवढ्या प्रचंड चुका होत्या. याचा अर्थ काँग्रेस सरकारने अनिच्छेने हि पाहणी अक्षरश: उरकली होती. मात्र काँग्रेस आणि काँग्रेसच्या इंडी आघाडीतील मित्र पक्षांनी या मुद्द्याचा वापर फक्त राजकीय स्वार्थासाठी केला. संविधानात जनगणना हा विषय केंद्रीय सूचित समाविष्ट करण्यात आला आहे. याचा अर्थ जन गणना या विषयाची जबाबदारी केंद्र सरकारचीच आहे. काही राज्य सरकारांनी जातींची पाहणी (सर्व्हे) केली आहे. ही पाहणी काही सरकारांनी योग्य पद्धतीने केली आहे, तर काही राज्य सरकारांनी राजकीय हेतूने अपारदर्शक पद्धतीने ही पाहणी केली. असे सर्व्हे समाजाची दिशाभूल करीत आहेत, जनतेत गैरसमज निर्माण करीत आहेत. मोदी सरकारने शास्त्रीय पद्धतीने ही जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून समाजात तणाव निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याची मोदी सरकारची भूमिका आहे. याच पद्धतीने मोदी सरकारने २०१९ मध्ये आर्थिक मागासलेपण लक्षात घेऊन आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय जनता पार्टीने आजवर जात निहाय जन गणनेला कधीच विरोध केला नाही. केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शाह यांनी जातनिहाय जनगणनेला भाजपाचा पाठिंबा आहे हे अनेकदा स्पष्ट केले आहे. जातनिहाय गणना व्हावी अशी भाजपाची भूमिका आहे. २०२१ मध्ये सार्वत्रिक जनगणना कोरोनामुळे होऊ शकली नव्हती. बिहारमध्ये जातनिहाय पाहणी करण्यास भाजपाने पाठिंबा दिला होता. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेसने आपली सत्ता असलेल्या राज्यात कधीच अशी पाहणी केली नाही. १९५१ ते २०११ या काळात जेवढ्या जनगणना झाल्या त्यात अनुसूचित जाती जमातींची आकडेवारी दिली गेली. मात्र ओबीसी समाजाची आकडेवारी कधीच दिली गेली नाही असे मत भाऊसाहेब वाकचौरे पाटील व्यक्त केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

हरेगांव फाटा पोलिस निवारा कक्ष या ठिकाणी १ मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशन अंकित तालुक्यातील हरेगांव फाटा येथील अशोकनगर पोलिस चौकी/ हरेगांव फाटा निवारा कक्ष या ठिकाणी १ मे महाराष्ट्र दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी पोलिस उपनिरीक्षक दादाभाई मगरे यांचे शुभहस्ते ध्वजारोहन करून मानवंदना देण्यात आली, प्रसंगी प्रा.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त शुभेच्छा व्यक्त करत उपस्थित मान्यवर यांना पुस्तके भेट देऊन कार्याचा गौरव केला. प्रसंगी पोलीस हवालदार संतोष परदेशी,पो.ना. किरण टेकाळे, पो.कॉ. वसिम इनामदार, प्रवीण कांबळे, गृह रक्षक दलाचे राजेंद्र देसाई, कवी आनंदा साळवे, निवृत्त मुख्याध्यापक नामदेव भालदंड सर, निवृत्त पोलीस अधिकारी वसंत पालवे, पोलीस मित्र गणेश गायकवाड, ह.भ.प. भानुदास महाराज खरात, हरेगाव फाटा मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय रुद्राक्षे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे राजेंद्र देसाई यांनी आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार राजेंद्र देसाई ✍️✅🇮🇳...
वडाळा महादेव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================