राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, May 10, 2025

रयतच्या "'विकासवर्धन"'वार्षिक अंकाचे प्रकाशन


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
रयत शिक्षण संस्थेच्या अहिल्यानगर येथील उत्तर विभागाच्या अहवालपर पहिल्या विकासवर्धन या वार्षिक अंकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते सातारा येथे नुकतेच संपन्न झाले.
 ९ मे २०२५ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी समारंभानिमित्त उत्तर विभागातील विविध शाळा, महाविद्यालयांची शैक्षणिक वाटचाल, गुणवत्ता विकास, विविध गुणवंतांचा सन्मान, शिष्यवृत्या, भौतिक सुविधा व अन्य विकासात्मक बाबींचा उल्लेख असलेल्या अहवालपर पहिल्या विकासवर्धन वार्षिक अंकाचे प्रकाशन पवारसाहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी या प्रकाशन समारंभास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हा. चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, आमदार दिलीप वळसे पाटील, उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, खासदार निलेश लंके, रामशेठ ठाकूर, मीनाताई जगधने, दादाभाऊ कळमकर, राहुल जगताप, सचिव विकास देशमुख, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव बी. एन. पवार, सहसचिव ऑडिट राजेंद्र मोरे, नवनाथ बोडखे आदी जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत विभागीय अधिकारी, संपादक नवनाथ बोडखे यांनी केले. यावेळी व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, आमदार आशुतोष काळे, मीनाताई जगधने, दादाभाऊ कळमकर, राहुल जगताप यांनी या अंकातील विकासात्मक व गुणात्मक बाबी, नवनवीन उपक्रम, प्रकल्प आणि कौशल्य विकास, शिष्यवृत्ती, क्रीडा स्पर्धा यांना नाविन्यपूर्ण बाबींचा उल्लेख करून कौतुक केले. विविध भौतिक व शैक्षणिक सुविधांची माहिती पालक व समाजापर्यंत पोहोचवावी हा या अंकाचा उद्देश आहे. अतिशय दर्जेदार लेखन, वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे आणि सांख्यिकी माहितीसह हा अंक अतिशय कमी कालावधीत पण खूपच दर्जेदार आणि वाचनीय झालेला आहे. संपादक मंडळाचे अध्यक्ष नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, गुणवत्ता कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर, गुणवत्ता कक्ष प्रमुख सुधीर साबळे आणि संपादक मंडळातील सर्व प्राचार्य, शिक्षक यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी परीक्षेत भक्ती भागवत शिंदे संस्थेत प्रथम


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीर विद्या प्रबोधिनी मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये संस्थेतून प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात स्व. सौ. एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर, श्रीरामपूर या शाळेतील भक्ती भागवत शिंदे हिने कर्मवीर विद्याप्रबोधिनी परीक्षेमध्ये इयत्ता सातवी मध्ये १०० पैकी ९२ गुण मिळवून रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान पटकावला. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यालयात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू व सध्या रयत शिक्षण संस्थेचे संघटक म्हणून कार्यरत असलेले डॉ.अनिल पाटील, संस्थेचे चेअरमन निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी,संस्थेचे सचिव निवृत्त आयएएस अधिकारी विकास देशमुख, व्हाईस चेअरमन भगीरथ काका शिंदे, सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते भक्तीचा सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला.
 खूप दिवसापासून आपल्या एखाद्या तरी मुलाने रयत शिक्षण संस्थेच्या कुठल्या ना कुठल्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवावा असे तिच्या पालकांचे स्वप्न होते. भक्तीच्या या यशाच्या रूपाने पालकांचे हे स्वप्न पूर्ण झाले. या यशामध्ये भक्ती सोबतच तिची आई अश्विनी आणि तिचे बाबा प्रा. डॉ‌ भागवत शिंदे यांचाही खूप मोलाचा वाटा राहिलेला आहे. 

या सत्कार प्रसंगी भक्तीचं हे नेत्रदीपक यश खरोखरच अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असून आशिया खंडामध्ये सर्वात मोठी संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या रयत शिक्षण संस्थेमधून प्रथम क्रमांक मिळवून गौरव प्राप्त करणं हे नक्कीच एका तेजस्वी भविष्याचं संकेत आहे,असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील दुरस्थ शिक्षण विभागाचे संचालक प्रा. डॉ. कृष्णा पाटील यांनी केले.
भक्तीच्या या उज्वल यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा.मीनाताई जगधने, मुख्याध्यापिका सौ. सोनाली पैठणे, वर्गशिक्षिका अनिता चेडे मॅडम, मुख्याध्यापक सुनील साळवे, प्राचार्य डॉ. मुकुंद पोंधे, प्राचार्य डॉ. प्रवीण बडदे, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर या सर्वांनी तिचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भक्तीच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे- शिरसगांव 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

खूप कष्टातून रुकसाना अखेरपुणे कारागृह पोलिस झाली💐💐💐


💐💐💐

- श्रीगोंदा - प्रतिनिधी -/ वार्ता -
मनात दुर्दम्य इच्छा शक्ती, जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असल्यास शिखर गाठता येते याचे ताजे उदाहरण म्हणजे गुंडेगाव येथील रुकसाना अशीर सय्यद हिची पुणे कारागृह पोलीसपदी निवड झाली आहे.
        रुकसाना ही नगर तालुक्यातील गुंडेगाव या छोट्याश्या गावात राहणारी सर्व साधारण कुटुंबातील मुलगी आहे, तीचे वडील खेड्या-पाड्यात जाऊन कुल्फी विक्री चा व्यवसाय करतात तर मोठे चूलते शकील सय्यद आणि छोटे चूलते समीर सय्यद या दोन्ही चुलत्यांचे तीला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
       दिड वर्षा पुर्वी रुकसाना चा इनामगांव येथील पिरजादे कुटुंबात विवाह झाला. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या रुकसानाला पती आणि सासू - सासऱ्याऱ्यांनी पाठबळ दिले.
      विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या पोलीस भरतीत काही गुणांनी तिची संधी हुकली होती. आहे. मात्र नुकत्याच झालेल्या कारागृह पोलीस परीक्षेत तिने यश संपादन करत पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
      तिची पुणे कारागृह येरवडा,पोलीस कर्मचारीपदी निवड झाली असली तरी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे स्वप्न असल्याचे रुकसाना ने बोलून दाखवले आहे.
       रुकसाना हिची पुणे कारागृह पोलीसपदी निवड झाल्या बद्दल गुंडेगाव व इनामगांव ग्रा.पं. सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ आदींनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार राजु शेख - श्रीगोंदा 
संपादक: श्रीगोंदा आवाज 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, May 9, 2025

चापडगाव विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम


चापडगाव विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

(भाग्यश्री पांडुरंग गोरे ७९.६३ गुणांसह द्वितीय)

- शेवगांव - प्रतिनिधी -/ वार्ता -
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेत शेवगांव तालुक्यातील एफ. डी. एल.शिक्षण संस्थेचे चापडगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९६.३८% तर कला शाखेचा निकाल ४७.५४ % इतका लागला आहे. बारावी विज्ञान शाखेचे एकूण ८३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते तर कला शाखेचे एकूण १२० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी कु. कोमल प्रजापती हिने ७१.३३ गुणासह प्रथम, प्राप्ती खताळ हिने ६८.८३ गुणासह द्वितीय तर सार्थक लांडगे याने ६८.६७ गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. 
तर कला शाखेमध्ये वैष्णवी गुंजाळ हीने ८५.८३ गुणासह प्रथम,भाग्यश्री गोरे ७९.६३ गुणासह द्वितीय तर भक्ती काळे हीने ७१,५० गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. कु. वैष्णवी गुंजाळ हीने अर्थशास्त्र या विषयात ९७ गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.चापडगांव कनिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवली. 
या गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना अध्यापन करणारे प्राध्यापकांचे कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड.विद्याधर काकडे , माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. डॉ. लक्ष्मणराव बिटाळ ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंहभैय्या काकडे , माध्यमिक शिक्षण विभाग प्रमुख श्रीमती वंदना पुजारी , सहप्रमुख अशोक आहेर , प्राचार्य अरुण वावरे, पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे सर्व प्राध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी वृंद , ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग गोरे - शेवगाव
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

💐💐💐💐💐💐💐💐💐
*वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !* 🌹
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

*ॲड. इंजि.मोहसिन शौकत शेख*
संचालक: समता कॉम्प्यूटर इन्स्टिट्यूट श्रीरामपूर यांना त्यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ आमच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा !

💐💐💐💐💐💐💐💐💐

*आप मुस्कूराऐं जींदगी मे इसितरहा* 
*हर घडी हर लमहा नयी खुशिया पाऐं !*

*अल्लाहकरे यह दिन आपके जींदगी मे*
*बार बार और कई हजार बार आऐं !!*

💐💐💐💐💐💐💐💐💐

येणाऱ्या भावी आयुष्यात आपणास सुखसमृद्धी, भरभराटी यासोबतच उत्तम आरोग्यदायी जीवन लाभो ही सदिच्छा !

*शुभेच्छूक*
समता फाऊंडेशन,श्रीरामपूर
सर्व पदाधिकारी आणी सदस्य 

💐💐💐💐💐💐💐💐💐

Tuesday, May 6, 2025

अपघातग्रस्तांना मदत करणे ही आपली नैतिक जबाबदारी


आजच्या धावपळीच्या युगात, आपण सर्वजण वेळेच्या एका कठोर चौकटीत अडकलेले आहोत. प्रत्येकालाच कुठे तरी पोहोचायचं आहे, काही तरी साध्य करायचं आहे. अशा वेळी रस्त्याने प्रवास करताना जर कुठे एखादा अपघात झालेला दिसला, तर बऱ्याच वेळा आपण केवळ पाहतो आणि पुढे निघून जातो. अपघातग्रस्त व्यक्ती मदतीसाठी हाका मारत असते, रक्ताच्या थारोळ्यात असते, श्वासोच्छ्वासासाठी धडपडत असते… पण आपण मात्र आपल्या "घाईच्या" कारणावर ठाम राहून मदत करण्याचे टाळतो. खरं पाहिलं तर ही परिस्थिती अत्यंत दुर्दैवी आणि समाजासाठी चिंताजनक आहे.
कारण आपल्या देशात अपघाताचे भयावह वास्तव आहे,भारतात दरवर्षी लाखो अपघात होतात. सरकारी आकडेवारीनुसार दर तासाला किमान १५ ते २० अपघात होतात, आणि त्यात अनेकजण आपला जीव गमावतात. यामध्ये बऱ्याच वेळा वेळेत मदत न मिळाल्यामुळे अपघातग्रस्ताचा मृत्यू देखील होतो. "गोल्डन अवर" नावाची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात ओळखली जाते, अपघात झाल्यानंतरचा पहिला एक तास अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात जर अपघातग्रस्ताला तात्काळ प्राथमिक उपचार आणि रुग्णालयात दाखल केले गेले, तर त्याचा जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. पण अनेक वेळा याच काळात मदत मिळत नाही आणि निष्पापास प्राण गमवावे लागतात.ही आजही समाजातील मोठी उदासीनता दिसून येते, जेव्हा आपण रस्त्यावर एखादा अपघात पाहतो, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया असते — "हे माझं काम नाही", "मला उशीर होईल", "पोलीस त्रास देतील", "आपण का अडकायचं?". ही मानसिकता आजच्या समाजात खोलवर रुजलेली आहे. काही लोकं तर फक्त मोबाईल काढून व्हिडीओ काढतात, समाजमाध्यमांवर टाकतात, पण प्रत्यक्ष मदतीसाठी पाऊल पुढे टाकत नाहीत. हा स्वार्थी आणि बिनधास्त दृष्टिकोन समाजाला एका गंभीर अधःपतनाच्या दिशेने घेऊन जातो. मात्र अपघातसमयी मदतीसाठी पुढे येणारे काही देवदूतही असतात,सुदैवाने, काही लोकं अशाही काळात माणुसकी जपत मदतीसाठी पुढे येतात. हे लोक खरंच देवदूतच असतात. पोलिस, आरटीओ अधिकारी, रिक्षाचालक, रस्त्यावरील दुकानदार, अगदी सामान्य नागरिकही अनेकदा अपघात पाहताच मदतीसाठी धाव घेतात, रुग्णवाहिका बोलावतात, प्राथमिक उपचार करतात, अपघातग्रस्ताला उचलून हॉस्पिटलमध्ये नेतात. अशा व्यक्तींनी अनेक वेळा अनेकांचे प्राण वाचवले आहेत. शिवाय अपघातसमयी मदत करणाऱ्या अशा मदतगारांना
घाबरण्याचे आता कारणही नाही याउलट त्यांना कायद्याने संरक्षण देखील आहे. पूर्वी लोक अपघातग्रस्तांना मदत करायला घाबरत असत कारण त्यांना पोलिसांचा त्रास होईल अशी भीती वाटायची. परंतु सन २०१६ पासून भारत सरकारने "गुड समरिटन लॉ" लागू केला. यानुसार, जो कोणी एखाद्या अपघातग्रस्ताला मदत करतो, त्याला कोणताही कायदेशीर त्रास दिला जाऊ शकत नाही. त्याला आपली ओळखही उघड करायची गरज नसते. अशा मदत करणाऱ्याला सरकारकडून प्रोत्साहन दिलं जातं. तरीही अनेक लोकांना या कायद्याची माहिती नसल्यामुळे ते मदतीपासून मागे राहतात.
मात्र अपघातग्रस्तांना मदत करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे, अपघातग्रस्ताला मदत करणे ही फक्त कायदेशीर किंवा सामाजिक जबाबदारी नसून ती एक नैतिक जबाबदारीही आहे. आज ज्याला मदतीची गरज आहे, तो उद्या आपणही असू शकतो. आपण जर आज मदत केली, तर भविष्यात आपल्यालाही कुणीतरी मदत करेल. "जेव्हाही शक्य होईल तेव्हा मदतीचा हात पुढे करा", ही शिकवण प्रत्येकाने मनात रुजवली पाहिजे.तथा अपघात प्रसंगी तात्काळ काय करावे? 
जर रस्त्यावर एखादा अपघात झाला असेल आणि आपण ते पाहिले, तर खालील गोष्टी तात्काळ कराव्यात. १)सुरक्षिततेची खात्री करा, आपले आणि अपघातग्रस्ताचे संरक्षण महत्त्वाचे आहे.२) रुग्णाची अवस्था पाहा, तो शुद्धीत आहे का, श्वास घेतोय का हे तपासा. ३) तात्काळ १०८ वर कॉल करा, आपत्कालीन (रुग्णवाहिका) सेवेला तत्काळ फोन करा.४) प्राथमिक उपचार करा, आपणास माहिती असल्यास, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी प्राथमिक उपचार करा.५) अपघातग्रस्तांचे मनोबल वाढवा,रुग्णाशी बोलून त्याचे मनोबल वाढवा. ६) रुग्णवाहिका येईपर्यंत सोबत रहा,रुग्णाला एकटं सोडू नका. ७) पोलीस मदतीसाठी संपर्क करा,अपघाताची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला द्या. यामुळे त्या अपघातग्रस्तांना मोठा आधार मिळून त्यांचे प्राण वाचविण्यास आपली मोठी मदत मिळेल.

*सामाजिक जागृतीची गरज*

आज समाजात अपघातांबाबत जागृती निर्माण करण्याची नितांत गरज आहे. शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, नागरिक मंडळे यांच्यामार्फत जनजागृती केली पाहिजे. "रस्ता सुरक्षा सप्ताह", "प्राथमिक उपचार कार्यशाळा", "गुड समरिटन कायद्याविषयी मार्गदर्शन" असे उपक्रम राबवून जनतेमध्ये सजगता निर्माण करणे आवश्यक आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात केंद्र आणी राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून आरटीओ व पोलिस अधिकारी यांचे द्वारे विविध शाळा,विद्यालय, महाविद्यालय,आणी चौकाचौकांमध्ये वाहतूक नियमांच्या जनजागृतीपर अपघातांविषयक तथा वाहतूक नियमांची जनजागृती केली जाते,परंतु जनसामान्यांचा त्यास अत्यल्प प्रतिसाद लाभतो ही शोकांतिका आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमांना केवळ वाहन चालकच नव्हेतर रस्त्यावर पायी चालणारे पादचारी आणी लहानपासून थोरांपर्यंत सर्वांनीच आवर्जून उपस्थिती दर्शविली पाहिजे.
काही प्रसंगसिद्ध उदाहरणे असेही आहेत की,काही घटनांमधून हे ठळकपणे दिसते की एका सामान्य नागरिकाच्या तात्काळ कृतीमुळे एखाद्याचा जीव वाचतो. पुण्यात एकदा एक तरुण दुचाकीवरून जाताना अपघात झाला आणि तो रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडला. एक रिक्षाचालक तिथे आला, त्याने कोणताही विचार न करता त्या तरुणाला रुग्णालयात नेले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचला. खरे तर हे रिक्षाचालक समाजाचे खरे हिरो आहेत.

*अपघात रोखण्यासाठी* *आपण काय करू शकतो?*

१) वाहन चालवताना वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करणे, वेगावर योग्य नियंत्रण ठेवावे,सिग्नल तोडू नये, हेल्मेट/सीट बेल्टचा वापरा करावा,२) शिस्तीत वाहन चालवा, वेगमर्यादा पाळा, मोबाईलचावापर टाळावा, ३) वाहनाची स्थिती तपासा,ब्रेक, टायर, लाईट्स यांची वेळोवेळी तपासणी करा.,४) रस्ता सुरक्षिततेबाबत इतरांना जागरूक करा.झोप येत असेल अथवा थकवा जाणवण असेल तर वाहन चालवू नये, योग्य आणी सुरक्षित जागा बघून थोडीशी विश्रांती घ्यावी,मगच वाहन चालवावे,वाहन चालवताना नेहमी स्वतःचा बचाव यासोबतच समोरच्याचा देखील बचाव करणे तीतकेच महत्त्वाचे असते.
"माणुसकी हाच खरा धर्म आहे" ही आपली भारतीय संस्कृती शिकवते. एखादा अपघातग्रस्त रस्त्यावर मदतीसाठी धडपडतो आणि आपण फक्त पाहत पुढे जातो, तर आपण एका माणसाला वाचवण्याची संधी गमावतो. आपले काही मिनिटे थांबणे, एक फोन करणे किंवा रुग्णवाहिकेची मदत मिळवून देणे,एवढंच केल्याने एखादा जीव वाचू शकतो.म्हणूनच, पुढच्या वेळी जेव्हा आपण रस्त्यावर एखादा अपघात पाहू, तेव्हा ‘मी का मदत करावी?’ असं न विचारता, ‘जर मी नाही मदत केली तर कोण करेल?’ असा विचार करूया. समाजात आपले योगदान हे अशा छोट्या पण प्रभावी कृतींमधूनच घडते.एकटे आपण संपूर्ण जग बदलू शकत नाही, पण कुणाच्यातरी संपूर्ण जगासाठी आपण फरक नक्कीच घडवू शकतो.

=================================
----------------------------------------------

*शब्दांकन: शौकतभाई शेख*✍️✅🇮🇳...
संस्थापक: समता फाऊंडेशन,श्रीरामपूर 
भ्रमणध्वनी: ९५६११७४१११
----------------------------------------------
=================================

Monday, May 5, 2025

दोन अपूर्ण व्यक्तींचे एकनिष्ठ होऊन जीवनात पूर्णतः आणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह होय - सुप्रिया लोहाळे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
दोन अपूर्ण व्यक्तींचे एकनिष्ठ होऊन जीवनात पूर्णतः आणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह होय असे प्रतिपादन सुप्रिया निमिष लोहाळे यांनी केले.

 आहिल्यानगर येथील उपदेशक साप्ताहिक आणि गोंधवणी येथील सेंट जॉन दि बाप्टिस्ट चर्च यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नुकतेच ख्रिस्ती वधू,वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले होते.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून सिने व मालिका दिग्दर्शक, लेखक निमिष लोहाळे लाभले होते.तर प्रमुख मार्गदर्शिका म्हणून सुप्रिया निमिष लोहाळे या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी मार्गदर्शनपर भाषणात अतिशय मौलिक विचार मांडून,इच्छुक वधू-वर व पालकांना संबोधित केले. दोन अपूर्ण व्यक्तींचे एकनिष्ठ होऊन जीवनात पूर्णतः आणण्याचा संकल्प म्हणजेच विवाह असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी साप्ताहिक उपदेशकचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेव्ह.डेव्हिड मेश्रामकर उपस्थित होते. तर संगीता गोडे, ॲड. प्रदिप सिंग, अविनाश काळे यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी सेंट जॉन बाप्टिस्ट चर्चचे सचिव उदयसेन राठोड,डी. जे.भांबळ, विजया जाधव, संतोष सगळगिळे, पास्टर अण्णासाहेब अमोलिक, सुभाष खरात, राजेश कर्डक, पीटर बनकर, अरुण मोहन, मोजेस चक्रनारायण, दिपक कदम, अमोल कदम, अजितकुमार सुडगे यांची उपस्थिती होती.
या उपक्रमासाठी विकास प्रभुणे, मिलिंद ठोकळ, बाळासाहेब कसबे,मकरंद चांदेकर,कार्तिकी चांदेकर, कविता गायकवाड, अनिल दुशिंग, मयूर अमोलिक, निखिल चांदेकर, सनी साळवे, जॉनी दिवे, यश पारखे, स्तवन प्रभूणे, प्रेम ठोकळ, राज ठोकळ, आंद्रेस यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास बीड, छत्रपती संभाजीनगर, कल्याण, पुणे, अहिल्यानगर, नाशिक, शेवगाव आदी ठिकाणाहून वधू, वर पालकांची उपस्थिती होती.
याप्रसंगी स्वादिष्ट भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीततेसाठी चर्च सचिव उदयसेन राठोड, सौरभ जाधव, रूपाली जाधव, ॲड. प्रदिप सिंग यांचे सहकार्य लाभले. राजेश्वर पारखे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रकाश लोखंडे यांनी आभार मानले. चर्चचे प्रमुख आचार्य रेव्ह.अनिल वंजारे यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व कार्यक्रमाच्या आयोजनात अविनाश काळे यांचा मोलाचा वाटा होता.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================