- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात विद्यालय व कन्या विद्यालयाच्या वतीने इयत्ता पाचवी वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवगतांचे स्वागत नुकतेच करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नालिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे हे उपस्थित होते. यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी केले. याप्रसंगी इयत्ता पाचवी वर्गामध्ये शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये प्रवेश घेणाऱ्या तसेच इतर वर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी भागवत थोरात, भाऊपाटील धावणे, अनिता लवांडे, मारिया गायकवाड, नरेंद्र ठाकरे, डॉ. शरद दुधाट, संजय ठाकरे, माधुरी वडघुले यांच्यासह पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य मेथवडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थी दशेतील आठवणी सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी सोहोनी यांनी केले तर शेवटी संगीता उगले यांनी आभार मानले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================