राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, June 19, 2025

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन

दरवर्षी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. या दिवशी योगाचे फायदे जगाला सांगितले जातात. योगाने केवळ शारीरिक आणि मानसिकच नाही तर आध्यात्मिक लाभही मिळतात. योग केवळ आपल्याला स्वतःशी जोडत नाही, तर निसर्गाशी आणि संपूर्ण मानवतेशीही जोडण्याचा मार्ग दाखवतो. आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे जगभरातील लोक योगाला ओळखू लागले आहेत आणि त्याचा फायदा घेत आहेत.
यावर्षी योग दिन २०२५ ची थीम 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' आहे. ही थीम पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी योगास प्रोत्साहन देण्यावर आधारित आहे. या थीमचा उद्देश वैयक्तिक आणि जागतिक आरोग्यामधील संबंध अधोरेखित करणे आहे. यासोबतच, पर्यावरण संतुलन आणि शाश्वत विकासात योगाची भूमिका देखील अधोरेखित करायची आहे.
योगाला वैयक्तिक आरोग्यासोबतच पृथ्वीच्या आरोग्यासाठीही आवश्यक मानले जावे. ही थीम पर्यावरण आणि वैयक्तिक जीवनातील संतुलनाला प्रोत्साहन देते.

=================================
-----------------------------------------------
*लेख विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
योग संस्था,कोपरगांव
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*लेख प्रसिद्ध सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Wednesday, June 18, 2025

*छत्रपती शिवाजी विद्यालयात* *नवगतांचे प्रवेशोत्सव उत्साहात*


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील वडाळा महादेव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात नवीन वर्षाची सुरुवात नवागतांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वाटप व गुणवंत विद्यार्थी सत्कार अशा त्रिवेणी संगमाने करण्यात आली. सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य सुधीर पाटील कसार हे होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानदेव माळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
 या कार्यक्रमासाठी थोर देणगीदार उद्धवराव पवार तथा आबा हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवागतांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी ते आठवीतील सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांना मिष्ठान्न देऊन करण्यात आली.
विद्यालयात एस.एस.सी. बोर्ड परीक्षा २०२५ मध्ये प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी स्मिता अशोक शिंगटे, रूपाली अशोक भोंडगे व तृष्णा सोमनाथ सोनवणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतातून सुधीर कसार यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक संतोष नेहुल यांची बदली झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बाळासाहेब कसार, शितल निंभोरे, स्वेजल रसाळ, संतोष नेहूल, उषा नाईक, दिपाली बच्छाव, अविनाश लाटे, सुहास पांडे, प्रशांत बांडे, संदीप जाधव व भास्कर शिंगटे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा कसार यांनी केले तर भास्कर सदगिर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, June 17, 2025

डॉ. श्रीकांत पाटील व वासुदेव सुरजुसे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,वरुड तालुकातर्फे अभिष्टचिंतन


डॉ. श्रीकांत पाटील व वासुदेव सुरजुसे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,वरुड तालुकातर्फे अभिष्टचिंतन

वरुड (जि.अमरावती) प्रतिनिधी :-
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार केंद्राचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील आणि नळ दयंमती मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार भारती मत्स्य सहकारी संस्था प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश प्रमुख वासुदेव सुरजुसे यांचा वाढदिवस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, वरुड तालुका यांच्या वतीने साजरा करण्यात आला.

या अभिष्टचिंतन सोहळ्यास पत्रकार संघाचे तालुकास्तरीय पदाधिकारी व विविध माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांचे अभिष्टचिंतन करण्यात आले 
डॉ. श्रीकांत पाटील यांचे शैक्षणिक व शासकीय कार्य क्षेत्रातील योगदान आणि वासुदेव सुरजुसे यांचे सहकारी व सामाजिक क्षेत्रातील कार्य हे प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, त्यांच्या कार्यात यश व आरोग्यसंपन्न आयुष्याची प्रार्थना करण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार प्रविण सावरकर ✍️✅🇮🇳...
 (वरुड जि.अमरावती)
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

विधी परिक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केल्याबद्दल कर्मयोगी प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांचा सन्मान व वृक्षारोपण


विधी परिक्षेत प्रथम श्रेणीत यश संपादन केल्याबद्दल कर्मयोगी प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांचा सन्मान व वृक्षारोपण 

- नगर - प्रतिनिधी -/ वार्ता -
नुकत्याच पार पडलेल्या विधी विभागाच्या परिक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याबद्दल कर्मयोगी प्रतिष्ठानतर्फे सदर उत्तीर्ण यशवंत विद्यार्थी - विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कर्मयोगी प्रतिष्ठान चे अध्यक्ष शफि जहागीरदार यांनी हजरत मिरावली पहाड येथे स्नेह भोजन आयोजित केले होते. शिक्षण आणि कामासोबत सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी या हेतूने सदर विद्यार्थ्यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. ऍड.सानिया नफिस चुडीवाला (एल एल बी) ऍड. अरीबा फ़ारुक शेख (एल एल बी) ऍड.नोमान अज़िम जहागीरदार ( एल एल बी) त्याचबरोबर १२ वी वाणिज्य विभागात, अहमदनगर महाविद्यालयात विशेष प्राविण्यासह प्रथम आलेली कु.निदा इकबाल चुडीवाला हिचा देखील सत्कार करण्यात आला तथा वृक्ष रोपे भेट देण्यात आली. 
याप्रसंगी शरद पवार होमिओपॅथिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रिज़वान अहमद, मिनर्व्हा इन्फ्राचे इंजि. अनिस शेख, नगरसेवक असिफ सुलतान, ज्येष्ठ विधीज्ञ फ़ारुक बिलाल, समाजसेवक नफ़िस चुडीवाला, जी.ए. एजन्सी चे अज़िम जहागीरदार, डॉ.रेश्मा रिज़वान, ऍड. साजिया सय्यद विशेष उपस्थितीत जोधपूर येथून आलेले हैदर अली आदी मान्यवर उपस्थित होते.
कर्मयोगी प्रतिष्ठानचे मार्गदर्शन सदस्य ज्येष्ठ त्वचारोग तज्ज्ञ डॉ. एम् के शेख यांनी सर्व यशवंताना पारितोषिक देऊन प्रोत्साहन दिले.
यावेळी विद्यार्थ्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्मयोगी प्रतिष्ठानचे माजी जिल्हा समाजकल्याण अधिकारी रफ़िक मुन्शी, पत्रकार मोहसीन बारुदवाले, डॉ.इमरान शेख, समिरखान यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

=================================
-----------------------------------------------
*वृत विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳....
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ. नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

सामाजिक चळवळ टिकली पाहिजे करीता सामाज कार्यास जरासा वेळ देणे आवश्यक - बालाजी सोनटक्के💐💐💐


<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
शिव,शाहु.फुले,आंबेडकर प्रबोधिनी समिती कडून सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान 💐💐💐
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
सामाजिक चळवळ टिकली पाहिजे करीता सामाजकार्यास जरासा वेळ देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे सामाजाची प्रगती ही केवळ सरकार किंवा काही नेत्यांच्या कार्यावर अवलंबून नसून, ती सर्वसामान्य नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आधारित असते. सामाजिक चळवळी हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असते. या चळवळी समाजात अन्याय, विषमता, भ्रष्टाचार, अज्ञान आणि रूढी परंपरांविरुद्ध आवाज उठवतात. पण या चळवळींचा प्रभाव टिकवायचा असेल, तर प्रत्येक समाजघटकाने आपली जबाबदारी ओळखून समाजासाठी थोडा वेळ द्यायला हवा.आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकजण "माझं काय जातंय?" या मानसिकतेत जगत आहेत. ही उदासीनता सामाजिक एकात्मतेला बाधा पोहोचवते. जर प्रत्येक व्यक्ती थोडा वेळ समाजहितासाठी खर्च करेल, तर अनेक समस्या निर्माण होण्याआधीच थांबवता येतील. युवकांनी समाजप्रश्न समजून घेतले पाहिजेत, महिलांनी हक्क आणि समानतेसाठी जागरूक राहिलं पाहिजे, आणि ज्येष्ठांनी आपला अनुभव नव्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. सामाजिक चळवळ ही टिकवण्यासाठी वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवून सामूहिक हितासाठी काम करणे आवश्यक आहे. अन्यथा समाज दिशाहीन होईल आणि त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. म्हणूनच, "समाजासाठी वेळ द्यावा, यातुन समाज घडवावा" ही आपली सामूहिक जबाबदारी आहे याकरीता शिव, शाहू,फुले, आंबेडकर प्रबोधन समितीद्वारे वैचारिक परिवर्तन चळवळ उभारली गेली असून राज्यभरातील विविध गांव शहरात याद्वारे सामाजहिताचे कार्य हाती घेण्यात आले आहे,त्याचाच एक भाग म्हणून शिव, शाहू, फुले, आंबेडकर प्रबोधन समितीच्यावतीने सामाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे श्रीरामपूर येथील बेलापूर रोडवरील यशोधन कार्यालयात शनिवार दि.१४ जुन २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिर्डी लोकसभा मतदारसंघ कार्याध्यक्ष अशोक (नाना) कानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास मा.बालाजी सोनटक्के साहेब (मा.सहा.आयुक्त,तपास अधिकारी विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर) व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.भास्कर लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती,

       शिव,शाहू,फुले आंबेडकर विचार प्रबोधिनी प्रबोधन व गौरव सोहळ्यात सर्वश्री शिवाजी गांगुर्डे, चांगदेव देवराय,समता फाऊंडेशन चे शौकतभाई शेख, कार्लस साठे,मेजर कृष्णा सरदार यांचा शाल फेटा, पुष्पगुच्छ आणी सन्मान चिन्ह (ट्रॉफी) देवून सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी मा.बालाजी सोनटक्के साहेब यांनी सामाजातील उणीवा आणी सामाज्याच्या आशा अपेक्षा आणी उपेक्षा यावर प्रकाश झोत टाकत संघटित राहण्याचे फायदे आणी विखुरले जाण्याचे नुकसान यावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच आदिवासी संघटनेचे नेते- शिवाजीराव गांगुर्डे,कार्लस साठे सर, मेजर कृष्णा सरदार, ऍड.मोहसीन शेख,अमोल शिरसाठ यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तर अशोक (नाना) कानडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सामाजिक चळवळ याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले.

     यावेळी अदिवासी समाजाची पहिली महिला वकील ऍड.प्रियंका शिवाजीराव गांगुर्डे व ऍड.संदेश दिलीप गांगुर्डे यांचा सत्कार करणेत आला.

         या भरगच्च कार्यक्रमास सर्वश्री नितीन शिंदे सरपंच, दादासाहेब कांबळे, सौ. मोहिनी खैरे, सौ.सोनाली देवराय,निलेश भालेराव, दिपक कदम, दिलीप शेंडे सर, सौ. सुनंदाताई शेंडे, अमोल शिरसाठ, राजेंद्र कोकणे, भाऊसाहेब गव्हाणे, बाळासाहेब सावंत, बंडोपत बोडखे, अर्जुन राऊत, मगर सर, बाळासाहेब गोळेकर, सुदाम मोरे, संजय दळवी, नामदेव कानडे, लक्ष्मण अभंग, नानासाहेब रेवाळे, सतीश बोर्डे, हरिभाऊ बनसोडे, राजेंद्र औताडे, अशिष शिंदे, कल्पेश माने, प्रतीक कांबळे, सम्राट माळवदे, रवि राजुळे, संतोष देवराय, राजू थोरात, संजय केदार, किशोर गाढे, सुभाष पोटे, अशोक खैरे, दिलीप अभंग,समता फाऊंडेशन चे ऍड.मोहसीन शेख, मुश्ताकभाई शेख,नदीम गुलाम, इब्राहीम बागवान सर,शेख फरजाना बाजी, सरताज शेख, ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे,राजू मोरे, प्रियंका गांगुर्डे, कलीम शेख, हारुन बागवान, छगन क्षिरसागर, किशोर सातपुते, भारत कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक दिनेश देवरे यांनी तर सूञ संचलन-दिलीप शेंडे सर यांनी केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग* ✍️✅🇮🇳...
पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस, 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, June 16, 2025

महावितरणच्या लेखी पत्रामुळे तोंडाला काळे फासणे आंदोलन स्थगित

- श्रीरामपूर -प्रतिनिधी -वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील व शहरातील सतत पंधरा ते वीस तास तसेच अधून मधून दोन दोन तास वीज पुरवठा खंडित होत होता त्यामुळे श्रीरामपूरातील वीज ग्राहकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत त्यामुळे रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी सर्व पक्षांच्या वतीने गंभीर इशारा तिला होता की 16जुन दुपारी तीन वाजता लोकमान्य टिळक वाचनालय आझाद मैदान या ठिकाणी आमदारांच्या उपस्थितीत होणाऱ्या महावितरणच्या आढावा बैठकीसाठी महावितरणच्या कार्यकारी अभियंता अजय भंगाळे तसेच उपकार्यकारी अभियंता प्रमोद केदारे तसेच त्यांचे अन्य अधिकारी त्या महावितरण च्या आढाव्या बैठकीसाठी येणार होते त्यामुळे श्रीरामपूरातील सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते हे महावितरणच्या अधिकाऱ्यांना सततचा होणारा वीजपुरवठा खंडित का होतो याचा जाब विचारून निषेध म्हणून अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार होते परंतु उपकार्यकारी अभियंता प्रमोद केदारे यांनी आंदोलन करताना येथून पुढे वीजपुरवठा खंडित न होता सुरळीत वीजपुरवठा चालू राहील त्याचबरोबर यदा कदाचित वीजपुरवठा खंडित झाला तर त्याची माहिती ज्या त्या भागातील वायरमन तसेचअधिकारी ग्राहकांना देतील तसे त्यांना आदेश दिले आहे म्हणून आपले होणारे आंदोलन स्थगित करावे असे त्यांनी लेखी पत्र रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन मर्चंड असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड अझर पठाण अरबाज पठाण यांना लेखी पत्र दिलत्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन तुर्तस्तगीत करण्यात आले आहे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

मावळ तालुक्यातील कुंडमाळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरचा जुना झालेला लोखंडी पूल कोसळला. त्यात अनेक जणं वाहून गेलेत आणि काही जणं मृत्युमुखी पडलेत.


वरील धक्कादायक घटनेत नक्की हानी किती झाली आहे याचा अंदाज आला नाहीये. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली.



हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला ? प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की, 'बचावकार्य वेगाने सुरु आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे...'
पण मुळात हा प्रसंग का येतो ? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा या घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळयाच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत, त्याची तपासणी, त्याची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही ? बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून कामं करून का घेता येत नाहीत ? आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग ?

पण लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा. अशा धोकादायक ठिकाणी जाताना, आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं. अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही. पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपणच सतर्क रहायला हवं. 

आत्ता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांत पाणी साठणं, रस्त्यांची चाळण होणं, पूल पाडणं अशा घटना सुरु झाल्यात. या सगळ्यात सरकारने आतातरी युद्धपातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल हे पहावं.

राज ठाकरे 

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================