राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, July 23, 2025

स्मृतीगंध ७९ रिवाइंड" सिताराम सारडा विद्यालयाच्या १९७९ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न


स्मृतीगंध ७९ रिवाइंड" सिताराम सारडा विद्यालयाच्या १९७९ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - वार्ता -
चार दशके उलटून गेली, आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटांवर, जबाबदाऱ्यांच्या गर्दीत हरवून गेलेले दहावी १९७९ च्या बॅचचे विद्यार्थी "स्मृतीगंध ७९ - रिवाइंड" या सुंदर स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले. हा केवळ एक कार्यक्रम नव्हे, तर शालेय आठवणींचा सुवर्णपुष्पगुच्छ ठरला.
शाळेतील काळ म्हणजे आपले जीवनातील सर्वात निरागस, निष्पाप आणि सुंदर क्षण. त्या दिवसात नक्की काय मिळालं हे लक्षात नसेल,पण "कोण" मिळालं हे मात्र कायम आठवतं, आणि हे "कोण" म्हणजे सर्व मित्र मैत्रिणी! हा दिवस हा फक्त भेटीगाठींचा नाही, तर त्या आठवणींना उजाळा देण्याचा, त्या जुन्या मैत्रीला नव्या उमेदीने पुन्हा जपण्याचा ! यांतील काहींनी मोठे यश मिळवले, काहींनी संघर्षातून विजय मिळवला, आणि काहींना आयुष्याच्या साधेपणात आनंद सापडला. पण या सर्वांचं मूळ एकच अहिल्यानगर शहरातील "सिताराम सारडा विद्यालय" आहे,असे प्रतिपादन भानुदास महानूर यांनी केले.

अहिल्यानगर येथील सिताराम सारडा विद्यालयाच्या १९७९ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा "स्मृतिगंध ७९ रिवाइंड" हा स्नेहमेळावा नुकताच कॅफे फरहत येथे मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल ४६ वर्षांनंतर ४५ जुने वर्गमित्र एकत्र आले. चार दशके उलटल्यानंतर पुन्हा एकदा जुन्या मित्रांना भेटण्याचा आणि संवाद साधण्याचा अनुभव सगळ्यांसाठीच भावुक आणि आनंददायक ठरला.
या अनोख्या भेटीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या सुवर्ण आठवणींना उजाळा देताना, शालेय किस्से, बालसुलभ खोड्या आणि जुन्या गोष्टी शेअर केल्या. काही सहभागी सदस्यांनी मराठी व हिंदी गीते, तसेच भावस्पर्शी गजल सादर करून वातावरण अधिकच उत्साही व भावनिक केले. या स्नेहमेळाव्याच्या आयोजनासाठी भानुदास महानूर, युनुसभाई तांबटकर, कृष्णा काळे,संपत पितळे, किरण सोनग्रा,नरेंद्र गोयल आणि परमानंद तलरेजा या जुन्या विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतल्या बद्दल त्यांच्या चमूचे सर्व विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्यामुळे हा क्षण अविस्मरणीय बनला आहे. जीवनात कितीही पुढं गेलो, तरी शाळेच्या आठवणी म्हणजे मनाच्या दालनात जपलेलं सोनं आहे.आणि त्या सोन्याला पुन्हा उजाळा मिळाला.
या मैत्रीचा गंध असा अखंड दरवळत राहो, आणि आपण दरवर्षी असंच पुन्हा भेटत राहो, हीच शुभेच्छा अनेक मित्रांनी एकमेकांचा निरोप घेतांना व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप होऊच नये असं वाटत असतांना संध्याकाळी ५.३० वाजता सर्वांनी जड अंतःकरणाने एकमेकांचा निरोप घेतला.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

बेलापूर महाविद्यालयात एकपेड माँ के नाम उपक्रम संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ' एक पेड माँ के नाम' हा उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेचा एक भाग म्हणून मंगळवार दिनांक २२ जुलै २०२५ रोजी या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करून बेलापूर परिसरात वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले . सद्यस्थितीत बदलत्या हवामान बदलाचा परिणाम सजीव सृष्टीसह अन्य क्षेत्रांवरही होत आहे. अशा स्थितीत वृक्ष लागवड महत्त्वाची मानली आहे. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. म्हणूनच एक पेड माँ के नाम हे राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सर्वांनी आईच्या सन्मानार्थ वृक्षारोपण केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम धिकारी प्रा. रूपाली उंडे यांनी केले. तर प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक थोरात यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Monday, July 21, 2025

एक पेड माँ के नाम संकल्पनेतून दुर्गादास शेगेकर यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भारतीय जनता पार्टीच्या "एक पेड माँ के नाम" या प्रेरणादायी संकल्पनेतून भाजप किसान मोर्चाचे वरुड (जि.अमरावती) शहर अध्यक्ष दुर्गादास शेगेकर यांचा वाढदिवस लहान न्यू इंग्लिश स्कूल, वरुड (जि.अमरावती) येथे अत्यंत अनोख्या आणि सामाजिक उपक्रमांनी भरलेल्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

या विशेष प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांच्या छोट्या हातांनी वृक्षारोपण करण्यात आले. "आईच्या नावे एक झाड" ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत उतरवून निसर्गसंवर्धनाचा महत्वाचा संदेश देण्यात आला. यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.

दुर्गादास शेगेकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने वाढदिवसाचे औचित्य समाजहिताच्या दिशेने वळवले. निसर्गरक्षण, शिक्षणप्रेम आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेला हा उपक्रम उपस्थितांनी विशेष उल्लेखनीय ठरवला.
कार्यक्रमाला प्रामुख्याने संजय उर्फ योगेश्वर खासबागे डॉ निलेश बेलसरे देवेन्द्र खेरडे मुरलीधर पवार राजु सुपले आकाश भोजने निलेश मानकर न्यु इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका कोमल पांडव व शाळेतील शिक्षकवृंद, पालक, भाजपा कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन योगेश्वर खासबागे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुरलीधर पवार यांनी केले.

=================================
-----------------------------------------------
*वृत विशेष सहयोग*
 पत्रकार प्रविण सावरकर ✍️✅🇮🇳...
 वरुड जि.अमरावती
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

वृक्षारोपण चळवळीस पालिकेचे नेहमी सहकार्य - मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप


मानवता संदेश फाउंडेशन व अहबाब - ए - मिल्लत ग्रुप तर्फे वृक्षारोपणाचा शुभारंभ

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
 पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे हरित श्रीरामपूर व सुंदर श्रीरामपूर चे स्वप्न साकार करण्यासाठी शहराचे विविध भागांमध्ये वृक्षारोपण चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिकेची नेहमी सहकार्य राहील, नागरिकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास किंवा दाखविल्यास त्या ठिकाणी वृक्षारोपण पालिकेतर्फे करण्यात येईल यासाठी शहरवासीयांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले.

    मानवता संदेश फाउंडेशन व अहेबाब ए मिल्लत ग्रुप तर्फे संघटनेचे अध्यक्ष तथा श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचे साठाव्या वाढदिवसानिमित्त साठ वृक्षांचे वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ मालेगांव महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.गणेश शिंदे, श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.मच्छिंद्र घोलप,श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे,मार्गदर्शक प्रदीप आहेर,नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख,राजे अलघ, श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अशोक उपाध्ये,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तौफिक शेख, सोहेल शेख, हाफिज अशपाक पठाण,आयाज तांबोळी, सर्वांचे वाढदिवस साजरे करणारे सर्वांचे मित्र लकी सेठी,शहर काजी मौलाना सय्यद अकबरअली, वृक्ष चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते डॉ.सलीम शेख, पेन्शनर शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष प्रकाश माने आदींच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मुख्याधिकारी घोलप बोलत होते.
ते पुढे म्हणाले की वृक्षारोपण हे एक सामाजिक कार्य समजून प्रत्येक नागरिकांनी वृक्षरोपणास प्रोत्साहन देण्याची गरज आहे.आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रत्येकाने वृक्षारोपण करावे पालिकेच्या संत गाडगेबाबा उद्यानामध्ये त्यासाठी मोफत रोपे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.याचा शहरवासीयांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
मागील वर्षी देखील मिल्लतनगर कालवा (कॅनल) साईडला ५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते, त्यापैकी ३५ झाडे आज जगली आहेत.या वृक्षांचे संगोपन होण्यासाठी वर्षभर झाडांची निगा राखून त्यांना पाणी देणारे तन्वीर शेख, खालील मोमीन, हाजी अनिस शेख,अन्वर टेलर आदींचा उपायुक्त शिंदे व मुख्याधिकारी घोलप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख यांनी वृक्षारोपण चळवळीसाठी मानवता संदेश फाउंडेशन व अहबाब ए मिल्लत ग्रुपने दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक करून भविष्यातही मिल्लतनगर भागामध्ये असेच सामाजिक कार्य सुरू ठेवावे त्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगितले.
मालेगांव महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी श्रीरामपूरचे मुख्याधिकारी असताना केलेल्या बहुमोल कामगिरीचा उल्लेख करून ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांनी त्यांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमास उपस्थित अहेबाब ए मिल्लत ग्रुपचे सदस्य सर्वश्री हाजी इमाम सय्यद सर,हाजी अनिस शेख सर,सज्जाद हुसेन नवाब, सलीम रसूल पटेल,रिटायर्ड पीएसआय जाबीरभाई सय्यद,पंचायत समितीचे साधन व्यक्ती शाहीन शेख सर,प्राध्यापक मोहम्मद उमर बागवान सर, या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे मानवता संदेश फाउंडेशनचे सर्वश्री तनवीरभाई शेख,खालीद मोमीन,बुरहानभाई जमादार, साजिद गुल मोहम्मद शेख, मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष जाकीर हुसेन सर,रज्जाकभाई पठाण, दीपक कदम, फिरोजखान पठाण सर, मोहम्मद आसिफ मुर्तुजा सर व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षांचे रोपण करण्यात आले. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुरहानभाई जमादार, तन्वीर शेख, खालीद मोमीन यांनी विशेष परिश्रम घेतले.डॉ. सलीम शेख यांनी सर्वांचे आभार मानले.
या वृक्षारोपण मोहिमेचा भाग म्हणून मिल्लतनगर पूल ते नवीन ठाकूर हॉस्पिटल पर्यंतच्या भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार सलीमखान✍️✅🇮🇳...
 पठाण (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

रेल्वे भुयारी मार्ग,रस्ता डांबरीकरण,सोलर वीज खांबांसाठी खासदार निधी मिळावा



 रियाजखान पठाण यांची खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

- श्रीरामपूर -  प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर येथील नगर पालिका हद्दीतील वॉर्ड क्रमांक २ गुलशन चौक ते वॉर्ड क्रमांक ४ बाल सुधार गृह (रिमांड होम) पर्येंत संगमनेर रोड ला जोडणारा रेल्वे अंडरग्राऊंड भुयारी पुल या प्रस्तावीत कामाची पाहणी करताना शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, रेल्वे पुणे विभागाचे मुख्य अभियंता देवेंद्र कुमार यांच्या समवेत श्रीरामपूर शहर काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष, नगर पालिका शिक्षण मंडळाचे माजी उप सभापती तथा हजरत सय्यदबाबा ऊर्स कमिटी चे अध्यक्ष रियाज खान पठाण, शाहरुख (बाबा) शेख आदि मान्यवर उपस्थित होते.



यावेळी रियाज खान पठाण यांनी खा.वाकचौरे यांचे कडे वॉर्ड क्र.२ गुलशन चौक ते वॉर्ड क्र. ४ बाल सुधार गृहापर्येंत संगमनेर रोड ला जोडणारा रेल्वे अंडरग्राऊंड भुयारी पुल तसेच वॉर्ड क्रमांक २ मधील मौलाना आझाद चौक ते बजरंग चौक पर्यंत रस्ता डांबरीकरण आणी प्रभाग क्र. १० व ११ मध्ये २५ ते ३० सोलर लाईट खांबे आदि विकास कामांसाठी खासदार निधी मिळावा अशा मागणीचे निवेदन त्यांना दिले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रियाजखान हबीबखान पठाण हे पुर्वीपासून कॉंगेसचे खंदे समर्थक आणी विश्वासू तथा एकनिष्ठ कार्यकर्ते असून आजवर त्यांनी प्रभागासह शहरातील विविध विकासकामांना मार्गी लावण्यात महत्वाची भुमिका बजावली आहे, आपल्या राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक आणी शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचे मोठे योगदान असुन तळागळातील उपेक्षित आणि दुर्लक्षीतांचे ज्वलंत प्रश्न यासोबतच जनसामान्यांचा विविध नागरी समस्यांचे निवारण यावर त्यांचे कटाक्षाने लक्ष असते, 

      मात्र दिवसेंदिवस शहराचा विकास होत असताना नवनव्या समस्या देखील निर्माण होत आहेत पैकी गुलशन चौक ते संगमनेर रोड पर्यंत रेल्वे अंडरग्राऊंड पुल होणे खुपच आवश्यक तथा गरजेचे आहे,
कारण या रस्त्यावर नेहमीच ये - जा करणाऱ्यांची मोठी वर्दळ असते, परिसरातील जनसामान्य नागरीक आणी शालेय विद्यार्थी याच रस्त्याने ये - जा करतात त्यात शुक्रवार हा आठवड्याचा बाजार असल्याने वॉर्ड क्रमांक २ तसेत मिल्लतनगर, रामनगर, आदी उपनगरातील नागरीकांना देखील शुक्रवार आठवडे बाजारात जाण्यासाठी याच रस्त्याने ये - जा करणे सोयीचे ठरते.
मात्र याठिकाणी रेल्वे अंडरग्राऊंड भुयारी पुल नसल्याने नागरीकांना रेल्वे रुळ ओलांडून ये - जा करावी लागते हे मोठे धोकादायक असल्याने कित्येकदा याठिकाणी अपघातात घडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.
शिवाय हा पुल झाल्यास सय्यद बाबा चौक रेल्वे अंडरग्राऊंड भुयारी पुलावरील वाहतूकीचे प्रमाणे देखील कमी होवून वाढत्या रहदारी आणी वर्दळीचा प्रश्न कायमचा निकाली निघू शकेल, करीता गुलशन चौक याठिकाणी रेल्वे अंडरग्राऊंड पुल होणे खुपच महत्वाचे तथा आवश्यक आहे.
तसेच वॉर्ड क्र.२ मौलाना आझाद चौक ते बजरंग चौक या प्रभाग क्र.१० व ११ मधील वॉर्ड क्र.२ चा मुख्य रस्ता समजला जाणाऱ्या रस्त्यावर गत १५ ते २० वर्षांपासून कोणतीच कामे झालेली नसल्याने या रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडले आहेत, या रस्त्यावर वाहन चालकांसोबत पादचाऱ्यांनाही अक्षरशः जीव मुठीत धरुन या रस्त्याने चालावे लागते, त्यात वीजेचा सततचा लपंडाव हा नेहमीच्या त्रासाचा विषय ठरल्याने प्रभाग क्र.१० व ११ मध्ये किमान २५ ते ३० सोलर लाईट खांबांची अत्यंत आवश्यक्ता असल्याने खासदार निधीद्वारे सदरील विकासकामांना तात्काळ निधी मिळावा अशी मागणीही रियाज खान पठाण यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, July 19, 2025

हिस्सार गणेश हत्याकांड घडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा भारतीय वाल्मिकी संघटनेच्या वतीने निषेध - तालेवर गोहेर

दोषींवर कडक कारवाई करण्याची 
भारतीय वाल्मिक संघटनेची मागणी 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता-
हिस्सार येथील गणेश हत्याकांड घडवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा अहिल्यानगर येथील वाल्मिकी समाजाच्या वतीने व भारतीय वाल्मिकी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
सविस्तर असे की,
दिनांक ७ जुलै २०२५ च्या रात्री हिस्सारमध्ये एक वाल्मिकी कुटुंब एका मुलाचा वाढदिवस साजरा करत होते. त्यावेळी एसएचओ आणि चौकीचे इतर कर्मचारी दारू पिऊन आले आणि त्यांनी कोणतीही माहिती न देता संपूर्ण कुटुंबाला लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीमुळे १६ वर्षीय मुलागा गणेश वाल्मिकी याचा जागीच मृत्यू झाला. मृत मुलाच्या कुटुंबातील भावाचीही प्रकृती गंभीर आहे. वडीलही तितकेच जखमी आहेत.आई, बहीण आणि घरातील सर्व महिलांवर अत्याचार करण्यात आला. एसएचओ आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांनाही मारहाण केली. तरीही गेल्या दहा दिवसांपासून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत मुलाचे अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत. आम्ही अहिल्या नगरच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांमार्फत सरकारला विनंती करतो की त्यांनी दोषी लोकांवर कारवाई करावी आणि वाल्मिकी समाजाला न्याय द्यावा. जर यावर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व सफाई कर्मचारी संपावर जाऊ, आम्ही साफसफाई थांबवू, हे किती दिवस चालेल हे माहित नाही. सदर कर्मचाऱ्याला अ‍ॅट्रॉसिटी कायदा दाखल करून निलंबित करा आणि शिक्षा करा. त्याला कामावर ठेवू नका, अशी मागणी भारतीय वाल्मिकी संघटनचे राष्ट्रीय अध्यक्ष तालेवर गोहेर व समस्त वाल्मिकी समाजाने निवेदनाद्वारे केली आहे. शासनाकडे न्यायाची याचना करत ,अन्याय करणाऱ्यांना योग्य ती शिक्षा कराल.अशी मागणी निवेदनाद्वारे निवासी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे केली आहे.
याप्रसंगी भारतीय वाल्मिकी संघटनचे राष्ट्राध्यक्ष तालेवर सेवकराम गोहेर,अमोल छजलाने, नरेश चव्हाण, राधेलाल नकवाल,आकाश कुडिया,अनिल तेजी, रवी मोरलरोशे, पत्रकार जहीर सय्यद, किशोर भगवाने, अनिल वाणे, नितेश निंदाने, राजेश बहोत, धीरज छजलाने, अर्जुन शेरगिल, सुरज झंगारे, ओंकार बनसोडे, सुर्दशन गोहेर, विक्रम चव्हाण सर, दीपक नकवाल, अनिल चंडाले, अशोक वाल्मिकी, गुलाबजी गोहेर,सोनु गोहेर,तुषार गोहेर आदी उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳 
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

पाट पाणी कालव्याच्या दोन्ही बाजूने आरक्षित असलेल्या जागेबाबत माहिती


भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतीसाठी पाण्याचे महत्व अमुल्य आहे. या आवश्यकतेमधूनच नदी- नाल्यांचे नियोजनबद्ध जलसंचयन करून शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पांची उभारणी झाली. पाटबंधारे खात्याच्या अंतर्गत असलेल्या मुख्य कालवा (Main Canal), उप कालवा (Branch Canal), पोट कालवा (Distributary / Minor), व चारी (Field Channel) यांच्या दोन्ही बाजूंना विशिष्ट अंतरापर्यंत जमीन ही सरकारी मालकीची व आरक्षित असते. या जागेचा उपयोग दुरुस्ती, देखभाल, विस्तार, सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत जलवाहिनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो.

या लेखात आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की, मुख्य कालवा, उप कालवा आणि पोट कालवा किंवा चारी यांच्या दोन्ही बाजूने किती मीटर व फूट जागा आरक्षित असते, आणि या जागेचा वापर कसा केला जातो तसेच त्याच्याशी संबंधित कायदेशीर बाबी काय आहेत.


१. मुख्य कालवा (Main Canal)

मुख्य कालवा हा जलवाहिनीचा सर्वात मोठा मार्ग असतो. तो थेट धरण किंवा जलसाठ्यापासून पाणी उचलून पुढील उप कालव्यांना पुरवतो.

मुख्य कालव्याच्या दोन्ही
 बाजूंनी आरक्षित जागा

*आरक्षित अंतर (दोन्ही बाजूंना)

४५ मीटर (सुमारे १५० फूट)
 पर्यंत जागा राखीव असते ?

एकूण रुंदी: ४५ मीटर डाव्या बाजूला + कालव्याची रुंदी + ४५ मीटर उजव्या बाजूला.

हे का गरजेचे?
यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या मदतीने
 देखभाल करणे.

आपत्कालीन गळती रोखण्यासाठी.

टंचाईत जलप्रवाह कमी-जास्त करण्यासाठी.

सांडपाण्याची गळती रोखणे.

कोणतीही खासगी बांधकामे थांबवणे.


२. उप कालवा (Branch Canal)

मुख्य कालव्यापासून पाणी वेगवेगळ्या दिशेने वळवण्यासाठी उपकालव्यांचा वापर होतो. हे माध्यमिक कालवे असतात.

*उप कालव्याच्या दोन्ही*
 *बाजूंना आरक्षित जागा:*

आरक्षित अंतर (दोन्ही बाजूंना)

१५ मीटर (सुमारे ५० फूट) राखीव.
एकूण रुंदी: १५ मीटर डावीकडे + कालव्याची रुंदी + १५ मीटर उजवीकडे.

हे का आवश्यक?
शेतकऱ्यांना पाणी योग्य वेळी मिळावे यासाठी नियंत्रण व्यवस्था.
देखभाल करणे सोपे होते.
गळती टाळता येते.
शेतात पाण्याचा न्याय्य वाटा देणे शक्य होते.

३. पोट कालवा किंवा चारी (Minor / Distributary / Field Channels)

पोट कालवे हे शेवटच्या टप्प्याचे कालवे असतात जे थेट शेतांपर्यंत पाणी पोहोचवतात. त्यांना स्थानिक भाषेत चारी असेही म्हणतात.

पोट कालव्याच्या दोन्ही
 बाजूंना आरक्षित जागा

आरक्षित अंतर (दोन्ही बाजूंना

२.२५ मीटर ते ३ मीटर (सुमारे ७.५ ते १०फूट) पर्यंत राखीव.

एकूण रुंदी: २.२५ मीटर डावीकडे + कालव्याची रुंदी + २.२५ मीटर उजवीकडे.

*हे का गरजेचे?*

शेतीसाठी पाणी योग्य प्रमाणात पोहोचते.

पाण्याचा अपव्यय टाळता येतो.

शेतीसाठी फेरफार किंवा सुधारणा करणे सुलभ होते.

शेतकरी संघटनांना देखभाल करता येते.

४. आरक्षित जागेचा उपयोग

या जागेचा उपयोग खालील बाबींकरिता केला जातो:

१. कालव्याची देखभाल, दुरुस्ती व रुंदीकरण.


२. वाहतूक (वाहने, यंत्रसामग्री) सुलभ होण्यासाठी रस्ता तयार करणे.


३. गस्त व जलसंवर्धनाची निरीक्षणे.


४. जमीनीची मोजणी, विद्युत वाहिन्या, पंपिंग सेटसाठी व्यवस्था.


५. आपत्कालीन परिस्थितीत प्रवेश व जलप्रवाह नियंत्रण.


५. कायदेशीर अटी व नियम
पाटबंधारे विभागाचे अधिकार

भारतीय पाटबंधारे कायदा, १८७६ / महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ नुसार ही जागा शासनाची मालकीची असते.

कोणतीही अतिक्रमण (घर, कुंपण, शेती, झोपडपट्टी) बेकायदेशीर मानले जाते.

कालव्याच्या आरक्षित जागेत बांधकाम केल्यास ती काढून टाकण्याचा अधिकार पाटबंधारे विभागास असतो.

कलम ६६ अंतर्गत, कोणतीही व्यक्ती कालव्यातून पाणी वळवणे, अडथळा आणणे, किंवा संरचनेचे नुकसान करणे गुन्हा ठरतो.

*६. अतिक्रमण व त्याचे परिणाम*

*अतिक्रमण झाल्यास*

कालव्याचे रुंदीकरण किंवा
 दुरुस्ती शक्य होत नाही.

गळतीमुळे पाण्याची नासाडी होते.

शेवटच्या टप्प्याच्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.

पूर परिस्थिती निर्माण होते.

प्रशासनास वेळोवेळी निर्गम नोटीस काढावी लागते.

काही प्रकरणांमध्ये पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढले जाते.

७. जनजागृतीची गरज

स्थानिक नागरिकांना कालव्याच्या आरक्षित जागेबद्दल माहिती नसते. त्यामुळे ते अनवधानाने अतिक्रमण करतात.

शासनाने गावपातळीवर मोजणी करून पाटी लावणे आवश्यक आहे.

ग्रामपंचायती, जलसिंचन समित्या, शेतकरी संस्था यांनी जनजागृती मोहीम राबवावी.

कालव्यात अडथळा न होण्यासाठी पाण्याच्या वहनाची दिशा, वेळापत्रक ठरवले पाहिजे.

८. महाराष्ट्रातील उदाहरणे

१. जायकवाडी धरणाचा मुख्य कालवा 

उंबरगांव ते वैजापूर पर्यंत ४५ मीटर दोन्ही बाजूंनी आरक्षित.

शेकडो गावे या कालव्यावर अवलंबून.


२. नाशिक जिल्ह्यातील गिरणा प्रकल्प

मुख्य व उप कालव्यासाठी
 ३० ते ४५ मीटर अंतर आरक्षित.

काही ठिकाणी अतिक्रमण
 झाल्याने न्यायालयीन हस्तक्षेप.


३. कृष्णा खोऱ्यातील उजनी प्रकल्प

पोट कालव्यांवर मोठ्या
 प्रमाणात अतिक्रमण.

अनेक वेळा पाटबंधारे विभागाच्या नोटीसा.

पाटबंधारे खात्याच्या कालव्यांच्या दोन्ही बाजूंना राखीव जागा ठेवणे ही शासनाच्या दीर्घकालीन जलव्यवस्थापन धोरणाचा भाग आहे. ही जागा केवळ पाण्याच्या वहनासाठी नसून त्याच्याशी संबंधित अनेक तांत्रिक व प्रशासनिक बाबींसाठी महत्त्वाची असते. शेतकऱ्यांनी, नागरिकांनी व स्थानिक संस्थांनी या जागेवर अतिक्रमण करू नये, तसेच शासनाने नियमित सर्वेक्षण, जागा अधिसूचना व जनजागृती यावर भर देणे आवश्यक आहे.

१०. आरक्षित अंतर
 सारांश तक्त्याद्वारे

कालव्याचा प्रकार आरक्षित अंतर
 (प्रत्येक बाजूला) फूटात अंदाजे अंतर

मुख्य कालवा ४५ मीटर १५० फूट
उप कालवा १५ मीटर ५० फूट
पोट कालवा / चारी २.२५
 ते ३ मीटर ७.५ ते १० फूट

शेवटचा संदेश
पाणी म्हणजे जीवन. या जीवनवाहिन्यांचे रक्षण व योग्य वापर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पाटबंधारे खात्याच्या नियमांचे पालन करणे म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांना जलसंपत्तीची सुरक्षित हमी देणे होय.

टीप :-
याबाबत कोणाच्या मनात काही शंका उपस्थित झाल्यास त्यांनी जलसंपदा (पाटबंधारे) खात्याच्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून योग्य प्रकारे खात्री व सहनीशा करुन घ्यावी.


=================================
-----------------------------------------------

शौकतभाई शेख
समता फाऊंडेशन,श्रीरामपूर 
 MOB.9561174111
-----------------------------------------------
=================================