राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, August 3, 2025

- प्रमोद (राजू) रतन पाटील ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील विभाग अध्यक्ष केंद्रीय समितीची बैठक !!!


- प्रमोद (राजू) रतन - पाटील -/ मुंबई -
 ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील विभाग अध्यक्ष केंद्रीय समितीची बैठक माझ्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अविनाश जाधव व सरचिटणीस श्री. प्रकाश भोईर यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत विभाग अध्यक्षांना मार्गदर्शन करताना स्पष्टपणे सांगण्यात आले की शाखा अध्यक्षांपासून महाराष्ट्र सैनिकांपर्यंत सातत्यानं संपर्क ठेवणं अत्यावश्यक आहे. संघटनात्मक बळकटीसाठी प्रत्येक विभागात नियमित बैठकांचे आयोजन करावं, स्थानिक पातळीवर कार्यक्रम राबवावेत आणि आगामी निवडणुकांसाठी भक्कम तयारी करावी. विभाग अध्यक्षांनी मांडलेली आपली मतं गांभीर्याने ऐकली गेली व त्यांना योग्य सल्लाही देण्यात आला.

संघटनात्मक पातळीवर एकसंध आणि शक्तिशाली वाटचाल हाच आपल्या यशाचा पाया असेल !

जय महाराष्ट्र !
केंद्रिय समिती विभाग बैठक 🌹🥀🌺🌸🌷🪷❤️✅

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


सस्नेह जय महाराष्ट्र !१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा १९वा वर्धापन दिन साजरा 💐💐💐


( महाराष्ट्र नवनिर्माण सेना ) 🌹🥀🌺🌸🌷🪷❤️✅
- राज गुडेक -  महाराष्ट्र - सैनिक ...

सस्नेह जय महाराष्ट्र 
१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा १९वा वर्धापन दिन साजरा करताना, राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत दोन दिवस एकत्र घालवता आले, याचा खूप आनंद आणि अभिमान वाटतो.

हे शिबिर म्हणजे केवळ एका आयोजनापुरतं मर्यादित नव्हतं; ते एक शिकण्याचं, अनुभव घेण्याचं, आणि एकमेकांशी मनमोकळं होण्याचं साधन होतं.

पक्ष, चळवळ, विचार आणि नेतृत्व यांचं भान, हे कधी भाषणातून तर कधी साध्या गप्पांमधून पोहोचतं, याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला.

शिबिरात तुमच्यातील काहीतरी करून दाखवण्याची चमक, बोलण्यातला आत्मविश्वास, आणि संघटनेप्रती असलेली जबाबदारीची जाणीव... हे सगळं पाहून एकच गोष्ट जाणवली, की ही संघटना केवळ कागदोपत्री नाही; ही संघटना आपल्या रक्तात आहे, श्वासात आहे.

कोणीतरी गाणं म्हणत होतं, कोणीतरी आठवणी सांगत होतं, तर कोणी गेल्या वर्षभरातील संघर्षांची उजळणी करत होतं, माझ्यासाठी, हे क्षण एका सहकाऱ्याच्य नजरेतून अनुभवता येत होते. कोणाला तब्येतीची अडचण असूनही तो सहभागी झाला, कोणीतरी आपल्या कला-कौशल्याचं सादरीकरण केलं... ही सगळी तुमचे नाते या संघटनेशी किती घट्ट जोडलेले आहे याची साक्ष आहे.


मी केवळ उपस्थित नव्हतो, मी पूर्णपणे त्या क्षणांचा भाग
होतो, आणि त्या प्रत्येक अनुभवाने मला आणखी जबाबदार केलं आहे.

आपल्या सहवासातून निर्माण झालेली ही ऊर्जा, ही प्रेरणा, हेच या शिबिराचं खरं यश आहे. या पुढच्या वाटचालीत, हे बळ घेऊन आपण अधिक ठामपणे उभं राहू.

तुमच्या विश्वासासाठी, प्रेमासाठी, आणि संघटनेप्रती असलेल्या निष्ठेसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याला मनापासून धन्यवाद !

हे दोन दिवस माझ्यासाठी खूप खास होते, आणि ही भावना शब्दांत मावणार नाही.

आपल्यासोबत अजून खूप काही करायचं आहे. पुन्हा भेटू... नव्या योजनांसह, नव्या जोमानं !


<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
जय महाराष्ट्र ! आपलाच, अमित राजसाहेब ठाकरे 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================

विचारवंतांच्या मुलाखती समकालाची चिकित्सा करणारे पुस्तक - प्रा.शिरीष लांडगे


संवादक सुभाष थोरात यांचे विचारवंतांच्या मुलाखती या पुस्तकाचे लोकार्पण संपन्न 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
विचारवंताच्या मुलाखती हे समकालाची चिकित्सा करणारे पुस्तक आहे. वर्तमान काळाची लढाई विचारांची आहे. ती विचारांनीच लढावी लागेल त्यासाठी वैचारिक बळ देणारे हे पुस्तक आहे असे प्रतिपादन प्राचार्य शिरीष लांडगे यांनी केले. 
कॉम्रेड सुभाष थोरात यांनी घेतलेल्या मुलाखतींचे ‘विचारवंताच्या मुलाखती’ या राजीव देशपांडे आणि डॉ. श्रीधर पवार यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन अहिल्यानगरमध्ये झाले याप्रसंगी ते बोलत होते.

अहमदनगर महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधाकर शेलार यांनी ‘विचारवंताच्या मुलाखती’ हे केवळ प्रश्नोत्तरांचे पुस्तक नव्हे तर सामाजिक चिंतन आणि सामाजिक परिवर्तनाचे मूल्यं असलेलं हे पुस्तक आहे अशा भावना व्यक्त केल्या. प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षा प्रसिद्ध लेखिका डॉ.प्रतिभा अहिरे होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्योत्तर काळाचे सिंहावलोकन करणारे हे पुस्तक आहे.या मुलाखतीतून विचारवंतांचे आत्मकथन आलेले आहे. अकरा विचारवंतांनी विविध विषयासंदर्भात विवेचन केले आहे, त्यामुळे हे पुस्तक सामाजिक दस्तऐवज झाले आहे.आताच्या तरुणांना विचारांची दिशा देणारे हे पुस्तक आहे म्हणून तरुणांनी हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे असे आवाहन केले. कॉम्रेड सुभाष थोरात यांच्या मृत्यू पश्चात हे पुस्तक प्रकाशित होत आहे. त्यांच्या नंतरही त्यांचे हे काम महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केला.

 याप्रसंगी सुभाष वारे, कॉम्रेड सुबोध मोरे यांनी सहकारी व मित्र सुभाष थोरात यांच्या कार्यकर्ता व विचारवंत म्हणून जडणघडण संदर्भात विवेचन केले.
शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या विचार व मूल्यांशी तडजोड न करणारा विचारी मित्र आपण गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या पुस्तकाचे संपादक राजीव देशपांडे यांनी प्रारंभी पुस्तक प्रकाशनामागील भूमिका विशद केली. प्रा. ग. प्र. प्रधान, डॉ. बाबा आढाव, प्रा. गो. पु. देशपांडे, डॉ. सुलभा ब्रम्हे, दया पवार, नारायण सुर्वे, प्रा. यशवंत मनोहर, प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. विद्युत भागवत, प्रा. डॉ. महेबूब सय्यद आणि मनोहर कदम अशा एकूण ११ विचारवंतांचा मुलाखती या पुस्तकात आहेत. या सर्व पुरोगामी मंडळींची विचारवंत म्हणून झालेली जडणघडण आणि त्यातून जोपासलेले विचार एकत्रितपणे समोर यावेत ही भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक प्रा. मेहबूब सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोनाली देवढे-शिंदे यांनी केले तर आभार अशोक सब्बन यांनी मानले.
 याप्रसंगी सुभाष थोरात यांच्या सहचारिणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे व त्यांच्यावर प्रेम करणारा मित्र परिवार, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
ज्येष्ठ पत्रकार अबीद खान,अ.नगर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

डिजिटल शाळा- योग्य की अयोग्य

कोरोनाचा काळ हा सर्वांसाठी संकटाचा काळ होता. कोरोनाच्या काळातील लॉकडाऊन मुळे अनेक बदल झालेले दिसून येतात. त्यातीलच एक बदल म्हणजे डिजिटल शिक्षण होय.वर्गातील फळा ते मोबाईल किंवा लॅपटॉपची स्क्रीन. असा तो प्रवास सर्वांनीच अनुभवला आहे. यातूनच पुढे डिजिटल शाळा उदयास आली असे म्हणायला हरकत नाही. 
        सध्या अनेक शाळांमध्ये शहरी भागात तरी असेच दिसून येत आहे की इंटरऍक्टिव्ह बोर्ड बसविण्यात आले आहेत. त्यामुळे डिजिटल शिक्षण ही संकल्पना पूर्णत्वास येऊ लागल्याचे आढळते.शाळांमधील डिजिटल बोर्डमुळे विद्यार्थी आनंदीत आहेत. कारण; त्यांना वेगवेगळ्या पद्धती अनुभवास मिळत आहेत. पाठ्यपुस्तकातील धडे मनोरंजनात्मक व प्रभावीपणे शिकण्यास मिळत आहेत. तसेच विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही विस्तृतपणे व नियोजनपूर्वक शिकविण्याचा आनंद मिळत आहे. खडूने लिहिण्यापेक्षा एका विशिष्ट प्रकारच्या पेनने किंवा हाताच्या बोटाने देखील डिजिटल बोर्डवर झटपट लिहून कमी वेळेत भरपूर ज्ञान देण्याचा व्यापक प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. 
     डिजिटल बोर्डमुळे मुलेही शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. ॲनिमेटेड व्हिडिओ धडे, कविता मन लावून पाहत आहेत व ऐकत आहेत. अधिक गोडीने लक्ष केंद्रित करून शिकण्यात रस दाखवत आहेत. खडूने लिहिलेला फळा पुसताना उडणाऱ्या धुळीमुळे होणारा त्रास कमी झाला आहे. खडूने लिहिलेले एकदा पुसले की पुसले जात असे तीच संकल्पना पुन्हा समजावून सांगण्यासाठी शिक्षकांना पुन्हा तेच तेच लिहावे लागत होते. पण; डिजिटल बोर्डमुळे एकदा लिहिलेले नंतर पहावयाचे असेल तर सेव्ह (जतन) करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने एक बटन दाबले की लगेच पाहिजे तो टॉपिक समोर उपलब्ध होत आहे.त्यामुळे कमी वेळेत हे साध्य होऊ शकत असल्याने वेळेची बचत होऊन मुलांना स्पष्टीकरण देण्यासाठी वेळ मिळत आहे.डिजिटल बोर्डचे हे फायदे असले तरी काही तोटेही असू शकतात. 
    डिजिटल बोर्ड साठी बऱ्याच वेळा इंटरनेटची आवश्यकता लागते आणि ते असणे गरजेचे आहे. डिजिटल उपकरणांच्या या वापरामुळे विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो. त्यासाठी बोर्डवर लाईटची म्हणजेच डिस्प्ले ची ऍडजेस्टमेंट योग्य असणे आवश्यक आहे. नाहीतर डिजिटल बोर्डच्या वापरामुळे मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या डोकं दुखणे किंवा इतर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या समस्यांबरोबरच आणखी काही समस्या म्हणजेच सर्वत्र शाळांमध्ये डिजिटल बोर्ड सर्व वर्ग खोल्यांमध्ये असतीलच असे नाही.डिजिटल बोर्ड साठीचा येणारा खर्च, वेळोवेळी बदलावे लागणारे सॉफ्टवेअर, त्याची निगा राखणे या सर्व गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत.शाळेच्या वाढत्या गरजा आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊनच डिजिटल बोर्डचा वापर करणे योग्यतेचे ठरेल.

=================================
-----------------------------------------------

*लेखन* ✍️✅🇮🇳...
       " सुकन्या"
सौ.मिनल अमोल उनउने
सातारा - 9130470397
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------

*लेख प्रसिद्ध सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

अनुकंपा भरतीबाबत राज्यशासनाचा निर्णय स्वागतार्ह



केंद्र शासनाकडूनही अनुकंपा भरतीसाठी अशी सकारात्मक पावले उचलली जावीत 

- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
 राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणाऱ्या १५० दिवसांच्या उद्दिष्ट कार्यक्रमांतर्गत अनुकंपा तत्त्वावर १००% भरतीत मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय १ सप्टेंबर २०२५ पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने  पदांसाठी शिफारस केलेले उमेदवारांचे नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्याचा निर्णय घेतला आहे, हा निर्णय अत्यंत वाखाण्याजोगा असून अशा कठीण प्रसंगी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तो दिलासा ठरतो, राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असताना केंद्र शासनाने देखील त्यांच्या अखत्यारित  येणाऱ्या विविध खात्यामध्ये देखील अनुकंपा भरतीची अंमलबजावणी तत्काळ करावी अशी अपेक्षा कर्मचारी व त्यांच्या संघटना कडून व्यक्त केली जात आहे. आजही केंद्र शासनाच्या अनेक खात्यांमध्ये अनुकंपा नियुक्ती प्रलंबित असून त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे, शासनातील सेवकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी राज्य शासनाचा निर्णय केंद्रासाठीही दिशादर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असल्याचे येथील परिवर्तन फाऊंडेशन आणी माजी सैनिक संघर्ष समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
मेजर कृष्णा सरदार - श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Saturday, August 2, 2025

प्रामाणिकपणामुळे सौ.उषा जगताप यांची एका जागेवर सेवा : अनुराधा आदिक


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील शिरसगांव येथील खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षिका सौ.उषा मच्छिंद्र जगताप यांचा ३४ वर्षे सेवेतून सेवा मुक्त झाल्यामुळे त्यांचा श्रीरामपूर - बेलापूर रोडवरील साई सुधा काळे रसवंती लॉन्स याठिकाणी प्रमुख मान्यवर व पाहुणे मंडळी यांच्या उपस्थितीत सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हंसराज आदिक, बापूसाहेब पटारे, श्री.ढोकणे. सुनिल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अनुराधा आदिक म्हणाला की, ज्या शाळेत प्रथम नियुक्ती त्याच शाळेत सेवानिवृत्ती होणे म्हणजे उषा जगताप यांच्या प्रामाणिक कामाची पावती होय, त्यांचा ज्ञानदान क्षेत्रातील प्रवास थक्क करणारा असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी अशोक कर्डक, किशोर बकाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद थोरात व उपस्थितांचे आभार मच्छिंद्र जगताप यांनी मानले.

सौ.उषा जगताप यांची सलग ३४ वर्ष सेवा करून सेवा निवृत झाल्याबद्दल त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत पुढे सौ. जगताप यांनी सामाजिक कार्यात सहभागी व्हावे अशा अपेक्षाही यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आल्या.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳...
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग* 
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳...
 श्रीरामपूर 9561174111
-----------------------------------------------
=================================

Friday, August 1, 2025

दोन वर्षापूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा राहुरी पोलिसांकडून शोध आणी सुटका


 ऑपरेशन मुस्कान अंतर्गत वर्षभरात राहुरी पोलीसांनी लावला एकूण ७३ मुलींचा शोध

- जावेद शेख - राहुरी -/ वार्ता -
राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर ८७६/२०२३ भारतीय दंड विधान कलम ३६३ प्रमाणे दिनांक ११/०८/२०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यामध्ये अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परिश्रम घेवुन गुन्ह्यातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा शोध घेऊन तीला राहुरी पोलीस स्टेशनला आणून सदर पीडितेस तिचे नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहे. व अपहरण करणारा युवक करण अशोक पवार वय २३ वर्ष रा. खुडसरगांव ता. राहुरी यास ताब्यात घेऊन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव , पोकॉ. गणेश लिपने हे करत आहेत.

तसेच ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मुलींचा शोध घेऊन गेल्या वर्षभरात ७३ मुलींचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई सोमनाथ घार्गे - पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, सोमनाथ वाकचौरे - अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपूजे - उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि. संजय आर.ठेंगे, पोसई राजू जाधव , पोहेकॉ. राहुल यादव, पोकॉ.अशोक शिंदे पोकॉ. गणेश लिपणे पोकॉ. शेषराव कुटे , मपोकॉ. वृषाली कुसळकर, अंजली गुरवे नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर व पो.ना.संतोष दरेकर, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर जि. अहिल्यानगर मोबाईल सेल यांनी केलेली आहे.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳...
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================