राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, November 17, 2025

उम्मीद पोर्टल मध्ये नोंदणीसाठी मोफत कॅम्प कार्यक्रम संपन्न !


दिनांक ५ डिसेंबर २०२५ पर्यंत मस्जिद, दर्गाह,मदरसा, कब्रस्तान ची उम्मीद पोर्टलवर नोंदणी करुन घ्यावी - वक्फ बोर्ड अध्यक्ष ना.समीर काजी यांचे अवाहन

- नंदुरबार,- प्रतिनिधी -/ वार्ता -
नंदुरबार शहरात मदरसा रियाजुल बनात अली साहब मोहल्यात राज्यातील वक्फ मध्ये नोंदणी झालेले असे सर्वच मस्जिद,दर्गाह,मदरसे व कब्रस्तानाची नोंदणी उम्मीद पोर्टलवर करावी असे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष नामदार समीर काजी यांनी आवाहन केले आहे.


महाराष्ट्र राज्यातील सर्व मस्जिद,दर्गाह, मदरसे, कब्रस्तानाची दि.५ डिसेंबर २०२५ पर्यंत उम्मीद पोर्टल वर १००% करुन घ्यावी, नोंदणीबाबत दुर्लक्ष करु नये, करीता गाफील न राहाता वरील प्रमाणे सर्व वक्फ मध्ये जे जे नोंदणी झालेले आहेत त्यांनी तात्काळ आजच उम्मीद पोर्टलवर नोंदणी करावी असेही म्हटले आहे.

याकरिता नंदुरबार शहरातील मदरसे रियाजुल बनात अली साहेब मोहल्यात उम्मीद पोर्टल चे ऑनलाईन मोफत नोंदणी कॅम्प, धुळे - नंदुरबार वक्फचे विभागीय अधिकारी अल्ताफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 यावेळी वक्फ चे अधिकारी हबीबुर रेहमान व येतेशाम अन्सारी कॅम्पमध्ये ऑनलाईन नोंदणीचे काम करत होते, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धुळे येथील सामाजिक कार्यकर्ते शकील अहमद अन्सारी, नंदुरबारचे धाव शा शा तकिया मस्जिद संस्थेचे अध्यक्ष एजाज बागवान, मदरसे रियाजुल बनात चे अध्यक्ष अहमद सईद आदि मान्यवर उपस्थित होते,

 कार्यक्रमाचे आयोजक जमियात उलमाये हिंद चे नंदुरबार अध्यक्ष मौलाना जकरिया सहाब, सचिव हाजी इरफान मेमन हे होते.
 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद मतीन, जुबेर मणियार,शकील शेख आदींनी केले.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️✅🇮🇳
हाजी एजाजभाई बागवान - नंदुरबार 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
 *वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Sunday, November 16, 2025

बौद्ध समाजाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात यावी - ॲड. विजयराव खाजेकर



बौद्ध समाजाला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात यावी - ॲड. विजयराव खाजेकर

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
लोकसभा असो की विधानसभा असो अथवा नगरपालिका असो प्रत्येक वेळी बौद्ध समाजाला उमेदवारीपासून डावलले जात आहे, यामागे आजपावतो जे काही आमदार,खासदार अथवा नगराध्यक्ष व नगरसेवक झाले त्या सर्वांना निवडून आणण्यामध्ये बौद्ध ,मातंग आणि मेहतर समाजाचा मोठा वाटा आहे, आणी असे असून देखील येथील सर्वच राजकीय नेत्यांनी जाणीवपूर्वक बहुसंख्यांक असलेल्या बौद्ध समाजाला उमेदवारी देण्यास गत २५ वर्षांपासून जाणीवपूर्वक केवळ डावललेच नसुन अक्षरशः टाळलेले आहे.

श्रीरामपूर तालुका बाहेरच्या आणी शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाहेरच्या एका विशिष्ट समाजाला नेहमीच येथील नेतृत्वाने जाणीवपूर्वक प्रतिनिधीत्व दिले हा बौद्ध ,मातंग,मेहत्तर समाजावर अन्याय नव्हे तर काय आहे ? तसेच या प्रश्नी सर्व राजकीय पक्ष नेतृत्वाला कधी जाणीव होणार आहे का ? असा सवाल देखील नव स्वराज्य सेनेचे अध्यक्ष ॲड. विजयराव खाजेकर यांनी प्रामुख्याने उपस्थित केला आहे.

बौद्ध समाजास नेहमीच डावलले गेल्यामुळे येत्या नगर पालिका निवडणुकी सोबतच पुढे होवू घातलेल्या ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीत देखील बौद्ध समाज आपल्यासोबत राहणार नाही, याची वेळीच दखल घेऊन बहुसंख्यांक असलेल्या बौद्ध समाजाला न्याय देण्यासाठी श्रीरामपूर नगर पालिका निवडणुकीत बौद्ध समाजास नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यात यावी असे सर्व राजकीय नेत्यांना ॲड.विजयराव खाजेकर यांनी आवाहन केले आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

समाजवादी पक्षातर्फे जोएफ जमादार यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल


समाजवादी पक्षातर्फे जोएफ जमादार यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल

समाजवादी शक्ती प्रदर्शनाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद; ‘निवडणूक जनतेच्या हातात’ अशी जोरदार चर्चा

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर नगर पालिका निवडणुकीत समाजवादी पक्षाने नगराध्यक्षपदासाठी शेख जोयेफ युनुस जमादार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताच शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण शहर अक्षरशः दणाणून गेले. ढोल-ताशांचा गजर, पटाख्यांची आतषबाजी, तर तरुण-तरुणींच्या उत्स्फूर्त घोषणा यामुळे श्रीरामपूरचा राजकीय पारा चांगलाच चढला होता.

या रॅलीमध्ये जमादारनगर–मौलाना आझाद चौक–सय्यद बाबा चौक–कर्मवीर चौक ते प्रशासकीय इमारत असा मार्ग उत्साहाने भरून गेला.
या मार्गात येणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील आदी थोर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले.
शहरातील नागरिकांच्या प्रचंड गर्दी आणी उत्स्फूर्त उत्साहने समाजवादी पक्षाच्या या उमेदवारीला जनतेचा जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.

प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या उपस्थितीत जोएफ जमादार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुंब्रा (मुंबई) येथील सुप्रसिद्ध रिअल स्टार नदीम खान यांची विशेष उपस्थिती रॅलीचे आकर्षण ठरली. समाजवादी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व ज्येष्ठ नागरिकांचा उसळलेला उत्साह पाहण्यासारखा होता.


*जनतेनेच निवडणूक हातात घेतली” रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त संदेश*

रॅलीदरम्यान सर्वसामान्य मतदार, व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते, महिला, युवक आदी नागरिकांनी खुल्या मनाने जमादार यांना शुभेच्छा दिल्या. यंदाची निवडणूक जनतेच्याच हातात असल्याचा संदेश यावेळी स्पष्टपणे उमटला.

जोएफ जमादार यांचे भावनिक भाषण : “आपला प्रतिनिधी उन्मत्त नसावा… आपल्या घरातील माणूस असावा!”

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नागरिकांसमोर बोलताना जोएफ जमादार भावुक झाले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“गेल्या दहा वर्षांत शहरातील समस्यांकडे कोणीच लक्ष दिले नाही. नागरिकांना अक्षरशः वाऱ्यावर सोडले गेले. आता प्रतिनिधी असा निवडला पाहिजे जो ‘आपला माणूस’ असेल, जो समस्या दाखवून द्यायच्या आधीच त्यावर काम करेल.”

ते पुढे म्हणाले की,
“लोकप्रतिनिधी उद्धट नसावा; तक्रार घेऊन येणाऱ्याला हाकलून लावणारा नसावा. उलट नागरिकांच्या समस्या आपल्या घरच्यांसारख्या समजून त्यावर तत्काळ उपाय करणारा असावा. आपला विश्वास, आशीर्वाद आणि आपले प्रेम असेच कायम राहो अशी माझी मनापासून इच्छा आहे.”

जमादार यांच्या या मनापासून केलेल्या संवादाला नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने जोरदार प्रतिसाद दिला.
जोएफ जमादार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाने श्रीरामपूरमधील निवडणूक वातावरण चांगलेच तापून प्रस्तापितांचे धाबे दणाणले गेले आहे. समाजवादी पक्षाच्या या जोरदार शक्तीप्रदर्शनामुळे शहरात चर्चेला उधाण आले असून आगामी निवडणूक रंगतदार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
नेहमीच्या त्याच त्या अकार्यक्षम प्रतिनिधींना शहरातील नागरीक मोठे त्रासले गेले असुन जोएफ जमादार यांच्या रुपाने शहरातील जनतेस नवीन पर्याय उपलब्ध झाल्याने जागरुक मतदार मोठ्या अपेक्षेने श्री.जमादार यांच्या नेतृत्वाकडे आकर्षीत होताना दिसून येत आहे.

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Media Google Network ✍️✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


Thursday, November 13, 2025

स्वाती कोळेकर यांना पीएच.डी. प्रदान


- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
स्वाती सुरेश कोळेकर यांना इंग्रजी विषयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रदान करण्यात आली आहे. संशोधन केंद्र हे संगमनेर येथील, डी जे मालपाणी वाणिज्य आणि बी.एन. सारडा विज्ञान महाविद्यालय आहे.

१९५० नंतरच्या भारतीय उपखंडातील निवडक इंग्रजी महिला कादंबरीतील स्त्रीवाद: तुलनात्मक अभ्यास या विषयावर प्रा. डॉ. डी. एम. घोडके सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड सर तसेच बोरावके महाविद्यालयामधील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुनील देवकर सर आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

त्या सर्टिफाईड ऑडिटर श्री. सुरेश कोळेकर यांच्या कन्या तसेच श्रीरामपूर शहरातील सुप्रसिद्ध विधीज्ञ ॲड. रमेश कोळेकर यांच्या त्या पुतणी आहेत.

=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* ✍️🇮🇳✅
हानिफभाई पठाण (भा.ल.से.) श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस 💐✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

सणसर - लासुर्णे जि.प.मतदार संघाची निवडणूक मोठी निर्णायक ठरणार !


सणसर - लासुर्णे जि.प.मतदार संघाची 
निवडणूक मोठी निर्णायक ठरणार !

पक्षश्रेष्ठींनी संधी दिल्यास निवडणुकीत 
ॲड.पुजा भिसे नक्कीच बाजी मारणार !!

सणसर - लासुर्णे जि.प. मतदार संघात राष्ट्रवादी कडून ॲड.पूजा भिसे यांच्या इच्छुक उमेदवारीबाबत जोरदार चर्चा 

- शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता -
इंदापूर - जिल्हा परिषद निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील सणसर - लासुर्णे मतदार संघात इंदापूर तालुक्याच्या बेलवाडी येथील ऍडव्होकेट पूजा लक्ष्मण भिसे यांच्या इच्छुक उमेदवारीबाबत जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
ॲड.पूजा भिसे या उच्चशिक्षित पदवीधर नामांकित विधीज्ञ (वकील) असुन त्यांचे वडील लक्ष्मण संभाजी भिसे हे सामाजिक कार्यकर्ते तथा नामवंत ज्येष्ठ पत्रकार व स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणी सलग १५ वर्षांहून अधिक काळ सातत्याने नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या "भवानीमाता" या साप्ताहिकाचे प्रमुख संपादक देखील आहेत, तसेच पत्रकारीते सोबत पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्यात देखील त्यांचे मोठे योगदान असल्याने इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गाव, वाड्या, वस्त्यांवर त्यांची केवळ चांगली ओळखच नव्हेतर चांगुलपणाची देखील एक छाप असल्याने
शिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री नाम. अजितदादा पवार आणि राज्याचे कृषीमंत्री नाम. दत्तात्रय भरणे मामा यांचे ते गेली तीस ते पस्तीस वर्षांपासून एकनिष्ठ खंदे समर्थक म्हणून सर्वत्र परिचित असल्याने त्यांच्या सुकन्या ॲड.पुजा भिसे यांना निवडणुकीत मोठे पोषक वातावरण मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
सणसर - लासुर्णे हा मतदार संघ राजकीय दृष्ठ्या इंदापूर तालुक्यात नावाजलेला मतदार संघ म्हणून प्रसिद्ध आहे, या मतदार संघातील नागरिक सुज्ञ आहे, हा मतदार संघ इंदापूर तालुक्याचे कार्य सम्राट कृषीमंत्री नाम.दत्तात्रय भरणे मामा यांना मानणारा मतदार संघ आहे, ऍडव्होकेट पूजा भिसे यांच्या इच्छुक उमेदवारीबाबत त्यांनी तालुक्याच्या प्रत्येक गावातील कार्यकर्ते, पदाधिकारी,मतदार यांच्यासोबत चर्चा आणि गाव भेटी दौरे सुरु केले आहेत,यातून नागरिकांकडून 
त्यांना उत्तमरित्या चांगला प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत असल्याने,तथा त्यांच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी चे काही प्रमुख पदाधिकारी आणी खंदे समर्थक कार्यकर्ते नाम. दत्तात्रय भरणे मामा यांच्याकडे ॲड.पुजा भिसे यांच्या उमेदवारीबाबत अग्रह धरणार असल्याने सणसर - लासुर्णे मतदार संघात यावेळी उच्चशिक्षित पदवीधर महिला वकील बाजी मारणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.कारण 
कृषिमंत्री नाम.दत्तात्रय भरणे मामा हे निश्चित ॲड.पूजा भिसे यांच्या उमेदवारीबद्दल योग्य निर्णय घेणार असल्याचे मतदारसंघात दबक्या आवाजात परंतु जोरदार चर्चा सुरू आहे.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग* 
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================

Tuesday, November 4, 2025

गौसे आजम संस्थेच्या निवेदनाची दखल !बेलापूर बाजारतळात स्ट्रीट लाईट सुविधा

गौसे आजम संस्थेतर्फे सन्मानचिन्ह देऊन बेलापूर ग्रामपंचायत प्रशासनाचा सत्कार

- अजीजभाई शेख - राहाता -/ वार्ता -
श्रीरामपूर - तालुक्यातील बेलापूर येथील गौसे आजम सेवाभावी संस्थेच्यावतीने बेलापूर आठवडे बाज़ारतळात स्ट्रीट लाईट लावण्याची मागणी सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी बेलापूर ग्रामपंचायत कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती.
या निवेदनात असे नमूद करण्यात आले होते की,दर रविवारी बेलापूरात प्रवरा नदीच्या तीरावर आठवड़े बाजार भरत असतो.या आठवडे बाजारत मोठ्या प्रमाणावर शेतकरी व भाजीपाला विक्रेते तथा व्यापारी असे सर्वच आपला माल विक्रीसाठी आणत असतात,या बाजारात बाहेर गावचे विक्रेते व ग्राहक देखील येत असतात.हा बाजार सायंकाळी उशीरा पर्यंत चालत असतो परंतु आठवड़े बाजार या ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्यामुळे व्यापारी व बाजारकरु लोकांना खुप त्रास सहन करावा लागत होता, अंधारात भाजीपाला व देवाण - घेवाण करावे लागत होते, हा बाजार आठवडे बाजार असल्यामुळे खूपच गर्दी होत असते, या गर्दीचा व अंधाराचा फायदा घेत भुर्ट्या चोरांकरवी ग्राहकांचे पर्स, मोबाईल लंपास करण्याचे प्रमाण वाढले होते,
करीता व्यापारी व बाजारकरू नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी सदरील ठिकाणी आपण स्ट्रीट लाईट लवकरात लवकर बसवावी अशी मागणी संस्थेद्वारे करण्यात आली होती.
या मागणीची दखल बेलापुर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी,सरपंच, उपसरपंच व सदस्य तथा ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली व बाजरातळात स्ट्रीट लाईट बसविण्यात आले.
या ग्रामपंचायत प्रशासनाच्या या उत्कृष्ट कामगिरी ची प्रशंसा म्हणुन गौसे आजम सेवाभावी संस्थेकडून बेलापूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांचा सन्मान चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
 यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, कृषि उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती तथा गांवकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिषेक खंडागळे, सरपंच मीनाताई साळवे,उपसरपंच चंद्रकांत नवळे पाटील,ग्रामपंचायत सदस्य शफीक बागवान, मुस्ताक शेख,बाबूराव पवार, गांवकारी पतसंस्था डायरेक्टर अजीजभाई शेख, मोहसिन सय्यद, तसवर बागवान, जिल्हा परिषद उर्दू शाळा समिती अध्यक्ष सरफराज सय्यद,भीम गर्जना तालुका अध्यक्ष रफीक शाह, सागर खरात आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी गौसे आजम सेवा भावी संस्थेचे संस्थापक अली सय्यद, अध्यक्ष सुल्तान शेख, उपाध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सोनू शेख, उपाध्यक्ष निसार शाह, बेलापूर अध्यक्ष अल्कमा शाह, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद कार्याध्यक्ष नासीर शेख, रेहान शेख, अजीम शेख, अरमान काझी, अयाज सय्यद, अतिक शेख,फरहान इनामदार, हारून अत्तार, अन्सार अत्तार यांचे वतीने 
बेलापूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Monday, November 3, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) च्या जिल्हा सरचिटणीसपदी शेख बरकत अली



<^><^><^><^><^><^>>^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
श्रीरामपूर - येथील ज्येष्ठ पत्रकार शेख बरकत अली यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करून त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश चिटणीस अशोक भाई बागुल, पक्षाचे अल्पसंख्यांक सेल श्रीरामपूर शहराध्यक्ष नाजीश शहा, महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे प्रदेश युवक अध्यक्ष संदीप पवार, ठेकेदार पंडित मिस्त्री आदी मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत*
<^><^><^><^><^><^>>^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता,-
येथील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार आणि महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राजनीती समाचार वृत्तपत्र व न्यूज चॅनल चे प्रमुख संपादक शेख बरकत अली यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अहिल्यानगर जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.

पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अशोकभाई बागुल यांच्या शिफारसीनुसार पक्षाचे जिल्हाप्रमुख ॲड. प्रशांत वर्पे यांनी शेख बरकत अली यांची या पदावर निवड करून याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदान केले.

श्रीरामपूर येथील व्हीआयपी रेस्ट हाऊस याठिकाणी संपन्न झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री.शेख यांची निवड करण्यात आली,
त्यांना ॲड.संदीप वर्पे यांच्या कार्यालयात त्यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस अशोकभाई बागुल, अल्पसंख्याक सेलचे श्रीरामपूर शहराध्यक्ष नाजीश शाह, महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष संदीप पवार, ठेकेदार पंडितराव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

श्री.शेख यांच्या निवडीबद्दल लकी सेठी,ॲड. राजेश बोर्डे, डॉक्टर बडाख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष नाजीश शाह, शहर उपाध्यक्ष जुनेद भाई शेख, अल्पसंख्यांक सेलचे शहर कार्याध्यक्ष मोहसीन जहागीरदार, साजिद भाई शाह, समाज सेवक मतीन भाई शाह, शिक्षक संघटनेचे नेते रावसाहेब पवार, तालुका अध्यक्ष शिवाजी गोसावी, सुरेश तडके,श्री.वडीतके, सुभाष हळनोर, राजू थोरात, हनुमंत खरात, नाना तुपे, इसाक पटेल, वाल्मीक ढोकचौळे, संदीप पवार, राज मोहम्मद शेख, अकबर भाई शेख, एजाज सय्यद, मुसा सय्यद, लालू भाई शेख, अस्लम भाई सय्यद, कासम भाई शेख, रमजान भाई सय्यद, अबरार भाई शेख, नाझीम भाई शेख,मास्टर सरवरअली सय्यद, रियाज खान पठाण, जाकीर भाई बागवान, शब्बीर भाई कुरेशी, सादिक अली शेख, रसूल सय्यद, हमीद पठाण, सौ. समिना शेख, सौ. जयश्री गायकवाड, सौ. सुप्रिया घोलप, सौ. बानू बी पठाण, आदींनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी उज्वल कार्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस ✍️✅🇮🇳
 श्रीरामपूर - 9561174111
-----------------------------------------------
=================================