राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, December 27, 2023

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवार💐🙏♥️✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

पुणे - प्रतिनिधि - / वार्ता -
राज्य शासनाच्यावतीने पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात; आगामी काळातही पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल इलेव्हन २३ येथे आयोजित ‘पुणे अचिव्हर्स २०२३’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, माजी आमदार विलास लांडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, , संघटक संजयजी भोकरे, संघाचे महासचिव डॉ विश्वास आरोटे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गोविंद वाकडे महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अध्यक्ष नितीन शिंदे, पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीचे सदस्य बबन पवार आदी उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे हल्ला विरोधी कृती समितीच्या अध्यक्षपदी गोविंद वाकडे व डिजिटल मिडिया अध्यक्षपदी सिध्दार्थ भोकरे यांची निवड झाल्याबद्दल यावेळी पत्र देऊन ना अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
श्री. पवार म्हणाले, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा आदरपूर्वक सन्मान करण्यासाठी, त्याच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक मानधन देण्यात येत आहे. पत्रकारांना दुर्धर आजार, अपघात झाल्यास किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांस शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीतून मदत करण्यात येते. या निधीसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ५० कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता आधीचे ५० कोटी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनातील ५० कोटी असे १०० कोटी रुपये झाले आहेत. पत्रकारांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’च्या माध्यमातून मराठी पत्रकारितेचा पाया रचला आहे. मराठी पत्रकारितेला निर्भीडता, नि:पक्षपातीपणा आणि लोकाभिमुखतेचा वारसा मिळालेला आहे. राज्य शासनाच्यावतीने घेण्यात आलेले निर्णय, ध्येयधोरणे, उपक्रम नागरिकापर्यंत पोहचविण्याचे काम अतिशय चांगल्याप्रकारे माध्यमांनी केले आहे. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत करण्यात आलेली कामे तळागळापर्यंत पोहचविण्याचे माध्यमांनी अतिशय चांगले काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन शासनाच्यावतीने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मानही करण्यात आला.
सुरुवातीला लोकशिक्षण, ज्ञानप्रसार आणि देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरीता पत्रकारिता करण्यात येत होती. स्वातंत्र्यपूर्वकाळात ब्रिटीशकालीन चुकीच्या धोरणाविरुद्ध विरोध करण्याचे काम मराठी माध्यमांनी नेटाने केले. मराठी वृत्तपत्रातून समाज घडविण्याचे काम करण्यात आले. त्या काळातील ध्येयनिष्ठ पत्रकारांनी वृत्तपत्र समाज प्रबोधनासाठी, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी, जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम असल्याचे दाखवून दिले. आज काळात या गोष्टीचा आदर्श घेऊन काम करण्याची गरज आहे.
समाज माध्यमाच्या युगात नागरिकांना जलद बातम्या मिळण्याकरीता पत्रकार काम करीत असतात. चुकीच्या गोष्टीवर टिकाटिप्पणी करणे माध्यमांचा हक्क आहे.पत्रकारांनी चांगल्या गोष्टी समाजापुढे आणण्यासाठी आणि वाईट गोष्टीला रोखण्यासाठी काम करावे. घडलेल्या घटनेचे वार्तांकन करण्यासोबत सामाजिक स्वास्थ जपण्यासाठी वस्तुस्थितीदर्शक बातमी दाखविण्याचे काम माध्यमांनी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

पुणे अचिव्हर्स २०२३’ या कॉफीटेबल पुस्तकाच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तीना समाजापुढे आणण्याचे काम केले आहे. देशाच्या, समाजाच्या प्रगतीत आणि उन्नतीत त्यांचे योगदान आहे. यातून इतरांनीही प्रेरणा घेऊन आपापल्या क्षेत्रात काम करत अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे, असे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

श्रीमती चाकणकर म्हणाल्या, बदलत्या युगात प्रवाहाच्याविरुद्ध निर्भीडपणे आणि विवेकबुद्धीला जागृत ठेवून सामाजिक वास्तव्य समाजासमोर आणणे हे खऱ्या पत्रकारितेचे काम आहे. वंचित, दुर्बल अशा घटकांचा आवाज होण्याचे कामही पत्रकारितेने केले आहे. समाजात महिलांवर होणाऱ्या घटना आणि अत्याचार माध्यमांनी समोर आणावे, घडलेल्या घटनेबाबत सतत पाठपुरावा करुन संबंधित पीडिताला न्याय देण्याची भूमिका ठेवावी, असेही श्रीमती चाकणकर म्हणाल्या.

श्री. मुंडे म्हणाले पिंपरी-चिंचवड या औद्योगिक, ऐतिहासिक, अध्यात्मिक नगरीमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करुन त्यांची यशोगाथा कॉफ़ीटेबल पुस्तकाच्या माध्यमातून समाजासमोर आणण्यात आली आहे.
प्रास्ताविकात श्री. भोकरे म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात सामाजिक जाणिव ठेवून पत्रकाराने नेहमी प्रयत्नवादी राहून काम करावे. या माध्यमातून आदर्श पत्रकारितेच्या व्रताचे पालन करावे.

यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते साहित्य, कला, क्रीडा, राजकारण, शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रातील विविध मान्यवरांना ‘पुणे अचिव्हर्स २०२३’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे महासचिव डॉ विश्वास आरोटे यांचा शिवरायांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुभाष डोके. पत्रकार संघाचे ब्रँड अम्बेसेडर संजय फुलसुंदर डॉ स्वामी शिरकुल वैदु महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे वृत्तवाहिनी पुणे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष अतुल परदेशी पुणे शहर जिल्हा अध्यक्ष राकेश वाघमारे कोल्हापूर जिल्हा कबड्डी अध्यक्ष बाजीराव फराकटे ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर नवले यांसह पदाधिकारी उपस्थित होते आभार प्रदर्शन नितीन शिंदे यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार लक्ष्मण संभाजी भिसे - इंदापूर*
==================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================




आपण कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही वा भुमिका बदललेली नाहीः माजी आ.भानुदास मुरकुटे


श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
आपण राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार असल्याची चर्चा ही अफवा आहे. आपण असा कोणताही निर्णय घेतला नसून राजकीय भूमिका बदलली नसल्याचे माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी सांगीतले.
             माजी आ.मुरकुटे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले. याबाबत श्री.मुरकुटे यांना विचारले असता त्यांनी सदरचा खुलासा केला. ते पुढे म्हणाले की, आपण कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही वा भुमिका बदललेली नाही. श्री.राजेन्द्र फाळके व अॕड.संदीप वर्पे यांचे व माझे जुने स्नेहसंबंध आहेत. ते श्रीरामपूरला आले असता त्यांनी केवळ स्नेहभेट दिली. या दरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यामुळे याबाबत ज्या बातम्या प्रसिध्द झाल्या त्यात तथ्य नसून केवळ अफवा आहे, असे श्री.मुरकुटे यांनी सांगीतले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



प्रा.सुनीताताई गायकवाड यांना पी.एच.डी. प्रदान.........💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
माजी आ.मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील तालुक्यातील अशोकनगर येथे अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ.सुनिताताई गायकवाड यांना जे.जे.टी. विद्यापीठाने (राजस्थान) पी.एच.डी. प्रदान केली आहे.
सौ.सुनिताताई गायकवाड यांच्या यशाबद्दल अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, सचिव सोपानराव राऊत, कारखान्याचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिदे, कार्यकारी संचालक संतोष देवकर तसेच संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले यांचा वाढदिवस श्रीरामपूर आरपीआयकडून मोठ्या उत्साहात साजरा...💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
केंद्रीय मंत्री.ना.रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर आरपीआयकडून श्रीरामपूर शहरात विविध विधायक कार्य हाती घेवून मोठ्या उत्साही वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला.
या वाढदिवसाच्या निमित्ताने यावेळी श्रीरामपूर
 शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून फटाक्यांची आतिष
 बाजीकरण्यात आली.तसेच रिपब्लिकन पक्षाच्यतीने श्रीरामपूर येथील माऊली वृद्धाश्रम येथील वयोवृद्ध महिला. पुरुष समवेत लहान बालकांना अन्नदान व
 स्वेटरचे वाटप करत केक कापून आणि पेढे वाटून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टीचे राज्य प्रवक्ते,श्रीरामपूर विधानसभा प्रभारी युवा नेतृत्व नितीन दिनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते, रिपब्लिकन पक्षाचे विभागीय जिल्हाप्रमुख भीमाभाऊ बागुल, राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर वाढदिवसाच्या निमित्ताने रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यात प्रामुख्याने बीजेपी नेते नितीन भाऊ दिनकर यांनी ना. आठवले साहेबांना शुभेच्छा देतांना सांगितले की, ना. आठवले साहेबांनी जो संघर्ष करून आज देशामध्ये स्वतःच्या ने्तृत्वाचा ठसा निर्माण केला, महामानाव. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी ना.आठवले साहेब संपूर्ण देशभर फिरत असून मागासवर्गीय समाजाला न्याय देण्यासाठी, समाजावर कुठे अन्याय, अत्याचार होत असेल तर त्याच्या विरोधात आवाज उठवतात व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे काम ते सातत्याने करताहेत,
या वाढदिवसाच्या निमित्ताने आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आठवले साहेबांच्या सामाजिक न्याय खात्याच्या ज्या ज्या विविध जनकल्याणकारी योजना आहेत त्या तळा काळापर्यंतच्या समाजातील उपेक्षित गरजू लोकांना त्याचा फायदा करून द्यावा तसेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनेक योजना आहेत जसे बार्टी व इतर समाज कल्याण खात्याच्या माध्यमातून देखील विविध योजना आहेत त्याचा देखील फायदा मिळवून द्यावा,तसेच महात्मा फुले,आण्णा भाऊ साठे महामंडळ अंतर्गत कर्ज योजनांचा फायदा, समाजातील गरजूवंतांना करून द्यावा असे अवाहन वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी रिपाई कार्यकर्त्याना केले.
 यावेळी रिपाई नेते भीमाभाऊ बागुल यांनी आठवले साहेबांना शुभेच्छा देतांना साहेबांचा संपूर्ण जीवन संघर्षच याठिकाणी सांगितला. तर सुभाष दादा त्रिभुवन यांनी खास आपल्या कवीवर्य शैलीलतुन छानशी कविता सादर करत आठवले साहेबांना शुभेच्छा दिल्या.बेलापूरचे सरपंच महेंद्रभाई साळवे, भीम शक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीपभाऊ मगर, रितेशभाऊ एडके,रिपाई चे शहर अध्यक्ष विजय पवार,राजाभाऊ मगर, विजय शेलार,संजय रुपटक्के, रॉकेश कापसे, माऊली वृद्धाश्रमाचे वागुंडे काका यांनी आठवले साहेबांना शुभेच्छा देऊन दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना केल्या.
सदर कार्यक्रमास रिपाई चे राहुल कापसे,बंटी शेलार,विजय शेलार, रितेश पवार,बंडू सुतार,किरण कसबे,दादा बनकर, दत्तू साखरे, दिपक भिंगाने, राजु मामा सोनवणे,विशाल सुरडकर,बाबा पंडित, संजय बोरगे, गुडू पंडित, राजु त्रिभुवन, मयूर एडके,संजय पटेकर, मोजेस चक्रनारायण, केदारी सर,शेलार सर, आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमाभाऊ बागुल यांनी केले तर आभार शहराध्यक्ष विजयभाऊ पवार यांनी मानले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर*
=============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



Tuesday, December 26, 2023

मालुंजाचे सरपंच अच्युतराव बडाख यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता
तालुक्यातील मालुंजा बु॥ चे सरपंच अच्युतराव बडाख यांना महाराष्ट्र सरपंच सेवा संघाच्या वतीने सन २०२३ सालचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार माजी आ.डॉ.सुधीर तांबे व सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
श्री.अच्युतराव बडाख यांनी सरपंचपदाचे कारकिर्दीत अनेक शासकीय योजना उत्कृष्टपणे राबविल्या आहे.
पंतप्रधान आवास घरकुल योजनेत ३० लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन तालुक्यात आदर्श मॉडेल बनविले आहे. तसेच नळपाणी पुरवठा, पाण्याची टाकी, कृषि बंधारे, पेव्हिंग ब्लॉक व सिमेंट काँक्रीट रस्ते, भूमिगत गटार योजना, अंगणवाडी इमारती, तलाठी कार्यालय इमारत, ग्रामपंचायत कार्यालय इमारत, सौरदीप, महिलांसाठी मसाला मेकींग कोर्स, ३५ महिला बचत गट स्थापना आदी विकासात्मक योजना प्रभाविपणे राबविल्या. तसेच त्यांचे कार्यकाळात महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार, पर्यावरण समृद्धी ग्रामयोजना पुरस्कार, संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार, आरोग्य विभाग पुरस्कारही गावास मिळालेले आहे. तसेच श्री.बडाख यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शेतकरी पुरस्कार मिळालेले असून त्यांचा सामाजिक व धार्मिक कार्यात मोठा सहभाग आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रास्तारोको, उपोषण, घेराओ आंदोलने करुन जनतेचे प्रश्न सोडविले आहे. या सोहळ्यास उपसरपंच रावसाहेब शेंडगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबुराव बडाख, सोसायटीचे माजी चेअरमन हरिभाऊ बडाख, संजय बडाख, वसंतराव कलंके आदी उपस्थितीत होते.
श्री.अच्युतराव बडाख यांचे अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे, व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, शहर अध्यक्ष नाना पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*♥️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

नेहमीच अनेकांना प्रसिद्धी ! देत जातो !!अन् प्रसिद्धी देणाराच उपेक्षित राहतो !!! 💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रसिद्धी पावणारे या उपेक्षित
घटकांचा विचार करणार का ?

यथाशक्ती जाहिरात स्वरुप कधी
मदतीचा हात पुढे धरणार का ?

हल्ली विविध डिजिटल प्रसार माध्यमे मोठ्या प्रमाणात आगेकुच करत आहे,त्यात दैनिके, सांयदैनिके,साप्ताहिक पाक्षिक, मासिके वर्तमानपत्रांसोबत ईपेपर्स/ न्यूज पोर्टल्स/स्थानिक वृत्त वाहिन्या / वेब पोर्टल्स अशी अनेक प्रसार माध्यमे ही मार्केट मध्ये प्रचंड प्रमाणात आगेकुच करत असताना आजच्या युगात क्षणात जगाची खबर- बातमी मानसाला आपल्या मोबाईलवर प्राप्त होत आहे.
मात्र विविध प्रसार माध्यमातून मोबाईलवर आलेल्या बातम्यांमध्ये जी सत्यता असते ती इतर व्यक्तीगत कोणी व्यक्तीश: टाकलेल्या बातम्यांत नसते,त्यावर विश्वास करुन खरे मानण्यात अर्थही नसतो,
कारण शासनमान्य नोंदणीकृत प्रसार माध्यमांना जबाबदारी असते म्हणून ते जबाबदारीनेच वृत संकलित आणि प्रकाशित करतात,याकरीता कधीही प्रिंट मिडियातील (प्रिंट केलेले वर्तमानपत्र) सत्यता ही परिपूर्ण मानली जाते, शिवाय अधिकृत न्यूज
 पोर्टल्स आणि अधिकृत वृत्तवाहिन्या / वेब पोर्टल्स
 हे देखील विश्वास पात्रच असतात.
मात्र ती अधिकृत तथा नोंदणीकृत असली पाहिजेत,याकरीता कोणतेही आपल्या आवडीचे वर्तमानपत्र आपण दररोज सकाळीच खरेदी करुन जरुर वाचावेच शिवाय आपल्या परिवारातील सदस्यांनी देखील वाचावयास सांगावे, यामुळे बातम्यांची सत्यता कळते सोबत वाचन संस्कृती
 वाढतेच वाढते आणी वाचन क्षमताही वाढते हे
 खुपच महत्वाचे आणी गरजेचे आहे.
तसेच आपल्या हक्काचे स्थानिक प्रसार माध्यमे आणि पत्रकार, संपादक हे आपल्या विविध विषयांकीत स्थानिक विविध सामाजाभिमुख उपक्रमाच्या आगदी ताज्या आणि फ्रेश बातम्यांना तात्काळ प्रसिद्धी देतात,आहोरात परिश्रम घेत नेहमी सर्वांच्या बातम्या आपल्या विविध प्रसार माध्यमाद्वारे प्रकाशित करुन सर्वांना मोठे करण्यासाठी तथा सर्वांना न्याय देण्यासाठी कायम सेवातत्पर असतात, मात्र हे सर्व करत असताना कोणीच त्यांच्या प्रसार माध्यमांना स्वतः हुन जाहिरात स्वरुपी सहकार्य करण्यास पुढे धजावत नाही,
जसे प्रत्येकाचे बातम्या आणि फोटो प्रसार माध्यमातून तात्काळ झळकावे अशी इच्छा,अपेक्षा बाळगणारे कधी त्या प्रसार माध्यमांसाठी लागणाऱ्या साधन सामग्री करीता जाहिरात स्वरुप मदतीचा हात पुढे करतांना मग का म्हणून कमी पडतात ?
का स्वतः हुन समजून घेत नाही की सदासर्वदा आपल्या विविध विधायक कार्यांच्या बातम्या या
 संबंधीत प्रसार माध्यमे विनामूल्य प्रकाशित करतात
 तर आपणही जरासं मोठं मन करत त्या प्रसार माध्यमांकरीता यथाशक्ती जाहिरात स्वरुपी कधी मदतीचा हात पुढे धरण्यात का मागे सरतात ?, 
याबाबत साधा विचार देखील करण्यास कोणी तयार नसेलतर मग अनेकांना आपल्या प्रसार माध्यमाद्वारे प्रसिद्धी देणारा हा जो महत्वाचा घटक आहे तो उपेक्षित नव्हेतर काय असु शकणार? म्हणून तर वरील प्रमाणे म्हणावेसे वाटते की 'नेहमीच अनेकांना प्रसिद्धी देत जातो, अन् प्रसिद्धी देणाराच उपस्थित
 राहतो, असे म्हटल्यास गैर ते काय?
आता सन २०२३ ला आपण गुडबाय करत सन २०२४ या नुतन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत,बऱ्याच शाळा, महाविद्यालयात वार्षिक संमेलने, तर कोणाचे दिनदर्शिका प्रकाशने, कोणाला राज्यस्तरीय पुरस्कार तर कोणाची विशेष निवड आदी विषयांकीत बातम्यांसोबत आपला फोटोही चांगल्या प्रकारे आणि उत्तमरित्या प्रसार माध्यमातून झळकावा,आपली सर्वत्र वाह.. वा..व्हावी, अशी प्रत्येक मान्यवरांची रास्त इच्छा असणे तसे स्वभावीकच मात्र ज्या प्रसार माध्यमातून हे ठळकपणे झळकणार आहे,त्याचाही विचार कधी कोणी करणार का? त्या प्रसार माध्यमास जाहिरात स्वरुपी मदतीचा हात पुढे धरणार का?, जर आपण आपल्या हक्काची प्रसार माध्यमे आपण मानत असाल तर आपलंही कर्तव्य बनतं की आपण आपल्या हक्काच्या प्रसार माध्यमांना वर्षाकाठी का असेना किमान एखादी हजार रुपयांची तरी जाहिरात स्वरुपी मदत करावी, ज्यामुळे त्या प्रसार माध्यमांच्या वार्ताहर, संपादक मंडळास आर्थिक पाठबळ मिळाल्याने ते देखील सक्षम आणि पॉवरफुल होतील तथा मग आपली बातमी देखील अग्रक्रमाने पहील्या पानावर घेतील. अधिकृत याकरीता स्थानिक वर्तमानपत्र/ न्यूज पोर्टल्स,वेब पोर्टल्स, स्थानिक वृत्तवाहिन्या आदिंच्या पत्रकार/संपादकांना त्यांनी न मागता आपण स्वतः हुन आपल्या जवळच्या आणि आपल्या हक्काच्या प्रसार माध्यमास जाहिरात स्वरुप मदत करणे हे आपले देखील कर्तव्यच आहे.
यामुळे आपले आपसातील स्नेह अधिक वृद्धिंगत होतील आणि आपली बातमी विनाविलंब प्रकाशित देखील केली जाईल. करीता याबाबी विचार व्हावा ही माफक अपेक्षा.


=================================
-----------------------------------------------
आपला  - *शौकतभाई शेख*
----------------------------
संस्थापक अध्यक्ष✍️✅🇮🇳...
स्वाभिमानी संपादक सेवा संघ (महाराष्ट्र प्रदेश)
श्रीरामपूर - मोबा: *9561174111*
----------------------------------------------
=================================


अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापण आणि मूल्यमापन प्रशिक्षण उत्साहात संपन्न💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
नवीन शासकीय धोरणानुसार महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परिषद पुणे यांचेमार्फत श्रीरामपूर येथील डी. पॉल इंग्लिश मेडीयम स्कूल येथे पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापण मूल्यमापन या विषयावर पाच दिवशींय प्रशिक्षण संपन्न झाले.विद्यार्थ्यावर होणाऱ्या संस्कारांत शिक्षकांचा वाटा मोठा असतो. शिक्षकाच्या आचारविचारांचा प्रभाव संस्कारक्षम विद्यार्थ्यावर होत असतो.अध्यापकाची प्रतिष्ठा बऱ्याच अंशी त्याच्या विविध प्रकारच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्या बाबतही अनेक प्रकारचे संशोधन अलीकडे झाले आहे.जे विषय शिकवावयाचे त्यांवर उत्तम प्रभुत्व, ते विषय विद्यार्थ्यांना समजावून देण्याचे कौशल्य, स्वत:चा व्यासंग अद्ययावत ठेवण्याची धडपड, अध्यापनसाधनांचे ज्ञान व त्यांचा कौशल्यपूर्ण उपयोग करण्याचे सामर्थ्य अध्यापकामध्ये अद्ययावत असावे म्हणून प्रशिक्षण फार महत्त्वाचे असते. तिसऱ्या कुलातील राज्यस्तरीय प्रशिक्षित शिक्षक संजय वाघ ,शाकीर शेख आणि अमोल कल्हापुरे यांनी उत्तम प्रकारे प्रशिक्षणार्थी बांधवांना प्रशिक्षण दिले. यावेळी पंचायत समिती श्रीरामपूरच्या गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी ,जिल्हा विस्तार अधिकारी रमजान पठाण, ज्ञानेश्वर कलगुंडे,संजीवन दिवे, केंद्रप्रमुख अशोक विटनोर,आणि राजू इनामदार, यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात मनोरंजक खेळ, उपक्रम घेण्यात आले आणि आव्हान पुस्तिका पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रशिक्षणातील सर्व उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल स्कूल क्र.३ मधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुरणपूर येथील उपक्रमशील शिक्षक श्री.शेख यांच्यासह घोगरे,काजल आसने,आणि संगीता उंडे यांचा ,आदर्श अध्ययनार्थी
 म्हणून विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रशिक्षित तज्ज्ञांबरोबर अहमदनगर जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष प्रदीप दळवी, ईब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय काटकर, सय्यद नसीर,राजेंद्र खरात,सुनील बागुल,अजय ओहोळ, निलेश कंगे,किशोर गायकवाड,संदीप अत्रे,ज्ञानदेव
 मोरे,सतीश आल्हाट,अविनाश साठे,मेहरखाम्ब,आदी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी विषयतज्ञ शाहीन शेख, दातीर, इरफान शेख,बाचकर,बागुल, शेंडगे,आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव*
==============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================