राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, January 23, 2024

कटकेवाडी चौकात स्थानिक ग्रामस्थांकडून सकल मराठा आंदोलकांकरीता भव्य अन्नदान


पुणे (वाघोली) प्रतिनिधी
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला गरजवंत मराठ्यांचा आरक्षणाचा लढा हा २३ जानेवारी रोजी मुंबईकडे जात असताना वाघोली (पुणे) येथे आगमन होताच. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जेवणाची, अन्नदानाची स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी, कटकेवाडी, रामनगर , गाढेवस्ती येथील सर्व तरुण सकल मराठा बांधवांनी एकत्र येऊन मुंबईकडे जाणाऱ्या सर्व आंदोलक सकल मराठा बांधवांकरिता जेवणाची , पाण्याची व्यवस्था कटकेवाडी चौकात अतिशय नियोजनबद्ध केली. येथील सर्व तरुण युवकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत नियोजन केले होते.यासाठी सर्व नियोजक तरुण वर्गांकरिता देखील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
==================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

श्रमसंस्कार ही आयुष्य घडविण्याची गुरुकिल्ली - ॲड. शरद सोमाणी


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
युवा अवस्थेतील श्रमसंस्कारामधून आयुष्याची जडणघडण होते. राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांनी शिबिर कालावधीत गावाचा जो विकास केला, त्याला तोड नाही. असेच देश उपयोगी कार्य आयुष्यात झोकून देऊन करा. त्यामुळेच प्रत्येक युवकाचे श्रमसंस्कार हे आयुष्य घडविणारी गुरुकिल्ली ठरेल असे प्रतिपादन बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲड.शरद सोमाणी यांनी केले.

 बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या तालुक्यातील उंबरगाव येथील विशेष शिबिराच्या सांगता समारंभामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उंबरगावचे उपसरपंच डॉ. नंदकिशोर काळे, सौ. कावेरी काळे, विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन अशोक बर्गे ,बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकनाना साळुंके तसेच पदाधिकारी अॅड विजय साळुंके प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, कार्यक्रमाधिकारी प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. रूपाली उंडे, प्रा. डॉ. बाबासाहेब पवार, प्रा. अशोक थोरात, प्रा. प्रकाश देशपांडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ .संजय नवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना ॲड.सोमाणी म्हणाले की, युवकांनी श्रमदानाबरोबरच विविध योजनांच्या सहाय्याने गावांचा विकास करावा.युवकांनी समाजाचे विविध अंगी प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येणे ही आजच्या काळाची गरज आहे. ॲड.विजय साळुंके, डॉ. नंदकिशोर काळे,अशोक बर्गे, डॉ गुंफा कोकाटे आदींनी शिबीरार्थींना मार्गदर्शन केले.सदर श्रमसंस्कार शिबिरामध्ये श्रमदानातून ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, धार्मिक स्थळांची स्वच्छता, ग्राम सर्वेक्षण, लोकसंख्या नियंत्रण व पर्यावरण जनजागृती, शिवार फेरी विषयी रॅली, तसेच विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने झाली.

यावेळी सारिका थोरात, प्रतीक माळी, प्रतीक्षा माळवदे, ज्ञानेश्वरी भांड आदी शिबिरार्थी स्वयंसेवकांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी वाडकर हिने केले तर आभार प्रा. डॉ.बाबासाहेब पवार यांनी मानले. सदर शिबिर यशस्वीतेसाठी उंबरगाव च्या सरपंच सुप्रियाताई भोसले, विराज भोसले , सोसायटीचे चेअरमन रवींद्र झरेकर तसेच विजय वारुळे, राजेंद्र मोहोळ ,नारायण कोळसे, तलाठी अशोक थोरात ,ग्रामसेवक रितेश ढुमणे, मुख्याध्यापिका कांबळे मॅडम सोमनाथ बारवकर, डॉ.शिल्पा थोरात, बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजेश खटोड,भरत साळुंके,रविंद्र खटोड व समस्त पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, संदेश शाहीर,रामेश्वर पवार सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी व उंबरगावचे ग्रामस्थ आदींनी अनमोल सहकार्य केले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


Monday, January 22, 2024

शिरसगांव येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळानिमित्त महाआरती व मिरवणूक उत्साहात संपन्न


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव येथे अयोध्यात होणाऱ्या श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतभर प्रभू श्रीराममय वातावरण दि २१ व २२ जानेवारी रोजी होत असल्याने शिरसगांव येथेही रविवारी सायंकाळी ५ ते ७ वाजता भव्य कलश मिरवणूक फटाक्यांची आतषबाजी करीत सवाद्य भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली त्यात शिरसगांवचे सर्व पुरुष महिला, बालके मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महिलांनी डोक्यावर कलश घेतले होते.विठल मंदिरात दिपोत्सव साजरा झाला. त्याचप्रमाणे सोमवार दि.२२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्रीराम प्रतिमेची भव्य मिरवणूक गावातून काढण्यात आली. दुपारी १२ वाजता महाआरती सरपंच राणी वाघमारे,उपसरपंच संजय यादव, निलेश यादव,गणेश मुद्गुले , गणेश वाघ,या दांपंत्याचे हस्ते करण्यात आली.त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला..या आनंदमय सोहळ्यात सर्व ग्रामस्थ,सहभागी झाले होते.हा सोहळा यशस्वीतेसाठी अध्यक्ष श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार योजना, गणेशराव मुदगुले,सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, अशोकराव पवार, बापूसाहेब काळे,सुरेश मूदगुले आदी मान्यवर व सर्व ग्रा .प. सदस्य, शिरसगाव ग्रामस्थ,भजनी मंडळ, यांनी परिश्रम घेतले.


=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी .आर.चेडे - शिरसगांव*
=================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

भूमी फाउंडेशनच्या वतीने सिको टूल्स आणि डेल्फिनगन कंपनी राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित


- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या शुभहस्ते व संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांच्या मुख्य संकल्पनेतून लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास हे ब्रीद वाक्य घेत २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती दिनी असंख्य सेवाभावी लोकांना सोबत घेऊन स्थापित भूमी फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य

 ही सामाजिक संस्था गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात,ग्रामीण भाग विकास ,विधवा निराधार महिला, अनाथ निराधार मुली , शेतकऱ्यांच्या गरजू मुलींकरिता उत्कृष्ट कार्य करीत आहे.तसेच भूमी फाउंडेशन या सामाजिक

 संस्थेच्या चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था
 राज्यभरातून दोन कंपन्यांची निवड करीत असते.
यावर्षी भूमी फाऊंडेशन च्या चौथ्या वर्धापनदिनी पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात सेको टूल्स इंडिया कंपनी आणि डेल्फिनगन कंपनी या दोन पुण्यातील

 कंपन्यांना उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्कार देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.तसेच भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने देखील या दोन्ही कंपन्यांच्या सर्व व्यवस्थापकांचे अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच याप्रसंगी व्यवस्थापकांनी देखील भूमी फाउंडेशनचे सामाजिक कार्य पुढे घेऊन जाण्याचे साठी सदैव आमचा सहभाग आम्ही देण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
==================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


अनुश्री इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये खेळाच्या स्पर्धा संपन्न


पुणे,वाघोली प्रतिनिधि वार्ता
 स्वलक्ष एज्युकेशन सोसायटीचे अनुश्री इंग्लिश मीडियम स्कूल लोणीकंद पुणे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव ढगे तसेच सचिव स्वप्निल ढगे, हर्षल ढगे आणि प्राचार्य पूजा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांचा शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक सर्वांगीण दृष्ट्या विकास व्हावा या मुख्य उद्देशाने शाळा अंतर्गत भव्य खेळाची स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी गटा प्रमाणे घेण्यात आली.सदर स्पर्धेमध्ये विजयी ठरलेल्या गटाला मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षीस देण्यात आले.या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून स्वप्निल ढमढेरे तसेच भूमी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कैलास पवार, संस्था सचिव हर्षल ढगे, पत्रकार गव्हाणे ,प्राचार्य पूजा मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पालकांची देखील मोठी उपस्थिती लाभली.या उपक्रमाला क्रीडा शिक्षक तसेच बडे सर,आनंद कवठे आणि सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत कान्हेगांव शाळेचा प्रथम क्रमांक


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
तालुक्यातील पढेगांव येथे झालेल्या केंद्रस्तरीय विविध गुण दर्शन स्पर्धेत कान्हेगांव शाळेने केंद्रात सर्वाधिक बक्षीसे मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
वक्तृत्व स्पर्धा-किलबिल गट -प्रथम क्रमांक-रुची प्रदिप खरात

बालगट-पूर्वा प्रकाश खरात-द्वितीय क्रमांक
वेशभूषा सादरीकरण-बालगट -ईश्वरी प्रमोद खरात-
 प्रथम क्रमांक
किलबिल गट-स्वरा योगेश खरात-तृतीय क्रमांक
हस्ताक्षर स्पर्धा- बालगट-विश्वजित अशोक चौधरी प्रथम क्रमांक

वैयक्तिक गीतगायन-किलबिल गट-स्वरा योगेश खरात -तृतीय क्रमांक
बालगट-आश्लेषा सचिन खरात-तृतीय क्रमांक
कथा सादरीकरण स्पर्धा-बालगट-कुमार अरुण
 खरात-द्वितीय क्रमांक

सांस्कृतिक कार्यक्रम -बालगट-प्रथम क्रमांक
समूहगीत गायन-बालगट-तृतीय क्रमांक
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका श्रीमती रेहाना मुजावर, मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्री.राजू इनामदार, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मंगल गायकवाड, गटशिक्षणाधिकारी श्रीमती साईलता सामलेटी तसेच कान्हेगांव ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


संगमनेर शहरातील महाळुंगे नदीपात्रात असलेले गोरगरिबांच्या घरा वर प्रशासनाचा बेकायदेशीर हातोडा रहिवाशांचा गंभीर आरोप...


- संगमनेर - प्रतिनिधि - / वार्ता -
संगमनेर मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरातील अकोले रोड राजापूर रोड महाळुंगी नदी पात्रात असलेले रस्त्यालगत असलेले झोपडपट्टी प्रशासनाने स्थलांतरासाठी कोणती पूर्व सूचना न देता बेकायदेशीरपणे हातोडा चालवण्याचा आरोप

 तेथील रहिवाशांनी केला आहे नेमकं प्रशासनाने अशी भूमिका का घेतली हे अजून स्पष्ट झालेले नाही मात्र संगमनेर शहरातील मोठे मोठे अतिक्रमणाची झेंडे आजुनही प्रशासनाला दिसत नसल्याचे चिन्ह या घडलेल्या दुश्या वरून लक्षात येत आहे

 झोपडपट्टीत राहणारे सर्व हातावरचे व मजुरी करणाऱ्या आहेत प्रशासनाने कोणती पूर्व सूचना न देता घरात झोपलेले लहान लहान मुलं तसेच संसार उपयोगी वस्तूचा कोणतेही निपटारा करण्याची संधी न देता आपल्या अधिकार व पदाचा गैरवापर करून थेट हातोडा चालवलाय असा आरोप देखील स्थानिक झोपडपट्टी धारकानी केला आहे

स्थानिक झोपड वाशी यांनी स्थलांतरासाठी आम्हाला वेळ द्या यासाठी प्रशासनाकडे विनंती देखील केली मात्र प्रशासनाने आपल्या बळाचा वापर करत तेथील रहिवाशांवर मारहाण देखील केलेली असल्याचे सांगितले आहे तसेच त्या ठिकाणी राहाणाऱ्या रहिवाशांनी न्यायामिळवण्या साठी संगमनेर न्यायालयात दाद मागितल्याचे आमच्या प्रतिनिधी याना सांगितले आहे

=================================
-----------------------------------------------
:- मुज्जफर शेख - शब्द - रचना संकलन...✍️✅
🇮🇳 +919881354577
-----------------------------------------------
=================================