राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, January 23, 2024

कटकेवाडी चौकात स्थानिक ग्रामस्थांकडून सकल मराठा आंदोलकांकरीता भव्य अन्नदान


पुणे (वाघोली) प्रतिनिधी
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला गरजवंत मराठ्यांचा आरक्षणाचा लढा हा २३ जानेवारी रोजी मुंबईकडे जात असताना वाघोली (पुणे) येथे आगमन होताच. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात जेवणाची, अन्नदानाची स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने व्यवस्था करण्यात आली. त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी, कटकेवाडी, रामनगर , गाढेवस्ती येथील सर्व तरुण सकल मराठा बांधवांनी एकत्र येऊन मुंबईकडे जाणाऱ्या सर्व आंदोलक सकल मराठा बांधवांकरिता जेवणाची , पाण्याची व्यवस्था कटकेवाडी चौकात अतिशय नियोजनबद्ध केली. येथील सर्व तरुण युवकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेत नियोजन केले होते.यासाठी सर्व नियोजक तरुण वर्गांकरिता देखील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
==================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment