( मुंबई ) वार्ता जबरी चोरी आदी विविध गुन्ह्यांची उकल करून कुख्यात टोळ्या जेरबंद करणाऱ्या पाच पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते डिसेंबर, महिन्यातील उत्कृष्ट उकल' चा (बेस्ट डिटेक्शन) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात काशिमीरा, वालीव ठाणे तसेच गुन्हे शाखा १, २ आणि ३ च्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दर महिन्याला उत्कृष्ट तपास करून गुन्हयांची उकल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते 'उत्कृष्ट उकल'चा पुरस्कार देण्यात येतो. नायगावमधील स्टार सिटी येथे २० डिसेंबरला सुनील तिवारी या मूकबधिर व्यक्तीची हत्या झाली होती. गुन्हे शाखा २ आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने तांत्रिक विश्लेषण करून पुरावा नसताना आरोपी यशवर्धन झा वाला अटक केली. चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
शाहूजी रणावरे तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख यांना उत्कृष्ट तपासासाठी गौरविण्यात आले.
त्याचबरोबर १९९४ मध्ये पेणकरपाडा येथील राजनारायण प्रजापती यांच्या पत्नी आणि तीन मुलांची हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखा १ च्या पथकाने २८ वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा छडा लावला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी काल्या ऊर्फ राजकुमार हा परदेशात पळून गेला होता. त्याचा माग काढून मुंबई विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली.
शाहूजी रणावरे तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल राख यांना शाखा १ चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुन्हाडे यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात आले.
वालीव पोलिसांनी महामार्गावरून रक्तचंदनाची चोरटी तस्करी उघडकीस आणली. पोलिसांनी कारवाई करून एक ट्रक अडवला आणि नऊ कोटी ६१ लाख रुपयांचे रक्तचंदन जप्त केले. आजवरची ही सर्वात मोठी कारवाई होती. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांना गुन्हयाची 'उत्कृष्ट उकल' केल्याप्रकरणी गौरविण्यात आले.
मोबाइल चोरणारी टोळी जेरबंद
मोबाइल चोरणारी टोळी जेरबंद
काशिमीरा पोलिसांनी मोबाइल चोरी करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात यश मिळवले होते. ही टोळी विविध प्रकारे नागरिकांचे मोबाइल लंपास करत होती. या
१७ चीजकल पोलिसानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय
हजारे यांना या कार्याबद्दल गौरविण्यात आले.
शहरात गाड्यांच्या काचा तोडून महागड्या 'म्युझिक सिस्टीम' चोरणारी टोळी सक्रिय झाली होती. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने या टोळीचा छडा लावला आणि तिघांना लागून अटक केली. या टोळीकडून चोरलेले ३० कार टेप आणि एकूण १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण् करण्यात आला. गुन्हे शाखा ३ चे प्रमुख प्रमोद बडाख यांना याप्रकरणी उत्कृष्ट उकल केल्याबद्दल गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment