राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, February 11, 2023

शासकीय कोविड सेंटरची चौकशी करा भारतीय जनता पक्षाची मागणी ?

पारनेर तहसीलदारांना निवेदन अनुदान प्रकरणांबाबतही लक्ष निदर्शनिष सादर
( अहमदनगर ) -वार्ता - ता : पारनेर येथिल कोरोना काळातील पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरची चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्याकडे केली आहे.पारनेर, सुपा, भाळवणी व खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा येथे कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये शासकीय कोविड सेंटर सुरू करण्यात आले होते. या कोविड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या सर्व कोविड सेंटर्सची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यातील प्रलंबित रेशनकार्ड, अनुसूचित जाती, जमातीचे दाखले, संजय गांधी प्रकरणे मागील एक वर्षापासून प्रलंबित आहेत. याबाबतपारनेर कोरोना काळातील पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरची चौकशी करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकत्यांनी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्याकडे केली आहे.ज्येष्ठ नेते बाळासाहेब पठारे यांनी प्रश्न उपस्थित केले. पिंपळनेर ते कुरूंद हा शिवरस्ता खुला करावा.हा रस्ता रहदारीचा असून शेतकरी बांधवांसाठी दळणवळणासाठी तो महत्त्वाचा आहे. पी. एम. किसान योजनेत नव्या लाभार्थ्यांना सामावून घेणे, पाणंद रस्ते खुले करणे, उतारे दुरुस्त करणे, जुन्या रेशनकार्डमधून विभक्त झालेल्यांची नावे कमी करणे
आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी तालुकाध्यक्ष वसंत चेडे, भाजपाच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे, राहुल शिंदे, बाळासाहेब पठारे, शिवाजी खिलारी, पंकज कारखिले, रघुनाथ आंबेडकर, सागर मैड, सतीश म्हस्के, लाभेश औटी, दादाभाऊ वारे, गंगाराम कळमकर, गजानन सोमवंशी, विलास झावरे, दत्ता
पवार, डॉ. साहेबराव पानगे, दिलीप पारधी, सुनील सोबले, सुरेश काळे, मनोज मुंगसे, आनंदाराव राजेविलास काळे, निवृत्ती वरखडे, गोरक्ष पठारे, सुखदेव कारखिले, दीपक कारखिले, शिवाजी भापकर, वसंत चौधरी, अनिल दिवटे, तुषार पवार, तुळशीराम गायकवाड, विवेक ढवण यांच्यासह इतर भाजपा चे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
















No comments:

Post a Comment