(अहमदनगर) - विशेष - वार्ता - केडगाव बायपास येथील हाॅटेल के 9 समोरील एका बंद ढाब्याजवळ एका ४० वर्षीय व्यक्तीची डोक्यात गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. शिवाजी किसन ऊर्फ देवा होले (रा. कल्याण रोड, नगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अरुण नाथा शिंदे (वय -४५) यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हंटले आहे की, दि.२३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास केडगाव शिवारातील केडगाव बायपास रोडवर हॉटेल के ९ जवळ एक बंद ढाब्याजवळ मी व शिवाजी होले असे अंधारात दारु पित बसलेलो असताना केडगाव बायपास रोडकडुन दोन अनोळखी इसम हे आमच्या जवळ पायी चालत आले व आम्हाला म्हणाले की, आम्ही येथे दारु पिवु का? त्यानंतर आम्ही त्यांना म्हणालो आम्ही नेप्तीचे आहोत तुम्ही बिनधास्त बसुन दारु प्या.
त्यानंतर ते दोघे आम्हाला काही एक न बोलता केडगाव बायपास रस्त्याकडे जावुन पुन्हा त्याच रस्त्याच्या बाजुने त्या दोन अनोळखी इसमांसोबात आणखी एक इसम आला. त्यातील एका इसमाच्या हातात चाकु व दुसऱ्या इसमाच्या हातात पिस्तूल होती. त्यातील एका इसमाने
माझ्या गळयाला चाकु लावुन तुमचे खिशातील पैसे काढा असे म्हणाला. त्याचवेळी माझ्या सोबत असलेला शिवाजी होले हा त्यांना म्हणाला की, तुम्ही आम्हाला नडता का असे म्हणुन तो रस्त्याकडे पळला. त्यानंतर त्या तिघांपैकी एकाने त्यांच्या हातात असलेले पिस्तूलने
शिवाजी होले याचे दिशेने गोळी फायर केली. यात शिवाजी होले यांचा मृत्यू झाला. तसेच मला खाली पाडुन मानेला चाकु लावुन बळजबरीने तीन हजार रुपये रोख रक्कम, मोबाईल काढून डोळयात मिर्ची पावडर फेकुन ते अनोळखी तीन इसम केडगाव बायपास रस्त्याचे दिशेने पळुन गे
दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास यंत्रणा तात्काळ शोध करत आहे.
No comments:
Post a Comment