( कोपरगाव ) - वार्ता - जि अहमदनगर, कोपरगाव ता. येथिल तहसीलदारांनी ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे साडेपाच वाजता पोहोचून रुग्णालयातील परिचारिका व तेथील कर्मचाऱ्यांशी असभ्य गैरवर्तन करुन तेथे उपस्थित परिचारिकेच्या तसेच रुग्णाच्या नातेवाईक मुलीच्या देखीलसंताप जनक प्रकार केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे समजते.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत परीचारिकेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामिण रुग्नालय कोपरगाव येथे रात्र पाळी डयुटीस आसताना आरोपी तहसीलदार विजय बोरुडे हे अवेळी दारू पिऊन येऊन फिर्यादीस तुमचे मेन अधिकारी कोण आहेत. असे म्हणुन फिर्यादिने दिलेला डयुटी तक्ता फेकून देऊन वैद्यकीय अधिकारी यांना फिर्यादीचे फोन वरून शिवीगाळ करून फिर्यादीचे सोबत डयुटीस असलेला कक्ष सेवक सचिन टोंबरे यांना दवाखाण्याच्या बाहेर काढून दिले व फिर्यादीस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्या नंतर तेथे असलेले पेशंटची नातेवाईक मुलगी हिला आवाज देऊन तीला जवळ बोलून शिवीगाळ करत हॉस्पीटल बाहेर निघुन गेले आहे. असे सर्व घडल्याला प्रकार सांगितले आहे
No comments:
Post a Comment