राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, February 12, 2023

राजापूर जिल्हा रत्नागिरी मध्ये घडल्याला हत्याचा प्रकार ( पेन ) येथे पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या हत्येच्या निषेधार्थ पत्रकारांचा निषेध मोर्चा ?

( नवि मुंबई ) - वार्ता - समाचार - राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे घडल्याले हत्याचे प्रकार संदर्भ :पेण समाजात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या चौथ्या स्तंभाचा आवाज दाबला जात आहे. पत्रकारांवर हल्ले करत खोटे गुन्हे दाखल करण्याच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पत्रकारांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यभरात पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटना सुरू असतानाच रत्नागिरी राजापूरचे पत्रकार शशिकांत वारीसे यांची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली. सातत्याने वाढणाऱ्या घटनेने पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पत्रकार शशिकांत वारीसे यांची हत्या व राज्यभर वाढत असलेल्या पत्रकारांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पेण आणि कर्जत येथे काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला.
पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी यांच्या नेतृत्वाखाली ) तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांना वारीसे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याबाबत लेखी
 निवेदन देण्यात आले.
दरम्यान, उपस्थित सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून घोषणा देत या घटनेचा जाहीर निषेध केला. हा योगायोग नसून कट रचून केलेला खूनच आहे. याचा राज्यातील सर्व पत्रकारांनी तीव्र शब्दांत निषेध केला.
या घटनेची सुनावणी फास्ट ट्रैक कोटांमार्फत व्हावी आणि राज्यातील पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी महाराष्ट्रातील सर्व पत्रकार संघटनांसह पेण तालुक्यातील पत्रकारांनी केली आहे. राज्यातील पत्रकारांचा विविध मार्गाने आवाज बंद करण्याचा होत असलेला प्रयत्न पुरोगामी महाराष्ट्राला शोभा देणारा नाही.
- रायगड - कर्जत- प्रेस क्लबकडून देखील याचा निषेध नोंदवत खुनातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. वारीसे यांच्या मृत्यू प्रकरणाबाबत सर्व पत्रकार बांधवांनी एकत्र येत काळी फित बांधून याचा निषेध नोंदविण्यात आला. रायगड जिल्ह्यातील कर्जत प्रेस क्लबकडून घोषणा देत काळी फित बांधून शुक्रवारी कर्जत तहसील कार्यालयासमोर निषेध नोंदविण्यात आला, तर आरोपीवर कारवाई व्हावी, म्हणून नायब तहसीलदार सचिन राऊत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष संजय मोहिते, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख, ज्योती जाधव, दर्वेश पालकर, दीपक पाटील, गणेश पवार, मल्हार पवार, गणेश पुरवंत, ज्ञानेश्वर बागडे, जयेश जाधव यासह मोठया संख्येने कर्जत प्रेस क्लब व स्थानिक पत्रकार बांधव उपस्थित होते.





No comments:

Post a Comment