राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, February 5, 2023

, एसटीचा वाहन चालक तळीराम निघाला प्रवाशांनी भरलेली बस साईडला लावून धाब्यावर मध्येधुंद अवस्था करायला ?

( उस्मानाबाद ) - वार्ता - तल्लफ लागली दारू पिण्याची आल्यानं वाहकानं एसटी बस अचानक रस्त्याच्या कडेला थांबवली. त्यानंतर तो दारू पिण्यासाठी एका धाब्यावर गेला. त्यामुळे प्रवासी दोन तास अडकून पडले. एसटी वाहकामुळे प्रवाशांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला.
लातूर - लातूरहून कळंबला निघालेल्या बसच्या वाहकाला दारु पिण्याची तल्लफ आली. त्यानंतर त्यानं प्रवाशांनी
खचाखच भरलेली गाडी बाजूला लावली आणि दारू पिण्यासाठी धाब्यावर गेला. प्रवासी मात्र तब्बल दोन तास ताटकळत बसले. अखेर प्रवाशांनी दारूच्या गुत्त्यावर जाऊन वाहकाची गचांडी धरली आणि बस पुढे निघाली. ही घटना घडली लातूरपासून जवळच असलेल्या  वारेगाव  येथे घडली.
अखेर प्रवाशांनी बसमधून उतरून ग्रामस्थांकडे विचारपूस केली. तेव्हा कुठं वाहकाचा प्रताप कळला. हा वाहक गेल्या तीन दिवसांपासून अशाच प्रकारे बस साईडला लावून जवळच्या दारूच्या गुत्त्यावर दारू प्यायला जात असल्याचं प्रवाशांना समजलं आणि त्यांचा संताप अनावर झाला.
ग्रामस्थांच्या मदतीनं प्रवाशी थेट दारूच्या धाब्यावर पोहोचले. वाहकाला जाब विचारताच, 'माझ्या फोनची बॅटरी उतरली म्हणून आलो चार्ज करायला असं सांगू लागला. संतापलेल्या प्रवाशांनी त्याची गचांडी धरली आणि बसकडे आणले. तेव्हा कुठे चालकाने बस पुढे नेली. बेवड्या वाहन चालका मुळे प्रवाशांना तब्बल दोन ते अडीच तास उशीर झाला. तर काही प्रवाशांना तिकीट काढूनही दुसऱ्या वाहनाने जावे लागल्यानं आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.
सर्व एस टी महामंडळ च्या नियम शोभेल असें खरंच धाब्यावर बसून उल्लंघणं करून शिस्थ भंगकेल्याचनिदर्शनास प्रवाश्याना स्पष्ट दिसलें  स्वच्छ, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सेवा देण्याचा तसेच एसटीच्या सुस्थितीची आणि चालक-वाहकाच्या 'नो ड्रिंक'चा एसटी महामंडळाचा दावा यामुळे फेल गेला आहे. आता एसटी महामंडळ या वाहन चालकावर काही कारवाई करणार का असा विषय प्रकार उत्पन्न होत आहे.


No comments:

Post a Comment