( अह,नगर ) प्रतिनिधी नगर - पुणे रस्त्यावर दहशत सुपा येथे दोन तरुणांना मारहाण : पानटपरीची तोडफोड; गुन्हा दाखल
सुपा. नगर-पुणे रस्त्यावरील सुपा परिसरात काही तरुणांनी कोयता, लाकडी दांडक्याने राडा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दोघा युवकांना काही तरुणांनी रविवारी (दि.५) मध्यरात्री दीडच्या सुमारास मारहाण केली. अहोरात्र वाहतुकीची वर्दळ असणाऱ्या गावातच गुन्हेगारीने लक्षण वर काढण्यास सुरुवात केल्याने जनसामान्यांच्या संरक्षणाचा शांतता भंग झाल्याचा विषय : निर्माण झाले आहे.
काही तरुणांनी कोयता व लाकडी दांडके घेऊन शिवीगाळ करत दोन युवकांना मारहाण करत जखमी केले.
त्यांनी आरडाओरडा केल्याने इतर लोक जमा होऊ लागल्यावर मारहाण करणारे दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने पळून गेले. याबाबत समीर सय्यद (रा. सुपा) याने सुपा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली
नगर-पुणे रस्त्यावरील दरवेश हॉटेलजवळ असणाऱ्या पान दुकानाजवळ काही तरुण थांबले होते.
ते तेथे जवळच लघुशंका करू लागले. तेव्हा पान दुकानावरील समीर सय्यद याने त्यांना 'तुम्ही येथे लघुशंका करू नका, येथे समाजमंदिर आहे' असे सांगितले. यावरून ते तरुण व स्थानिक युवकांत तोल बोल झाल. त्यावेळी तो कैफ मण्यार नावाचा तरुण शिवीगाळ करत पुण्याच्या दिशेने निघून गेला. अर्ध्या तासाने कैफ मण्यार सहकाऱ्यांसह तेथे आला. त्यांच्या हातात कोयता व लाकडी दांडके होते. त्यांनी पान दुकानाची तोडफोड केली. दुकानातील समीर सय्यद व साजीद शेख यांना लाकडी दांडके व कोयत्याने मारहाण करून जखमी केले.
समीर व साजीदच्या आवाजाने जवळचे लोक मदतीसाठी धावले. त्यानंतर मारहाण करणारे पळून गेले. जखमी साजीद शेख यास उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
कैफ मण्यार व इतर ५ ते ६ जणांविरुद्ध सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment