( महाड ) - वार्ता - माध्यमातून मिलीजुली सरकारचा खेळ सुरू आहे. लोकांच्या मतांतून सरकार बनत नसून,ते ईव्हीएमच्या माध्यमातून होत आहे. असे खुले संभ्रम वक्त करण्यात आले एकंदर ईव्हीएमने मतदारांचा अधिकारच हिरावून घेतल्याची टीका बामसेफचे राष्ट्रीय
अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केली आहे. तसेच याविरोधात बामसेफद्वारे जनआंदोलन उभे करून म भारत बंद केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मेश्राम यांनी नुकतीच महाडमध्ये व भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन केले. यावेळी त्यांनी भेटीचा हेतू स्पष्ट करताना स ईव्हीएमविरोधात भंडाफोड परिवर्तन यात्रा आंध्र प्रदेशपर्यंत काढली होती.
यंत्रानाच्या मध्येमातून मतमोजणी का नाही
ईव्हीएमबरोबर पेपरटेल यंत्रातील मतमोजणी का होत नाही, असा सवालही मेश्राम यांनी उपस्थित केला आहे. तसेच घटनेने दिलेल्या मताच्या अधिकारासाठी आपला लढा अखंडपणे सुरू राहील, असेही मेश्राम म्हणाले.
ई व्ही एम विरोधात जनजागृती अभियान
मात्र, कोविडमुळे यात्रा रद्द केली होती. त्यानंतर कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत दुसरी परिवर्तन यात्रा काढण्यात आली. मात्र, तीदेखील पोलिस परवानगीसाठी थांबविण्यात आली. त्यामुळे यापुढे करण्यासाठी ६७४ जिल्ह्यांत रॅली काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मेश्राम यांच्यासमवेत नथुराम हाटे, सुभाष मोहिते, अशोक सकपाळ, अब्दुल्ला देशमुख, अमीर डांगे, लबडे रमेश पवार, संजीवन तांबे, रफीक नाना अंबावले, आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment