( ANI ) News Riportings,Ejancy समाचार.
आता औरंगाबादसाठी आमच्या शक्तीप्रदर्शनाची वाट पाहा. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव नामातंर करण्यास केंद्राने मंजुरी दिली. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे या निर्णयाचे राजकीय पदसाद उमटायला सुरूवात झाली आहे. एमआयएमने (Aimim) या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. जी-२० परिषदेच्या दरम्यानच आंदोलन करून भाजपचे घाणेरडे राजकारण जगासमोर आणण्याचा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.
संभाजी महाराजांना आमचा विरोध नाही, पण त्यावरून सुरू असलेल्या राजकारणाला असल्याचे म्हणत मोठ्या शक्तीप्रदर्शनाला तयार राहा, असा इशाराच त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना दिला आहे. नामातंराच्या निर्णयानंतर इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी ट्विट करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
इम्तियाज जलील म्हणाले, या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोठा लढा उभा करणार असून, रस्त्यावर उतरणार आहे. जी 20 परिषदेच्या औरंगाबादेतील बैठकी दरम्यानच आंदोलन करणार असल्याचे इम्तियाज यांनी स्पष्ट केले. फडणवीस साहेब हा जिल्हा माझा आहे, कोणाच्या बापाचा नाही. कोणीही माझ्या शहरात येईल आणि हे नाव द्या ते नाव द्या अशी मागणी करेल, सध्या हेच धंदे सुरू आहेत का ?
जी 20 परिषदेच्या बैठकीच्या दिवशी मी जर विरोध केला तर काय करणार मी जगासमोर तुमचे घाणेरडे राजकारण उघडे करीन. फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांना सांगतो, मी मोठ आंदोलन उभारणार. नामांतराच्या निर्णयामुळे एक औरंगाबादकर म्हणून मला दुःख झाले आहे. ज्या लोकांना या निर्णयामुळे आनंद होत आहे, त्यांना सांगू इच्छितो सरकार तुमचे आहे म्हणून तुम्ही निर्णय घेतला आहे.
यापुढेही तुम्ही असे निर्णय घेत राहाल, पण ज्यांचे नाव शहराला दिले, त्यांच्या नावाच्या दर्जाप्रमाणे शहर सुधारणार आहात का? आठ दिवसांनी मिळणारे पाणी उद्यापासून दोन वेळा पाणी मिळणार आहे का? असा सवाल देखील इम्तियाज यांनी उपस्थितीत केला. औरंगाबाद आमचे शहर आहे, होते आणि राहील.
No comments:
Post a Comment