राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, February 9, 2023

गोंधवणी पुलाजवळील रस्त्याचे काम मार्गी लावावे, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा : अजहर शेख ?

( श्रीरामपूर ) - आजहर शेख - यांची मागणी गोंधवणी पुलाजवळील रस्त्याचे काम मार्गी लावावे, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा : अजहर शेख (एबीएस)
श्रीरामपूर : (इम्रान शेख प्रतिनिधी) शहरातील वाढती रहदारीमुळे रस्ते वारंवार खराब होणे, ड्रेनेज फुटणे, पावसाळ्यात पाणी साचणे इत्यादी समस्या उद्भवत असतात. श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील गोंधवणी रोड पुलाजवळील प्रभाग १ व १२ कडे जाणारा सुमारे १०० मीटर पर्यंतचा मुख्य रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावेत, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण अँड अँटी करप्शन ब्युरोचे महाराष्ट्र अध्यक्ष अजहर शेख यांनी केली आहे.   
निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २६ ऑगस्ट २०२२ रोजी रस्त्याचे खड्डे बुजविण्यासाठी सदर ठिकाणी झाडे लावा आंदोलन करून श्रीरामपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी गणेश शिंदे यांना लेखी निवेदन देण्यात आलेले होते. तरी देखील अद्याप पर्यंत कोणतेही काम झालेले नाही. परिसरातील नागरिकांची वारंवार तक्रार येत असून मुख्य रस्ता असल्याने सतत रहदारी व वर्दळ सुरु राहते. तसेच कायम त्याठिकाणी रस्ता खराब होत असल्याने अपघात घडणे, पावसाळ्यात पाणी साचणे, पाटाचे पाणी पाझरणे इत्यादी समस्या उद्भवत आहे. सध्या त्याठिकाणी गटाराचे काम चालू झाल्याने आणखी रस्ता फुटत चाललेला आहे.
 सदरचा रस्ता फक्त १०० मीटर पर्यंत असल्याने प्रशासन नेहमी दुर्लक्ष करीत आहे. याबाबत वारंवार लेखी व तोंडी निवेदन देण्यात आलेले आहे. तरी या कामामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेता अजितदादा पवार यांनी लक्ष घालावे यासाठी लेखी निवेदन देखील पाठविण्यात आलेले आहे. सदर ठिकाणी काहीही अपघात घडल्यास किंवा येत्या १५ दिवसात रस्त्याचे काम सुरु न केल्यास राज्य सरकारच्या विरोधात नागरीकासमवेत रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा अजहर शेख यांनी दिला आहे. 
यावेळी निवेदन देताना अल्तमश शेख, सौरभ जाधव, फैजान बागवान, नरेंद्र लोंढे, मोईज पठाण, सामाजिक कार्यकर्ते तौफिक शेख, राष्ट्रीय मानवाधिकारचे जिल्हाध्यक्ष जमीर पिंजारी, नोमान शेख, धीरज पवार, फरदीन शेख, बिलाल काकर, फरदीन शेख, प्रशांत मिसाळ, वैभव शेळके आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment