राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, March 1, 2023

ग्रामसेवक कर्तव्य ग्रामिण क्षेत्रात ली काम काज पार पाडत संयम व भान ठेऊन जनतेची भले करिता पुर्ण करावा लागतात ?


राष्ट्रीय संविधानिक अधिनियम (Article 243) ( नगर ) ग्रामसेवक कर्तव्य व कामे पंचायत राज्यव्यवस्थेत ग्रामपंचायतीला महत्वपूर्ण स्थान आहे. ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष संपर्क साधणारी 'लोकशाही संस्था' असे तिचे स्वरुप असल्याने तिला पंचायतराज संस्थेचा पायाभूत घटक मानले जाते. ग्रामपातळीवर विकास कामांचा विचार करता, सरपंच सोबत ग्रामसेवकालाही Gram Sevak महत्वाची भूमिका बजावावी लागते. ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीचा सचिव किंवा ग्राम विकास अधिकारी Village Development Officer अशा नावांनी देखील ओळखले जाते.
गावाचा विस्तार, लोकसंख्या आणि उत्पन्न लक्षात घेता, प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक किंवा एकापेक्षा अधिक ग्रामसेवकाची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्यापरिषदकडून नेमणूक केली जाते. त्याचे वेतन व भत्ते जिल्हा निधीतून दिले जाते.
महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ तसेच, ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ नुसार ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी हे काम पाहत असतात. या पदावर कार्यरत असतांना त्यांनी करावयाच्या कामांची कर्तव्यसूची Gram Sevak Kame शासनाकडून वेळोवेळी प्रसिद्ध केली जाते.
ग्रामसेवक कामे / कर्तव्ये व अधिकार: 
ग्रामसेवकाला गावाच्या विकासाच्या दृष्टीने, विकासकामांचे नियोजन, ग्रामपंचायत निधी, ग्रामसभा अहवाल, ठरावांची अंमलबजावणी, पत्रव्यवहार, शासकीय योजनेचे व्यवस्थापन इत्यादी सारख्या अनेक जबाबदाऱ्या व कर्तव्ये पार पाडाव्या लागतात.
• महाराष्ट्र ग्रामपंचात अधिनियम, १९५८ कलम ७ नुसार ग्रामपंचातीच्या सहकार्याने ग्रामसभा, मासिक सभा बोलाविणे, त्यांची नोटिस काढून संबधितांना देणे, सभेचा कार्यवृत्तांत लिहणे व सभेमध्ये झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी व पूर्तता करणे.
• मनरेगा व वित्त आयोग योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीचे उत्पन्न व इतर प्रशासकीय व जिल्हापरिषदकडून उपलब्ध होणारे अनुदान याचा विचार करून, ग्रामपंचायतीचे सरपंच व सभासद यांचे सहकार्य घेऊन, गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने गावविकासाचा पंचवार्षिक आराखडा तयार करणे.
पंचवार्षिक आराखडा तयार करीत असताना ग्रामपंचायतीमार्फत राबविल्या जाणाऱ्या विकास योजनेवर लाभार्थी निवडीसह जानेवारी महिन्यात वार्षिक कृती आराखडा तयार करून एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या ग्रामसभेपुढे कामाचे प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवणे.
• ग्रामसभेत प्रस्ताव मान्य झाल्यानंतर, सदर प्रस्ताव संबंधित खातेप्रमुख तांत्रिक अधिकारी यांच्याकडे मंजुरीकडे पाठवणे.
• ग्रामपंचायतीने विकास विषयक कामांवर केलेल्या कामाचा अहवाल तयार करणे आणि त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावणे.
टीप : ग्रामपंचायत अधिनियम कlलम (६०-क) (२) नुसार, ग्रामपंचायतीने विकासकामांवर केलेल्या कामाचा अहवाल तयार करण्यात आणि त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर लावण्यात ग्रामसेवकाने कसूर केल्यास, महाराष्ट्र जिल्ह्या परिषद जिल्हा सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९६४ च्या नियम ४ अन्वये संबंधित ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई केली जाण्यास पात्र असेल.
हे देखील वाचा : ग्रामपंचायतीला दरवर्षी किती निधी मिळतो?
• सरपंच, उपसरपंच यांना सभेच्या वेळी व आवश्यकता असेल तर कायदेविषयक सल्ला देऊन आपले मत मांडणे. 
• ग्रामपंचायतीकडील सर्व प्रकारची माहितींचे जतन करणे व सरपंचाच्या मदतीने गाव विकासाची कामे पार पाडणे.
• राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सर्व अभिलेख (Records) जतन, वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्ययावत (updated) ठेवणे. 
• शासनाने व जिल्हा परिषदेने बसविलेले विविध ग्रामपंचायत कर व फी यांची वसुली करणे. प्रत्येक चार वर्षांनी कर आकारणीत वाढ सुचविणे व ग्रामनिधीची संपूर्ण जबादारी सांभाळणे.
• ग्रामपंचायतीचे पत्रव्यवहार सांभाळने व ग्रामपंचायत व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून काम करणे.
• ग्रामपंचायत हद्दीतील जमीनी, रस्ते, इमारती, पडसर जागा व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोज
ग्रामपंचायतीचे पत्रव्यवहार सांभाळने व ग्रामपंचायत व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून काम करणे.
• ग्रामपंचायत हद्दीतील जमीनी, रस्ते, इमारती, पडसर जागा व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे दस्तऐवज, कराराचे दस्तऐवज अद्ययावत ठेवणे. ग्रामदर्शक नकाशा ग्रामपंचायतीमध्ये ठेवणे.
• जन्म-मृत्य, विवाह नोंदणी इत्यादी बाबत रजिस्ट्रेशन अक्टनुसार निबंधक/कुलसचिव म्हणून कर्तव्य पार पाडणे.
• ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोसायट्यदूध डेअरी, नागरी पत संस्था, स्थानिक महिला मंडळे, बालवाडी, तरुण मंडळे, बालवाडी, अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्व्य साधून गावात लोकोपयोगी विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे.
• ग्रामपंचायतीच्या पातळीवर शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान एक दिवस ग्रामपंचायतीमध्ये एकत्र आणून गावातील प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा करणे व त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही करणे.
• ग्रामपंचायत काही नियमांची व कायद्याची उल्लंघन करणारी कृती करत असेल किंवा तसे करावयाचे ठरविले असल्यास त्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करणे.
• निवडणूकांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना व आदेश यांचे काटेकोरपणे पालन करणे.
• ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे व त्यांच्याकडून कर वसुली करण्याची जबाबदारी पार पाडणे. तसेच, त्यांच्या रजेच्या हिशेब, भविष्य निर्वाह निधी, बोनस इत्यादी शासनाच्या कायद्यानुसार व नियमानुसार देणे.
• सेवा हमी कायद्यानुसार दाखले विहित मुदतीत देणे.
• गावातील दारिद्ररेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे.

--------------------------------------------------
===================================

आई आर मिर्जा.(संपादक) शक्तीचा संचार ,


























No comments:

Post a Comment