राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, March 5, 2023

सर्वोच्च न्यायलय नवि दिल्ली येथून नामकरण'ची याचिका फेटाळली ?

(नवी दिल्ली) - वृत्तसेवा - समाचार - अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या एका याचिकेसंबंधी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारत याचिका फेटाळली. उपाध्याय यांनी विदेशी आक्रमणकर्त्यांच्या नावांवर ठेवण्यात आलेल्या अनेक ऐतिहासिक स्थळांच्या नावांत बदल करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. अशाप्रकारची याचिका दाखल करून देशातील वातावरण तापवत ठेवायचे आहे का? असा सवाल न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांनी उपस्थित केला.
या मुद्द्याला जिवंत ठेवून आपण देशातील वातावरण तापवायचे आहे का? एका विशेष समाजाकडे बोट दाखवण्यात आले आहेत. समाजाच्या एका विशेष वर्गाला तुम्ही खाली दाखवत आहात. भारत एक धर्मनिरपेक्ष देश तसेच व्यासपीठ आहे, अशा शब्दात न्या. जोसेफ यांनी उपाध्याय यांना सुनावले. हिंदू धर्म
जीवनाची एक पद्धत आहे. भारताने त्यामुळे सर्वांना आत्मसात केले आहे. याचमुळे आम्ही सर्व एकत्र राहण्यास सक्षम आहोत. इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा, या धोरणामुळे समाजात राग निर्माण झाला आहे, अशी भावना न्या. नागरत्ना यांनी व्यक्त केली.असलेल्या अनेकऐतिहासिक  नाव
वेद आणि पुराणांमध्ये उल्लेख स्थळांचे विदेशी आक्रमणकर्त्यांच्या नावावर ठेवण्यात आल्याचे उपाध्याय यांनी याचिकेतून निदर्शनात आणून दिले होते. देशात लोधी, गजनी, गोरीच्या नावावर रस्ते आहेत. पांडवांच्या नावावर एकही रस्ता नाही. इंद्रप्रस्थचे निर्माण युधिष्ठिरने केले होते. ज्या व्यक्तीने
शहराला लुटले त्याच व्यक्तीच्या नावावर फरिदाबादचे नाव ठेवण्यात आले. देशासोबत औरंगजेब, लोधी, गजनी यांचा का संबंध? असा सवाल याचिकेतून उपाध्याय यांनी उपस्थित केला होता.
धार्मिक पूजेचा रस्तांसोबत काही घेणे-देणे नाही. मुगलसम्राट अकबर यांनी विविध समाजात सद्भावना बनवण्याचे लक्ष ठेवले होते, असे न्या. जोसफे यांनी नोंदवले. इतिहासातून आक्रमण' कशाप्रकारे दूर केले जाऊ शकते? असा सवाल न्या. नागरत्ना यांनी उपस्थित केला. दरम्यान, धर्मनिरपेक्ष प्रकृती तसेच बंधूभावावर मत व्यक्त करीत खंडपीठाने याचिका फेटाळली.













No comments:

Post a Comment