(मुंबई) - प्रतिनिधि - वार्ता महाराष्ट्रात सध्या राजकीय उलाढालींच्या चर्चा असतानाच राज्यपाल रमेश बैस यांचा २६ व २७ रोजीचा नाशिक आणि अहमदनगर दौरा रद्द करण्यात आला आहे. राज्यातील सत्तांतराच्या नाट्यात महत्त्वाची भूमिका असणाऱ्या राज्यपालांचा दौरा असा अचानक रद्द झाल्याने राजकीस तर्कविर्तकांना उधाण असेही लावण्यात येते काल राहुरी परिसरात हवामान चे वारे वादाळाने भराड ल्याने अनेक ठिकाणावर पाऊस व सुसाट वाऱ्यामुळे निरनिराळ्या ठिकाणवार झाडें पडली अस्थांना निदर्शनास घेतले प्रशासकीय सूत्रकडनं राज्यपालच्या यंत्रनेला कळवले असून बहुतेक दौरा रद्द करण्याचे कारण असु शकतात असा ही अंदाज व्यक्त करण्यात येते आहे.
नाशिकसह अहमदनगरमध्ये राज्यपालांच्या उपस्थितीतअनेक
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, हा दौरा का रद्द झाला? याबाबत अधिकृत माहिती समजू शकली नाही. राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्यपाल बैस नाशिकला येत असल्याने प्रशासनाने दौऱ्यासाठी जय्यत तयारी केली होती. त्यात त्र्यंबकेश्वर येथे पहिने गावाला भेट देत राज्यपालांकडून हे गाव दत्तक घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्याशिवाय कालिदास कलामंदिर येथे नाशिक
एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव सांगता समारंभास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. तसेच अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी, नेवासा तालुक्यातील देवगड आणि राहुरीच्या महात्मा फुले विद्यापिठाला भेट देणार होते. मात्र, त्यांचा नाशिक आणि अहमदनगर दौरा अचानक रद्द झाला असून, ते राजभवन मुंबईत उपलब्ध राहणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यानंतर राजकीय वर्तुळांत चर्चांना उधाण आले असून, राजभवनाकडे येणाऱ्या राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींकडे माध्यमांचे लक्ष लागलेआहे.
------------------------------------------------------------------------=====================================
राजप्रसारित...संपादक...✍️✅️🇮🇳...
=====================================------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment