राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Saturday, April 29, 2023

बृज भूषण यांच्या विरोधात कुस्ती पट्टू आंदोलन कायम करणार दिल्ली पोलीस FIR दाखल करण्याचे तयारीत ?

(नवी दिल्ली) - न्यूज- एजन्सी भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेले बृजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. सर्वोच्च न्यायालयात दिल्ली पोलिसांकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड व न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठापुढे याबाबतची माहिती सादर केली. पोलिसांनी उचललेल्या पावलांबावचे मोठे पोस्टर्स कुस्तीपटूंनी आंदोलन स्थळावर ठळकपणे दिसेल, असे उभारले आहे. मात्र तरीही कुस्तीपटू
आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. सात महिला कुस्तीपटूंनी आपल्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपावरून नुकतीच सर्वोच्च न्यायालयात याचिक दाखल केली आहे. न्या. चंद्रचूड व न्या. नरसिंहा यांच्या खंडपीठाने गत सुनावणीत दिल्ली सरकारसोबत पोलिसांना नोटीस पाठवली होती. प्रकरण गंभीर असूनही सिंग यांच्याविरोधात एफआयआर का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल खंडपीठाने त्यावेळी उपस्थित केला होता. त्यानुसार दिल्ली पोलिसांकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यासाठी पाऊल टाकल्याची माहिती खंडपीठास दिली गेली. खंडपीठाने अल्पवयीन असलेल्या
याचिकाकर्तीला सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले. सॉलिसिटर जनरल यांनी खंडपीठाला सांगितले की,आरोप दखलपात्र गुन्हा दर्शवत असल्याने पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल कुस्तीपटूच्या बाजूने हजर झाले आणि त्यांनी सीलबंद लिफाफ्यात प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर ठेवले. यामध्ये अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांना धमकीचे आकलन करण्याचे आणि अल्पवयीनला पुरेशी सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश देतो. ५ मे रोजीच्या पुढील सुनावणीला प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश खंडपीठाने दिले.
भाजपचे खासदार असलेल्या सिंग यांना सर्व प्रकारच्या पदावरून हटवण्यात येईपर्यंत आपण आंदोलन कायम ठेवणार असल्याचा निर्धार कुस्तीपटूंनी केला आहे. विजयाच्या दिशेने पहिली वाटचाल सुरू आहे. मात्र तरीही विरोध कायम राहणार, असे साक्षी मलिक म्हणाली. पोलिसानी
दाखल केलेल्या तक्रारीवर विश्वास नाही. निरीक्षण करणार आणि त्यानंत आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेणार. त्यांना तुरुंगात पाहायचे आहे. तसेच त्यांना सर्व पदावरून हटवण्याची गरज आहे, अन्यथा तपास प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असे विनेश फोगाट म्हणते.
-----------------------------------------------------========================================================================
सा : राज प्रसारित...कार्यकारी...संपादक भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...संकलन... वार्ता...
-----------------------------------------------------========================================================================
























No comments:

Post a Comment