भाग्ये उजळा श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विखे- मुरकुटे - ससाणे युतीने एकहाती निर्विवाद वर्चस्व मिळविले. या गटाने १८ पैकी १७ जागांवर विजय मिळवून सत्ता ताब्यात ठेवली. निवडणुकीत आ. लहू कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, शेतकरी संघटनेचे ऍंड अजित काळे आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) सचिन बडधे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाचा पराभव झाला. व्यापारी मतदार संघातून किशोर एकनाथ कालंगडे हे अपक्ष
उमेदवार विजयी झाले. राहाता बाजार समितीच्या निवडणुकीत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सर्वच उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे. राहाता बाजार समितीत ना.विखे पाटील यांच्या गटाची सत्ता होती. पहिल्यांदाच झालेल्या निवडणुकीत जनसेवा मंडळाने मोठा फरकाने विजय प्राप्त केला आहे. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोर यांनी विखेंच्या बालेकिल्ल्यात विधानसभा वगळता पहिल्यांदाच तालुका पातळीवरील निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला. विरोधी महाविकास आघाडीचा ४०० ते ४५० मतांच्या फरकाने पराभव झाला.
कोपरगावात काळे-कोल्हेंची सहमती एक्सप्रेस
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गत निवडणुकीत 'सहमती एक्सप्रेस' धावली होती. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. याही वेळी 'सहमती एक्सप्रेस' धावली होती. पण शिवसेनेच्या ठाकरे गट आणि काँग्रेसने यावर्षी पॅनेल निवडणुकीत उतरविला. पण मतदारांनी 'सहमती एक्सप्रेस' ला पसंती दिली. या निवडणुकीत आ. काळे गट ७, कोल्हे ७, २ औताडे, २ परजणे गट 9 अशा १८ उमेदवारांनी विजय मिळवत झेंडा फडकावला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ पैकी ३ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत.
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राहात्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाने दणदणीत विजय संपादित केला. कोपरगावात मागील प्रमाणेच आ. काळे आणि कोल्हे गटाच्या सहमती एक्सप्रेसला मतदारांनी यंदा पसंती दिली. श्रीरामपुरात ना. विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे - जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या गटाने एकहाती सत्ता हस्तगत केली. नेवाशात विरोधकांचा सुफडासाफ करत माजी मंत्री आ. शंकरराव गडाख गटाने गड राखला. अकोलेत महाविकास आघाडीने सत्ता हस्तगत केली आहे.
-----------------------------------------------------============================================================================================================
सा : राज प्रसारित... कार्यकारी.... संपादक... भगवंत सिंघ प्रितम सिंघ बत्रा... शब्द ✍️✅️🇮🇳...रचना...संकलन...वार्ता...
============================================================================================================------------------------------------------------------
No comments:
Post a Comment