(अहमदनगर) - प्रतिनिधी - वार्ता -
जिल्हा पोलिस दलात महत्वाची शाखा असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेशन (LCB) निरिक्षक पदी दिनेश आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीने (LCB) ला एक सक्षम अधिकारी मिळाला आहे. त्यांनी यापूर्वी बीड एलसीबीची यशस्वी धुरा संभाळली आहे. त्यांच्या कामगिरीवर 'फिदा' होत पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी त्यांची नियुक्ती एलसीबीच्या निरीक्षकपदी केली आहे.
दरम्यान बदली होवूनही सोडले न गेलेले निरीक्षक अनिल कटके यांना आता सोडण्यात आले असून त्यांना आता नियंत्रण कक्षा हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यांना अजूनही ठेवले जाणार अशी चर्चा चांगलीच झडली होती, मात्र योग्य वेळ येताच अधिक्षक ओला यांनी निरीक्षक कटके यांच्या जागी निरीक्षक आहेर यांना संधी दिली आहे. त्यांच्या रूपाने एलसीबीला "'सक्षम '"अधिकारी मिळाला आहे.
आहेर बीड जिल्यात एल.सी.बी.च्या निरीक्षकपदी असताना उल्लेखनीय कामगिरी त्यांची असून त्यांच्या कामगिरीची दखल अधिक्षक राकेश ओला यांनी घेतली आहे.निरीक्षक आहेर यांना नुकतेच केंद्रीय गृहमंत्रालयाचे 'सर्वोत्कृष्ट अन्वेषण पदक' राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.बीड येथील तपासात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले आहे. निरीक्षक आहेर जिल्ह्यात बदलून आल्यानंतर त्यांनी सुरूवातीला बेलवंडी व नंतर सायबर पोलीस ठाण्याचा कारभारही यशस्वी दैइत्व पूर्वक त्यानी संभाळले आहे
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संपादक : 🖊️✅️ 🇮🇳 राजु मिर्जा
कार्यकारी संपादक :,, ✍️✅️ 🇮🇳 भगवंत सिंग प्रितम सिंघ बत्रा
सह : संपादक : ✍️ ✅️ 🇮🇳 रणजित बत्रा
उप : संपादक : ✍️ ✅️ 🇮🇳 जितेश बत्रा
इंडियन पिनल कोर्ट :कायदे तज्ज्ञ : तथा राजस्तर सलागार समिती : प्रमुख ऍडव्होकेट : ✍️✅️ 🇮🇳 आर के चौधरी पाटील, B A L L B......
=====================================
==========================================================================
No comments:
Post a Comment