( राहता ) - प्रतिनिधि - वार्ता - शिर्डी शहरात वाढत्या मोबाईल चोरीला आळा घालण्यासाठी शिर्डी पोलिसांनी तांत्रिक प्रणालीचा अवलंब करून मोबाईल चोरांना गजाआड करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. त्याआधारे अशा पद्धतीने चोरी करणार्या 3 मोबाईल चोरांना पकडन्यास शिर्डी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत तीन चोरट्यांकडून अनेक मोबाईल जप्त करण्यात आले
असून त्याची अंदाजे किंमत 2 लाख 88 हजारअसल्याची माहिती शिर्डी पोलिसांनी दिली.
अधिक माहिती अशी, शिर्डी शहरात दुचाकी चोरी प्रकरणात अटकेतील तीन आरोपींची कठोर चौकशी केली असता त्यांनी 11 नामांकीत कंपनीचे अंदाजे 2 लाख 88 हजार रुपये किंमतीचे विविध मोबाईल विविध ठिकाणाहून चोरी केल्याची कबुली दिली. सदरचे मोबाईल देखील जप्त करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल संदीप गडाख, संतोष गोमसाळे, नितीन शेलार, अजय अंधारे, राजेश बिरदवडे यांनी केली. चोरी प्रकरणातील आरोपी अनिल अण्णासाहेब मनतोडे गणेशनगर, सनी शिवाजी माळी सावळीविहीर, विशाल माणिक पवार माहेगाव देशमुख या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर भादंवि 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सह...संपादक...रंजित बतरा...शब्द...✍️✅️🇮🇳...रचना...
संकलन...वार्ता...
No comments:
Post a Comment