( अहमदनगर )
सार्वजनिक बांधकाम खात्यात गुणवता पूर्वक रस्ते इमारती दर्जेदार पारदर्शक कामकारणारे यांना उत्कृष्ठ अभियंता पुरस्कार जाहीर होऊन मिळाले अस्थांना दिनांक 30/04/2023श्री कुलकर्णी अधिक्षक अभियंता पदा वरून सेवा निवृत्ती कार्य सेवा मुक्त झाले तेंच्या शासकीय कार्य सेवेत पार पडल्याली कामे...
नवीन जिल्हाधिकारी कार्यालयइमारत सामाजिक न्याय भवन, निंबळक व अरणगाव येथील रेल्वे उड्डाणपूल, नगरचा बायपास, अशा नगरच्या वैभवात भर टाकणाऱ्या अनेक वास्तू उभ्या करणारे सार्वजनिक बांधकामचे अधीक्षक अभियंता जयंत धोंडोपत उर्फ जे. डी. कुलकर्णी हे नियत वयोमानानुसार नुकतेच शासकीय से वेतून सेवानिवृत्त झाले
आहेत.कुलकर्णी यांनी आपल्या शासकीय सेवेची सुरुवात सहाय्यक अभियंता श्रेणी - १ या पदावरून मार्ग प्रकल्प उपविभाग क्र. २ नगर येथूनच केली होती. त्यानंतर त्यांनी नांदेड, गंगाखेड, औरंगाबाद येथे कार्य केले. कार्यकारी अभियंता म्हणून त्यां लातूर, अकोला, पेण जि. रायगड, नगर, पुणे येथे कार्य केले. तर अधीक्षक अभियंता म्हणून रत्नागिरी व नगर येथे कार्यरत होते शासनाच्या आशियाई विकास
बँकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते प्रकल्पाअंतर्गत राज्याचे समन्वय अधिकारी म्हणून केलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या सेवाकाळात शासनाच्या विविध समित्यावर त्यांनी काम केले. त्यांना सेवापूर्तीनिमित्त नुकताच निरोप देण्यात आला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, नव्यानेच पदभार स्वीकारलेले अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, दीपक दरे, उदय मुंढे, अनिल कोठारी अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार आदी उपस्थित होते.
...राजु मिर्जा...🖊️✅️🇮🇳...
No comments:
Post a Comment