राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, May 28, 2023

नव्या संसद भवनाचे आज होत आहे लोकार्पण अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन ?

( नवी दिल्ली ) - न्यूज - एजन्सी - वृत्तसंस्था वैविध्याने नटलेल्या भारताच्या कानाकोपऱ्यातून मागवलेल्या साहित्याने भारताची नवीन संसद नटली आहे. त्यात महाराष्ट्राचाही मोठा वाटा आहे. इमारतीत वापरण्यात आलेले अस्सल सागवान नागपूरहून मागवण्यात आले आहे तर अशोक चिन्हासाठी लागणारे साहित्य छत्रपती संभाजीनगरहून मागवले गेले आहे. संसद भवनातील सारे फर्निचर महाराष्ट्राच्या राजधानीत तयार करण्यात आले आहे.
नवीन संसद भवनाची उभारणी करताना 'एक भारत श्रेष्ठ भारत' या उक्तीनुसार कामांची विभागणी केली गेली. समग्र देशाचा या संसद भवनात सहभाग असायला हवा या हेतूने ठरवून देशाच्या कानाकोपऱ्यातून साहित्य मागवले गेले. अगदी बांबूपासून ते दगडी कोरीव जाळ्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट ज्या भागाचे वैशिष्ट्य आहे तेथून तयार 
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नवी दिल्ली : संसद भवनाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या भव्य-दिव्य आणि देखण्या वास्तूचे छायाचित्र. (फोटो :पीटीआय)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
करून मागवण्यात आली.
नवीन संसद भवनात देशाची वैविध्यपूर्ण संस्कृतीची झलक बघायला मिळणार आहे. जणू काही
साऱ्या देशाने मिळून ही इमारत उभारली आहे. तीन वर्षांच्या या बांधकामात देशाच्या कानाकोपऱ्यातून साहित्य मागवण्यात आले आहे....

*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*
संसदेच्या नव्या वास्तूचे स्वप्न नरसिंह राव सरकारमध्ये असताना पाहिले होते. आराखडाही तयार केला होता. पण ते पुढे बराच काळ सत्तेत असूनही पूर्ण करू शकलो नाही. मोदींनी ते पूर्ण करून दाखविले, त्याचे स्वागतच व्हायला हवे. -गुलाम नबी आझाद, डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्ष
*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*%*
> कोणत्या राज्यातून काय आले<

• नागपूर : बांधकामासाठी लागणारे सर्व सागवान

• औरंगाबाद 
 : अशोक चिन्हाचे साहित्य

• मुंबई : या इमारतीतील सारे फर्निचर तयार झाले

• त्रिपुरा : फरशीसाठीचे बांबू

मिर्झापूर (उत्तर प्रदेश) : शानदार गालिचे

• सरमथुरा (राजस्थान) : लाल-पांढरे वाळूचे दगड

• उदयपूर : भगवा-हिरवा दगड

• लाखा (अजमेर) : लाल ग्रॅनाईट • अंबाजी : पांढरा संगमरवर

• दमण-दीव : फॉल्स सिलिंगसाठी स्टीलचे सांगाडे

• राजनगर (राजस्थान), नोएडा : दगडी जाळीचे काम

इंदूर (मध्य प्रदेश) : अशोक चक्र

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दुपारी १२ वाजता संसदेवी नवीन वास्तू देशाला समर्पित करतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार तसेच इतर नेते कार्यक्रमात यावेळी उपस्थित राहतील.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

२१ विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. २५ राजकीय पक्ष या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.
होणार आहे. सकाळी महात्मा गांधीच्या पुतळ्या जवळ काही धार्मिक विधी केले जातील. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष दोन सत्रांत उद्घाटन सोहळा राज्यसभेचे सभापती सहभागी होतील,
या पक्षांचा बहिष्कार शिवसेना उद्धव ठाकरे) काँग्रेस :राष्ट्रवादी कॉग्रेस, डीएमके, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, भाकप, आमुमो, सीपीआय (एम), आरजेडी, एआयएमआयएम, इंडियन युनियन मुस्लिम लीग, नॅशनल कॉन्फ्रेन्स : आदी पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सत्कार करताना मदुराई मठातील साधू.
{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}<>{}
Parliament Building Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२८ मे) देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. यावेळी एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात पंतप्रधान मोदींसोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लादेखील उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनख उपस्थित नव्हते, त्यामुळे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी नवीन संसदेत
 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचा संदेश वाचून दाखवला. द्रौपदी मुर्मू यांचा संदेश वाचताना हरिवंश सिंह म्हणाले, नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा हा प्रसंग भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. नवीन संसद भवनाचे उद्घाटन हा भारताच्या उत्तरेकडील बिंदूपासून दक्षिणेकडील बिंदूपर्यंत आणि पूर्व सीमेपासून पश्चिम किनारपट्टीपर्यंत विविधतेत राहणाऱ्या सर्व देशवासियांसाठी अभिमानाचा आणि अतुलनीय आनंदाचा प्रसंग आहे. भारतीय संसदेला आपल्या मनात विशेष स्थान आहे. संसद ही आपल्या समृद्ध लोकशाही परंपरांचा प्रकाश स्तंभ आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांचे भाषण वाचून दाखवताना हरिवंश सिंह म्हणाले, २.५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन आधुनिक संसदेची उभारणी झाली, ही आनंदाची बाब आहे. हा एक अविस्मरणीय क्षण आहे आणि यासाठी पंतप्रधान मोदींचे आभार. भारतीय लोकशाहीच्या अभूतपूर्व विकास प्रवासाच्या या महत्त्वाच्या ऐतिहासिक क्षणाबद्दल आणि अभिमानास्पद क्षणाबद्दल संपूर्ण देशाचे अभिनंदन करताना मला खूप आनंद होत आहे. ही नवीन संसद भविष्यातही आपल्या विकासाची साक्षीदार असेल.
----------------------------------------------------
===================================
: - राजु मिर्जा... 🖊️✅️🇮🇳...(+919730595775)...
===================================
----------------------------------------------------


























No comments:

Post a Comment