राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, May 28, 2023

लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फादर ज्यो गायकवाड संविधान रत्न पुरस्काराने सन्मानित श्रीरामपूर ?

( श्रीरामपूर ) - प्रतिनिधि - वार्ता -
तालुक्याचे भूमिपुत्र असलेले फादर ज्यो गायकवाड गेल्या अनेक वर्षांपासून धर्मगुरू म्हणून येशू संघात कार्य करीत आहेत. ते मराठीचे गाढे अभ्यासक असून निरोप्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ख्रिस्ती मासिकाचे ते अनेक वर्ष संपादक राहिलेले आहेत.
ते ख्रिस्ती अस्मिता साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व प्रगत पदवीधर संघटनेचे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे उत्तम साहित्यिक म्हणूनही त्यांना सर्वत्र ओळखले जाते. सध्या ते येशू संघा अंतर्गत अहमदनगर सह बीड जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट सुपिरियर म्हणूनही काम पाहत आहेत.
फादर ज्यो यांनी धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही भरीव कामगिरी केलेली आहे. त्यांच्या सेवा कार्यात त्यांनी अनेक दीन-दुबळे, कष्टकरी व गरजूंची सर्वतोपरी सेवा केलेली आहे. "करशील जे गरीबांसाठी होईल ते माझ्यासाठी" या प्रभू येशूच्या शिकवणुकीप्रमाणे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मिशन कार्य केलेले आहे. संविधानास अभिप्रेत असलेले हे कार्य फादर ज्यो यांच्या हातून घडल्याने नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी या दिल्ली येथील संस्थेने याची दखल घेतली व २७ मे २०२३ रोजी दिल्ली येथे संपन्न झालेल्या मायनॉरिटी राष्ट्रीय अधिवेशनात दिल्लीचे आर्च बिशप अनिल कुटो, खासदार इम्तियाज जलील, खासदार कृष्णा व खासदार गौतम यांच्या हस्ते संविधान रत्न पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
 पुरस्कार प्राप्त फादर ज्यो यांच्यावर धार्मिक, सामाजिक, राजकीय व साहित्य क्षेत्रातील सर्वांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

*समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर*


No comments:

Post a Comment